महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
कोयना धरण जलसंधारणाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने १९५६ साली कोयना धरणाच्या कामाला प्रारंभ केला.
१९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्णत्वास आले.
सातारा जिल्ह्यातील कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाची उंची १०३.९ मी व लांबी ८०७.१ मी एवढी आहे.
हे देशातील प्रमुख धरण मानले जाते
March 22, 2017
दक्षिण आफ्रिकेच्या नैऋत्येस अटलांटिक महासागर व दक्षिण, आग्नेय व पूर्व दिशेला हिंदी महासागर आहे. उत्तरेला नामिबिया, बोत्स्वाना व झिंबाब्वे हे देश असून ईशान्य दिशेला मोझांबिक व स्वाझीलँड हे देश आहेत. लेसोथो हा देश पुर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत आहे. दक्षिण आफ्रिकेला एकुण २,७९८ किमी लांब समुद्रकिनारा लाभलेला आहे.
दक्षिण आफ्रिका हा विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. देशाच्या राज्यघटनेने अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात. सार्वजनिक आणि व्यावसायिक जीवनात इंग्रजी सर्वसाधारणपणे वापरली जाते.
March 7, 2019
मदुराई हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. वैगाई नदीच्या किनाऱ्यावर वसलेले हे शहर तमिळनाडू राज्यातील तिसरे मोठे शहर आहे.
October 11, 2023
शिर्डीचे साईबाबा मंदिर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी हे गांव साईबाबांच्या वास्तव्यामूळे आधुनिक पर्यटन स्थळ म्हणून मान्यता पावले आहे. शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास या मुळे शिर्डी लाखो भाविकांचे श्रध्दास्थान बनले आहे.
June 22, 2015
पुणे शहर हे महाराष्ट्रातील महत्त्वाची औद्योगिक नगरी असुन माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. पुणे-मुंबई ही दोन महत्त्वाची शहरे जोडणार्या महामार्गावरील पिंपरी, चिंचवड हा परिसर औद्योगिक घनता जास्त असलेला पट्टा आहे.
June 23, 2015
आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे एक एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिध्द आहे. सन १९०५ मध्ये याला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान म्हणून काझीरंगाने शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.
July 8, 2016
जिल्ह्यात जालना, परतूर,अंबड, भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून,जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना जिल्ह्यात ४ साखर कारखाने आहेत.
June 23, 2015
कर्नाटक राज्यातील गदग आणि बेटागेरी या दोन शहरांची मिळून एकच महापालिका बनविण्यात आली आहे. याच शहरात गदग जिल्ह्याचे मुख्यालयही आहे.
गुती-वास्को महामार्गावर असणारे हे दुहेरी शहर हुबळीपासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेचे गदग हे महत्वाचे जंक्शन असून हुबळी-होस्पेटगुंटुकल लाईनवर ते आहे.
मंदिरांचे शहर
गदग-बेटागेरी या शहरांत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथील त्रिकुटेश्वर महामंदिरात शिव,ब्रम्हा आणि सूर्य यांची स्वतंत्र मंदिरे असून, चालुक्यकालीन शिल्पकलेचे सैादर्य येथे पाहायला मिळते. येथील प्राणिसंग्रहालयही खूपच प्रसिध्द असून ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात.
February 7, 2017
रोमेनिया (मराठी-हिंदीत रुमानिया) हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. रुमानियाच्या पश्चिमेला सर्बिया व हंगेरी, उत्तरेला युक्रेन, पूर्वेला मोल्दोव्हा, दक्षिणेला बल्गेरिया हे देश तर आग्नेयेला काळा समुद्र आहे. बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
February 24, 2019
हिंदुस्थानात संस्थात्मक जीवनाचा व सनदशीर राजकारणाचा पाया घालणारे न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाडचा होय. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके, ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि दलित मुक्तीसाठी लढणारे दादासाहेब गायकवाड हे सगळे विविध क्षेत्रांतील दिग्गज नाशिक जिल्ह्याच्या भूमीतले होते.
June 23, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti