वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पाणी शुद्धीकरण भाग चार
पाणी शुद्ध करण्यासाठी एक साधी पद्धत ग्रंथकार सांगतात.
दोन मडकी घ्यावीत. एका मडक्यात अस्वच्छ म्हणजे नेहेमीचे उपलब्ध असेल ते नलोदक वा बोअरचे, विहिरीचे पाणी घ्यावे. ते जरा उंचावर ठेवावे. दुसरे मडके जरा खाली ठेवावे. एक स्वच्छ तलम कपड्याची गुंडाळून एक लांब वात करावी. आणि ती वरच्या मडक्यातील पाण्यात तळापर्यंत बुडेल अशी ठेवावी. ही वात ओली करावी. त्याचे दुसरे टोक बाहेर काढून खालील मडक्यात असे लोंबत ठेवावे की, वरच्या मडक्यातील पाणी थेंब थेंब वातीवरून खाली ठिपकत राहील. दोन्ही मडक्यावर नीट आच्छादन घालावे.
वरच्या मडक्यातील काही अशुद्धी, वातीमुळे खालील पाण्यात येणार नाही. फक्त वरच्या मडक्यातील तळापर्यंत गेलेल्या वातीच्या पातळीपेक्षा दुसरे टोक आणखी खालील पातळीवर आले पाहिजे, हे पहावे.
ही वात घसरून खाली येऊ नये यासाठी वरच्या मडक्यात वातीवर एखादी वाटी वजनासाठी ठेवावी.
टीप टीप बरसा पानी.... सुरू होईल.
वरच्या मडक्यातील पाणी गाळून आपोआप खालील मडक्यात जमा होईल. वरच्या मडक्यातील पाणी कमी होत जाईल. खालचे मडके भरत जाईल.
वातीला चिकटलेली धुळ, माती सारखी अशुद्धी आपल्याला उघड्या डोळ्यांनी पहाता येते. कापडाची वात धुवुन वाळवून ठेवली की, पुनः दुसऱ्या दिवशी वापरायला तयार !
खर्च म्हणाल तर काही नाही. मडक्यामुळे पाणी थंड पण होईल. वरील मडक्यात रोज एखाददुसरे सुगंधीत फूल किंवा पान किंवा बी किंवा वाळ्यासारखे सुगंधी असलेले एखादे मूळ ठेवावे. त्याचा वास, अर्क, आणि काही प्रमाणात सूक्ष्म औषधी गुण पाण्यात येतील.
दररोज औषधीयुक्त शुद्ध गाळलेले थंडगार पाणी मिळत जाईल.
करून तर बघा,
गंमत म्हणून !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
31.12.2016
December 31, 2016
भारनियमनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे , पण शेती आणि उद्योगाचीही पार वाट लागली आहे. राज्यातील उद्योगांना या अतिरेकी भारनियमनामुळे रोज कोट्यवधीचा फटका बसतो आहे.
सध्या संपूर्ण राज्याला सूर्याच्या काहिलीसोबत भारनियमनाच्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
May 1, 2005
तेजाब’ मधून एन. चंद्रा यांनी बेरोजगारी, बेकारी, गुन्हेगारी व भ्रष्टाचार यातून निर्माण होणारे नैराश्य व तरूणांपुढे निर्माण झालेला अस्तित्वाचा प्रश्न याची मांडणी केली.
November 11, 2021
आर्यन’ १९१५ साली सुरू झाले, तेव्हा तेथे मूकपट दाखवले जात होते. मूकपटांतील दृश्यात जिवंतपणा यावा यासाठी पडद्यामागे बाजाची पेटी, तबला, घोड्याच्या पळतानाच्या टापांचा आवाज वाटावा म्हणून नारळाच्या रिकाम्या करवंट्या वाजवल्या जात. पेटी, तबला वाजवण्याचे काम करणाऱ्या मुलांमध्ये राजा परांजपे यांचा समावेश होता. पुढे ते विख्यात दिग्दर्शक झाले.
February 7, 2022
गाय हा अत्यंत उपयोगी प्राणी आहे. त्याची उपयोगिता समजावणारा हा लेख..
May 18, 2017
समारोप – मराठे एक सत्ता म्हणूनच राहिले, त्यांचे भारतव्यापी साम्राज्य झाले नाही, ते दिल्लीपती झाले नाहीत, ही गोष्ट खरी आहे. ते नाकारण्यात अर्थ नाही. परंतु त्याची कारणे सैनिकी व आर्थिकही आहेत. त्याची कारणे त्या काळातील प्रमुख राजकारणाशी संबंधित आहेत. ‘मराठी’ मनोवृत्ती, ‘मराठी’ संस्कृती किंवा ‘मराठी’ परंपरा संकुचित व अल्पसंतुष्ट होती असे अजिबात दिसून येत नाही.
March 18, 2019
शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता?
भात किंवा भाकरी.
प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते.
ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो.
बाजुला पोळी असते.
आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. ज्वारी बाजरी किंवा मका गहू यापासून बनवलेली रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी हा जेवणातील मुख्य पदार्थ होतो.
रोट म्हणजे हातावर किंवा पाटावर थापून, जाडसर केलेले असतात. तव्यावर एकदा आणि तवा उतरवून पुनः थेट अग्निवर, असे दोन वेळा हे रोट भाजले जातात. आकाराने मोठे ते रोट. आकाराने जरा लहान ती रोटी. रोट, रोटी आणि भाकरी यात आणखी एक फरक आहे तो म्हणजे भाकरीला गरम तव्यावर घातले की लगेच पाणी लावले जाते. रोटीला पाणी पण नाही तवा पण नाही. थेट अग्नीच्या संपर्कात.
अग्निचा संस्कार जेवढा जास्त तेवढा पदार्थ पचायला हलका. हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे.
हे रोट भाजताना जर तंदुर वापरली, म्हणजे अग्नि आणि रोट यामधे तव्याचा कोणताही अडथळा न येता हे जाडेभरडे रोट थेट अग्नीवर खमंग भाजले जातात. त्यातील पाणी लवकर सुकवले जाते. ते फुलतात, फुगतात, पापुद्रा वेगळा होतो. आतपर्यंत उष्णता जाते आणि पचायला हलके होतात. पोटही लवकर भरते.
हे तवे पूर्वी खापराचे किंवा मातीचे असायचे. नंतर लोखंडी किंवा बीडाचे म्हणजे मिश्र धातुचे असायचे. आता हिंडालियमचे. हिंडालियम हा पण एक मिश्र धातु. आजचे विज्ञान सांगते, या धातुची झीज लवकर होते. उष्णता मिळाली की त्याला चरे पडतात, त्यातील धातु अन्नातून पोटात जातात. म्हणून त्याचा वापर नियमितपणे जेवणात असेल तर मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते. किंवा जो विषारी आहे. इंग्रजांच्या काळात बंदीवान कैद्यांना तुरूंगातील भोजन याच अॅल्युमिनीयम वा हिंडालियमच्या ताटल्यातून दिले जायचे. पिक्चरमधे आपण बघतोच.
आज आम्ही ही अॅल्युमिनीयम हिंडालियमची भांडी, स्वस्त वाटतात म्हणून, पटकन स्वच्छ होतात म्हणून, आमच्या घरात वापरायला सुरवात करून, स्वतःलाच स्वतःच्या घरामधे बंदिस्त कैदी बनवून टाकले आहे.
लवकरच सुटका करून घ्यायला हवी ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.10.2016
October 23, 2016
राजनीतीत आज विचारधारा व मर्यादा राहिली नाही. महाराष्ट्र असो वा झारखण्ड सर्वत्र चित्र-विचित्र गठजोड़ दिसतात. अशा परिस्थितीत कृष्णाने अर्जुनास काय उपदेश केला असेल?
June 21, 2010
एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती (जीवलग माणूस) जेव्हा अडचणीत असेल त्यावेळी त्याचा सोबती किंवा जीवश्च-कंठश्च म्हणून त्याला वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न केले जातात. पण एवढं करुनही ज्यावेळी “ती व्यक्ती” कोणताच प्रतिसाद देत नाही तेव्हा तीचा जीवलग निराश, हाताश होऊन शेवटी हतबल होतो.
June 18, 2013
जगत श्रेष्ठ अवतार अंबा विझा देवीचा । अंबा विझा देवीचा ।
ताम्हीणीते वास, ताम्हीणीते वास देवी विध्यवासिनीचा
हो देवी विध्यवासिनीचा ।।धृ0।।
उपासक शत्त*ी प्रभु चांद्रसेनिय । कायस्थाते रक्षी दुर्गा विध्य पर्वतीय ।।1।।
महिषादी असुर अंबे त्वांची वधिले । अनंत नांवे रूपे दुर्गे भत्त* तारीले ।।2।।
गंगा सुते अतुल भत्त*ी अंबेची केली । विध्यवासिनी देवी नच प्रसन्न झाली ।।3।।
बंधू द्वया दिधला अंबे तुच दृष्टांत । श्रेष्टाने करावा मम चरणी देहान्त ।।4।।
पाहिलेस सत्व अंबे प्रधान रामाचे । अर्पण केले शीर, तुते हस्ते स्वतचे ।।5।।
शीर कमळ अर्पण करीता तव चरणी । भत्त* कौतुका लागी प्रगटे विझाई देवी ।।6।।
माग माग पसन्न तुजला म्हणे महादेवा । विळेकरांच्या मूळ पुरूषा प्रभू महादेवा ।।7।।
पहाताच जगत् अंबा प्रत्यक्ष आता । ब्रह्यानंदी लागे द्वितीय गंगा सूता ।।8।।
मागणे ते एकची आहे आई जगदंबे । तव चरणासी विलीन करावे माते जगदंबे ।।9।।
संतती संपत्ती कुलवृध्दी सर्व गुणे । आर्शिवाद माझा कूला काय उणे ।।10।।
निरंतर ध्यान माझे तुम्ही करावे । संकट येता काही तुम्ही मजला स्मरावे ।।11।।
पती बंधनी जाता अंबे स्मरले तुजला । माहेराचे देवी दे चुडेदान मजला ।।12।।
त्याच करीता वास तुझा वैद्य देव्हारी । भाकेला गेली अंबा वैद्या घरी ।।13।।
तव गुण वर्णितां सर्व देवही शिणले। विध्यवासिनी देवी तुझे तुच वर्णिले ।।14।।
गणेश सुत दास तुझा प्रार्थी भगवते । संधी द्यावी पुन्हा प्राण अर्पण्याते ।।15।।
गायक - श्री.गजानन प्रधान.
गायीका - सौ. हेमा.
October 15, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti