वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल.
October 7, 2010
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं पूजार्थं वा कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि ।
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो ॥५॥
भगवान श्री भोलेनाथांची क्षमायाचना करतांना आज पर्यंत मी कोण कोणत्या गोष्टी केल्या नाहीत? याची एक सूची आचार्य देत आहेत. त्यातून खरेतर, वेगळ्या शब्दात आपण सगळ्यांनी भगवान शंकरांच्या उपासनेस्तव काय काय करायला पाहिजे? ही सांगण्याची आचार्यांची ही सुंदर पद्धती आहे.
आचार्यश्री म्हणतात,
स्नात्वा प्रत्यूषकाले स्नपनविधिविधौ नाहृतं गाड्गतोयं
पूजार्थं वा - हे भगवंता मी कधीही प्रातःकाळी स्नान करून आपल्या अभिषेक विधी साठी किंवा पूजेसाठी कधी गंगेचे जल आणले नाही
कदाचिद् बहुतरगहनात्खण्डबिल्वीदलानि - किंवा कधीही अत्यंत गहन जंगलात जाऊन बिल्वपत्रे खुडून आणली नाहीत.
नानीता पद्ममाला सरसी विकसिता गन्धपुष्पै त्वदर्थं- हे भगवंता मी सरोवरामध्ये विकसित झालेली सुगंधाने युक्त अशी कमल फुलांची माला तुझ्याकरता कधी आणली नाही.
क्षन्तव्यो मे पराधः शिव शिव शिव भो श्रीमहादेव शम्भो - हे भगवान शंकरा! माझे अपराध क्षमा कर.
येथे आचार्यश्री आपल्याला भगवान शंकरांच्या पूजेसाठी निसर्गात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टीदेखील किती पर्याप्त आहेत ते सांगत आहेत.
सदैव वाहणाऱ्या गंगेचे जल, सहज मिळणारी बिल्वपत्र, जलाशयात आपोआप येणारी कमलपुष्पे या गोष्टी निसर्गात परस्पर उपलब्ध आहेत. निदान त्या तर आपण सहज जाणू शकतो ना?
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 24, 2020
कार्तिक शुक्ल चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. या दिवशी हरि-हरांचे (विष्णू-शिव) यांचे पूजन करण्यास सांगितले आहे. सामान्यतः शिव पूजनासाठी निशिथ काळ श्रेष्ठ असतो. परंतु या दिवशी निशिथ कालात विष्णूंची पूजा करून अरूणोदयी शिवांची पूजा करण्यास सांगितले आहे.
October 1, 2023
आपल्या रोजच्या व्यवहारात पासवर्डचं महत्त्व असाधारण आहे. तुम्हाला असं वाटतं का, की तुमचा पासवर्ड सुरक्षित आहे? पहा खाली दिलेली यादी !!!
April 7, 2015
पानगळ म्हणजे आयुष्याची शेवट असे आपल्याला वाटते. पानगळ आपल्याला जाणीव करून देते शेवटच्या क्षणांची. पण पानगळ होणार म्हणून पानं फुलायची थोडीच थांबतात. विचारांची ही पानगळ असते. सुचतं तेव्हा खूप सुचतं. जेव्हा सुचतं तेव्हा निसर्गातील घटना, सौंदर्य विचार करायला भाग पाडतात. घटना दुःखद असो वा सुखद, मन संवेदनशील असेल तर विचारांचा उत्सव फुलतो. मन निर्विकार असेल तर विचारांची पानगळ ठरलेली असते.
June 17, 2026
"मला सर्वांना वापरता येईल अशी मोटार बनवायची आहे." ३० वर्षांचा फोर्ड सर्वांसमोर आपल्या नवीन तयार केलेल्या मोटारीचे डिझाईन पेश करत होता. त्यांचा जन्म ३० जुलै १८६३ रोजी झाला.
"हि फोर्ड मोटार दणकट, वजनाला हलकी फक्त १००० पौंड वजनाची आहे. ४ सिलिंडर इंजिनाची हि गाडी ताशी ४५ मैल वेगाने धावू शकते. सध्या हिची किंमत फक्त $९०० आहे. हिच्या बरोबरीच्या गाड्या साधारणपणे $१५०० ला विकल्या जातात. आणि यामुळेच हि गाडी सर्वांना परवडणारी जगातील पहिली गाडी असेल." असे म्हणून त्याने सर्वांच्या पुढे आपल्या गाडीचे एक चित्र सरकवले. हेन्री फोर्डच्या उद्योगीपणाचा अनुभव त्याच्या घरच्यांना आणि मित्रांना त्याच्या लहानपणा पासूनच येऊ लागला होता. त्याच्या वयाच्या तेराव्या-चौदाव्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला एक पॉकेट वॉच आणून दिले होते. त्यात तो रमला. इतका की तो पंधरा वर्षाचा होई पर्यंत त्याने आपले शेजारी आणि मित्र यांची घडय़ाळे शंभरदा उघडली आणि पुन्हा त्यांची जुळवणी केली. तो तेरा वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले आणि तो जवळपास मानसिकरीत्या उध्वस्त झाला. त्याचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते.
समजू लागले त्या वयापासूनच यंत्राशी त्यांची मैत्री झाली, या यंत्रांच्या ओढीनेच ‘अश्वहीन रथ’ म्हणजेच मोटरगाडी बनविण्याचे त्यांना पडलेले स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या साथीने केलेले कठोर परिश्रम नक्कीच कौतुकास्पद आहेत. घोडय़ाशिवाय कधी रथ चालतो काय, अशी चेष्टा लोक करीत. शेवटी अनेक दुरुस्त्या करीत १८९३ मध्ये त्याने आपली गाडी रस्त्यावर आणलीच. मात्र पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग वारंवार येऊ लागले, या गाडीच्या आवाजाने घोडे उधळतात,गाई दूध देत नाहीत, कोंबडय़ा अंडी घालत नाहीत, रस्ते खराब होतात, अशा तक्रारी लोक करीत होते. आज हे वाचताना गंमत वाटते.अशा तक्रारी लोक करू लागले. शेवटी डेट्रॉइटच्या नगरपालांकडून हेन्री फोर्ड यांनी गाडी चालविण्याचा परवाना काढला.अमेरिकेतला हा पहिला परवाना होता.
हेन्री फोर्ड यांचे ७ एप्रिल १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / विनोद शिवाजी गोरे
July 30, 2021

कोणतीही मालगाडी नीटपणे न्याहाळली तर असं लक्षात येतं, की तिला भारतातील वेगवेगळ्या विभागांचे डबे जोडलेले असतात. नॉर्थन रेल (एन.आर.), वेस्टर्न रेल (डब्ल्यू.आर.), वगैरे. असे डबे काही महत्त्वाच्या जागी एकमेकांना जोडले जाऊन त्यांची ६० ते ७० डब्यांची मालगाडी तयार होते. ज्या जागी अशा अनेक मालगाड्यांचे डबे वेगवेगळ्या विभागांतून येतात त्या जागांना ‘मार्शलींग यार्ड' म्हणतात. यांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत:
१. फ्लॅट: ज्या जागी साधारण प्रत्येक दिवशी ५०० डबे जोडले जातात.
२. हम्प: या जागी ५००० डबे प्रत्येक दिवशी जोडले जातात.
या मार्शलींग यार्डांमध्ये उंच मार्गावरून डबे त्यांच्या मूळ वजनांमुळे खाली आणले जातात. त्यामुळे अर्थातच ते हलवण्याकरता होणाऱ्या खर्चात बचत होते. परंतु अशा ठिकाणी जागा भरपूर मोठी असावी लागते.
