वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात,
परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते.
दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील क्लेदाचे पाचनही व्यवस्थित होत नाही. अशा अवस्थेत त्या आशयामधे आलेला अन्नरस किंवा पोषकांश देखील दूषित होतो.
जसे नासलेल्या दुधामधे कितीही चांगले शुद्ध सात्विक दूध घातले तर सर्वच दूध नासते.
किती सुंदर उदाहरण ग्रंथकारानी दिले आहे.
दही विरजलेले पातेले आहे, त्यातील सर्व दही चमच्याने खरडून जरी काढून घेतले, पण पातेल्यात, पाणी घालून जर धुतले नाही, जर त्या दह्याचा थोडासा अंश पातेल्यात शिल्लक राहिला तर ? आणि पुनः त्याच पातेल्यात दूध ओतले तर ?
परत सर्व दुधाचे रूपांतर दह्यामधे होईल. तसंच ग्रंथकार सांगत आहेत.
रात्रौच्या वेळी होणारी स्रोतो संकोच ही प्रक्रिया आणि त्याचा पचनावर होणारा परिणाम पचन बिघडवणारा असतो, असे शास्त्रकारांना सांगायचे आहे. म्हणून रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ नंतर जेवू नये.
आप्त मंडळी जे सांगतात, ते ऐकलं तर खूप गैरसमज दूर होत असतात. मी म्हणेन तेच खरं हा मोठ्ठा दोष आहे. आपल्या परंपरा काय सांगताहेत, आपण कुठे रहातोय, आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, याचा विचार आरोग्याच्या रक्षणासाठी व्हायलाच हवा. आप्त म्हणजे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली मंडळी.
त्यांनी अनुभवलेलं, ग्रंथामधे लिहून ठेवलेलं, आम्हाला नको झालंय, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी आजची पिढी, अवांतर वाचन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, कोणी सांगितले तर विश्वास ठेवत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला पुरावा हवा असतो. बुद्धीवादी व्हावं, विज्ञानवादी व्हावं, जरूर व्हावं, पण या करीता आपले पूर्वज जे सांगत होते, त्या मागील कारणांचा आपल्या सकारात्मक बुद्धीने जरा विचार करावा.
आपल्या आजोबांना, वडीलांना विचारावे, त्यांच्या लहानपणी, जेवणाच्या वेळा कोणत्या होत्या, जेवणातले पदार्थ कोणते होते, काही पदार्थ विशिष्ट दिवशीच केले जात होते, मांसाहार विशिष्ट दिवशीच घेतला जात होता, असे का ? हे शोधून काढले पाहिजे.
या प्रश्नांची उत्तरे मिळवली की, आज रोग का वाढताहेत, याचेही उत्तर सहज मिळू लागेल.
या सर्व उदाहरणावरून लक्षात येतंय की रोग वाढायचं मुख्य कारण आमचं उशीरा होत असलेलं जेवण हे आहे. बदलायचं ठरवलं तर आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो.
औषधं कायमची बंदही होऊ शकतात
पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि विश्वास.
आप्तांवर, ग्रंथावर आणि स्वतःवर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.03.2017
March 11, 2017
डेव्हिड शेपर्ड यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजविरुद्ध ओव्हल वर 12 ऑगस्ट 1950 रोजी खेळला. तेव्हा त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 11 धावा काढल्या तेव्हा ते वेस्ट इंडिजच्या रामाधीन कडून 11 धावांवर बाद झाले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 29 धावा काढल्या.
September 8, 2021
अगदी छोट्या (चार-पाचशे वस्तीच्या) गावांमधे तर सगळेजण एकमेकांना ओळखतात. थोड्या मोठ्या (दोन-चार हजार वस्तीच्या) गावांमधे सगळ्यांच्या ओळखी नसल्या तरी ओळखीचं हास्य तरी असतं. गाडीतून, पिक-अप ट्रकमधून जाता येताना एकमेकांना हात वर करून ओळख दाखवणं, हा सर्वसाधारणपणे शिरस्ता असतो. नवीन लोकांना देखील गाडीतून जाताना ओळखीचं हास्य किंवा हात वर करून दाखवणार. गावातल्या छोट्याश्या पोलीस ठाण्यामधे मोजून असणार दोन किंवा तीन पोलीस. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला गाववाले ओळखतात. मग अगदी कोणत्या वीकएंडला कोणत्या पोलिसाची ड्युटी आहे, तो नवशिक्या आहे की तीस वर्षे खात्यात काढून मुरलेला आणि आजोबांसारखा प्रेमळ आहे, हे देखील सगळ्यांना ठाऊक. प्रत्येक पोलीस कुठे रहातो हे देखील सार्या गावाला माहीत. त्यामुळे शक्यतो त्याच्या घराच्या आसपासच्या रस्त्यावर आरडा ओरडा किंवा धिंगाणा न घालण्या एवढी पोराटोरांना देखील अक्कल आलेली असते. अगदी छोट्या गावांमधे तर सारा गावच जणू पोलीसाचे काम करत असतो. गावातल्या उंडारणार्या पोरांवर सगळ्या गावाचं लक्ष असतं. त्यामुळे वाह्यात पोरांच्या उनाडक्या आई बापांच्या कानावर जायला वेळ लागत नाही आणि त्यात काही गैर आहे असं आई बापांनाही वाटत नाही.
छोट्या गावांमधले रस्ते देखील छोटे आणि रहदारी देखील तुरळकच. अशा गावांमधे ट्रॅफिक लाईट्स देखील जेमतेम एक दोनच असतात. काही ठिकाणी उघडझाप करणारे (blinking) लाईट्स असतात. त्याच्या अनुसार तिथे आलं की गाड्या हळू करायच्या, आजूबाजूचा अंदाज घ्यायचा आणि मग पुढे जायचं. बहुतेक ठिकाणी stop signs असतात. त्याच्या अनुरोखाने गाड्या बरोबर थांबून मगच पुढे जातात. गाववाल्यांची पत्ते सांगायची पद्धत देखील विशिष्ट असते. सगळा उल्लेख, डांबरी रस्ता (black top) किंवा कच्चा रस्ता (gravel or dirt road) या संदर्भात होणार. दिशांचा अदमास तर यांच्या अंगी अगदी लहानपणापासूनच मुरलेला असतो. Go two blocks east on black top, then go two and half blocks on the dirt road अशा सूचना सर्रास ऐकायला मिळतात. अशा प्रकारे सूचना देऊन कोणी पत्ता सांगायला लागलं की सुरवातीला आम्ही अजागळासारखे बघत रहायचो, मग समजल्यासारखं दाखवून मुंडी हलवायची आणि हळूच उघड्यावर येऊन आकाशात सूर्य कुठे दिसतोय ते बघायचं आणि त्यावरून आडाखे बांधून दिशेचा अंदाज घ्यायचा. पुढे पुढे मग आपल्या परिसराचा अंदाज आला की त्यांच्या दिशादर्शक सूचना आपल्या संदर्भात बसवायच्या. म्हणजे मुख्य रस्त्यावरून चर्चच्या दिशेला वळलं की आली ईस्ट किंवा गॅस स्टेशनवरून उजवीकडे वळले की झाली साउथ वगैरे. तरी देखील गोंधळल्यासारखं व्हायचं ते होतंच. (आपल्या सारखं “गांधी रोड वरून वंदना टॉकीजच्या बाजूच्या गल्लीत वळायचं किंवा मारुतीच्या देवळावरून खाली आलं की कट्ट्यावर बसलेल्या कुणालाही विचारा – कुलकर्णी कुठे रहातात ते”. असा प्रकार नाही). Enter from the east or west entrance at the south end of the building, असल्या सूचनादर्शक पाट्या पाहून लिहिणार्याला गदगदून हलवून सांगावसं वाटतं “अरे बाबा, असं कोडं सांगितल्यासारखं का सांगतोस ? सरळ सांग ना की गॅस स्टेशनच्या बाजूला जे दार आहे तिकडून आत शिरा किंवा पोस्ट ऑफिसच्या जवळच्या दरवाजाचा वापर करा” म्हणून.
छोट्या गावांमधे downtown म्हणजे मोठा मजेशीर प्रकार असतो. एका रस्त्याच्या दोन बाजूंस असलेली काही दुकानं म्हणजे downtown. त्यात एक दोन बॅंका, दोन चार रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, काही अॅंटीक शॉप्स, एखादं दुसरं ग्रोसरी स्टोअर, बार्बर शॉप, छोटसं पोस्ट ऑफिस, dairy queen सारखं एखाद आईस्क्रीम शॉप, अशी सारी दाटीवाटीने बसलेली. या दुकानांना पार्कींग लॉट नसतो. त्यांच्या समोर रस्त्यावरच गाड्या लावायच्या आणि उतरून दुकानात जाऊन कामं उरकायची. एक काळ होता जेंव्हा छोट्या गावांमधे घरगुती स्वरूपाची दुकानं म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यात किराणा मालापासून घरगुती वापरायच्या वस्तूंपर्यंत बरंच काही मिळायचं. गावातली पोरं उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला किंवा गोळ्या चॉकलेट खायला तिकडे यायची. घरात कधी गरज लागलीच तर विजेचे दिवे, खिळे, शाळेच्या वह्या वगैरे लहान सहान गोष्टींसाठी लोक तिकडे धाव घ्यायचे. चकाट्या पिटण्यासाठी, घडीभर टेकण्यासाठी, पंचक्रोशीतल्या भानगडी ऐकण्यासाठी, स्थानिक राजकारणावर गरमा गरम चर्चा करण्यासाठी, ते एक हक्काचं ठिकाण असायचं. मुलांना उधारीवर खाऊ देतांना कुणी त्यांच्याकडे ओळखपत्र मागायचं नाही आणि दुकानदाराच्या उधारवहीत नुसतं नाव लिहून त्याच्यापुढे पैसे लिहून ठेवले तर चालायचं. एखाद्या न्हाव्याच्या दुकानात, दर्शनी काचेमधे “आज संध्याकाळी आपल्या शाळेची टीम जिंकली तर उद्या जे कोणी येतील त्यांचा हेअर कट फुकट” असा आपुलकीचा आणि गावातल्या शाळेबद्दलचा जिव्हाळा दाखवणारा बोर्ड दिसायचा.
