(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नशीब ……!!!

    - नको

    शी – शी असलेली गोष्ट

    ब - बदला
    (नशीब म्हणजे, “नकोशी असलेली गोष्ट” बदलणे होय”)

  • हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १ फुट

    हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १1 फुट उभा असणारया माणसाला ना दिसतो मराठा ना ब्राम्हण ना दलित ओ बी सी., राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी !!

    आठशे वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद घोरी , हुमायूँ , बाबर , औरंगजेब , आदिलशाहा , अफझलखान, निझाम , हैदर, टिपू ,
    ह्यांच्या तलवारींनी तुम्हाला ओळखलं ते फक्त आणि फक्त " काफर " म्हणूनच...,

    देशाच्या फाळणीसाठी लाहोर कराची कलकत्ता आणि संपूर्ण देशभर कायदे आझम जिन्नाच्या डायरेक्ट ॲक्शन खाली तुम्ही कापले गेलात, घरादारासहीत जाळले गेलात , ते "काफीर " हीच ओळख घेउन..

    हैदराबादमध्ये निझामाच्या रझाकारांचा अमानुष अत्याचार हा खास फक्त तुम्हां काफीरांसाठीच होता ..

    काश्मीर श्रीनगरच्या खोऱ्यात एके फोर्टीसेव्हन छातीवर रोखून वडिलोपार्जित घरादारातुन तुम्हाला रातोरात हाकलून दिले ते पंडित म्हणून नाही " काफीर " म्हणून..

    मुंबई बॉम्बस्फोटात आणि २६ /११ च्या हल्ल्यात मारले गेलात जखमी झालात ते ब्राम्हण, मराठा, दलित, ओबीसी म्हणून नाही तर त्यांच्या दृष्टीने फक्त " काफर " हीच ओळख होती तुमची..

    आज पाकिस्तान जो रात्रंदिवस तुमचा द्वेष करतो आहे ते तुम्ही काफीर आहात म्हणून...

    जैश ए मह्मंद , लष्कर ए तोय्यबा , हाफिज सइद , मसुद अजहर , फीदायीन अतिरेक्यांद्वारे विध्वंस करून तुम्हाला कायम दहशतीखाली ठेवतात ते तुम्हाला " काफीर " म्हणूनच ओळखतात...

    सहारनपूरचा इमरान मसूद ४४% लोकसंख्येचा हवाला देवून बोटी बोटी काट डालुंगा म्हणतोय ती कोणाची..? तुमची " काफीर " हया एकाच जातीची ..

    अकबरुद्दीन ओवैसी " १० मिनिट पुलीस हटा दो २५ करोड १०० करोड पे भारी पडेंगे " म्हणतोय ते कोणाला ...?

    कधी जागे होणार तुम्ही...?

    आठशे , वर्ष तुम्ही जाती जातीत भांडत राहीलात आणि अरबस्तानातुन आलेल्या हिरव्या संकटाने तुमच्या आमच्या, देवा धर्माचा , संस्कृतीचा,आयाबहिणींचा सत्यानाश केला , तलवारीच्या धाकाने जबरीने धर्म बदलून कंधार लाहोर कराची ते ढाक्क्या पर्यंत आपल्या मायभूमीचे लचके तोडले ,

    पानिपतावरुन ओढून नेलेले पेशव्यांचे ब्राम्हण वंशज , शिंद्यांचे मराठे वंशज , होळकरांचे धनगर वंशज आज बलोचिस्तानात ,अफगाणिस्तानात दिवसातून ५ वेळा नमाज पडून गायी गुरं खात आहेत .

    विचार करा काहीशे वर्षापूर्वी अशाच जाती जमाती मीरवणारी ही आमचीच माणसे चांद ताऱ्याला कवटाळून आपली ओळख विसरुन आमचाच द्वेष करताहेत , त्यांच्या दृष्टीने आमची जात एकच " काफीर "

    अजून जागे व्हा ...

    हैद्राबादचे ओवैसी बंधू उद्याचा जिन्ना होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत .
    २०३० /३५ पर्यंत त्याना अपेक्षित लोकसंख्या वाढली की पुन्हा एकदा फाळणीची मागणी डायरेक्ट ॲकशन च्या कत्तली सुरु होतील ,
    त्यांच्या हत्यारांना आपल्यातले मराठे , ब्राम्हण , दलीत ,ओबीसी दिसणार नाहीत,
    त्याना फक्त " काफीर " दिसतील,

    त्यावेळी पर्याय फक्त एकच मरण किंवा चांद ताऱ्याला शरण ...

    मग कसली आलीय जात ,
    कसली अस्मिता ..
    आणि कसलं आलायं " आरक्षण " ..?

    बघा जमलं तर करा विचार.... ,
    जाती विसरुन एक व्हा ...
    जाती चा अभिमान जरूर बाळगा पण इतर जाती कडे सक्खे भाउ म्हणून पहा .
    नाहीतर आहेच ..
    पालथ्या घड्यावर पाणी ......

  • सफारी इन माबुला – भाग २

    आल्या आल्याच सुग्रास पंगतीचा बेत होता. खास 'बिग५' च्या देखरेखीखाली! जेवणगृहाच्या भिंतीवरून ते पाहुण्यांकडे लक्ष ठेऊन होते.

    सजावट विविध प्राण्यांची मुंडकी, कातडी, शिंगे वापरून केलेली होती, उजेडही आवश्यकते इतकाच. आफ्रिकन पदार्थ जेवणात होतेच पण इतरही चविष्ट पदार्थांची रेलचेल होती. पदार्थांच्या चवी थोड्याश्या परिचित वाटत होत्या म्हणून चौकशी केली तर मुख्य आचारी भारतीय असल्याचे समजले. नुसत्या वासानेच 'घरेलू' वाटले. हॉटेलचे कर्मचारी प्रत्येक ठिकाणी हसून प्रेमाने स्वागत करत होते.

    इथपर्यंत सगळे कसे मस्त होते. पण "पहिली तीन तासांची सहल संध्याकाळी आहे, खोलीत जाऊन थोडावेळ विश्रांती घेऊन सफारीसाठी तयार रहा" असा गाईडचा आदेश ऐकताच माझ्या पोटात गोळाच आला. जेवण अंगावर आले होते, त्यामुळे पाय आपोआप खोलीकडे वळले. सफारीला जायची भीती जास्त का खोलीत एकटीने बसायची भीती जास्त हेच समजत नव्हते. शेवटी बाहेर जाऊन पहाणेच पसंत केले. १०-१२ जीपचा तांडा लॉज समोर उभा होता. ५-७ फूट उंचीच्या, ६ते ८ चाकांच्या, हिरवट रंगाच्या, ९ जणांच्या बसण्याची व्यवस्था असणाऱ्या उघड्या टपाच्या जीपकडे पाहूनच जीव दडपला. वर चढून बसायचं कसं हा प्रश्न फक्त माझ्या मनात आला नाही, तर सगळेच या विचारात दिसले. या जीपमध्ये ९ प्रवासी तीन चढ्या बाकांवर बसतात त्यामुळे कोणत्याही सीटवरून सगळीकडचे दृश्य स्पष्ट दिसते. त्यांचे चालक असे धिप्पाड की, क्षणभर त्यांचीच भीती वाटावी. रंगाने काळेकभिन्न, उंची ६ फुटांपेक्षा जास्त, मजबूत बांधा असणारे असे असले तरी पण त्यांचे विनम्र बोलणे, हसणे, मदतीचा हात पुढे करणे, सारेच प्रसन्न करणारे होते. सगळ्यांनाच जीपमध्ये चढायला चालकाची मदत लागली. आमच्या जीपमध्ये आम्ही फक्त ६ जणच होतो. कसे चढायचे, कुठे पाय ठेवला तर चढणे सोईचे होईल याचा विचार माझ्या मनात चालू असताना जीपच्या चालकाने मला जीपमधल्या सगळ्यात उंच बाकावर कधी टाकले तेच कळले नाही. जीप मध्ये बसल्यावर एका रेंजरने प्रत्येक चालकाजवळ एक एक बंदूक व तीन तीन गोळ्या दिल्या व त्याची नोंद केली. एकंदर रागरंग पाहता मला खोलीत परत पळून जावे असे फार वाटू लागले. तेवढ्यात जीपचा तांडा चालू झाला.लॉजच्या आवारातून गमती देशोदेशी बाहेर पडताच पुरुषभर उंचीचे पिवळे पिवळे गवत सगळीकडे दिसू लागले. थोड्या अंतरापर्यंत एकत्र राहून मग प्रत्येक चालकाने आपला वेगळा मार्ग स्वीकारला. भोवती सर्वत्र गवत व आपण त्यात एकटे ह्या भीतीने काळजाचा ठोकाच चुकला. चालक मात्र त्याच्या ठरलेल्या गतीने पुढे गवतातल्या रस्त्यात जीप दामटवत होता. भन्नाट वारा सुटला होता, वाऱ्यावर डुलणाऱ्या गवताच्याही वरून लांबवरचे दृश्य पहाताना भीतीची जागा उत्सुकतेने व प्रसन्नतेने कधी घेतली कळलेच नाही.

    समोर लाल मातीचा कच्चा रस्ता, व आजूबाजूच्या नजरेच्या टप्प्यापर्यंत रानच रान दिसत होते. गवत व झाडे याखेरीज दुसरं काही नव्हतंच. चालक तर मातीच्या खडबडीत रस्त्यांवरून वेगात गाडी हाणत होता, पटकन उजवी डावी वळणे घेत होता. १२००० हेक्टरचे रान, त्यात मातीचे रस्ते. ना कुठे चिन्हे, पाट्या वा खुणा. आपण चुकणार तर नाहीना अशी पाल चालक सोडून बाकी प्रत्येकाच्या मनात चुकचुकली. आपापसात तशी कुजबूजही सुरू झाली. आपोआपच शेजारच्या सीटवरच्या सोबत्याचे हात घट्ट धरले गेले. त्यात अचानक गाडी थांबली. समोर पाहिले तर दूरवर दोन गेंडे उभे होते. इथे गवत थोडे कमी उंच होते त्यामुळे लगेच आम्ही फोटो काढणे सुरू केले. उदी रंगाचे ४-५ फूट उंचीचे २ गेंडे आम्हाला पाहायला आमच्याच दिशेने यायला लागले. त्यांचा आकार व आविर्भाव बघण्यासारखा होता. आमच्या जीपपासून ५-६ फूटांवर थांबून त्यांनी आमचे निरीक्षण सुरू केले. रानातले ते रहिवासी व आम्ही पाहुणे. आमचे नीट निरीक्षण करून 'अत्यंत निरुपद्रवी' असल्याचा शिक्का त्यांनी पायाखालची जमीन जोरजोरात उकरून उमटवला व तोंडाने 'फुर्रर्र' करून ते आमच्या समोरून दुसऱ्या बाजूला निघून गेले. ते रस्ता ओलांडून जाईपर्यंत आमचा मुक्काम तेथेच. रानाच्या सुरुवातीसच ते दोघे भेटल्याने त्यांची नेमणूक या रानाचे पहारेकरी म्हणून असावी यावर आम्हा सर्वांचे एकमत झाले. गेंडे पूर्णपणे नजरेआड होईपर्यंत आम्ही एकटक बघत होतो. सुरुवात तर छान झाली म्हणून आम्ही खूश! जीप पुढे निघाली. थोडे पुढे जातो तो हरिणांचे व झेब्यांचे कळप मुबलक प्रमाणात भेटले. त्यांचे भरपूर फोटो काढून आम्ही पुढे निघालो. वाटेत बबून, जिराफ, नीलगाई वगैरे मंडळी भेटतच होती. पण अजून हत्ती व जंगलचा राजा दिसले नव्हते. "आता सायंकाळी पाणवठ्यावर सिंह दिसतील, कदाचित लेपर्डही दिसण्याची शक्यता आहे." असे चालक महाशय सांगत होते. तोच 'खर्र खट्ट' असा आवाज करून जीप थांबली. आम्हाला वाटले हत्तीबित्ती आला की काय? आमचे कॅमेरे सरसावले तोच "गाडी पंचर हाय, टायर बदलायला हवा, तवा समदे खाली या" अशी आज्ञा ऐकू आली. सहज सभोवती नजर टाकली तर हाकेच्या अंतरावर हरणं, नीलगाई, झेब्रे व दूरवर गेंडे दिसत होते. जवळच कुठेतरी गजराज व वनराजही असणार होते. हे सगळे मनात आले, अन् खाली उतरायचे कुणाचेच धाडस होईना.

    आसपास दुसरी जीप दिसत नव्हती, लॉज तिकडे दूर कुठेतरी राहिलेले. भोवताली फक्त रानगवत, प्राणी अन् टायर फुटलेली जीप. बापरे! 'नाटककाराच्या शोधात सहा पात्रे' च्या चालीवर 'श्वापदांच्या शोधात सहा प्रवासी' ऐवजी 'सहा प्रवाशांच्या शोधात श्वापदे' असे नवीन नाटक जंगलाच्या पार्श्वभूमीवर रंगणार की काय याची भीती वाटायला लागली. माझी तर पाचावर धारण बसली. "बघा, मी म्हणत नव्हते का की...." ह्या माझ्या बडबडीकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता कारण चालकाची "खाली उतरा व दूर गवतात उभे रहा" अशी घाई चाललीच होती. शेवटी जीव मुठीत धरून सर्वजण उतरले. आता झेब्रे व हरणांची सोबतही खूपच हवीहवीशी वाटू लागली. आम्हाला धीर देण्याच्या उद्देशाने तेही आमच्या जवळ येऊ लागले. त्यांचे फोटो काढण्यात आम्ही रंगून गेलो त्यामुळे खाली उतरताना वाटलेली भीती कशी व केव्हा कमी झाली ते कळलेच नाही.

    आजुबाजूला बघण्यासारखे तर खूपच होते. इतकावेळ जीपमधून एकसारख्या दिसणाऱ्या गवताच्याही खूप जाती आहेत, त्यावर छोटीछोटी नाजूकशी विविधरंगी फुलेही आहेत हे समजले. मोठ्या झाडांच्या शेंड्यांवरून गुलाबी, पांढरट दिसणारे फुलांचे झुबके मन आकर्षित करत होते. हे सगळे भरधाव जाणाऱ्या जीपमधून दिसलेच नव्हते. आमचे निरीक्षण चालू होते तोवर जीपमधल्या दोन्ही पुरुष प्रवाश्यांच्या मदतीने चालकाने अर्ध्या तासात जीप ठीकठाक केली. जीपचे बदललेले भले मोठे चाक त्याने एकट्याने हाताने जीपमधे आदळताच जीप जागेवरच थरथरली. जीपला उचलण्यासाठी लावलेला जॅक जीप इतकाच भक्कम होता. तो लावताना त्याचा आकार बघण्याचे कुणालाच सुचले नव्हते तर आता उतरवताना तरी बघू या म्हणून आम्ही जीपजवळ गर्दी केली. ते पाहताच चालकाने ओरडून "जीपपासून १०-१२ फूट लांब जा' असे ओरडून सांगितले. आम्ही दूर जाताच त्याने जीपला जॅक लावलेला असतानाच जीप जोरात चालू केली, व इतका वेळ उभ्या स्थितीत असणारा जॅक धाडकन मातीत आपटला, खूपच धूळ उडाली, मोठा आवाज झाला, जीप पुढे गेली. चालकाने ती परत आमच्याजवळ आणली, जीपमध्ये चढण्याची खटपट झाली. जॅक लावण्याच्या पद्धतीची, जॅकच्या नवीन प्रकाराची आमच्या ज्ञानात भर पडली व आम्ही पुढे निघालो.

    थोड्याच अंतरावर आमची वाट बघत असलेले गजराज भेटले, अगदी दहा फुटावरून दर्शन झाले. नशीब, ते थोडे उशीराने संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी निघाले होते नाही तर आमची गाठभेट अगदी जवळूनच झाली असती. जीपवर चढल्याने आम्ही आता थोडेतरी त्यांच्या लेव्हलला आलो. आफ्रिकन हत्ती किती मोठा असतो ते आत्तापर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते. पण इथे समोर आपले प्रशस्त कान हलवत, लांबलचक सोंडेने गवत तोडून डोक्यावर मारत आपल्या बारीक डोळ्यांनी आम्हाला ते बराच वेळ न्याहाळत होते. पुरेसा वेळ फोटो काढायला देऊन सावकाशपणे गजराज हलले. जरी ते आमच्यापासून दहा फुटावर होते, आम्ही जीपमध्ये होतो तरी गजराज दिसेनासे होईतो जीव थोडा धाकधूकच करत होता. पुढे गेल्यावर पाणवठ्यावर सुसर, हिप्पो दिसले. वनराज मात्र थोडक्यात हुकले.इतरांना कदाचित हळहळ वाटली असेल, पण मला मात्र चालकाची खटपट, त्याची ताकद, कुठलेही संकट न येताच आलेली मानसिक धास्ती, झेब्रे, हरणे, गेंडे इत्यादींचा अवतीभवतीचा वावर हे वेगळे पण अद्वितीय अनुभवच संपूर्ण सहलीचे फळ देऊन गेले. बघता बघता रान अंधारात गडप झाले व आमची जीप परत वळली. बिग ५ पैकी तिघे तर भेटले. आता पोटात कावळे कोकलत होते, तरी रानावरून नजर हटत नव्हती. सभोवतीचा अंधार, आकाशात रेंगाळणारा चुकार संधिप्रकाश, त्यात उजळून निघालेले ढग, चंद्राची कोर, दूरवरचे धूसर डोंगर सारे सारे खूपच रम्य दिसत होते.

    लॉजवर परतलो तर आफ्रिकन वाईन (आणि सरबताचेही) ग्लास तयार! सकाळच्या ताल वाद्याऐवजी खास आफ्रिकन तंतूवाद्य वाजत होते. खांबाखांबावर मशाली तेवत होत्या. त्यांचा उजेड व धुराचा वास आपण शहरापासून दूर जंगलात आहोत याची जाणीव करून देत होते. चविष्ट खाद्यपदार्थांची रेलचेल असलेला बूफे उघड्यावर मांडला होता. खमंग वासानेच पोट भरून गेलेसे वाटले. बटाट्याची भाजी, वांग्याचे खरपूस भरीत, वेगवेगळ्या उसळी, सलाडचे प्रकार... एवढे सगळे पदार्थ आहेत तर त्याबरोबर पोळी किंवा भाकरी मिळेल तर किती मजा येईल असे मनात येईतो मागून प्रश्न आला, "हॅल्लो सर, लाइक टु हॅव रोटी?" उत्स्फूर्तपणे "वॉव" असा प्रतिसाद आला आणि उरलेले पोटही भरून गेले. ओळीत मांडलेली टेबले, मधे मधे छोट्या छोट्या फायर-प्लेसेस, वाद्यवृंद, झोपड्या... अगदी मस्त माहोल होता. थोडी चौकशी केली तर दुपारच्या जेवणाच्यावेळी थोडक्यात चुकामुक झालेले बल्लवाचार्य भेटले. ते चक्क मुंबापुरीचे पूर्वरहिवासी निघाले. ते आणि आम्ही अगदी एका गावचेच की! मग तर रोटी जास्तच गोड लागली. सगळे पदार्थ नुसते चाखून पाहिले तरी पोट तुडुंब भरले, निद्रादेवी खुणावू लागली व पाय आपोआपच खोलीच्या दिशेने पडू लागले.

    खोलीत पंखा होता पण हवेतला गरमा कमी करण्याएवढी ताकद त्याच्यात नव्हती. पलंग, गाद्या, उश्या सगळे छान होते पण थोडीशी डासांची गुणगुण बेचैन करत होती. दिवे नव्हतेच त्यामुळे भींतीवर हलणाऱ्या आमच्याच सावल्या खूप मोठ्या वाटत होत्या, कसेबसे कंदिलाच्या प्रकाशात झोपायचा प्रयत्न करत होतो तोच खोलीमागच्या व्हरांड्यात खुसफूस ऐकू आली. हळूच पडदा करून पाहिले तर एक हरीण आपल्या कुटुंबासह आमच्या खोलीपाशी मुक्कामाला आला होता. आपण कुठेही गेलो आणि कुणी आपल्याला भेटायला आले तर किती छान वाटते ना! तसेच एका हरिणाने सहकुटुंब भेट देऊन आमचे क्षेमकुशल विचारण्याचे सौजन्य दाखवले हे खूप म्हणजे खूपच छान वाटले आणि लगेच मस्त झोपही लागली एवढे मात्र खरे!

    दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वा दुसरा फेरफटका होता. परत जीपची सफर. पण आज मात्र भीती अजिबात वाटत नव्हती. उलट कधी एकदा जीपमध्ये शिरतो याची उत्सुकता होती. पहाटेचा मस्त गारवा, चमकते दवबिंदू, अगदी झालेला सूर्योदय बघताबघता आम्ही रानात प्रवेश कधी केला कळलेच नाही. काल रात्रीचे रान ते हेच का असा प्रश्न पडावा एवढे सगळे सकाळच्या वेळी वेगळे दिसत होते. सकाळच्या-पहाटेच्या कोवळ्या उन्हात सगळे गवत कसे सोन्यासारखे लखलखत होते. झाडे ताजीतवानी होऊन वाऱ्यावर डोलत होती.

    त्यावर तऱ्हेतऱ्हेचे पक्षी इकडून तिकडे आपले पंख फडफडवत घिरट्या घालत होते. त्यांचा चिवचिवाट वाऱ्याच्या शिळेला साथ देत होता. पक्षांच्या विविध जाती पाहायला मिळाल्या, काल आमच्या नादुरुस्त जीपला सोबत करणारे झेब्रे, हरणे आमची वाट तितक्याच उत्सुकतेने पहात होती. ते मोकळं सोनेरी रान, उडणारे पक्षी आजूबाजूला वावरणारे प्राणी....काहीही विसरणे केवळ अशक्यप्रायच!परत आलो तेव्हाही ओला टॉवेल व सरबताचा ग्लास तयार. या लॉजचे वैशिष्ट्य असे की, कोठेही सुवेनीर शॉप, रेस्टॉरंट, शॉपिंग सेंटर नाही. चहा पाणी, न्याहारी, जेवण सगळे सगळे इथेच. टी.ही. फोनची गरज खरं तर किती कमी असते याची जाणीव झाली. पहाटेचा वेक अप कॉलही प्रत्येक खोलीच्या दारावर हाताची थाप देऊनच दिला गेला. किमान पण सर्व अत्यावश्यक सुखसोयी पुरवणारं हे लॉज एक वेगळाच अनुभव देणारं ठरलं. भीती मनात घेऊन सुरू झालेली सफर खूप आनंद व खूप सारे अनुभव घेऊन मजेत झाली. पण आपल्या अगदी दारात सहकुटुंब आलेल्या हरीणकुटुंबीयांचा पाहुणचार करायचा राहून गेला याची मात्र मनात रुखरुख राहून गेली!!!!!!!!!!

    --अनामिका बोरकर

  • संगणकीय लेखन – सोयी आणि गैरसोयी

    आता स्वत:च्या लेखनासाठीही संगणकाचा किंवा आयपॅड, आयफोन किंवा तत्सम सुविधांचा वापर करावा लागतो. संगणकावर किंवा त्या त्या अुपकरणांवर जे फॉन्टस् बसविलेले असतात, त्यानुसारच लेखन करावं लागतं. त्यामुळे शुध्दलेखनाचे बाबतीत बर्याच तडजोडी करणं अपरिहार्य असतं. फॉन्टसाठी लागणारं सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ आर्थिक गणितही मांडतात. जे खपतं, विकलं जातं किंवा ज्याला जास्त मागणी असतं, असंच सॉफ्टवेअर बाजारात येतं. शुध्द अशुध्द असं ते जाणीत नाहीत किंवा या बाबतीत त्यांचं फारसं देणंघेणं नसतं.

    त्यामुळं संगणकीय लेखनात काही गैरसोयी झाल्या आहेत त्याबरोबरच काही सोयीही झाल्या आहेत. ‘रवी’ आणि ‘खी’ हे निराळे ओळखता येतात. वानखेडे हे वानरवेडे असं वाचलं जात नाही. पद्धत किंवा शुद्ध या शब्दात, अुच्चारानुसार ‘द’ अर्धा आणि ‘ध’ पूर्ण असायला हवा पण तो तसा टाअीप करायला गेलात तर तो...पद्धत किंवा शुद्ध असाच टाअीप केला जातो. लिहीतांनाही आपण पद्धत आणि शुद्ध असंच लिहीतो. ‘ध’ हलंत (अर्धा) आणि ‘द’ पूर्ण असं टाअीप केलं तर कसं टाअीप केलं जातं ते पहा....पध्दत, शुध्द..

    विश्व या शब्दात ‘श्’ चं रूप बदलून ते अुलट्या ४ सारखं होतं तर ‘व’ अर्धा होतो. काही संगणकात ‘श’ अर्धा होतो (अुलटा ४ होत नाही) आणि ‘व’ पूर्ण राहतो.

    शुध्द कशाला म्हणावं आणि अशुध्द कशाला म्हणावं हेही काही वेळा समजत नाही. ‘होतं’ हे शुध्द तर ‘व्हतं’ हे अशुध्द..पण ‘नहोतं’ हे अशुध्द तर ‘नव्हतं’ हे मात्र शुध्द...हे कसं?

    टाअीप केलेला हा मजकूर, माझ्या संगणकात असलेल्या सॉफ्टवेअरनुसार टाअीप झाला आहे. आता मराठी भाषेची आणि लिपीची शुध्दाशुध्दता, अक्षररूप (फॉन्ट) तज्ज्ञ आणि मराठी सॉफ्टवेअर घडविणारे तज्ज्ञ यांच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. टाअीप केलेल्या मजकूराचा आशय समजला म्हणजे फॉन्ट सॉफ्टवेअर यशस्वी झालं असं मानावं.

    अक्षररूप, फॉन्ट तज्ज्ञांना काही सूचना कराव्याशा वाटतात. मागील लेखांत .... मी सुचविलेले ... शिफारस केलेले स्वर :: अ ची बाराखडी :: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ

    यापैकी अ आ ओ औ या स्वरांना स्वतंत्र कळा आहेत. इ ई उ ऊ ए ऐ या पारंपारिक स्वरांनाही स्वतंत्र कळा आहेत. या ६ कळांना अि अी अु अू अे अै या कळा दिल्या तर इ ई उ ऊ ए ऐ हे स्वर गाळले जातील आणि त्यांच्या जागी अि अी अु अू अे अै हे स्वर सहज टाअीप करता येतील. अॅ ऑ हे स्वर दोन कळा वापरून सहज टाअीप करता येतात. ञ आणि ङ अैवजी दुसर्या कोणत्यातरी अक्षरांना किंवा अक्षरखुणांना या कळा द्याव्यात. ऋ ची स्वतंत्र कळ आहे, ती दुसर्या कोणत्यातरी अक्षराला द्यावी. ॐ ची कळ मात्र हवीच.

  • नोकरी

    "माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी".

    "कापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे (आणि या जन्मातले ही) योगी असतात अशी माझी ठाम श्रद्धा आहे.बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेहर्‍यावरची घडी मोडू देत नाहीत.बायका काय वाटेल ते बोलतात."शी ! कसले हो हे भडक रंग !"

    लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो.निष्काम, निरहंकारी चेहरा ! समोरची बाई म्हणत असते, "कसला हा भरजरी पोत !"

    हा शांत.

    गिऱ्हाईक नऊवारी काकू असोत, नाहीतर पाचवारी शकू असो, ह्याच्या चेहऱ्यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते.समोर शेपन्नास साड्यांचा ढीग पडलेला असतो, पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा, तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाळीस अश्या किमती हा गृहस्थ,"अथोक्षजाय नम: । अच्युताय नम: । उपेंद्राय नम: । नरसिंहाय नम: ।" ह्या चालीवर सांगत असतो.

    सगळा ढीग पाहून झाला तरी प्रश्न येतोच,"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं?"एक वेळ तेराला तीनानं पूर्ण भाग जाईल; पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच.आपली स्वतःची बायको असूनसुद्धा आपल्याला तिच्या चेंगटपणाची चीड येते.पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात,"नारायण, इचलकरंजी लेमन घे"खरेच, माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कपड्याच्या दुकानात नोकरी करावी.

    - पु. ल. देशपांडे

  • पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा

    आजच्या दिवशी पहिला भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांची आठवण आलीच पाहिजे…स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवंद्र शर्मा तर आईचे नाव तृप्ती शर्मा असे आहे. राकेश शर्मा यांचा जन्म झाल्यावर त्यांचे आईवडील आंध्र प्रदेश येथील हैद्राबाद शहरामध्ये रहाण्यास गेले.

  • सेतू समुद्रम शिपिंग कॅनॉल प्रोजेक्ट.

    सेतू समुद्रम प्रकल्प राबविला तर वर्षाकाठी हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न भारत सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढं निश्चित आहे.

  • ठाण्याचा कलादूत: नरेंद्र बेडेकर

    आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.

  • तार सेवा बंद, बार सेवा सुरु !

    सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका

  • कै. पंडित उल्हास बापट यांचा एक लेख

    लोकसत्ता मध्ये प्रकाशित झालेला पं.उल्हास बापट यांचा हा लेख त्यांच्या आठवणीनिमित्त शेअर केला गेला सोशल मिडियावर.