वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अणुविद्युत्निर्मितीमध्ये अणुभट्टीची सुरक्षितता सर्वोपरी असते. बाकी सर्व गोष्टी त्यानंतर येतात. परंतु चेर्नोबिल दुर्घटनेत डिझाइनमधील त्रुटी, मानवी चुका, प्रचालकांच्या ज्ञानाची कमतरता आणि सुरक्षिततेबाबतची अक्षम्य बेपर्वाई या गोष्टी कारणीभूत ठरल्या. याच दुर्घटनेस यंदाच्या पंचवीस एप्रिल रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने या गंभीर अपघाताचा हा आलेख…..
May 2, 2011
सोविएत रशियन साहित्यिक युरी नगीबीन यांची डॉ.सुनिती देशपांडे यांनी अनुवाद केलेली ही कथा आहे. नगीबीन यांच्या कथांमध्ये पात्रांची गर्दी नसते, पण प्रत्येक पात्र स्वतंत्र रूपाने प्रभावी होऊन उभे राहाते. लेखकासाठी लहान मूल आणि निसर्ग यांच अतूट नातं खास लोभाचं वाटतं.
June 22, 2026
गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे.
November 5, 2018
सुगंधी तेलासाठी प्रसिद्ध असलेला एक वृक्ष. हा वृक्ष सँटॅलेसी कुलातील असून जगभर चंदनाच्या साधारणपणे २५ जाती आहेत. हा मूळचा भारतीय वृक्ष असून भारत, चीन, श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ते हवाई बेटांमध्ये याची लागवड करण्यात आली आहे. कोरडया भागात समुद्रसपाटीपासून सु. १,२०० मी. उंचीपर्यंत चंदन मोठया प्रमाणात आढळतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात. कर्नाटक राज्यात म्हैसूर तसेच इतर अनेक ठिकाणी या वृक्षावर आधारित अनेक लघुउद्योगांचा विकास झालेला दिसून येतो. याच्या सुवासिक गुणधर्मामुळे अनेक शतकांपासून ह्याचा वापर, लागवड व व्यापार चालत आला आहे. परंतु याच कारणामुळे या वृक्षाचे वन्य (Wild) वाण सध्या नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मोठ्या आकारमानाची लाकडे आता आढळत नसल्यामुळे फर्निचरांसाठीच्या लाकूडकामासाठी याचा वापर संपला असला, तरीही सुवासिक तैलार्कासाठी याची मोठ्या प्रमाणावर लागवड होते.
January 15, 2024
भारताने आपले राष्ट्रहित लक्षात घेऊन येणार्या काळात इस्राईलशी चांगले संबंध प्रस्थापित करून देशाचा सामरिक, आर्थिक व तांत्रिक अशा तिन्ही बाजू भक्कम कराव्यात. याकरीता इस्राईल हा भारताचा चांगला मित्र होऊ शकतो व हे सुधारलेले संबंध भारताच्या विकासात खूप हातभार लावतील.
January 23, 2018
सज्जनांची निष्क्रियता दुर्जनांच्या दुष्टपणापेक्षा अधिक घातक आहे. सरकारी कर्मचार्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की त्यांची बांधीलकी त्यांच्या नोकरीपेक्षा अधिक या समाजाशी, या देशाशी आहे. या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या घामातून जो पैसा उभा होतो, त्यातूनच त्यांना पगार, भत्ते वगैरे मिळत असतात. अशा परिस्थितीत जिथे सामान्य लोकांच्या हक्कावर गदा आणणारे, सामान्यांचे शोषण करणारे भ्रष्टाचार होतात तिथे त्यांनी मौन बाळगणे म्हणजे बेइमानी ठरते.
