(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आंदोलनांमधील फरक

    "एकदा जरूर वाचा"

    जाट आंदोलन, हरियाणा:
    जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान,
    सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला,
    शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल.

    पटेल आंदोलन, गुजरात:
    २५० कोटींच शासकीय नुकसान,
    ८००० कोटींचा महसूल बुडाला,
    १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी,
    ६५० च्या वर अटक.

    गुज्जर आंदोलन, राजस्थान:
    ४०० कोटींच शासकीय नुकसान,
    ६००० कोटींचा महसूल बुडाला,
    ४० च्या वर मृत्यू,
    लष्कर पाचारण.

    आणि मग, आमचा

    मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र:
    एकही रुपयाचं नुकसान नाही,
    बहुसंख्य असूनसुद्धा, अन्याय सहन करूनसुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचे आहे.
    पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही,
    दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही.

    कारण शिकवण आहे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची.."रयतेच्या काडीला पण धक्का लागला नाही पाहिजे"...

      September 28, 2016


  • हेही नसे थोडके !

    सध्या देशात विशेषत: महाराष्ट्रात, बर्ड फ्लूचा आतंक माजला आहे. या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारी स्तरावर प्रचंड धावपळ सुरू आहे. लाखोंच्या संख्येने कोंबड्या मारल्या जात आहेत.

      February 26, 2006


  • नसती उठाठेव!

    'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

      December 21, 2003


  • केवळ उपचार!

    प्रकाशन दिनांक :- 29/08/2004

    ‘दि ठोटेस्ट शो ऑन दि अर्थ’ या वर्णनाला सार्थ ठरविणारा ऑलिम्पिक सोहळा अथेन्समध्ये पार पडला. दोनशेपेक्षा अधिक देशाचे दहा हजाराच्यावर खेळाडू या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यात भारताचे खेळाडूही होते.

      August 29, 2004


  • असत्य सत्यम् !

    युग संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. सगळ्याच गोष्टी कशा संगणकाच्या वेगाने होऊ लागल्या आहेत. तसे पाहिले तर वेगाचे हे अप्रूप मानवासाठी नवे नाही.

      January 18, 2009


  • तुझे आहे तुजपाशी…!

    इंधनाच्या बाबतीतले परावलंबित्व ही देशाच्या विकासासमोरची एक मोठी समस्या आहे आणि त्यापेक्षा मोठी समस्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाची आहे. सुदैवाने आज राजकारणात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. या युवकांनी एकत्र येऊन या देशाला महासत्ता बनविण्याचा निर्धार केला, तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. नाविन्यपूर्ण विचार, ते अंमलात आणण्याची धमक, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी या सगळ्या गुणांनी युक्त असलेले नेतृत्व ही आज देशासाठी काळाची गरज बनली आहे.

      May 5, 2012


  • सहयोग

    आपण सहयोग देण्या व घेण्याची अपेक्षा शक्यतो आपल्या माणसाकडून करतो. जिथे संबंधामध्ये जवळीक आहे अश्या व्यक्तीला मनापासून सहयोग देतो. मग तो वस्तु, पदार्थ असो किंवा भावनिक आधार असो देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. कोणी दुःखी असेल व आपण त्याच्या भावना ऐकून घेतल्या तरी त्या व्यक्ति साठी हा ही खूप मोठा सहयोग असतो. एखाद्याला वेळ, आपलेपणा जरी दिला तरी त्याला त्याचे समाधान मिळते. त्यांना समाधान मिळणे हा सुद्धा सहयोग नाही का?

      September 23, 2022


  • राज्याची समृद्धी स्थलांतरित होत आहे!

    यशवंतराव चव्हाण मुंबईसह संयुत्त* महाराष्ट्राचा अमृतकलश घेऊन दिल्लीहून परतले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात एका समृद्ध राज्याचे स्वप्न तरळत होते. मुंबईसह संयुत्त* महाराष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी 105 लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले होते. या लोकांचे हौतात्म्य विसरता येणार नव्हते.

      April 15, 2007


  • डॉक्टर  नावाच्या देवांनो…….!

    एका दु:खी बापाचे काय सांगू गाऱ्हाणे.....! काळाने उलटा डाव टाकला होता हसतं खेळतं बाळ अंथरुणाला खिळलं होतं. एक दिवशी काळ उगवला अन बाबूचा बबन्या देवाघरी गेला. डेंग्यूने एक बळी घेतला होता. बाबु हतबल झाला. तीळ तीळ तुटला. बाबु होता कणखर तरीही वाहत होती डोळ्यातून आसवांची खळखळ...! एखादे फुल उमलण्याच्या आधीच नष्ट झाले. त्या मात्या- पित्यावर झालेला आघात अत्यंत दुर्दैवी. किती जपलं होतं त्या फुलाला. त्या दु:खी माईचे अश्रू सांगत होते. पण विधात्याने जे भाळी लिहिले त्याला सामोरे जाणे भाग आहेच. पण हे एकाच घरात घडले नाही. अनेकांच्या घरी या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया सारख्या घातक रोगाची लागण झाली. गेले अनेक. लागण झालेल्यांची संख्या मोजता न येण्यासारखी होती. विशेषत: नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. याची नोंद कुणी घ्यावी अथवा न घ्यावी परंतु आपलेच चुकत असेल तर.....! महापालिका आरोग्यसेविकांचा सल्ला ऐकत नाही. त्यांना हवं असलेले सहकार्य करीत नाहीत, अशी एक कुजबूज आहे. आपण आपल्या कुटुंबियांसाठी काळजी घ्यायला हवीच.

    डॉक्टर हा ईश्वरी अंश मनाला जातो. डॉक्टर हा देव तर दवाखाना हे एक मंदिर. कारण रुग्णाला बरं करण्यासाठी जीवाचे रान करीत असतो. म्हणून ईश्वरानंतर डॉक्टरांना देवच. यात शंका घेण्यासारखे काहीच नाही. खरोखर डॉक्टर हे आई वडील गुरुजनानंतर चौथे पूज्यनीय स्थान म्हणावे लागेल. डेंग्यू,मलेरियाची लागण झाल्यापासून विभागातील महापालिका दवाखान्यातील डॉक्टर शिंदे, डॉक्टर जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा गौरव करणे स्वाभाविक आहे. गरिबांनी नव्हे तर श्रीमंतांनी देखील धाव घेतली या दवाखान्यात आणि उपचार घेतले. योग्य सल्ला आणि आवश्यक तपासण्या करून त्यांनी उपचार केल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. डेंग्यू, मलेरिया आणि कावीळ या दहशतवादी रोगांवर प्रतिबंध करणारे माणुसकीचे डॉक्टर आपल्या विभागात कार्यरत असल्याने मनस्वी आनंद होत आहे.

    विभागात कितीतरी डॉक्टर होऊन गेले.आजही आहेत. रस्त्याने जाताना मंदिर दिसले तरी अदबीने नमस्कार करावासा वाटतो, त्या प्रमाणे त्या डॉक्टरांना पाहताच आपोआप हात जोडले जातात. आपणां कुणाला *डॉक्टर पांडुरंग कुलकर्णी* आठवत असतील.नावाप्रमाणे विठोबाच, या विठोबाच्या मंदिरात सदानकदा रांग लागलेली असे. काय राजा माणूस....! गरीबांचा डॉक्टर... पैसे नसले तरी उपचार केले त्यांनी. आपल्या श्रमजीवी लोकांचा डॉक्टर. डॉक्टर कुलकर्णीसारखे अनेक देव विभागाला लाभले. ते ही रुग्णांचा स्थिती पाहून उपचार करीत म्हणजे एखाद्याकडे पैसे नसले तरी इलाज करीत होते. तेव्हा परिस्थिती तशी होती. त्या वेळेस डॉक्टर रुग्णांच्या सुख दु:खाशी समरस होत होते. आजही समाजात अनेक देव आहेत जे रुग्णसेवा म्हणजेच आपला धर्म मानतात. भगवंत त्यांना शक्ती देवो. त्यांच्यामुळे आपण निश्चित आहोत आणि बरेच देव असे आहेत की,देव बनण्यात झालेला खर्च लवकरात लवकर कसा भक्ताकडून काढू शकतो ह्यातच आपला धर्म आहे असे मानतात... त्यांना भगवंत सद्बुद्धी देवो.

    पण आता हेच डॉक्टर आपली मर्यादा ओलांडू लागल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. खरं बोलले की, खऱ्या आईला राग येतो. हे अनुभवलेले आहे. त्यामुळे या पूज्यनीय देवांवर कडक भाषेत लिहिण्याऐवजी सौम्य भाषेत लिहावं, असं मन सांगत होते. काय करीत आहेत हे गल्लीबोळातले देव ...? एक डॉक्टर आपल्या दवाखान्यात विनापरवाना औषधं विक्री करीत आहे. उपचार अधिक औषध या दोन्ही गोष्टी देऊन लुबाडत आहे. आता या डॉक्टरला सौम्य भाषेत सांगायचं की, आपला बडगा दाखवायचा. अनेक डॉक्टर अनैतिक स्वरूपाचे व्यवहार करीत आहेत. रुग्ण दवाखान्यात जाऊ शकत नाहीत. वृध्द असतात. चालू शकत नाहीत किंवा अन्य कारणाने डॉक्टरला घरी बोलाविण्यात येते तेव्हा एक डॉक्टर विभागातल्या विभागात घरी भेट द्यायचे ५०० रुपये आकारत आहेत. हे बरोबर आहे का ...? काही डॉक्टर केवळ रजेचे दाखले देण्यासाठी बसलेले आहेत. दिवसापाठी रुपये २० आकारीत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या दोनशे अडीचशे पगार वाल्यांनी काय करायचे. काही महिन्यापूर्वी एका डॉक्टरने मयत दाखला देण्यासाठी ५०० रुपये घेतले. एका रुग्णाला डॉक्टरने जागचे हलायचे नाही. एकाच जागी पडून राहायचे, आराम करायचा, सल्ला दिला. पेशंटला थोडासा त्रास होऊ लागला. तेव्हा एक दोन मिनिटावर असलेल्या डॉक्टरला सांगितले त्याने बेधडक सांगितले. मी एम डी आहे. माझी फी परवडणारी नाही. घर एक मिनिटावर असो वा दहा मिनिटावर....! फी ठरलेली आहे. ती देत असाल तर येतो. वैद्यकीय व्यवसायाकडे डॉक्टरांची दृष्टी बदलत्या काळानुसार बदलत आहे. आताचे डॉक्टर रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारत आहेत. पैसे नसले तर उपचार करतात, उधारी ठेवतात. पण फीचा तगादा यांचा भारी आहे. एका फेरीत पेशंट बरा होईल असे त्यांच्याकडून घडत नाही. दोन तीन फेऱ्या मारायला लावल्यानंतर पेशंटला आराम मिळतो. तो पर्यंत खिसा खाली झालेला असतो. कोणी तरी म्हणेल या पेशंटला जवळच्या सरकारी किंवा महापालिकेच्या रुग्णालयात जाता येत नाही का ...? काहींचे हातावर पोट असते.दिवसभर राबावे लागते. आजारी असल्याचे सांगता येत नाही. दुकानात कामावर असलेल्या नोकरदारांचे उदाहरण घ्या. कामावर नाही गेलात तर ते तुम्हाला घरचा रस्ता दाखवितात. काही तरी कमवून आणले तरच त्यांची कच्ची बच्ची जेवतात. त्यांच्यासाठीच.....! या गल्लीबोळात मंदिर उभारून बसलेल्या देवांनो समजुतीने घ्या. जेव्हा जेव्हा साथीच्या रोगांनी नागरिक त्रस्त असतात. तेव्हा तरी त्यांना सांभाळून घ्या.

    अशोक भेके

      March 29, 2017


  • LGBTQI जनांसाठी नवी आशा

    सुप्रीम कोर्टानें आज एक स्वागतार्ह व आशादायक गोष्ट केली , आणि ती म्हणजे ‘LGBTQI’ जनांबद्दलच्या आपल्याच आधीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यांचें ठरवलें.

      September 12, 2018