(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आम्ही खरेच राक्षस झालो का ?

    भारताला स्वतंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली पण पिण्याच्या पाण्या सारखा मुलभुत प्रश्न आम्ही सोडवु शकलो नाहीत तर असे स्वातंत्र्य मिळुन काय उपयोग झाला

  • नवरात्रारंभ

    शारदीय नवरात्राचा प्रारंभ होत आहे. घटस्थापना असे या दिवसाचे महत्त्व संस्कृत भाषेत सांगता येईल आणि आजपासून घट बसणार आहेत, असे मराठीत म्हणता येईल.

  • “जोखीम”

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  • अहंकाराची लुडबुड ! (बेवड्याची डायरी – भाग ३९ वा)

    अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..

    तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..

    एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..
    अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले .

    जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..

    रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण !

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • द रशियन कनेक्शन : रशिया टुरची नवी ओळख

    जगातला सर्वात मोठा देश रशिया व ह्याच रशिया टुरसाठी आपण खरेच काय पाहतो ? रुशिया टूर करायची असल्यास आपण काय पाहतो तर, मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग. ह्या रशियाच्या खऱ्या दोन राजधान्या होत, पण ह्यासाठी आपण किती दिवस देतो तर प्रत्येकी दोन किंवा तीन  दिवस ! पाच दिवसाच्या रशिया टूर मध्ये फक्त भुज्याला शिऊन येतो. आणि रशिया पर्यटन म्हणजे  केवळ मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग पर्यंतच सीमित नाही.

  • किडा

    माणसाच्या मनात मरुत देहाबाबत जी भिती असते ती या कथेत दाखवली आहे.ही भयकथा आहे.

  • यमुनाकाठी दैवीय शांती यज्ञ आणि आसुरी अहिष्णुता

    द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.

    केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग. काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच. सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

    शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे, रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.

    या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती. श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते. कचर्याने भरलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली. पण प्रत्यक्ष राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).

    शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल. असो.

  • माझा अन्न सत्याग्रह.. (बेवड्याची डायरी – भाग ३५ वा)

    काल रात्रभर नीट झोप लागलीच नाही ...पोटात जेवण नाही म्हणून असेल कदाचित ..शिवाय डोक्यात राग होताच मला काल घरी न सोडल्याचा ..सकाळी मी पीटी करता उठलोच नाही ..मुद्दाम तोंडावर चादर घेवून पडून राहिलो ..कार्यकर्ता उठवायला आला तेव्हा ..माझी तब्येत बरी नाही असे कारण सांगितले ..शेरकर काका मला दोन वेळा उठवण्याचा प्रयत्न करून गेले... मी त्यानाही दाद दिली नाही ..' ओ गांधी बाबा उठा की आता चहा तरी घ्या ' तिसऱ्यांदा शेरकर काका जवळ येवून मला उठवू लागले ..त्यांनी मला गांधी बाबा नावाने मारलेली हाक खटकलीच ..काल पासून मी अघोषित उपोषण सुरु केले होते म्हणून ते मला गांधीबाबा म्हणत आहेत हे जाणवले ..मी रागाने उठून बसलो व त्यांना म्हणालो ' काका तुमचे इतके वय झालेय ..मात्र शहाणपणा काडीचा नाहीय तुमच्यात ' यावर ते नेहमीप्रमाणे मिशीत हसले ..त्यांच्या हातात चहाचे तों ग्लास होते ..' जाऊ दे यार ..वयाचा आणी शहाणपणाचा काही संबंध नसतो ..चहा तर घे ..' माझ्या बाजूला बसकण मारत त्यांनी बिस्किटाचा पुडा उघडला .. भूक लागली होती ..परंतु माझे अघोषित उपोषण मात्र सोडायचे नव्हते मला ..मी शेरकर काकांकडे न पाहता तोंड फिरवून बसलो ..' अरे जाऊ दे नको घेवूस चहा ..पण बोल तरी जरा माझ्याशी ' काका चिवटपणे मला चिकटून राहिले ..

    " विजयभाऊ अहो ..असा राग चांगला नसतो आपल्या माणसांवर ..असे मनाविरुद्ध घडतच असते ..जेवणावर राग काढून काही साध्य होत नाही ..इथले कार्यकर्ते अजून एक दिवस वाट पाहतील तुम्ही जेवता की नाही याची ..मग सरळ डॉक्टरना बोलावून तुम्हाला सलाईन लावतील ..तुम्ही जास्त विरोध केलात तर बांधून ठेवून सलाईन लावतील " हे ऐकून मी विचारात पडलो .. जरा अंतर्मुख झालो ..कालचा सगळा प्रसंग डोळ्यासमोरून तरळून गेला माझ्या ...काल सरांनी सर्वाना नेहमीप्रमाणे सूचना दिली होती ..' आज पालकांच्या भेटीचा दिवस आहे ..ज्या लोकांना इथे येवून दहा दिवस पूर्ण होत झालेले आहेत ..तसेच वार्डातील ज्यांचे वर्तन नीट आहे अशा लोकांच्या पालकांना आम्ही भेटीस परवानगी दिली आहे ...मला माहित आहे की इथे व्यसनमुक्ती केंद्रात रहाणे म्हणजे बहुतेक लोकांना शिक्षा वाटत असेल ..कारण इथे बहुतेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतात ..पत्येक वेळी तुम्हाला अॅडजेस्टमेंट करावी लागतेय ..

    व्यसनी व्यक्तीच्या हट्टी आणि जिद्दी स्वभावात बदल करण्यासाठी ते आवश्यकच असते...मात्र येथे मनासारखे वागता येत नाही म्हणून सर्वांनाच आपण लवकरात आपल्या घरी जावे असे वाटते ..इथे कोणालाही कायमचे राहायचे नाहीय ..उपचार पूर्ण झाल्यावर सर्वाना घरी जायचेच आहे .. व्यसनमुक्ती साठी आणि उज्वल भविष्यासाठी आपल्याला येथे आणले गेलेय ..यावे लागलेय ...किवां काही स्वतःहून आलेत म्हणा हवे तर ..पण पालक आपल्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ..आपल्यात घडणारे बदल पाहण्यासाठी भेटायला येतात ..कोणीही आपल्या पालकांजवळ मला घरी घेवून चला म्हणून हट्ट करू नका ..त्यातून हेच सिद्ध होईल कि अजूनही तुमच्यात सुधारणा झालेली नाही ..उलट हट्ट केला तर पालक नाराज होऊन तुमचे इथले वास्तव्य वाढवण्याचा विचार करतील हे ध्यानात ठेवा ..बाकी आपण सुज्ञ आहातच ' ....

    मी मनातून आज अलका भेटीला येईल म्हणून आनंदलो होतो ..तिच्याकडे घरी ने असा हट्ट करण्याचा माझा अजिबात विचार नव्हता ..प्रत्यक्ष संध्याकाळी ती भेटीला आली तेव्हा तिचा प्रफुल्लीत चेहरा पाहून मला भरून आले होते ..मला पाहताक्षणी तिचे चमकलेले डोळे सांगून गेले कि ती अतिशय आतुरतेने माझ्या भेटीची वाट पाहत असावी .. जवळ बसताच तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली .. बोलताना ती इतकी निष्पाप दिसत होती की तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम मी पाहतच राहिलो ' अहो लक्ष कुठेय तुमचे ..मी काय म्हणतेय ऐकताय ना ' असे म्हणत तिने मला भानावर आणले ..म्हणाली मुले पण मागे लागली होती आम्ही पण येतो बाबांना भेटायला म्हणून पण मीच नको म्हंटले ..पुढच्या वेळी नक्की आणीन मुलांना ..मग तिने माझी चौकशी सुरु केली ' कसे वाटतेय इथे ? जेवण कसे आहे ? सगळ्या उपचारात भाग घेता का ? वैगरे ..मी जमेल तशी उत्तरे देत होतो ..खरे तर तिच्याकडे मला घरी ने असा हट्ट करण्याचा माझा कुठलाच विचार नव्हता ..इथले सगळे नीट शिकूनच डिसचार्ज घ्यायचा हे मी ठरवले होते ..तरीही कसा कोण जाणे अलकाशी बोलता बोलता माझा विचार बदलत गेला ..पहिल्यांदाच मी पत्नी आणि मुलांपासून इतके दिवस दूर राहत होतो ..सुरवातीचे एक दोन दिवस वगळता मी इथे चांगल्या पद्धतीने जुळवून घ्यायला लागलो होतो .. इथे शिकवल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी माझ्या फायद्याच्या आहेत हे देखील लक्षात आले होते ..पण अलकाशी बोलता बोलता वाटले ..दहा दिवस खूप झालेत आता ..यापुढे आपण दारू अजिबात पिणार नाही याची खात्री वाटू लागली होती मला..उगाच अजून जास्त दिवस राहून फारसे काही साध्य होणार नाहीय .. ..

    सहज एक चान्स घ्यावा म्हणून अलकाला म्हणालो ' आता मला पटलेय चांगलेच कि दारूमुळे आपले सर्वांचेच किती नुकसान केलेय ते ..यापुढे मी अजिबात प्यायची नाही असे ठरवलेय ..तू सरांना सांगितलेस तर ते मला डिसचार्ज सुद्धा देतील ' माझे हे बोलणे ऐकून अलका एकदम स्तब्ध झाली ...नुसतीच माझ्या तोंडाकडे पाहत राहिली ..कदाचित माझ्या मनाचा वेध घेत असावी ..म्हणाली ' अहो ..पूर्ण कोर्स केल्याशिवाय किवा सरांनी सांगितल्याशिवाय तुम्हाला येथून नेता येणार नाहीय असे कालच सरांनी मला फोनवर सांगितलेय ..' ' म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाहीय तर अजून ? ..थोडे दुखावला जावून मी विचारले ..' इथे विश्वासाचा प्रश्नच नाहीय हो ..तुम्हाला डिसचार्ज देणे योग्य राहील कि नाही हे ठरवणारी मी एकटीच नाहीय ..सरांची परवानगी लागते त्यासाठी ..आपण आता बरे झालोत हे आजारी व्यक्तीने नाही तर त्याच्या उपचारकाने ठरवले पाहिजे ना ? '

    " अग पण ..मी इथे स्वताच्या मर्जीने आलोय ..शिवाय आता मी सांगतोय ना की मला बरे वाटतेय .अजिबात दारूची आठवण येत नाहीय ..यापुढे मी अजिबात पिणार नाही ..तुझी शपथ " असे म्हणत मी तिच्या डोक्यावर हात ठेवला ..यावर अलका गडबडली ..आपण तिची शपथ घेतली की ती भावनाविवश होते हे मला चांगलेच ठावूक होते ..मग म्हणाली ..." अहो पण या पूर्वी पण तुम्ही अनेकवेळा माझ्या शपथा घेतल्या आहेत तरी दारू सोडली नाही " हे ऐकून मला राग येवू लागला.." पण त्या वेळी मी उपचार घेतले नव्हते म्हणून शपथ मोडल्या " मी काहीतरी समर्थन देवू लागलो." ... " बरे पाहू मी विचारते सरांना ." .असे म्हणून पटकन उठून बाहेर ऑफिसात गेली ..मी वार्डातच बसून तिची वाट पाहू लागलो ..साधारण दहा मिनिटांनी परत आली ..' सरांनी नाही म्हंटले आहे ..' असे म्हणत खाली मान घालून बसली ..

    मी इथे आल्यापासून इतका चांगला सहभाग घेतोय सगळ्या उपचारात तरीही सरांनी माझ्या डिसचार्ज करिता नकार द्यावा याचे मला वैषम्य वाटले ..राग वाढत गेला .. कुत्सितपणे म्हणालो " तुला घरच्या लोकांपेक्षा बाहेरच्या लोकांवर जास्त विश्वास आहे तर ? " अलका खाली पाहतच म्हणाली ' या पूर्वी इतके वेळा विश्वासघात केलंय तुम्ही की आता विश्वास ठेवणे कठीणच जातेय मला ..अनेक वेळा माझ्या शपथा झाल्यात ..मुलांच्याही शपथा घेवून झाल्यात ..मात्र तुमचे पिणे काही कायमचे बंद होत नव्हते ' तिच्या या बोलण्याने मी दुखावलो गेलो ..अपमानित झाल्यासारखे वाटू लागले ..

    अलकाने माझ्यावर आता तिचा पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाहीय हे उघड बोलून दाखवल्यावर मला खूप अपमान झाल्यासारखे वाटले ..मी म्हणालो ..जर तुझ्या विश्वासच नाहीय माझ्यावर मग मला का दाखल केलेस व्यसनमुक्ती केंद्रात ..सरळ घटस्फोट घ्यायचा होता माझ्याशी ...माझे असे बोलणे तिला खूप लागले असावे ..जखमी झाल्यासारखे तिने पटकन माझ्याकडे रोखून पहिले ..तिच्या नजरेत एकाच वेळी अनेक प्रकारचे भाव स्पष्ट वाचता येत होते ..त्यात आजवर तिने दिलेले प्रेम ..तिचे माझ्या संसारातील समर्पण .तिचा त्याग ..या साऱ्या गोष्टी मी ' घटस्फोट ' या एका शब्दाने शून्य ठरवल्या आहेत हे मला जाणवले ..तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ..मी मान खाली घातली..विषय कुठून कुठे गेला होता ...कुठून ही भेटीला आली असे वाटू लागले मला ..निर्हेतुकपणे का होईना मी तिला घायाळ केले होते ..दोन मिनिटे अशीच गेली ..ती माझ्याकडे पाहतेय ..अन मी मान खाली घालून बसलोय ..

    तितक्यात माॅनीटर आमच्या जवळ आला .." नमस्कार विजय भाऊ ..काय म्हणताय ..बरे वाटले असेल ना खूप ? " त्याला आमच्यात काय चाललेय हे कळू नये म्हणून मी लगेच हसून उत्तर दिले .." होय तर ..तेच सांगतोय मी हिला ..इथे खूप छान वाटतेय ..खूप आधी यायला हवे होते मला इथे " .. मी चेहरा हसरा करत ..उद्गारलो ..माॅनीटरशी अलकाची ओळख करून दिली ..तो म्हणाला " छान राहत आहेत विजय भाऊ इथे ..आम्हाला अजिबात काहीही त्रास नाहीय यांचा ..सगळ्या उपचारांमध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत ..फक्त जसे इथे वागतात ..तसेच जवाबदारीने बाहेर वागले म्हणजे झाले ..मी लगेच " हो हो ..नक्कीच ..आता यापुढे इथे जे शिकवले आहेत त्या प्रमाणेच घरी वागायचे ठरवले आहे " असे म्हणालो ..मी अशी पलटी मारलेली पाहून अलका गोंधळात पडली असावी ..ती माझ्याकडे आश्चर्याने पाहतेय हे जाणवले मला..माॅनीटर दूर गेल्यावर मला म्हणाली .." अहो तुम्हाला घटस्फोट द्यायचा असता तर या पूर्वीच दिला असता ..माझ्या माहेरचे तर मला मूर्ख म्हणत आहेत ..सरळ माहेरी ये म्हणून आग्रह करत आहेत ...तरी इतके वर्ष राहिलेच ना तुमच्या बरोबर ..तुम्हाला हे घटस्फोट घे म्हणणे सोपे आहे ..माझ्या मनाचा ..मुलांचा काही विचार ? " पुढे ती बरेच काही बडबडत राहिली ..मी नुसताच घुम्या सारखा मान खाली घालून ऐकत राहिलो ..

    एकंदरीत मला उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी नेणार नाही हेच सार होते तिच्या बडबडीचे ..बोलता बोलता तिने सोबत आणलेली पिशवी माझ्या हातात दिली ..मी आतल्या वस्तू पाहू लागलो ..छोटी लोणच्याची बरणी ..मला आवडतो तसा पोहे भाजून केलेला चिवडा ..दोन सफरचंदे ..एका डब्यात माझ्या खास आवडीच्या अळूच्या वड्या..वगैरे ..' अग इथे व्यवस्थित जेवण मिळते ..इतके सगळे कशाला आणलेस ..? आणि हे एव्हढेसे कोणाला पुरणार ? असे म्हणत ती पिशवी परत तिच्या हाती दिली ..अहो असू द्या ..अधे मध्ये खायला लागते तुम्हाला म्हणून आणलेय ..माझा डिसचार्ज होणार नाहीय हे पक्के झाल्यावर अलकाशी बोलण्यातील माझा इंटरेस्ट संपला होता ..तुला आता जायला हवे ..नाहीतर घरी पोचायला उशीर होईल ..मुले वाट पाहतील असे निरोपाचे बोलू लागलो ..

    अलका जायला उठल्यावर म्हणालो .." बघ पुन्हा एकदा नीट विचार कर ..हवे तर उद्या ये परत मला घ्यायला " माझे डिसचार्जचे तुणतुणे सुरूच होते ..ती निग्रहाने निघाली ..एकदा विद्ध नजरेने मागे वळून पहिले ..अलका गेल्यावर मी वार्डात गेलो ..सगळ्यांच्या नजर माझ्याकडेच लागून होत्या ..शेरकर काका लगेच पुढे झाले ..' काय मग ? खुश ना ? ' मी काहीच न बोलता ..कोपऱ्यात जावून भिंतीला टेकून बसलो ..चणाक्ष शेरकर काकांनी ओळखले असावे काय झाले ते ..माझ्या जवळ येवून बसलो ..विजय भाऊ अहो बहुतेकांच्या बाबतीत असेच होते ..घरचे लोक भेटायला आल्यावर आपल्याला घरी जायची खूप इच्छा होते ..मात्र तसे झाले नाही तर अपमान झाल्या सारखे वाटते ..' ..काका समजावणीच्या सुरात काही बाही बोलत राहिले ..

    जरा वेळाने माॅनीटर आत आला ..त्याच्या हातात अलकाने आणलेली खायच्या वस्तूंची पिशवी होती .." विजय भाऊ अहो हे घेतलेच नाहीत तुम्ही ? ..वहिनीनी इतक्या प्रेमाने आणलेय सगळे ..मीच मागून घेतली पिशवी परत त्यांच्याकडून ..तुम्हाला द्यायला ." त्याने पिशवी माझ्यापुढे केली .." नको अहो ..मला भूक नाहीय .." शेरकर काकांनी पटकन त्याच्या हातून पिशवी घेतली ...मग आत डोकावून आतल्या वस्तूंचा अंदाज घेत म्हणाले .." अरे वा ..लोणचेपण आहे यात ..घ्या हो विजयभाऊ ..आपल्या घरचेच आहे ..उगाच का लाजता .." " काका तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ठेवून घ्या ती पिशवी " असे मानभावी पणे म्हणत मी तेथून उठलो ..समोर टी.व्ही . समोर जावून बसलो ..मनाशी ठरवले आता आपण अन्न सत्याग्रह करायचा ..इथे पाणी सोडून काहीच खायचे प्यायचे नाही..मग झक्कत घरी सोडतील आपल्याला ..
    रात्री जेवणाच्या वेळी सर्वांनी मला खूप आग्रह केला ..मी ढिम्म ..ग्लासभर पाणी पिवून उपाशीपोटी झोपलो ..

    रात्रभर विविध विचार डोक्यात थैमान घालत होते ..मी पूर्ण उपचार घेतले पाहिजेत हे मला बुद्धीच्या स्तरावर समजत होते ..मात्र भावनिक पातळीवर उमजत नव्हते .. मी घरी ने म्हणून मागे लागल्यावर अलकाने दिलेला ठाम नकार मला पचत नव्हता ..नेहमीप्रमाणे मी अलकाला गृहीत धरून चाललो होतो ..ती माझा शब्द कधीच खाली पडू देणार नाही या माझ्या अहंकाराला टाचणी लागली होती.." विजय भाऊ ..कुठे हरवलात ? " काकांच्या प्रश्नाने मी भानावर आलो ..कालच्या सगळ्या घटना आठवून मला कसेतरीच झाले ..चूक माझीच होती हे जाणवले ..काकांनी पुन्हा चहाचा ग्लास पुढे केला ..माझ्याकडे मिस्कील नजरेने पहिले ..चहा सोबत तुमच्या घरून चिवडा पण खा हवे तर असे म्हणत त्यांनी लॉकर मधून काल मी नाकारलेली पिशवी काढली ..मला आतून प्रचंड भक लागली होती ..तरीही मी अडून बसलो होतो ..काकांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली ...बस झाले हो आता नाटक ..उगाच का मारता पोटाला ..या पोटासाठीच तर सारी दुनियादारी असते ..मी संकोचाने त्यांच्या हातातील चहाचा ग्लास घेतला ..आसपासच्या तीन चार जणांनी लगेच टाळ्या वाजवल्या ..सुटले माझे उपोषण ..

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • जहाजांची दुनिया

    जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा.

  • अपेक्षा

    आज आईचा रागरंग जरा वेगळाच भासला, तिने बाळाला जवळ बोलावले व गप्पा मारता मारता सहज प्रश्न विचारला, "बेटा मला सांग, कसे रे फेडशील पांग या माउलीच्या कष्टाचे? तुला जन्म देताना मरण यातना भोगल्या, तुला वाढविताना रात्रींचा सुध्दा दिवस केला. तुझ आजारपण, पडण, रडण, दुखण, भरवणं, शिकवण काय काय नाही केल. स्वत:च जगणंच विसरले मी."

    मुलगा म्हणाला, "आता लवकरच मी मस्त पैकी नोकरी करेन, भरपूर पैसा कमवेन व जगातील सर्व सुख तुझ्या पायी ठेवेन."

    आई स्मितहास्य करित म्हणाली, " अरे वेडया हे तर सर्व माझ्यासाठी तुझे बाबा करत आहेत की, अन् हो, तू जेव्हा खूप मोठा होशील, रग्गड पैसा कमावशील, तेव्हा ऐहिक सुखाची गरजच नसेल मला."

    मुलगा म्हणाला,"बर मग मी एका छानश्या प्रेमळ मुलीशी लग्न करेन, ती तुझी मनापासून सेवा करेल व तू आराम कर"

    आई आता हसली म्हणाली, "सुने कडून सेवा करुन घेण्याची माझी मुळीच ईच्छा नाही, मला नाही वाटत ते कर्तव्य तिचे आहे, माझ्या सुखासाठी तिने का कष्ट घ्यावे. तू लग्न कराव ते तुला आयुष्यासाठी साथीदार, जोडीदार मिळावा म्हणून, तुम्ही दोघांनी एकमेकाना साथ दयावी, समजून घ्याव व सुखाने एकत्र नांदाव."

    मुलगा थोडवेळ विचार करुन आईला म्हणाला, "आता तूच सांग ना आई मला, "मी काय कराव तुझ्यासाठी?"

    आता आईची कळी खुलली, ती मुलाला म्हणाली, "ऐक, जोपर्यन्त मी जिवंत असेन, तोपर्यन्त तू मला नेहमी भेटायला ये, माझ्याशी प्रेमाने मनमोकळया गप्पा मार. आई म्हणून हिच अपेक्षा आहे माझी.

    जेव्हा देवासमोर उभा राहशील तेव्हा माझ्यावतीने सुध्दा प्रार्थना कर.
    मी जेव्हा मरेन तेव्हा मला तू खांदा दे. माझ्या आठवणीत दानधर्म कर.
    तु केलेले प्रत्येक चांगले काम मला सुख व समाधान देईल. म्हणून आता पासूनच सर्वांशी प्रेमाने वाग, आसपास असलेल्या लहानथोर प्रत्येकाचा आदर कर, यथायोग्य मान ठेव.

    लक्षात ठेव तुला जन्म देताना झालेल्या वेदना व वाढविताना झालेले कष्ट हे मी स्वेच्छेने स्विकारले होते, तुझ्यावर उपकार नाही केले मी, तो आमचा दोघांचा निर्णय होता.

    देवाने माझ्यावर विश्वास ठेवून तुला माझ्या पदरात टाकले व मला एक सुवर्ण संधी दिली एका त्याच्या कलाकृतीला घडविण्याची त्याबद्दल त्याची मी सदैव रृणी असेनच. तू मला निखळ आनंद व साथ दिली.

    तूझ्याहातून घडणारे प्रत्येक कार्य म्हणजेच मोबदला असेल.
    करशील का हे?"

    निशब्द मुलाच्या डोळयातून वाहणारे अश्रु खूप काही बोलत होते.

    धन्य धन्य ती माता!!
    निरपेक्ष व निस्सिम प्रेम फक्त माताच करु जाणे, त्रिवार वंदन प्रत्येक मातेला !!!


    -- संकलन : अशोक साने
    फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी
    शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.