(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बोलिव्हिया

    बोलिव्हिया

    बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातील एक भूपरिवेष्ठित देश आहे. बोलिव्हियाच्या उत्तरेला व पूर्वेला ब्राझिल, दक्षिणेला पेराग्वे व आर्जेन्टिना तर पश्चिमेला चिली व पेरू हे देश आहेत. ला पाझ ही बोलिव्हियाची राजधानी तर सान्ता क्रुझ हे सर्वात मोठे शहर आहे.

      October 7, 2018


  • ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

    ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, मुरबाड इ. तालुक्यांत भाताचे अधिक उत्पादन घेतले जाते. जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात नाचणी व वरीचेही पीक घेतले जाते. वसई तालुक्यात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

      June 26, 2015


  • krushna-canal

    कराड तालुक्यातील ब्रिटिशकालीन “कृष्णा कालवा”

    महाराष्ट्रात कालव्यांचा विकास जवळजवळ १५० वर्षांपूर्वी सुरु झाला. सन १८७० मध्ये “कृष्णा” हा नावाचा पहिला कालवा बांधल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात राज्यात अनेक कालवे बांधले गेले आणि नंतर सिंचन क्षेत्राच्या विकासाला गती मिळाली.

    ब्रिटीशकालीन खोडशी धरणातून सांगली जिल्हय़ात पाणी नेण्यासाठी कृष्णा कालव्याची निर्मिती करण्यात आली. सैदापूरच्या रेणुका मंदिराजवळ कृष्णा कालवा सुरू होतो.

    खोडशी (ता. कराड) येथून निघालेला कृष्णा कालवा ८६ कि.मी. लांबीचा असून, तो सातारा, सांगली जिल्ह्यातून जातो. या दोन्ही जिल्ह्यातील कराड, वाळवा, पलूस, तासगाव या तालुक्यातील ४५ गावांतील सुमारे ९४०० हेक्टर क्षेत्र या कालव्याच्या लाभ क्षेत्रात येते.

    सध्या या कालव्याला अतिक्रमणांनी विळखा घातलेला दिसतो. जवळपास २००० हेक्टरहून जास्त क्षेत्रामध्ये अतिक्रमणे आहेत.

      April 14, 2017


  • टांझानिया

    टांझानिया

    टांझानिया हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. डोडोमा ही टांझानियाची राजधानी आहे, आणि दार एस सलाम हे टांझानियातले सर्वांत मोठे शहर आहे. स्वाहिली ही ह्या देशाची राष्ट्रभाषा आहे.

      February 24, 2019


  • ग्वातेमाला

    ग्वातेमाला

    ग्वातेमालाचे प्रजासत्ताक हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुरास व साल्वाडोर, पूर्वेला बेलिझ व कॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.

    ऐतिहासिक काळात मेसोअमेरिकेच्या माया संस्कृतीचा भाग असलेला ग्वातेमाला १६व्या शतकापासून स्पेनच्या अधिपत्याखाली होता. १८२१ साली ग्वातेमालाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथे अनेक हुकुमशहांनी सत्ता गाजवली. १९६० ते १९९६ दरम्यान ग्वातेमालामध्ये प्रदीर्घ यादवी युद्ध चालू होते. त्यानंतरच्या काळात येथे लोकशाहीवादी सरकार असून अनेक आर्थिक सुधारणा घडून आणल्या गेल्या आहेत.

      October 10, 2018


  • ऐतिहासिक गोल घर – पाटणा

    ऐतिहासिक गोल घर – पाटणा

    बिहारची राजधानी पाटणा शहरातील गोल घर हे जगप्रसिध्द आहे. गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग यांनी सन १७७० मध्ये गोल घर निर्मितीची योजना तयार केली.

      December 7, 2016


  • P-6198-Karvande

    कोकणचा मेवा – करवंदे

    डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे. सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. रत्नागिरीच्या बाजारात दिसणाऱ्या कोकमासोबतच काळे टपोर करवंदे पर्यटकांना आवडतात. डोंगर उतारावरील करवंदांच्या जाळीतून ग्रामीण महिलांनी (कोकणात त्यांना मामी म्हणतात) बाजारात आणलेले ताजी करवंदे पाहून तोंडाला पाणी सुटते. अत्यंत चवदार असलेल्या या करवंदांचे सरबतही कोकणात मिळते. पाच रुपयाचा वाटा घेतल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासात हा गोडवा सहजपणे जिभेवर रेंगाळतो.

      November 16, 2018


  • इंदूरचे होळकर पॅलेस

    इंदूरचे होळकर पॅलेस

    होळकर घराण्याची सत्ता असताना इंदूर येथे सात मजली राजवाडा बांधण्यात आला भारतीय ऐतिहासिक वास्तुशिल्प कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे.

      June 1, 2016


  • मुंबई जिल्ह्यातील लोकजीवन

    रोजगाराकरता मुंबईत अनेक लोकांचे स्थलांतर झाले आहे अणि सतत होत असते. शहरात ६८% हिंदू, १७% मुस्लिम, ४% ख्रिस्ती व ४% बौद्ध अशी लोकसंख्या आहे. बाकी लोक पारशी, जैन, ज्यू, शीख इत्यादी आहेत. मुंबईत प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जात असून हिंदी, इंग्रजी, कोकणी या भाषादेखील बोलल्या जातात.

      June 26, 2015


  • गाव तेथे ग्रंथालय

    गाव तेथे ग्रंथालय

    महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम १९६७ अन्वये ग्रंथालय संचालनालय या विभागाची स्थापना करुन राज्यात सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आलेली आहे.

    राज्य शासनाच्या गाव तेथे ग्रंथालय या घोषवाक्यानुसार स्थापन करण्यात आलेली ही ग्रंथालये नागरिकांना विविध स्तरांवर विनामूल्य सेवा देत आहेत.

      March 10, 2017