आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो.
कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून बंडखोर काव्याची निर्मिती होत जाते.आपल्या शब्दांच्या कधी लाह्या होतात आणि आकाशातल्या सगळ्या चांदण्याची कधी जागा घेतात हे आपल्याला समजत नाही.मधूनच तत्वज्ञानाचे नवनवे फंडे आपल्या हातून जन्माला येतात.
आपण या सगळ्यात एक साधी गोष्ट विसरून जातो की मुळात रखरखत्या उन्हात आपल्याला सावली मिळावी म्हणून नेहमी कुणीतरी ऊन झेलायलाच हवे असा काही दंडक होऊ शकत नाही.कधीतरी आपणसुद्धा आपल्या उन्हाची ख्याली-खुशाली विचारायला हवी.आपल्या उन्हानां आपल्याकडून होणाऱ्या विचारपुसेची आस लागून राहिलेली असते.बाकी सगळ्यांच्या स्पर्शापेक्षा त्यांना आपल्याकडून एक फुंकर अपेक्षित असते.आणि हे त्यांचे मागणं काही वावगं म्हणता येणार नाही.
साऱ्या जगात कितीही कौतुक झाले. मानपत्रे मिळाली तरी गावाकडल्या पाठीवरल्या थापेपुढे त्यांना मोल नसते.आपल्याला आपल्या उन्हापेक्षा शेजारच्या अंगणातली सावली जादा भाजून काढत असते.जगात उन्हाच्या भाजण्यावर औषध मिळू शकते.पण सावलीच्या भाजण्याला काही कुठे आराम मिळत नाही.
दुसरं असं होतं की आपल्याला सावली देणाऱ्या झाडाच्या फांद्या वठल्या की आपण त्यांचा हात अलगद सोडून देतो.आतापर्यंत केवळ त्यांच्यामुळे प्रत्येक नाजूक घडीला आपण सहीसलामत सुटलो याबद्दल आपल्याकडे कसलाही कृतज्ञपणा असत नाही.आणि कित्येकदा आपल्या कानावर पडणाऱ्या हाकांना आपण कृतघ्नपणे टाळून टाकत असतो. इथले सगळे व्यवहार केवळ देवाण-घेवाण अशा दोन बाजू असणार्या नाण्याच्या इशाऱ्यावर चालते हे सोयीस्करपणे विसरून जात असतो.
दिलेल्या कडू गोळीच्या कडवटपणाचे वास्तव आपण स्वीकारत नाही. त्याला सामोरे जायची आपण हिंमत दाखवीत नाही.सत्य हे नागडे असायला हवे हे सत्य आपल्याला पचनी पडत नाही.वेगवेगळ्या वेशभूषा करून आपण कुणाला फसवीत होतो.याचं उत्तर आपल्या मानगुटीवर बसते तेव्हा आपल्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. आपण त्यावेळी स्वत:वर डाव घेण्यासाठी कबूल होऊन कितीही आर्जवे करीत गेलो तरी हाती काही लागत नाही.
-- दीपक गायकवाड
April 28, 2017
July 29, 2007
मुलींची जबाबदारी सरकारणे घ्यायला हवी. हे झाले मध्यमवर्गीय माणसांच्या बाबतीत पण श्रीमंत वार्गाला एकच आपत्य हवे असते ते आपत्य ही मुलगा असावा अशी काहींची इच्छा असते. यातूनच त्यांच्याकडून मुलींचा गर्भात असतानाच जीव घेण्याचे प्रकार घडतात. मुलगा आपली म्हातारपणी काळजी घेईल या खोट्या आशेवर जगत असणारे मुलाचा अट्ट्हास करीत असतात.
July 23, 2014
देश चालवला जात नाही तो उतारावरून घरंगळत येतोय .नेते फक्त बोलतात.कुणाचाही प्रशासनावर ताबा नाही.नशिबाने चांगला हुकुमशहा मिळावा हीच आता देशाची गरज आहे.मग मोदी हुकुमशहा झाले तरी चालतील पण शासनाला अर्थात प्रशासनातील अधिका-यांना आता फक्त हुकुमशाहा च CONTROL करू शकतो.तो हुकुमशहा मात्र प्रामाणिक पाहीजे आपोआप सर्व सुता सारखे सरळ होतील
April 21, 2018
चीनने नुकतेच जगातील दुसर्या क्रमांकाची अर्थसत्ता हे स्थान मिळवले. 2025 पर्यंत चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क’मांकाची आर्थिक सत्ता होईल असा अंदाज आहे. आर्थिक सामर्थ्यावर लष्करी सामर्थ्य अवलंबून असल्याने महासत्ता बनण्याच्या प्रकि’येत आर्थिक विकास महत्त्वाचा ठरतो. जगात सर्वाधिक लोकसं’या असूनही चीनने हे यश मिळवले आहे. एकवीसावे शतक आपले असल्याचा दावा चीन खरा करेल असे वाटते.
August 14, 2010
ही ’इंटरनॅशनल् लेबर ऑर्गनायझेशन्च्या‘ जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथील कार्यालयाच्या दर्शनी भागावर लिहिलेली घोषणा, हल्ली मला बकवास वाटू लागलीय. विशेषतः महाराष्ट्राच्या ’कॅनव्हास‘वर तर मराठी कामगार-कर्मचार्र्यांची थडगी बांधण्याची ’कंत्राटी‘ कामे, जागोजागी घाऊक पध्दतीनं चालू असताना… अशासारखं घोषवाक्य आपल्याला वाकुल्या दाखवत अंतःकरणात दूर कुठेतरी कळ उमटवून जातं.
January 2, 2012

कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
August 19, 2025
कुणी लिहिलंय माहित नाही.. पण झणझणीत आहे. नुसतंच बोलबच्चनगिरी करणार्या शिक्षणतज्ज्ञांनी यातून काहितरी घ्यावं !
August 6, 2017
प्रकाशन दिनांक :- 30/05/2004
भारताच्या गरिबीचे तुणतुणे आम्ही भारतवासी नेहमीच वाजवतो. इतर पुढारलेल्या देशातसुद्धा भारताच्या गरिबीची नेहमीच कुचेष्टा होते. परंतु गरिबी निश्चित करण्याची जी मानके आहेत त्याचा विचार केला तर भारताची गरिबी वेगळ्या अर्थाने श्रीमंत ठरते.
May 30, 2004
हजारो पोलिसांना गडचिरोलीच्या जंगलात तैनात करूनही नक्षल्यांची ताकद कमी का होत नाही, या प्रश्नाचे उत्तर सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणातही शोधणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर अतिरेकी आणि नक्षल्यांच्या नावाखाली कुणाचे काही भले झाले असेल तर ते पोलिसात किंवा अन्य सुरक्षा यंत्रणेत दाखल झालेल्या बेरोजगार तरुणांचे, सुरक्षेची विविध साधने पुरविणाऱ्या कंपन्यांचे, वाहन उद्योगाचे आणि शस्त्रास्त्रे उत्पादन करणार्या कंपन्यांचे भले झाले आहे. बाकी सगळ्या समस्या जिथल्या तिथे आहेत.
October 16, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti