(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दफ्तर दिरंगाई दखलपात्र गुन्हा करा अन्यथा अराजक निश्चित

    13 रविवार,जानेवारी 2008

    प्रशासनाने आश्वासन देऊनही आपली मागणी मान्य झाली नाही म्हणून एका महिलेने चंद्रपूरच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षातच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेने बरीच खळबळ माजली. त्या अधिकाऱ्याच्या कक्षात उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने समयसूचकता दाखवित वेळीच त्या महिलेला रोखल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.

      January 13, 2008


  • गृह मंत्रालयाची लक्तरे वेशीवर!

    सेकंदात जगाच्या एका टोकावरची माहिती दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचविणाऱ्या माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात आमच्या पोलिसांकडे अतिरेकी कुठून गोळीबार करीत आहेत ही माहिती नसावी आणि असली तरी ती आपल्या वरिष्ठांकडे पोहोचविण्याची सोय नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? एकविसाव्या शतकातले युद्ध सतराव्या शतकातल्या तयारीने लढायचे असेल तर करकरे, कामटे, साळसकरसारख्यांचे बळी जाणारच! आमच्या पोलिसांजवळ अत्याधुनिक शस्त्रे नाहीत, दळणवळणाची अत्याधुनिक साधने नाहीत, आपापसातला योग्य समन्वय नाही, अतिरेकी त्यांचीच जीप घेऊन पळतात इतके ते बेसावध असतात; या सगळ्याला जबाबदार या देशाचे आणि राज्याचे गृहखाते, पर्यायाने गृहमंत्री आहेत.

      November 30, 2008


  • जागतिक भ्रष्टाचार आलेख व क्रमवारी सन २०१०.

    सकाळचे वर्तमान पत्र उघडताच भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्याची पण आपणास सवय झाली. प्रत्येक जण त्यां बद्दल बोलतो पण सध्याच्या बिघडलेल्या परिस्थिती मध्ये कोणीही कसलेही पाऊल उचलणयास धजत नाही.

    भ्रष्टाचार हा काहीं भारतातच आहे असे नाही तर सबंध जगात तो बोकाळ लेला आहे. जर का देशाची प्रगती सर्वांगीण साधायची असेल तर सरकारला भ्रष्टाचार रुपी राक्षसास समूळ नष्ट करावे लागेल. त्या साठी काहीं कठोर पावले उचलावी लागतील तसेंच वेळ पडल्यास स्वकीयावर कारवाई करण्यास कुचराई करतां कामा नये .

    गेली ६० वर्षे आपण बघतो आहोत कि हा भ्रष्टाचार रुपी राक्षस असा वाढला कि त्याला मारणे किवां काबूत ठेवणे पण कठीण होऊन गेले. ह्या चें मुळ कारण देश भक्ती,सदाचार, सच्चेपणा, निष्कलंकता , आत्मीयता ,जिव्हाळा,तसेंच निस्वार्थ बुद्धी अशा सर्वच गुणांचा झालेला ऱ्हास.सध्याची बदललेली राजकीय समीकरणे , राजकीय नेते,सरकारी अधिकारी,प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष व ईतर उच्च पदावर असलेले प्रतिष्ठीत ह्या सर्वांची स्वहित जपण्याची प्रवृत्ती त्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार माजलेला आहे.

    सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व सरकारी क्षेत्रात पारदर्शकता व आकाउंटीबिलीटी ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहे ती जर अमलात आणली तर, हा भ्रष्टाचार चा राक्षसास समाप्त करणे कठीण जाणार नाही.जगात अशी पण उदाहरणे आहेत कि जेव्हा भ्रष्टाचाराचा विळखा सर्वत्र पसरला तर जनतेस जगणे अशक्य होऊन जाते तेव्हां ,जनतेचा राग कोणीही थांबू शकणार नाही. सर्व भ्रष्टाचारी मंडळींची काय गत होईल ते देवच जाणे.

    भारतीय जनता फारच शोशिक आहे पण कां एकदा त्याचा अंत झाला कि मग परिस्थिती काहीं वेगळीच होईल. तेव्हां सर्व राजकर्त्यांनी,सरकारी अधिकारि,आणि उच्च पदस्थ लोकांनी वेळीच सावध होऊन स्वहित जपणे सोडले पाहिजे नसता लोक क्षोभास समोरे जावे लागेल हें पक्के.

    भारत सरकारने मग ते कोणत्याही पार्टीचा कां असेना UNO convention against curruption चा ठराव कडकरीत्या आमलात आणले पाहिजे व आपल्या राजकारणी नेत्यांनी " स्वहित " बाजूला सारून किवां त्यागून जनतेच्या भल्यासाठी ,देश प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्या कामात पारदर्शकता, जवाबदारी च्या भावनेनी वागले पाहिजे नसता पुढचा काळ त्यांचा अंधारमय होईल.

    जगातील काहीं देशांनी आपला कारभारात पारदर्शकता व जवाबदारीने करून आपल्या राष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर आणल्याची उदाहरणे आहेत. डेन्मार्क,न्यूझीलंड,आणि सिंगापोर ह्या देशांनी कठोर कारवाई, पारदर्शकता,जवाबदार वृतीने काम करून भ्रष्टाचाराचा नाश करून जागतिक क्रमवारीत वरच्या कृमंकावर जाऊन पोहचली आहेत. ह्या वरून असे दिसून येते कि स्वछ राज्य कारभार, लोक उपयोगी कामे, आत्मीयता,आणि देशासाठी समर्पण भावना ठेऊन राष्ट्र हिताची कामे केली तर टप्या , टप्याने भ्रष्टाचार रुपी राक्षसाचा नाश करणे साध्य होईल.

    वर उध्रत केल्या प्रमाणे जागतिक भ्रष्टाचारचा आलेख व क्रमवारी Transparancy International ह्या संथेने जगातील १७८ राष्ट्राचा अभ्यास व पडताळणी करून एक अहवाल तय्यार केला आणि त्यांत सर्वात जास्त भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे व सर्वात कमी भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ह्यावरून त्यांनी सर्व देशाची क्रमवारी केली. कोण कोणती राष्ट्रे किती भ्रष्टाचारी आहेत ते ० ते १० यां माप पट्टी ने मोजून क्रमवारी दिली आहे. आपणा साठी तो आलेख व माप पट्टी कृमांक देत आहे. ह्या क्रमवारीत भारत देश ( इंडिया ) ८६ कृमंकावर आहे व माप पट्टी मध्ये भ्रष्टाचार मोजणी ३.३ आहे.

    आपण आशा करुया कि भारतीय राजनीतिक नेते ह्या पासुन काहीं शिकतील व आपला देश पण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त होईल.

    -- मा.ना. बासरकर

      February 23, 2011


  • मत आणि मन

    साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण गेल्या काही दशकात जे चित्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही समाजकारणात, राजकारणात पहायला मिळते आहे ते चिंताजनक आहे.

    पूर्वी एखाद्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडीवर, घटनेवर समाजाच्या विविध थरातले मान्यवर मतप्रदर्शन करीत तेव्हा आपली.. भूमिका स्पष्टपणे व ठामपणाने मांडीत. परंतु सध्या हा ठामपणा, स्पष्टपणा अभावानचे आढळतो. परस्परामध्ये गुंतलेल्या हितसंबंधांमुळे सार्वजनिक जीवनात एक प्रकारचा बोटचेपेपणा बोकाळलेला दिसतो. आपल्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी किंवा नविन हितसंबंध जोपासण्यासाठी सावध, वरवरच्या आणि भूमिकाहीन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. मनातले मतभेद उघडपणे व्यक्त करण्याची जोखीम कोणी पत्करत नाही.

    या हिशोबी, गुळमुळीत भूमिकेच्या अगदी विरूद्ध टोकाची भूमिका घेणारा वर्गही समाजात निर्माण झालेला आढळतो. एखाद्याच्या वक्तव्याबद्दलचे, कृत्याबद्दलचे मतभेद तीव्रपणे जाहिररित्या व्यक्त करण्याची नवीन शैली या मंडळीनी विकसीत केली आहे. त्या व्यक्तीचे पुतळे जाळण्यापासून ते त्या व्यक्तीशी संबंधही नसलेल्या जनतेला रास्ता रोको करून वेठीला धरण्यापर्यंत कोणत्याही थराला ही मंडळी जाताना दिसतात. अशा तीव्र मतभेद प्रदर्शनामध्ये अनेकदा आपण मुद्द्यांना उत्तर गुद्द्यांनी ' देतोय याचेही भान संबंधितांना राहत नाही. कार्यशैली वा घेतलेल्या निर्णयाबाबतचे मतभेद व्यक्त करताना त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करून, त्याच्या खाजगी आयुष्यावर अतिक्रमण केले जाते.

    अशा दोन्ही पद्धतीच्या अतिरेकी वृत्तींमुळे समाजाचा तोल ढासळतो आहे. कोणत्याही समाजाची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विधायक विरोध किंवा मतभेद आवश्यकच असतात. पण सध्याच्या काळात मतभेद व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यच कोणी मानायला तयार नाही. एखादया विषयावरील मतभेदामुळे उसळलेल्या तात्विक व सात्विक वादाचा धुरळा खाली बसल्यानंतर त्या विषयाचे अधिक नेमके व नेटके रुप लोकांना दिसते. पण आज विरोधाचा लहानसा सूर ही तात्काळ दाबला जात असल्याने, परिस्थितीचे नेमके आकलनच होत नाही. परिणामी, अनेक निर्णय बहुमताने पण आंधळेपणाने घेतले जातात. हे निरोगी समाजाचे लक्षण नव्हे.

    मतभेदांमुळे मते दुरावतात आणि मने दुखावतात हे जरी खरे असले तरी हा दुरावा कायमचा नसतो हे ध्यानात घेतले पाहिजे. टिळक आणि आगरकर या महापुरूषांमधील मतभेद याचेच उदाहरण म्हटले पाहिजे. सामाजिक सुधारणांना अग्रक्रम द्यावा का स्वातंत्र्याच्या मागणीला यावरून त्यांच्यात मतभेद होते पण वैर नव्हते हे विसरता कामा नये, आज मतभेद असणे म्हणजे वैर असणे असाही गैरसमज करून घेतला जातो. आणि वैर टाळण्यासाठी मतभेद लपविले जातात. या विचारसरणीमुळे समाजात आपोआप एक घातक पायंडा पडत चालला आहे. तो म्हणजे वाईट गोष्टींना (मूक) संमती देणे व चांगल्याला (खुला) पाठिंबा न देणे. केवळ इतरांची मने दुखवली जातील म्हणून समाजविघातक रुढी, परंपरांना विरोध केला जात नाही. आणि अशा गोष्टींचा प्रसार होत रहातो.

    राजा नागडा आहे हे सांगणारा मुलगा काय किवा राघोबांना देहांत प्रायश्चित सुनावणारे रामशास्त्री काय, ही मंडळी केवळ कल्पनेच्या जगातच शिल्लक राहिली आहेत. ठाम विचारांनी सौम्यपणे, समोरच्याचा योग्य आदर राखून मतभेद व्यक्त करणारे सुजाण, सुसंस्कृत लोक आज हवे आहेत. विरोधी शेरे- ताशेऱ्यांना न घाबरता, त्यांचे सभ्यपणे खंडन करणारे लोक आज हवे आहेत, समाजातील बुद्धिजीवी वर्गात ही शक्ती सुप्त स्वरूपात आजही आहे. गरज आहे ती त्यांनी आपली जबाबदारी ओळखून, ती धैर्याने पार पाडण्याची. मतभेत असणे आणि ते मोकळेपणाने व्यक्त करता येणे हे समाजाच्या सहिष्णुपणाचे लक्षण आहे. हे लक्षण लोप पावणार नाही याची खबरदारी आपण सर्वानी घेतली पाहिजे.

    --चिंतामणी कारखानीस

      November 11, 2015


  • “पॅकेज” चे मृगजळ !

    सध्या नागपुरात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कापूस उत्पादक पट्ट्यातील आणि त्यातही विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न या अधिवेशनात गाजत आहे. ‘गाजत’ हा खरोखरच यथार्थ वर्णन करणारा शब्द म्हणावा लागेल.

      December 11, 2005


  • ग्रामीण भागातील शैक्षणिक अवस्था

    आज कित्येक मुल शिक्षणापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील परिस्थिती एवढी विपरीत आहे कि शिक्षण नावाचे अक्षरही त्या आईवडिलांना माहित नसते ,अडाणी आई वडिलांना शिक्षणाचे महत्व माहित नसल्याने त्यांच्या मुलांना देणे हि त्यांना आवश्यक नाही वाटत आणि ज्याना शिक्षणाचे मोल आहे त्या पालकांचे शिक्षणाच्या अवास्तव खर्चापायी मुलांना शिकवायचे स्वप्न स्वप्नच राहून जातात .

      July 13, 2019


  • दहावी नापासांचा देश!

    आठव्या वर्गात त्याला बर्‍यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्‍या-तिसर्‍या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.

      May 16, 2010


  • सातच्या आत, घराबाहेर !

    आजच्या घराघरातील आई-वडिलांना खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ‘आमची मुलं बिघडली हो’ असा आक्रोश करण्याची वेळ येणार नाही आणि ‘सातच्या आत घरात’ सारखे चित्रपट निर्माण करण्याची गरजच भासणार नाही !

      July 23, 2017


  • अनिवार्य मतदानाची गरज अधोरेखित !

    मतदान केले नाही तर सगळ्या सोयी बरखास्त होतात, याचा एकदा अनुभव घेतला, की लोक अगदी मसणातून उठून मतदान करायला येतील. पाच राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका आणि त्याचवेळी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकांचे तुलनात्मक विश्लेषण केल्यास मतदानाची अनिवार्यता किती गरजेची आहे, हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.

      March 12, 2012


  • आनंदाची अनुभूती

    सुखाची अनुभूती हीच आनंदाची अनुभूती असतें. अंतर बाह्य बदलल्या शिवाय सुख व आनंद मिळत नाही.अनेकांना सुख कळले पण वळले नाही. सुख म्हणजे नक्की काय असतं ?याचे उत्तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. अनेकांना सुख कळले पण सुखाच्या पायवाटा नाही कळल्या. सुख मिळवण्याची प्रत्येकाची धडपड असते.

      July 1, 2026