(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनपेक्षित

    दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्‍याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते.

      January 2, 2020


  • कापूस ठरला शेतकर्‍यांचे कफन!

    छोट्या शेतकर्‍यांच्या समस्यांकडे सरकार जाणीवपूर्वक वागत आहे आणि त्यामुळे तर शेतकर्‍यांनी शेती सोडावी किंवा आत्महत्या करावी अशी परिस्थिती निर्माण करत आहे. कापसावरील निर्यातबंदीच्या आणि गरिबांना मोफत किंवा स्वस्तात धान्य या निर्णयाकडे त्या दृष्टीनेही पाहता येईल.

      March 17, 2012


  • अवयवदानाचा संकल्प

    शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा किडनी पुरता मर्यादित नसून शरिराचे सुमारे 10 विविध अवयव आपण दान करू शकतो. फक्त त्यासाठी पाहिजे पुरेशी माहिती व तुमची इच्छा…

    गेल्या २० वर्षात फक्त ७५४ लोकांनीच अवयवदान करून इतरांना जीवनदान दिलेले आहे. या आकड्यावरूनच अवयवदानासंबंधी किती मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, हे लक्षात येईल.

    मनुष्य देहातून प्राण निघून गेल्यावर त्या पार्थिवाला पंचतत्वात विलीन करण्याच्या प्रत्येक धर्माच्या आपापल्या पद्धती आहेत. पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी यात मानवी शरीरासोबत, त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयवसुद्धा नष्ट होतात. या शरीरातील काही अवयव आजच्या अत्याधुनिक वैद्यकीय प्रगत शास्त्रामुळे दुसऱ्या रुग्णांमध्ये प्रत्यरोपीत करून त्याला जीवनदान देता येते. अर्थात ही प्रक्रिया सोपी मुळीच नाही. प्रथमत: समाजात जागृती निर्माण होणे, नंतर उच्च वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशासनाचे सहकार्य अशा अनेक गोष्टींच्या सहकार्यानेच अवयव प्रत्यारोपण प्रत्यक्षात शक्य होते. आपण संक्षेपमध्ये देहदान अवयवदानबाबत माहिती करून घेऊयात.

    देहदान : यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर संपूर्ण देहाचेच दान करण्यात येते. देहदान हे मेडिकल कॉलेजमध्येच केले जाते. या देहाचा उपयोग शिकाऊ डॉक्टर यांना प्रशिक्षण देण्यासाठी होतो. यातूनच चांगले डॉक्टर्स तयार होतात याच डॉक्टरला समाज पुढे देवासमान मानतो.

    मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाची उपयोगिता संपल्यावर सन्मानाने तो देह पंचतत्वात विलीन केला जातो. देहदानाचे फॉर्म मेडिकल कॉलेज या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांकडे उपलब्ध आहेत. नागरिकांनी फॉर्म भरून जवळच्या नातेवाईकांची सही घेतल्यास तुमची इच्छा त्यांच्याही लक्षात येईल ती व्यक्ती मृत झाल्यास देहदान करणे सोपे जाईल. फॉर्म भरला म्हणजे देहदान होईलच, असे नाही. जर जवळच्या नातवाईकांनी नकार दिला तर देहदान होऊ शकत नाही. आणि फॉर्म भरला नसेल मृत्यूनंतर जर जवळच्या नातेवाईकांनी देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली तर देहदान होऊ शकेल. देहदान करण्यासाठी जवळच्या मेडिकल कॉलेज अथवा सामाजिक संस्थेला फोन करणे एवढेच पुरेसे आहे. देहदान हे जास्तीत जास्त ५-६ तासांत होणे गरजेचे आहे.

    अवयवदान : मनुष्य काही कारणाने अती कोमात जातो मेंदू मृत (brain dead) झाल्यावरच अवयवदान करता येते. डॉक्टरांचे सर्व प्रयत्न थकतात रुग्ण कोमातून बाहेर येण्याची शक्यता संपते रुग्ण कृत्रिम श्वासोच्छवासावर जिवंत असतो. अशा परिस्थितीत काही अवयवांचे दान करता येते.

    आपल्याला डोळे, त्वचा, यकृत, हृदय, मूत्रपिंड, प्लीहा यासारख्या अवयवांची अमुल्य भेट मिळालेली आहे. निसर्गाने दिलेली ही भेट आपल्या मृत्यूनंतर इतर गरजू रूग्णांना तुम्ही दान देऊ शकता. या अवयवदानाने मृत्यूच्या उंबरठयावर उभ्या असलेल्या रूग्णांना दुसरे जीवन जगण्याची संधी मिळते व मृत्यूनंतरही आपण दुसर्‍याच्या शरीरात जिवंत राहू शकतो. अवयवदानाच्या उदात्त कार्याला जाती-धर्माचे, दर्जाचे अथवा लिंगाचे बंधन नाही. सद्य परिस्थितीत देशात सुमारे 5 लाख मूत्रपिंड, 50 हजार यकृत, 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रूग्ण असून या रूग्णांना अवयवांची गरज आहे. मूत्रपिंड विकारावर कृत्रिम रक्त शुद्धिकरण हा पर्याय आहे. परंतु यकृत, हृदय, फुप्फुस विकारांनी त्रस्त रूग्णांना असा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी नवीन अवयव प्रत्यारोपण हाच एकमेव मार्ग आहे. जागतिक पातळीवर विचार करता मृत्यूनंतर अवयवदान करण्याचे प्रमाण भारतात अत्यल्प आहे. सामाजिक व कौटुंबिक जनजागृतीच हा बदल घडवून आणू शकेल.

    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      January 2, 2017


  • गृह मंत्रालयाची लक्तरे वेशीवर!

    सेकंदात जगाच्या एका टोकावरची माहिती दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचविणाऱ्या माहिती-तंत्रज्ञानाच्या या युगात आमच्या पोलिसांकडे अतिरेकी कुठून गोळीबार करीत आहेत ही माहिती नसावी आणि असली तरी ती आपल्या वरिष्ठांकडे पोहोचविण्याची सोय नसावी, यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? एकविसाव्या शतकातले युद्ध सतराव्या शतकातल्या तयारीने लढायचे असेल तर करकरे, कामटे, साळसकरसारख्यांचे बळी जाणारच! आमच्या पोलिसांजवळ अत्याधुनिक शस्त्रे नाहीत, दळणवळणाची अत्याधुनिक साधने नाहीत, आपापसातला योग्य समन्वय नाही, अतिरेकी त्यांचीच जीप घेऊन पळतात इतके ते बेसावध असतात; या सगळ्याला जबाबदार या देशाचे आणि राज्याचे गृहखाते, पर्यायाने गृहमंत्री आहेत.

      November 30, 2008


  • लकशाहीचे मढे कुजले आहे !

    लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेल्या लोकांचे सरकार, ही लोकशाहीची व्याख्या किमान आपल्या देशात तरी अतिशय संकुचित झाली आहे. इथे लोकांना फत्त* मतदानाचा किंवा आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे. अर्थात तो हक्कही अनेक मार्गांनी बाधित होत असतो.

      July 27, 2008


  • शिखंडी राज्यकर्ते!

    विदर्भातील कापूस पट्ट्यात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उद्रेक सुरू आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी नाही, असा एकही दिवस जात नाही. सरकारच्या सगळ्या कथित प्रयत्नानंतरही आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही, उलट ते वाढतच चाललेले दिसते.

      November 20, 2005


  • कोंडी झालेला उध्वस्त भारत

    प्रकाशन दिनांक :- 30/11/2003
    एखाद्या गोष्टीचे यथार्थ, वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे असेल तर केवळ त्या गोष्टीच्या बाह्यरंग, रूप, आकारावरून कधीच करता यायचे नाही. तसा प्रयत्न केला तर हाती येणारा निष्कर्ष हमखास चुकू शकतो. एखादे साधे बीज असेल तर ते सकस आहे, चांगल्या प्रतीचे आहे, त्याचा वाण उत्तम आहे, हे केवळ ते बी हातात घेऊन सांगता येणार नाही.

      November 30, 2003


  • डॉक्टर आजारी झालेत!!

    मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. नव्हे तो समाजप्रिय प्राणी आहेच. आदिम काळातील रानटी अवस्थेपासून मनुष्यप्राण्याची ती स्वाभाविक गरज ठरत आली आहे. शत्रूच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले प्राणी समूहाने वावरून आपली सुरक्षितता जोपासतात, हा निसर्गनियम आहे आणि मानव त्याला अपवाद नाही. ही सुरक्षितता जोपासताना एकमेकांना सहकार्य आणि आलेल्या संकटाचा सामूहिक मुकाबला केला जातो. प्रगत मानवात ही व्यवस्था समाजाच्या रूपाने अधिक विकसित झाली. परस्परांच्या सहकार्याने सुखी आणि समृध्द जीवन व्यतीत करणे सामाजिक व्यवस्थेचा पाया ठरला. इतर प्राण्यांमध्ये ही व्यवस्था प्राथमिक स्वरूपात असताना मानव प्राण्याने मात्र आपल्या बौध्दिक विकासाच्या जोरावर ही व्यवस्था चांगलीच सुदृढ केली. असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मानव स्वत:च्या हाताने ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाला की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे.

      July 28, 2002


  • संघटित भावना आणि नगर-संस्कृती

    मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते.

      October 23, 2010


  • विदर्भाची ओळख कोणती?

    मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता.

      December 3, 2006