(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मातीचे प्रेम मातीशीच – समलिंगी संबंध

    "ऋतू पावसाळी, ऋतू माती आणि बियाण्याच्या प्रेमाची" गुणगुणत एक बियाणे मातीपाशी पोहचले. "चल, दूरहट, पावसाळी किडा." काय झाले तुला, ओळखले नाही, मी तुझा अनादी काळापासूनचा प्रेमी. "कधी होता, आता नाही, आता मी शेजारच्या शेतातील मातीशी प्रेम करते". हे चुकीचे आहे, मातीने बियाण्यावर प्रेम केले पाहिजे, अन्यथा सृष्टीचक्र भंगेल. वसंत येणार नाही. फुलांविना फुलपाखरू मरेल. गवत विना चरणारे जीव मरतील. जंगलाचा राजा शेरखानचा जीव हि जाईल. दाण्या-दाण्यासाठी भांडत मनुष्य हि कालवश होईल. "मी ठेका घेतला आहे, का या सर्वांचा, एवढेच प्रेम उतू जात असेल तर दुसर्या बियाण्यावर प्रेम कर". बियाणे मातीत रुजले नाही आणि धरती ओसाड पडली. असे आपण पाहिले आहे का? मातीने-मातीशी प्रेम करण्याचा अधिकार आपण मान्य करतो का? नाही. कारण हे सृष्टीचक्राच्या विरुद्ध आहे.
    मातीत बियाणे रुजत नसेल तर मातीचा डॉक्टर मातीला तपासतो. रोग निदान करतो. मातीची उर्वरा शक्ती वाढविण्याचे औषध देतो. युरिया, नत्र, जिंक, रासायनिक खत, शेण व सेंद्रिय खते इत्यादींचा वापर करून मातीची पोत सुधारल्या जाते. सारांश मातीत बियाणे रुजले पाहिजे याची आपण काळजी घेतो.
    मनष्य तर सर्वात बुद्धिमान आणि जीवित प्राणी आहे. पुरुषाने-पुरुषाची शारीरिक संबंध स्थापित करणे असो वा एका स्त्रीने दुसर्या स्त्रीशी विवाह करणे, हे सर्व सृष्टी नियमांच्या विरुद्ध आहे. यामुळे सृष्टीचक्र भंगते. समलिंगी आकर्षण, एक मानसिक आजार आहे, विकृती आहे. विकृती नेहमीच समाजात वेगाने पसरते. याचेच उदाहरण, उपचार करण्याची गोष्टच सोडा, अनेक तथाकथित बुद्धिमान लोक या रोगाला, रोग मानायला तैयार नाही. उलट अश्या संबंधाना प्रोत्साहन देतात. समलिंगी लोकांना वार्यावर सोडून देतात. पण काही वर्षांनी विकृत प्रेमाचे भूत उतरल्यावर त्यांच्या हाती फक्त निराशा येते. त्यांचे जगणे दूभर होते.
    या संबंधांना, मानसिक आजार मानून, योग-ध्यान, उचित औषध-उपचार, इत्यादी करून हा आजार वेळीच दूर केला पाहिजे. हेच समाजाच्या हिताचे आहे.
    -- विवेक पटाईत

      September 7, 2018


  • मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात

    मुख्यमंत्री साहेब आपण गुन्हेगारच आहात....

    आपण मुख्यमंत्री झालात हाच आपला पहीला गुन्हा. आपण साखरसम्राट नसताना असं धाडस केलंच कसं? साखरसम्राट होऊन नको त्या कारणानी टनामागे शेतकर्याचं शोषण केलं नाही हा आपला दुसरा गुन्हा

    गबर बागाईतदार शेतकरी वर्षानुवर्षे जिराईतदार शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे भान्डवल करून त्यांच्या टाळुवरचं लोणी खात आहेत.हे आपण ओळखले हाही गुन्हाच!शेतकर्यांना कर्ज माफ करण्याच्या नावाने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा सहकारी बँका आपलं उखळ पांढरे करुन घेतात हे आपल्या चाणक्ष नजरेतुन सुटले नाही हा काय लहानसा गुन्हा आहे?

    शेतकरी कायमचा कर्जमुक्त व्हावा या साठी तात्कालिक उपाययोजने ऐवजी दिर्घकालिन उपाययोजना अवलंबल्या हा काय गुन्हा नाही?सर्व सवलती आँनलाईन करून भुरट्या गबर शेतकऱ्यांना पायबंद घातला हाही गुन्हाच.

    साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार्या मार्केट कमीटी आणि दलालाची मक्तेदारी संपवण्याचा प्रयत्न करता हा गुन्हा कसा खपुन घ्यायचा?

    तुमच्या कार्यकाळात बाजार भाव कमी मिळाले ही बाब टाळता आली असती तर बरे झाले असते ,हे खरे असले तरीही कांदा घाटात फेकला आणि टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला तेव्हा ज्यांचे राज्य होते अन धरणात लघुशंका करणारे गादीवर विराजमान होते .त्यांचे काय ? हा प्रश्न विचारायचा नसतो.त्यांना सोडाहो त्यांना सगळं माफ आहे.

    तुम्ही मात्र विक्रमी तुर खरेदीचाही गुन्हा करता वर घोटाळा करणार्या व्यापार्यांवर कारवाई करता! हे काही बरे नाही.

    तुमचा अपघात झाला ,आम्हाला बरे वाटले .तुमच्या मरणावर टपलोच होतो. दुसरा असता तर अपघाताने हबकुन गेला असता .तुम्ही मात्र लगेच कामाला लागलात. याला काय अर्थ आहे?अजूनही एकही घोटाळा केला नाही ,हा गुन्हाच.

    तुम्ही ५ वर्षे राहीलात तर गरीब शेतकर्याचे प्रश्न कायमस्वरूपी मिटवाल ही भिती वाटते .या गुन्ह्याला शिक्षा हवीच साहेब, असे अनेक गुन्हे करीत रहा हीच विनंती

    -- संकलन : शेखर आगासकर

    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम . लेखकाचे नाव मला माहित नाही.

      June 11, 2017


  • भगवान बुद्ध, राजू गाईड आणि ईरोम शर्मिला

    भारतीय प्रजातान्त्रिक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन तिने निवडणूक लढविण्याचा निश्चय केला आहे. तिचा हा निर्णय निश्चितच योग्य आहे.

      August 14, 2016


  • सरकारी कर्मचाऱ्याची संघटित दादागिरी!

    आपला देश तसा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे, अर्थात ही गौरवाची बाब आहे की खेदाची हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकेल, परंतु केवळ आपल्या देशाची म्हणून अशी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे जागोजागी उभ्या असलेल्या, उभ्या होणाऱ्या संघटना. हा देश संघटनांचा देश आहे.

      March 25, 2007


  • बंदुकीची गोळी आणि ती

    तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक जागा मिळाली. समोरच्या सीट वर एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते.

      January 1, 2015


  • सेल्फी- एक व्यसन…

    तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्यांीपासून- तारूणांपर्यत सार्यां नाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत.

    तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्याु अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यांना त्यांच्या सभोवतालच्या निसर्गातील सौंदर्य दिसेनासे झालेले आहे. सेल्फी हे आजचा समाज कसा आत्मकेंद्रीत होत चालला आहे याचे जीवंत उदाहरण आहे. जेंव्हा सेल्फी नव्हता तेंव्हा लोक आपल्या सभोवतालचे सौंदर्य शोधायचे आणि आपले सौंदर्य इतरांच्या डोळ्यात पाहायचे. सेल्फीभ हे सध्याच्या मणुष्याच्या आत लपलेल्या स्वार्थाचेच एक प्रतिबिंब आहे. पण सध्याच्या माणसाचा हा स्वार्थ आता इतरांच्या जीवावरही बेतू शकतो हे लक्षात आल्यानंतर आता सेल्फी हा विनोदाचा, मजा- मस्तिचा विषय राहिला नसून आता चिंतनाचा विषय झालेला आहे. सेल्फी काढण्यासाठी हल्लीचा माणूस स्वतःला अधिका - अधिक उगडा पाडू लागलेला आहे. महिन्यातून दोन- चार सेल्फी काढण्याचा मोह कोणालाही होऊ शकतो. पण दिवसातून दहा-पंदरा सेल्फी काढणारी व्यक्ती बरी आहे असं नाही म्ह्णता येणार. त्या व्यक्तीला सेल्फी काढण्याचा आजार जडलेला आहे असंच म्हणावं लागेल. प्रत्येकाने सेल्फी बाबत आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे.

    सेल्फी काढतानाही काळ, वेळ आणि स्थळ याचे भान प्रत्येकाने ठेवायलाच हवे, त्या तीन तरुणींनी ते ठेवले असते तर त्यांच्यातील एकीला आणि त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात समुद्रात बुडून त्या तरूणाचा नाहक बळी गेला नसता.

    सेल्फी हा आपल्या सौंदर्याच प्रदर्शन मांडण्याचा एक प्रकार झालेला आहे. पण मणुष्य स्वभाव त्याचे काय करणार कालांतराने त्याला तेच ते पाहण्याचा कंटाळा येतो. तेंव्हा आपल्या सेल्फीकडे होणारं लोकांच दुर्लक्ष कित्येकांना मानसिक त्रासही देत असेल ज्यामुळे त्यांचा मनोरुग्ण होण्याच्या दिशेने प्रवास कदाचित जलदही होत असेल, त्यातून त्यांना येणार नैराश्य आणि त्या नैराश्यातून त्यांच्या हातून होणार्याह चूका याचा वाईट परिणाम शेवटी समाजमनावरच होणार. अर्थात लोकांच सेल्फीच वेड नव्हे व्यसन समाजाला घातक आहे हे आता प्रत्येकाने पटवून घ्यायला हवे. एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतो अथवा आपण समुहाने कोठे - कोठे गेलो होतो हे इतरांना दाखविण्याचा अट्टहासही सेल्फीत दिसतो.

    सेल्फीच्या नादात कोणीतरी जीव गमावल्याच्या बातम्या हल्ली वारंवार कानावर येत असतात. सेल्फीसाठी वारंवार नव्याने स्वतःतील सौदर्य शोधण्याचा अट्टहास करण्यापेक्षा आपल्या सभोवतालचे सौंदर्य इतरांपर्यत पोहचविणे अधिक सोप्पे नाही का ? सेल्फीसाठी सेल्फफीश होणे आता थांबायला हवे त्यातच समाजाचे आणि आपलेही खरे हीत आहे नाही का ?

    -- निलेश बामणे,

      January 16, 2016


  • नसेल स्पर्धा तर माणूस ‘अर्धा’

    आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट” या तत्वातून हीच गोष्ट तर स्पष्ट होते. -डायनॉसोरसारखे अजस्त्र, महाकाय प्राणी नष्ट झाले पण डासांसारखे बचावले कारण अस्तित्व टिकविण्याच्या स्पर्धेत ते यशस्वी झाले. एकाच जागी उभी राहून वाढणारी झाडेसुद्धा अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी एकमेकांपेक्षा उंच वाढण्याची स्पर्धा करतात मग अशा सर्वव्यापी स्पर्धेपासून मानवी जीवन मुक्त कसे असेल?

    स्पर्धा ही वैश्र्विक चैतन्याचे प्रतिक आहे असे मला वाटते. गुणवत्ता यादीत येण्यासाठी झटणारे विद्यार्थी, वर्ल्डकप मिळवण्यासाठी क्रीडागंणावर झुंजणारे विविध देशाचे क्रिकेटचे संघ, आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या उत्पादनाचा खप वाढावा म्हणून परिश्रम करणारे उद्योजक. चित्रपटसृष्टीतील आपले आघाडीचे स्थान अबाधित रहावे म्हणून धडपडणारे सिनेस्टार्स इतकेच काय ९.५२ च्या लोकलमध्ये विंडोसीट पकडण्यासाठी धावपळ करणारा सामान्य माणूस देखील या चैतन्याचा भाग आहे. जे पुढे जाते ते जीवन आणि पुढे जायचे म्हणजे स्पर्धा आलीच म्हणून तर शिक्षण, राजकारण, कला, क्रीडा, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात स्पर्धा आढळते आणि ती असायलाच हवी. ती जर नसेल तर एक प्रकारचे साचलेपण येउन त्या क्षेत्रावर मरगळ पसरेल.

    स्पर्धा म्हणजे चालना. स्पर्धा म्हणजे गती. प्रगती साधण्यासाठी गती अनिवार्य असते. पण ही गोष्ट लक्षात न घेता अनेकजण स्पर्धेचा विनाकारण बाऊ करतात. स्पर्धेमुळे निर्माण होणारी चुरस गतीला पूरक, पोषकच असते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किमान गुणवत्ता जोपासणे आवश्यकच असते. .आणि स्पर्धेत आघाडी मिळविण्यासाठी कमाल गुणवत्ता राखणे अपरिहार्यच असते. म्हणजे त्या त्या क्षेत्रातील सेवा, उत्पादनाचा दर्जा राखण्यात आपोआपच ढिलाई येते. आणि समाधान होत नसतानाही नाईलाजाने समाज ती सेवा ते उत्पादन स्वीकारतो. पण संधी मिळताच अशा उत्पादनाकडे पाठ फिरवतो. दूरध्वनी सेवेबाबतचा अनुभव याबाबत पुरेसा बोलका आहेच.

    इतरांपेक्षा अधिक चांगले असे काही करून दाखविण्याची भावना स्पर्धेमुळे निर्माण होते. ही भावनाच विकासाची वाट दाखवते. काही जणांना असे वाटते की, स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम होतो. त्यांची शक्ती स्पर्धेत अनाठायी खर्च होते. विशेषत: मार्कांची संधी - गुणवत्ता यादी - विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. असा विचार करणाऱ्यांना स्पर्धेचे तत्व उमगलेले नाही असे मला वाटते. स्पर्धा कोणाबरोबर आणि कशासाठी याचे भान जरुर राखायला हवे. प्रत्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊ शकणार नाही. पण प्रत्येकाने त्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न केले तर त्याची कामगिरी निश्चितच सुधारेल. धावण्याच्या स्पर्धेत फक्त तीन खेळाडूच पुरस्कार प्राप्त ठरतात म्हणून इतरांनी स्पर्धेत भाग घ्यायचाच नाही किंवा स्पर्धाच भरवायची नाही हा विचारच अपरिपक्व आहे. स्पर्धेचे दडपण आणि त्यातून येणारा ताण काहीवेळा विद्यार्थ्याच्या बाबतीत अनुभवायला मिळतो खरा पण त्याला पालकांचा दुराग्रह, अवाढव्य अपेक्षा असे इतर घटकच जास्त जबाबदार असतात. आपल्या मुलांची शारीरिक, बौद्धिक क्षमता ओळखण्याची कुवत पालकांमध्ये नसेल तर त्याचा दुष्परिणाम मुलांवर निश्चित होतो. पण दोष मात्र स्पर्धेवर ढकलला जातो.

    म्हणून आपली स्पर्धा कोणाबरोबर आहे हे ओळखणे जरुरीचे आहे. तुल्यबळ स्पर्धकांमध्येच खरी स्पर्धा रंगत असते. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्या क्रिकेट संघात स्पर्धा संभवतच नाही कारण दोन्ही संघाच्या गुणवत्तेत अफाट फरक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या दृष्टीने बांगला देशचा संघ स्पर्धकच नाही. पण बांगला देशच्या संघासाठी मात्र वेगळया अर्थाने स्पर्धा आहे - ऑस्टेलियाविरुद्ध याआधी केलेल्या खेळापेक्षा जास्त चांगला खेळ करून दाखवण्याची स्पर्धा आणि हीच स्पर्धा त्यांच्या खेळांचा दर्जा उंचावयाला मदत करणारी ठरेल. म्हणजे स्पर्धा नेहमी इतरांशीच असते असे नाहीतर कधीकधी ती स्वत:शी देखील असते. आणि अशी स्वत:शी 'असलेली स्पर्धा हीच सर्वोकृष्ट
    स्पर्धा असते. इथे तुम्हाला ज्याच्यावर मात करायची त्याची बलस्थाने आणि कमजोर जागा पूर्ण माहीत असतात. त्यामुळे कमजोर जागा नष्ट करून स्पर्धा जिंकण्याची संधी तुम्हाला सहज उपलब्ध असते. या संधीचा जे फायदा घेतात ते आपोआपच इतरांबरोबरच्या स्पर्धेत पुढे येतात.

    स्पर्धा मग ती स्वत:शी असो की इतरांशी, त्यात भाग घ्यायचा तो जिंकण्यासाठीच. पण अपेक्षित यश मिळाले नाही तर नाराज, निराश व्हायचे नाही. मिळालेल्या अनुभवातून शहाणे होऊन अधिक जोमाने पुढल्या स्पर्धेची तयारी करायची. यश मिळण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब मात्र कधीच करू नये. स्टिरॉईड घेऊन एखादा धावपटू सुवर्णपदक मिळवू शकेल किंवा पेपर फोडून विद्यार्थी भरघोस मार्क मिळविलही पण हे यश निर्भेळ नसेल. शिवाय जगाला माहीत नसले तरी, त्यांच्या अंतर्मनाला नक्की माहीत असते की तो या यशाला खऱ्या अर्थाने लायक नाही. अशा फसवणूकीमुळे स्पर्धेचा हेतूच नष्ट होतो. गैरव्यवहार फोफावतात आणि खऱ्या गुणवत्ता धारकांवर अन्याय होतो.अशा अपप्रवृत्तीमुळे स्पर्धा बदनाम होते. ह्या अपप्रवृती दूर करून निकोप स्पर्धा जोपासण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. स्पर्धेची भीती न बाळगता, खुल्या दिल्याने आणि अथक परिश्रमांसह स्पर्धेला सामोरे जायला शिका. तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली स्पर्धेतच दडलेली आहे. तुमच्या गुणवत्तेला दाद स्पर्धेमुळेच मिळणार आहे तेव्हा स्पर्धेतील, जीवन जगा आणि जीवनाची स्पर्धा जिंका.

    -चिंतामणी कारखानीस

      December 16, 2015


  • ध्यास..

    माणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो, हे खरेच आहे आणि या वाट्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न, आपला विवेक, आपले ध्येय, आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ. घटकांवरच अवलंबुन राहायला हवे.

      September 19, 2019


  • श्रीकृष्ण जन्म कहाणी, माझ्या नजरेतून

    आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.

    माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

    कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप आनंदात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढतो, त्या वेळेस आकाशवाणी होते कि देवकीचा आठवा पुत्र तुझ्या मृत्यूस कारणीभूत होईल. तत्काळ मिरवणूक थांबऊन कंस देवकी- वासुदेवाला काळ कोठडीत बंद करतो तिथून त्यांचा यातनामय प्रवास सुरु होतो. कदाचित कंसाला भास झाला असावा, त्याला त्याने आकाशवाणी समजली असावी, यातून तो मनोरुग्ण असावा अशी शंका येते. बरेच एकहाती सत्ता असलेले राज्यकर्ते असाच काहीसा विचार करून जनतेची पिळवणूक करतात हे आपण विसाव्या शतकातही अनुभवले आहे.

    देवकी-वासुदेवाला कालकोठडीत ठेऊन येणाऱ्या काही वर्षात त्यांची पहिली सात मुले मारल्यामुळे दोघेही खूप व्यथित झाले होते, अश्या परिस्थितीत आठव्याची चाहूल लागली, त्यामुळे त्यांच्या मनात अजुनच कोलाहल सुरु झाले, कारण सात जणांना मारल्याच्या दहशतीमुळे देवकी मानसिक तणावाखाली होती, आणि कंस आठवे मुलही मरणार यात शंका न्हवती अश्या परिस्थितीत तिला अन्न गोड लागत न्हवते, या मुळे ती अतिशय कृश झाली होती, तसेच सात मुलांना जन्म दिल्यामुळे सहजिकच शरीर खूप खंगले होते. कालकोठडीत जिथे सुर्य किरण सुद्धा पोहोचत नाहीत तिथे जवळपास १० वर्ष (कमीतकमी) काढल्यामुळे तिच्यात ड जीवनसत्वाची कमतरता झाली होती. या सर्व कारणामुळे देवकीने आठव्या महिन्यात मुलास जन्म दिला. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे तर (premature delivery) झाली. सर्वसाधारणपणे बालके जन्मानंतर रडतात, जर रडले नाही तर त्याला रडवण्यात येते, याचे प्रमुख कारण मुलाला आईच्या गर्भात नाळेतून (placenta) प्राणवायू मिळतो, बाळ बाहेर आल्यावर नाळ कापल्यामुळे बाळाला नाकाने श्वास घ्यावा लागतो. जर बाळ रडले नाही तर फुफ्फुसे (lungs) आपले काम सुरु करत नाहीत, म्हणून डॉक्टर वेळ पडली तर चिमटा काढून बाळाला रडवतात, नाहीतर डॉक्टरवर रडण्याची पाळी येते. श्रीकृष्ण जन्मानंतर रडला नाही हे पुस्तकात लिहिलेले आहे, याचा अर्थ ते मुल मृत (still baby) अवस्थेत जन्माला आले असे म्हणू शकतो.