पण हळू हळू हे चित्र बदलत आहे. वॉलमार्टने अमेरिकेच्या आतल्या भागांमधे देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचंड स्टोअर्समधून सारं काही उपलब्ध असतं. भाजीपाला, इतर खाद्यपदार्थ, कपडे, औषधं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, घरातल्या वापरातल्या सार्या वस्तू, जे म्हणावं ते. त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उद्योगामुळे वॉलमार्ट जितक्या स्वस्त दरात वस्तू विकू शकते, तितक्या स्वस्त दरात ही जुनी दुकानं विकू शकत नाहीत. वॉलमार्टच्या जगडव्याळ पसार्याला टक्कर देऊन टिकून रहाणं या छोट्या दुकानांना शक्यच नसतं. त्यामुळे ही छोटी दुकानं धडाधड बंद होऊ लागतात. उदाहरणार्थ नुसत्या आयोवा राज्यामधेच १९८३ ते १९९३ च्या दशकामधे वॉलमार्टच्या आक्रमणामुळे ७३०० छोटी दुकानं बंद झाली. एकंदर पाहणीवरून असा निष्कर्ष निघतो की वॉलमार्ट किंवा तत्सम एखादं मोठं दुकान एखाद्या आतल्या भागात सुरू झालं की पुढच्या ४-५ वर्षांत आसपासच्या २० मैल अंतरापर्यंतच्या छोट्या गावांत साधारण २०% धंदा कमी होतो. वॉलमार्ट भले नवीन रोजगार निर्माण करण्याच्या वल्गना करत असेल पण आजवरचा अनुभव असं सांगतो की वॉलमार्टने निर्माण केलेल्या दर १०० रोजगारांमागे, आजूबाजूच्या छोट्या दुकानांतील १५० लोकांच्या रोजगारीवर गदा आलेली असते.
लोक देखील एकदा वॉलमार्ट संस्कृतीची चटक लागली की आपल्या छोट्या गावातल्या छोट्या दुकानांमधे जाणं टाळायला लागतात. हे सारं अपरिहार्यच आहे. या मोठमोठ्या super market chains जसजशा आपले पाश अमेरिकेच्या अंतर्भागातल्या छोट्या आणि मध्यम गावांभोवती आवळायला लागल्या आहेत आणि जागतिकीकरण हे जसजसं दिवसेंदिवस प्रखर सत्य होत चाललं आहे, तसतसं ग्रामीण अमेरिकेच्या ह्या जुन्या जीवनातल्या एका पर्वाचा अंत जवळ येत चालला आहे.
-- डॉ. संजीव चौबळ
February 17, 2016
4 रविवार, नोव्हेंबर 2007
पैसा, नाव कमाविण्याचे या जगात अनेक मार्ग, अनेक धंदे आहेत. अंगात फत्त* थोडा बेरकीपणा मुरवावा लागतो. तो मुरवला की बाकी कशाचीच काळजी करावी लागत नाही.
November 4, 2007
देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचे सर्वच थरातून स्वागत होत आहे. विशेषतः सामन्यांसाठी हा निर्णय अतिशय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया मुंबईतल्या ट्रेन मध्ये, रस्त्यावर फिरताना प्रवासी, रिक्षा-टॅक्सीवाले, किरकोळ भाजी विक्रेते यांच्याकडून ऐकायला येत आहेत.
November 10, 2016
या विश्वाद्य दंपतीचे वर्णन करतांना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
September 21, 2020
हे डोह साधारण पहाटे तीन ते पाच भेटायला येतात- खोलवर, घनगंभीर, दिवसभराचे सारं काही आत पचवलेले! समुद्र अथांग, नदी खळखळ वाहती तर डोह एकाजागी स्थिरावलेले आणि स्तब्ध !
February 1, 2023
१८६८ मध्ये लंडन येथे बेंजामिन वॅडी या पेंटरने पहिल्यांदा वॉटर हीटर तयार केला, त्याला गिझर असे नाव होते. त्यामुळे आजही आपण गिझर हा शब्द वॉटर हीटरला नेहमी वापरतो. १८८९ मध्ये एडविन रूड या नॉर्वेच्या इंजिनियरने अधिक प्रगत असा इलेक्ट्रीक वॉटर हीटर तयार केला.
August 13, 2023
भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.
October 2, 2024
ऑक्टोबर महिना येताच दिल्लीत प्रदूषणावर चर्चा सुरु होते. वायु गुणवत्ता निदेशांक २०० वर अर्थात खतरनाक स्तरावर पोहचतो. त्यात जर पाऊस पडला नाही तर प्रदूषण अत्यंत खतरनाक स्तरावर अर्थात ३००च्या वर पोहोचतो. आज हि दिल्लीत अधिकांश ठिकाणी वायु गुणवत्ता निदेशांक ३००च्या वर आहे. त्यात भर म्हणजे शेतकरी पराली (धानचे अवशेष) जाळणार आणि दिवाळीत फटाके हि फुटणार.
October 17, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti