(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आई मला भूक लागली..

    पुणे तिथे काय उणे महाराजा ?

  • वालावलचा लक्ष्मीनारायण !

    कुडाळ जवळील वालावल हे देखील निसर्गाने गर्द हिरव्या झाडीने झाकलेले असेच एक छान गाव ! येथील लक्ष्मीनारायणाचे देऊळ म्हणजे डोंगर, माड , तलाव , कलात्मक दीपमाळा अशा सर्व संपत्तीने सजलेले प्रशस्त देवस्थान आहे ! बहामनी सत्तेने आत्यंतिक धार्मिक छळ सुरु केल्यावर, गोव्यातील हरमळ येथून ही मूर्ती वालावल येथे आणण्यात आली, असेही म्हटले जाते. लक्ष्मीनारायणाची मूर्ती म्हटले तरी कोकणात बहुतेक ठिकाणी विष्णूच्या उजव्या व डाव्या बाजूला लक्ष्मी आणि भूदेवी / श्रीदेवी यांच्या मूर्ती असतात. येथील मूर्तीही तशीच आहे. अगदी देवळात शिरतानाच दोन्ही बाजूंना ३ /३ दिवे लावण्यासाठी बसविलेल्या महिरपयुक्त पट्टया खास आहेत. छताला बसविलेल्या त्रिकोनयुक्त रिपा वेगळ्या आणि भक्कमपणा वाढविणाऱ्या आहेत. रिंगयुक्त घंटा पोर्तुगीज घंटांची आठवण करून देणारी आहे. पूर्वी प्रत्येक गावकरी दिवसातून एकदा तरी देवळात येत असे. त्यामुळे गावातील पत्रे टाकण्याची पोस्टाची पेटी, देवळातच बसविलेली असे. तशीच ती या देवळातही आहे. आता टपालव्यवस्थाच बंद पडत चालली आहे. त्यामुळे टांगायच्या या जुन्या टपालपेटीचे दर्शनही आनंददायी आहे.

    -- मकरंद करंदीकर.

  • मराठीपणाचं राजकारण

    जसं आपण व्यवहारात फंक्शनल इंग्रजी बोलतो, तसंच व्यवहारात फंक्शनल मराठी वापरलं पाहिजे. व्याकरणशुद्ध व्हिक्टोरिअन इंग्रजी फार थोडे लोक बोलतात. हल्ली तर इंग्लंडच्या राणीचंही इंग्रजी बिघडलंय अशी ओरड सुरू आहे. मोबाइलवरच्या एसएमएस इंग्रजीमुळे इंग्रजी लिपीवर अतिक्रमण होतंय, असेही आरोप होतायत. इंग्रजीची ही हालत तर मराठीच्या प्रमाणीकरणाचा काय पाडाव लागणार.

  • पावसाशी वायदा

  • रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)

    मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्‍याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”.

  • बाळासाहेबांचं स्मारक झालेच पाहिजे !

    बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्कात व्हावे अशी लोकभावना आहे. टिळकांचे खरे नावं ‘केशव’ असे असले तरीही ते ‘बाळ’ या टोपण नावाने प्रख्यात होते. बाळ गंगाधर टिळक आणि बाळ केशव ठाकरे या दोन नावांत ‘बाळ’; या दोघांचा जन्म दिनांक ‘२३’ व इंग्रजी वर्णाक्षरात ‘BT’ म्हणजेच ‘B for Bal & T for Tilak/Thackeray’ अशी समानता या लोकोत्तर महान नेत्यांमध्ये सुयोगाने पहावयास मिळते.

  • मराठी भाषेतील पहिलाच व एकमेव “ग्राहक तक्रार मंच”

    मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी “ग्राहक तक्रार मंच”

  • कंटाळा आला आता या टोलचा

    खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा...

  • छत्रपती शिवरायांचे पुतळे जगात सर्वात जास्त

    सर्व मराठी माणसांची आणि भारतीयांचीही मान उंचावेल अशी आश्चर्यचकीत करणारी एक बातमी नुकतीच वाचली. बातमीची सत्यासत्यतता तपासता येणं कठीण आहे. पण ही संख्या जर खरी असेल तर......

    महापुरुषांचे पुतळे ही काही फक्त भारतीयांची मक्तेदारी नाही. जगातील अनेक शहरांमध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत. मात्र जगात सर्वात जास्त पुतळे कोणाचे असतील बरे?

    जगात सर्वात जास्त पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे !

    त्यांची देशनिहाय संख्या बघा..

    अमेरिकेत - ४८
    जपान - २९
    चीन - ४०
    श्रीलंका - ३५
    रशिया -२३
    थायलंड - २०

    आता भारतात किती आहेत ते बघू.

    महाराष्ट्र - २३००० पेक्षा जास्त
    कर्नाटक - ११००० पेक्षा जास्त
    उत्तर प्रदेश - ११०००
    बिहार - ८०००
    आंध्र प्रदेश - ७८००
    राजस्थान - ५४००
    मध्य प्रदेश - ६०००
    गोवा - ४४००

    एकूण - ८६००० पेक्षा जास्त

    या विषयावर कोणीतरी सखोल अभ्यास केला तर Ph.D नक्की मिळवू शकेल.

  • मी भिकार्यांचा डॉक्टर

    "मी भिकार्यांचा डॉक्टर"

    नमस्कार,

    1999 साली डाँक्टर म्हणून पास तर झालो.....दवाखाना टाकायला पैसे नाहीत ..... आणि घरातुन पैसे मागायची लाज....पोट भरायचं कसं? काहि दिशा सापडेना ......

    अशात खडकवासला परिसरातले एका गावातील वयोवृध्द सरपंच भेटले; म्हणाले, " दवाखाना कंदिबी हुईल, पाय हायेत ना तुला, आरे भर पिशवीत गोळ्या आन माज्या गावात घरोघरी फिर.मी सांगतो समद्यांना."

    झालं...… तेव्हा खरोखरच दोन पिशव्या भरुन औषधं घेतली......एक पिशवी पाठिवर आणि दुसरी घेतली पोटावर ......पोटासाठी.....!

    खडकवासला धरण परिसरातल्या 12 वाड्या आणि 12 खेडी पायपीट करुन पिंजुन काढायचो, .....घरोघरी जावुन ......कोणी पेशंट आहेत का विचारुन गोळ्या द्यायच्या ....पैसे घ्यायचे....पैशाबरोबरच कितिक वेळा अपमानही मिळायचे एकावर एक फ्री......!

    काहिवेळा स्वतःची चीड यायची....पण पोटातल्या भुकेला अपमान आणि चीड सुध्दा त्यावेळी गोडच वाटायची.
    पण काहिवेळा याच रस्त्यावरून फिरतांना वाटेत कितीतरी भिकारी भेटायचे.....डाँक्टर आहे म्हटल्यावर माझीच विचारपुस करायचे.....आजार सांगायचे ..... गोळ्या घ्यायचे ...... आठ आणे / एक रुपया फि सुध्दा मोठ्ठ्या मनाने हसत हसत द्यायचे....विचार यायचा ......भिकारी कोण ? देणारे ते कि घेणारा मी .......???

    2017 संपत आलंय, या 17 वर्षात तेच आठ आठ आणे आणि एक एक रुपया साठवुन भरबाजारात स्वतःची दवाखान्याची जागा, फ्लॅट आणि मोठ्ठी गाडी घेतलीये.

    पैशाने आज नक्कीच त्या वेळेपेक्शा मोठा झालोय, पण आजही त्या फ्लॅटवर गेलो कि त्या रस्त्यावर भेटलेल्या भिकार्यांचे हसरे चेहरे भिंतीवर दिसतात.कोपऱ्या कोपऱ्यात देणारे ते हात दिसतात.वाटतं, खरंच आपला काय वाटा आहे यांत ....?

    गाडीची चाकं पुन्हा त्याच वाटेवर वळतात......

    पुर्वीच्या त्या वळणावर आजही भिकारी तसेच तिथेच उभे असतात. पण मी शोधतोय रस्त्यावरची त्यावेळची ती जुनी श्रीमंत माणसं ज्यांनी माझ्यासारख्या भिकार्यांला गाडीत बसवलं.... आणि स्वतः गेली दुसर्यांना आनंद वाटायला.

    लायकी नसतांनाही मी येत असतो दरवेळी इथं परतफेड करायला..... पण ती कुठंच नसतात.....कुठंच नसतात.....किती क्रुर चेष्टा !!!

    ....... आणि मी असतो माझ्या AC गाडीत घामेजुन बसलेला निर्ल्लज्जपणे .....

    खरंच मला जमणार आहे का आठ आठ आण्यांची ही त्यांची कर्जं फेडायला......?

    वाटतं, कुठल्या फुशारकीने आपण इथे येतो?

    खरंच, आजतरी ते आठ आठ आणे फेडण्याची ऐपत आहे आपली ??? .....

    आता वाटतं , या 17 वर्षात मी मोठा झालोय कि आणखी खुजा .......?

    आता मात्र मला आणखी खुजं नाही व्हायचं माझ्याच नजरेत , आणि म्हणून मी निर्णय घेतलाय; पुन्हा तशाच दोन पिशव्या घ्यायच्या, एक पाठिवर आणि एक पोटावर......एक दिशा धरुन चालत रहायचं.... वाटेत भेटणार्या रस्त्यावर, मंदिराबाहेर जे भिकारी दिसतील त्यांची विचारपुस करुन , आजारी असतील तर तिथल्या तिथे औषधं द्यायची , सेवा करायची अगदी मोफत....

    यांच लोकांत ती जुनी माणसं शोधायची.... बघु भेटले तर भेटले, नाहितर कुठुनतरी पहात असतीलंच कि........

    डाँ. अभिजीत सोनवणे

    Doctor of Begger

    Social Health And Medicine (Soham ) Trust

    सोहम ट्रस्ट हि वयोवृध्द व आजारी भिक्षेकर्यांची (ज्यांना घरातल्या लोकांनी बाहेर काढले आहे, आणि भीक मागण्या शिवाय ज्यांच्या कडे दुसरा पर्याय नाही) सेवा शुश्रुषा करुन त्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणारी संस्था आहे.

    कारण हे लोक कितीही त्रास असला तरी , पैशाअभावी डॉक्टरांकडे जात नाहीत व वेळेअगोदरच नाईलाजाने त्यांना या जगातुन जावे लागते.

    अशा वयस्कर भिक्षेकर्यांचे औषधोपचाराविना वेळेअगोदरच होणारे मृत्यु टाळणे (मृत्युदर कमी करणे) हे संस्थेचे उद्दिष्ट आहे.

    आपणांसारख्या सहृदय लोकांच्या आशिर्वादाने हे काम सुरु आहे.

    आपण या कार्यात सहभागी होणार असाल तर संस्थेला आपण अशी मदत करु शकताः

    1. एक रुपयाचीही आर्थिक मदत स्विकारली जाईल. (सोहम ट्रस्ट च्या नावे काढलेल्या चेकने- कँश स्वरुपात नाही)
    आपण दिलेल्या मदतीतुन बीपी , डायबेटिस, यासारख्या कायमस्वरुपाच्या आजारांवर लागणारी ॲऔषधे (जी वर्षानुवर्षे द्यावी लागतात ) रुग्णांस मोफत पुरवली जातील.

    2. आपणांकडे चालु स्थितीत असणारे कोणतेही वैद्यकीय उपकरण उदा. बीपी मशीन, स्टेथोस्कोप, ग्लुकोमीटर , थर्मामीटर अथवा कोणतेही इतर उपकरण ज्याचा उपयोग रुग्ण तपासण्यासाठी होईल , ते देवु शकता.

    3. आपणांस नको असणारी व Expiry Date न संपलेली औषधे आपण ट्रस्टला देवु शकता.

    4. कुबड्या , वॉकर, कमोड चेअर यांसारख्या वस्तु.

    5. संस्था चालविण्यासाठी आवश्यक असणाऱ्यां गोष्टी उदा. जुने टेबल , खुर्ची, computer , printer, आँफिस स्टेशनरी अथवा तत्सम बाबी संस्थेला देवु शकता.

    6. डॉक्टरांना मदत म्हणुन प्रत्यक्ष जागेवर येवुन या वयस्कर भिक्षेकरी रुग्णांची सेवा शुश्रुषा (जखमा स्वच्छ करणे , ड्रेसींग करणे ) यासारख्या कामात डॉक्टरांना मदत करु शकता.

    7. याव्यतीरीक्त आपणांस जे शक्य असेल ते.... !!!

    8. वरील पैकी काहीही शक्य नसेल तरीही आपण फक्त आलात आणि यांच्याशी प्रेमाने दोन शब्द बोललात तरी ती ही लाखमोलाची मदत ठरेल, कारण यांना फक्त भिक नकोय, त्यांना हवंय प्रेम आणि माया

    ज्यावेळी आपण कोणतीही मदत करता, त्यावेळी ही मदत आम्ही आपले नाव त्यांना सांगुन आपल्या नावे त्यांच्यापर्यंत पोचवतो.. ज्यावेळी आम्ही या वयस्कर लोकांना आपलं नाव सांगतो , त्यावेळी खरोखरीच हृदयापासुन त्यांनी तुम्हाला दिलेला आशिर्वाद ऐकुन आणि पाहुन असं वाटतं, ज्यांनी हि मदत दिली आहे , ते खरोखर आज इथे हवे होते हे सर्व पहायला !!!

    आपण दिलेली मदत नेमकी कोणापर्यंत पोचली आहे याचे सर्व डिटेल्स आम्ही मदतकर्त्यांना पोचवतो जेणेकरुन आपण त्या व्यक्तिशी परस्पर संवाद साधु शकता, आणि हेच वैशिष्ट्य आहे सोहम ट्रस्टचे !!!

    डॉ. अभिजीत सोनवणे म्हणजेच Doctor For Beggar यांना आपण संपर्क करु शकता 9822267357 या नंबरवर.