    वरील सर्व कारणामुळे गर्भात व्यवस्थित पोषण झाले नसल्यामुळे, आणि प्राणवायू कमी मिळाल्यामुळे बाळ निळा रंग (cyanosis) घेऊन जन्माला आले. आठव्या महिन्यात जन्म झालेली अशी बरीच मूले मी पहिली आहेत ज्यांच्यात ही लक्षणे दिसतात. साधारण अश्यामुलांच्यात कमरेखालचा (कुल्ले, मांड्या) तसेच पाठीचा भाग निळा दिसतो. या बाळातही असेच झाले असणार, अर्थात त्या काळात विज्ञान फार प्रगत नसल्यामुळे प्राणवायू कमतरतेमुळे निळे मूल जन्माला आले हे समजले नाही. लोकांनी त्याला दैवी देणगी समजली. पुढे चित्रकारांनी संपूर्ण शरीर निळे दाखऊन दैवी चमत्कार भासवला. आजही लोक गणपती दुध पितो म्हणून देवळात रांगा लावतात, तर त्या काळाबद्दल न बोललेलेच बरे. म्हणूनच बाळकृष्ण निळा दाखवला जातो, तसेच मोठेपणीचा कृष्ण निळा दाखवला जात नाही, याचे कारण या मुलांच्यात वाढत्या वयासोबत भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळाल्यामुळे चामडीचा हा निळा रंग निघून जाऊन नैसर्गिक रंग येतो.

    वर सांगितल्याप्रमाणे हे मृत बाळ जन्माला आल्यामुळे रडले नाही आणि त्याचा जन्म झाला हे देवकी आणि वासुदेव शिवाय कुणालाही समजले नाही. वसुदेवाने हि गोष्ट जेव्हा जेलरला सांगितली, तेव्हा जेलर प्रचंड तणावाखाली आला. त्याला काय करायचे हे प्रथम दर्शनी सुचले नाही, परंतु त्वरित निर्णय घेणे जरुरी होते. मेलेलं मुल जन्माला आले आहे हे कंस कधीही मान्य करणार नाही, हे नक्की, उलटा कंस जेलर व वसुदेवानी संगनमत करून जिवंत मुल बाहेर पाठवून मेलेलं मुल त्याला दाखवले हे समजून सर्वाना मृत्यूदंडाची शिक्षा देणार यात शंका न्हवती. याच कारणामुळे जेलरने व वसुदेवाने संगनमत करून मेलेलं मुल बाहेर नेऊन जिवंत मुल त्या ठिकाणी ठेवायचा निर्णय घेतला. हि गोष्ट अत्यंत गुप्तपणे ठरवल्यामुळे पहारेकऱ्याना समजूद्यावयाचे न्हवते, यासाठी एकच उपाय होता, त्या प्रमाणे सर्व पहारेकऱ्याना रात्रीच्या पेयात झोपेचे औषध मिसळून दिले, ज्यामुळे सर्व शिपाईवर्ग झोपी गेला, व जेलरने सर्व दारे उघडून वासुदेवाला मुक्त केले, अट हि कि त्याने ताबडतोब नदी पार करून गोकुळात जाऊन हे मुल टाकून त्या जागी दुसरे मुल आणायचे. ठरल्या प्रमाणे वासुदेव नदी ओलांडून गोकुळात गेला, व तिथे चांगला वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे हे मुल जिवंत झाले, पुढे हेच मुल कृष्ण म्हणून प्रसिद्ध झाले, असो, अश्या गोष्टी आजही आपण पेपर मध्ये वाचतो. मीही बरेच वेळेस वाचले आहे कि मृत मुलाला पुरण्यासाठी घेऊन जातात व अचानक स्मशानात मुल रडू लागते.

    कथेत सांगितल्या प्रमाणे वसुदेवाने गावातील एका मुलीला सोबत आणून कंसासमोर पेश केले. त्याला एखादा मुलगा मिळाला असता, परंतु कुणीही आपला मुलगा त्याला दिला नाही म्हणून मुलीवर समाधान मानून तो तिला घेऊन आला. जेलरने परत वासुदेवाला बंदी करून सर्व दरवाजांना कुलुपे घातली, या नंतर सर्व पहारेकऱ्याना जागे करण्यात आले. पुढे जेव्हा कंसाला हे समजले तेव्हा जेलर व सर्व पहारेकऱ्यानी झोप लागल्याची कबुली देऊन व हा दैवी चमत्कार भासवून स्वतःची मृत्यूदंडातून सुटका करून घेतली.

    बऱ्याच वेळेस लेखकाला दोन गोष्टींची सांगड घालता आली नाही कि तो काहीतरी चमत्कार दाखवुन आपली कहाणी पूर्ण करतो, इथेही त्याला हे समजले नाही म्हणून चमत्कार दर्शवून कथा पूर्ण केली असे जाणवते.

    -- विजय लिमये

      December 13, 2016


  • शर्यत : ससा आणि कासव

    गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट. …

      December 23, 2016