April 11, 2011
प्रल्हादासी करितो नमन बालक असुनी महान
अणुरेणूंत असे भगवान दाखवूनी देई जगाला ।।१।।
बघावी सृष्टी ठेऊनी संत द्दष्टी
त्यासी दिसेल जगत् जेठी सर्व ठिकाणीं ।।२।।
प्रल्हादाचे तत्वज्ञान प्रभुमय सारे जग् जीवन
त्यासी घ्यावे ओळखून श्रद्धा द्दष्टीनें ।।३।।
अपूर्व प्रभू भक्ति उन्मत्त असूरी शक्ति
संघर्षकथा होती भक्त प्रल्हादाची ।।४।।
बहूत महान वीर प्रभुपुढे कोण टिकणार
परि प्रभूसीच वाकवणार प्रल्हाद बालक ।।५।।
नारद ऋषीं एके दिनीं हिरण्यकश्यपूचे राजधानीं
पाद्यपुजा स्वीकारुनी गेले प्रसन्न होऊनी ।।६।।
शिवाची करावी भक्ति मिळवावी तप शक्ति
सामर्थ्यवान ह्या जगतीं होऊनी करावे राज्य ।।७।।
नारद राणीस उपदेशीती जो नारायणाचे नाम घेती
उद्धार ह्या जगती त्याचा होत असे ।।८।।
गर्भवती तूं राणी भक्तिभाव ठेवतां मनीं
ईश्वर संस्कार पडूनी बनेल बालक महान ।।९।।
राजा उपदेश ऐकूनी गेला तपश्चर्येस वनीं
राणी राजधानी नारायणाचे नामस्मरण करी ।।१०।।
करुनी तप महान शिवासी केले प्रसन्न
वरदान घेई मागून वाढवी आपली शक्ति ।।११।।
असे मागीं वरदान जेणे टळावे मरण
परि प्रभू लिला महान कसे टाळी ब्रह्मालिखीत ।।१२।।
पशू अथवा नर राजगृहीं वा बाहेरी
कुणी न करी ठार हिरण्यकश्यपूला ।।१३।।
मृत्यु न यावा शस्त्रानीं भय नसावे अग्नीपासूनी
टाळावे मरण बुडोनी ही इच्छा करी राजा ।।१४।।
दिवस असो वा रात्र मृत्यु टाळावा मात्र
निष्प्रभ ठरावे अस्त्र फेकता राजा वरी ।।१५।।
शिवाचे मिळतां वरदान राजा झाला बेभान
सामर्थ गेले वाढून शिवकृपेमुळे ।।१६।।
सामर्थ्यांत असे शक्ति शक्ती ओघांत वाहती
ओघास दिशा लागती परिणाम दिसण्या योग्य ।।१७।।
मिळतां योग्य मार्ग होईल चांगला उपयोग
नम्रतेचा असता भाग मिळालेल्या शक्तिमध्ये ।।१८।।
दुरुपयोग होता शक्तिचा दुष्परिणाम दिसेल तिचा
उद्वस्त करी जीवनाचा केंद्र बिंदू अहंकार असतां ।।१९।।
पावन करुनी शिववर जागृत झाला अहंकार
मूळचा होता असूर हिरण्यकश्यपू ।।२०।।
गरोदरपणीं नामस्मरण मंत्र जपूनी नारायण
महान संस्कार करुन बाळास संगोपिले ।।२१।।
लागला ईश्वरी ध्यास सतत प्रल्हाद बाळास
बघे सर्वत्र प्रभूस रात्रंदिनी ।।२२।।
गोष्ट येता ध्यानीं राजा गेला संतापूनी
मजविण श्रेष्ठ नाही कुणी सांगु लागला प्रल्हाद बाळासी ।।२३।।
मीच प्रभूचे ठायी तुझी भक्ति अर्पावी
इच्छा नारायणाची सोडावी ताकद देई प्रल्हादबाळा ।।२४।।
नाम नारायणाचे शब्द ते अंतर्मनांचे
भाव गुंतले ह्रदयाचे प्रल्हादबाळाचे ।।२५।।
जन्मबीजाचे संस्कार सहजतेने न जाणार
बाह्य शक्तीचा करी अव्हेर प्रल्हादबाळ ।।२६।।
धमकावले प्रल्हादासी त्यास जीवे मारण्यासी
चालू ठेवता नामस्मरणासी नारायणाच्या ।।२७।।
आत्मा हा अविनाशी समर्पित झाला नारायणाशी
न देई महत्व देहाशी प्रल्हादबाळ ।।२८।।
सर्वत्र सोडता प्रभूवर काळजी तोच घेणार
संशय नसावा त्याचेवर समर्पण करते समयीं ।।२९।।
प्रल्हादाचा हट्ट बघूनी राजा जाई क्रोधूनी
ठार करण्या ठरवूनी हूकुम देई प्रधाना ।।३०।।
पर्वतावरुन लोटले उकळत्या तेलांत ठाकले
ऐरावताच्या पायीं बांधले सर्व प्रयत्न जाई निष्फळ ।।३१।।
प्रभू असतां तारणधारी कोण त्यास जीवें मारी
राजाचे प्रयत्न निष्प्रभ ठरी परमेश्वर शक्तीपुढे ।।३२।।
राजाचा क्रोधाग्नी पेटला प्रश्न करी प्रल्हादाला
नारायण कोठें दाखव ? नाश करीन मी त्याचा ।।३३।।
हे विश्वची प्रभूमय अणूरेणूंत तो होय
सर्वत्र समावून जाय हीच त्याची लीला ।।३४।।
ईश्वर आहे महान ब्रह्मांड त्याचा भाग असून
अंशरुपें जायीं समावून प्रत्येक वस्तूमध्ये ।।३५।।
महासागरातील नीर अगणीत थेंबांचा बनणार
थेंबांत सागरी अंश असणार हे घ्यावे समजावूनी ।।३६।।
'तो नाही' ऐसे ठिकाण न सापडेल ते शोधून
तुझ्या माझ्यांत ही तो असून वास करीत राही ।।३७।।
नारायण आहे सर्व ठिकाणीं घ्यावे हे समजावूनी
हया खांबी तो बसूनी हास्य वदन करी ।।३८।।
प्रल्हादाचे शब्द ऐकूनी राजा गेला चवताळूनी
जोरानें लाथ मारुनी प्रहार केला खांबावरी ।।३९।।
भयंकर होऊनी आवाज कडाडून चमके वीज
हिरण्यकश्यपू न येई समज ह्या चमत्काराची ।।४०।।
मानव देही सिंह शिर नखें त्याची भयंकर
गर्जना देत बाहेर पडला खांबांतूनी ।।४१।।
रुप आक्रळ विक्राळ जणु भासला महाकाळ
घाबरुनी सोडी सकळ ओढूनी घेई असुराला ।।४२।।
सायंकाळचे समयीं भयंकर रुप घेई
हिरण्यकश्यपूस मारण्या येई नारायण ।।४३।।
बसूनी उंचावरी घेऊन राजास मांडीवरी
नखानी पोट चिरी नृसिंह ।।४४।।
वचनाचे करुन पालन वरदानाचा ठेऊन मान
नृसिंह आवतार घेवून ठार करी राजाला ।।४५।।
डोळे मिटूनी नामस्मरण ऐकूनी प्रल्हादाचे भजन
प्रसन्न होई नारायण दर्शन देई विष्णूरुपे ।।४६।।
प्रल्हाद झाला पावन प्रभूचे नामस्मरण करुन
भक्तीचा विजय होऊन अहंकारासी केले नष्ट ।।४७।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१२- ०११२८३
January 12, 2018
सतत हिरव्या पानांनी बहरलेला मोठा वृक्ष असतो.ह्याची पाने ७.५-१५ सेंमी लांब व ५-८ सेंमी रूंद भालाकार असतात.फुले हिरवट पांढरी व मंजिरी स्वरूपात असतात.फळ १-३ सेंमी लांब व पिकल्यावर तांबुस काळे व गरदार असते.फळा मध्ये एक मोठी आठळी असते.
ह्याचे उपयुक्तांग आहे फळ,त्वचा,पाने व बी.जांभुळ चवीला तुरट,गोड,आंबट असते.गुणाने थंड व जड व रूक्ष असते.जांभुळ कफ पित्तनाशक व वातकर असते.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)रक्त स्त्राव थांबवायवला जांभुळाच्या सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
२)ताप आल्यावर अंगाचा दाह होत असल्यास जांभळाच्या फळाचा गर तिळ तेलात एकत्र करून कापडी पट्टीवर लावावा व हि पट्टी डोक्यावर बांधतात.
३)उल्टी व मळमळ होत असल्यास जांभुळाच्या पानांचा रस मधासोबत देतात.
४)मधुमेहामध्ये जांभळाच्या सालीचे चुर्ण उपयोगी आहे.
५)जांभळाच्या फळातील गराचे चुर्ण तारूण्यपिटिकांवर लेप करायला उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
September 19, 2017
शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच.
July 29, 2016
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.
तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’
त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’
आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.
सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.
कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.
जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
-- WhatsApp वरुन
July 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti