(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • थांब विज्ञाना, नको लावूस शोध

    बागेतील तारका- थांबव, विज्ञाना तुझे शोध

  • बलात्कार विकृती कि मानसिकता

    ” बलात्कार तर देशात सगळीकडेच होतात, मग दिल्ली बलात्काराचा एवढा गहजब का? ” हे वाक्य देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे …..

  • नशीब ……!!!

    - नको

    शी – शी असलेली गोष्ट

    ब - बदला
    (नशीब म्हणजे, “नकोशी असलेली गोष्ट” बदलणे होय”)

  • संत ज्ञानेश्वर (१९४०)

    संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..

  • सि.के.पी. चोखंदळ

    व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्‍याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे.


    आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे
    निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे..

    काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट
    नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट

    दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार
    बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार

    पापलेट किंवा सुरमई फ्राय अशी खरपूस मस्त
    कोलंबीचे कालवणही मग लगेच होते फस्त..

    लज्जतदार चिकन असे लबाबदार झणझणीत
    वरुन लिंबू पिळून करावे..चटकदार चमचमीत..

    खिम्याचे कटलेट्स ही तर सर्वांनाच पर्वणी
    माध्यान्हीला "हटके" अशी तोंडीलावणी

    सोडे हे तर कुठेही भाजीत वाढवित असे स्वाद
    मसाले वांगे,मेथी,कालवण अथवा सोडेभात

    वालाचे बिरडे करावे छान परतूनी..सवताळूनी
    ओले खोबरे अन कोथिंबीर घालावी वरतूनी..

    कायस्थ पुरणपोळी असे मधुर व मऊशार
    मटणाला "व्हेज"पर्याय म्हणून वड्यांचे सांबार

    आळूच्या वड्या,वाटली डाळ यांची औरच बात
    पंचामृत अन पुलावाचाही मग जमून येतो बेत..

    सर्व पदार्थांचा राजा..शाही खाज्याचा कानवला
    खमंग खुसखुशीत ..क्षणांत तोंडात विरघळला..

    (Forwarded. Original Credit - प्राची जयवंत )

  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

    टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.

  • पुस्तके

    पुस्तके स्वप्नात येतात आणि विचारतात..
    'तू आम्हास ओळखले कां?'

    बोलता बोलता पुस्तके वितळतात
    आणि अथांग पाणी होऊन हेलावत विचारतात..
    'तू आमच्यात कधी न्हालास कां? पोहलास कां?'

    पुस्तके मग घनदाट वृक्ष होतात
    आणि विचारात ,
    'आमची फळे खाल्लीस कां
    छायेत कधी विसावलास कां?'

    पुस्तके भुरुभुरु वाहणारा वारा होतात नि विचारतात..
    'श्वासाबरोबर आम्हांला कधी उरात साठवलेस कां?'

    पुस्तके असेच काही विचारीत राहतात..
    एकामागून एक.

    प्रत्येक प्रश्नाला माझे काही उत्तर नसते;
    मी गप्प बसतो त्यांच्याकडे नुसता पाहत.

    तेव्हा पुस्तके सजावटीच्या कपाटात जाऊन बसतात
    नि म्हणतात..
    'म्हणजे आमचे आयुष्य व्यर्थच ना?'

    पुस्तके मूक होतात,
    झुरत जातात,
    स्वतःला वाळवीच्या स्वाधीन करतात,
    शेवटी आत्महत्या करतात ती-
    घरातल्या घरात,
    बंद कपाटाच्या कारागृहात...

    - शंकर वैद्य

  • बेवड्याची डायरी !

    एका व्यसनीला व्यसनातून बाहेर पडण्यास इच्छाशक्ती देण्यासाठी नेमके काय उपचार होतात ? याबाबत अनेकांना कुतूहल असते. तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत अनेक गैरसमज देखील असतात ..तेथे मारतात ..टाॅर्चर करतात ..पोटभर जेवण मिळत नाही वगैरे गैरसमज आहेत ..माझ्या ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे

  • श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, अलिबाग

    वृध्दाश्रम हा केवळ अद्ययावत सोयी-सुविधा किंवा आधुनिक वैद्यकिय सोयी आणि यंत्रणा यांनी परिपुर्ण असून चालत नाही, तर शेवटच्या काळात या वृध्दांना हव असतं ते प्रेम, आपुलकी माया व पुरेसा आदर. श्री समर्थ कृपा वृध्दाश्रमाचे सर्वेसर्वा श्री. जयेंद्र गुंजाळ हे गेली अकरा वर्षे आसपासच्या अनेक निराधार व गरीब वृध्दांना पालकांसारखेच नाही तर अगदी त्यांच्या मुलांप्रमाणेसुदधा सांभाळत आहेत, व उत्तमरित्या त्यांची बडदास्त ठेवत आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असून जवळपास ४०० वृध्दांना त्यांनी आतापर्यंत मायेची सावली दिलेली आहे.

  • आत्मभान जागवणार्‍या यशोगाथा – अदान अॅण्ड ईव्हा, कटिग फ्री आणि इराणमधून सुटका

    ‘अदान अॅण्ड ईव्हा’, ‘कटिग फ्री’ आणि ‘इराणमधून सुटका’ हे तीन दर्जेदार अनुवाद प्रकाशित केले आहेत. उज्ज्वला गोखले, सुप्रिया वकिल, विदुला टोकेकर यांनी केलेले अनुवाद वाचकांच्या मनाचा ताबा घेतातच; पण एका विदारक वास्तवाचे दर्शन घडवतात. तिनही आत्मकथने महिलांच्या जीवनलढ्याच्या कहाण्या आहेत. हा लढा त्यांनी धिरोदात्तपणे देऊन स्त्री शक्तीची ओळख करून दिली आहे.