एके काळी मुगलसराई (वाराणसीपासून १९ कि.मी. अंतरावरील स्टेशन) हे आशियातील सर्वांत मोठं मार्शलींग यार्ड होतं. आता टर्मिनल यार्डस् जास्त प्रमाणात आहेत, जिथे एका स्थळाहून दुसऱ्या ठरलेल्या स्थळाकडे मालगाड्या जातात. उदाहरणार्थ, वाडीबंदर (मुंबई) पासून ते थेट शालीमार (कलकत्ता) येथपर्यंत मालगाड्या जाऊन पोहोचतात. यामुळे सर्व माल लवकर पोहोचण्यास मदत होते.
मालगाड्यांचं प्रवासी गाड्यांसारखं पक्कं छापील टाईम टेबल नसतं, परंतु त्यांना वेगळा क्रमांक व नावं असतात. त्यावरून त्या ओळखल्या जातात. कोणत्याही मधल्या स्टेशनावर थांबा नसल्यानं त्या चांगल्या वेगात जातात. रेल्वेचं उत्पन्न या माल पोहोचविण्यावर जास्त प्रमाणात अवलंबून असल्यानं या गाड्यांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. रशियामध्ये मालगाड्यांचं महत्त्व मेल एक्सप्रेस गाड्यांपेक्षा जास्त आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
August 30, 2022
भगवान शंकरांच्या उपासनेचे, चरित्राची सर्वच साधने लोकविलक्षण आहेत.
August 28, 2020
एच.आय.व्ही. किंवा हिपेटायटिस बी हे आजार पन्नास वर्षांपूर्वी कुणाला माहिती नव्हते. आजकाल हे आजार माहिती झाले. त्यावर संशोधन चालू झाले आणि काही प्रमाणात आटोक्यात आणण्यापर्यंत यश पण मिळते आहे. तसाच एक नवीन आजार आजकाल फार वाढलेला दिसतो. तो आहे “टाच दुखणे”. हा आजार खूप जुना फक्त आजकाल प्रमाण खूप वाढलेले बघण्यात येते. टाचदुखी काही जीवघेणा आजार नाही म्हणून त्यावर फारसे संशोधन करण्याची धडपड फारशी कोणी करत नाही. पण ज्याची टाच दुखत असते त्यालाच समजते की त्या वेदना किती जीवघेण्या असतात ते.
ही टाच दुखी आजकाल का वाढली आहे? त्याला कसा आळा घालता येईल? पेन किलर औषधे न घेता फक्त काही सवयी बदलून टाच दुखीवर कसा इलाज करता येईल? ह्या सर्व प्रश्नांचे “अनुभविक बोल” समजून घेऊया.
पूर्वी ज्यांच्या घरी फ्रीज आहे ते श्रीमंत समजले जात. आजकाल फ्रीज म्हणजे अगदी जीवनावश्यक वस्तू बनली आहे. फ्रीजचा आणि टाच दुखीचा काय संबंध असा विचार आता आपण नक्कीच सुरु केला असेल. लहानपणा पासून आपण बघत आलो आहोत की कुठेही दुखत असेल तर शेकण्यामुळे बरे वाटते. खेळता खेळता चेंडू जरी डोळ्याच्या आसपास लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने थोडी ऊब निर्माण करुन लगेच डोळ्यावर धरतात हे आपण बघितले असेल. पाठ दुखी, कंबर दुखी होत असेल तर गरम लाईट किंवा रबरी पिशवीतून गरम पाणी भरुन शेकण्यामुळे आराम पडतो हे आपण नेहमी अनुभवतो. म्हणजेच उष्णता ही वेदना घालवते ह्या उलट थंड पाण्यामुळे वेदना वाढते हे समजले पाहिजे. थंड गार सरबत किंवा पाणी पिताना दातांमध्ये कळ येते हा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मग त्या थंड पाण्यामुळे शरीरात इतर ठिकाणी वेदना होणं शक्य आहे हे आपल्याला का लक्षात येत नाही.
उत्तरेकडे अती थंडीच्या वातावरणात चालता चालता हाता-पायाला जरा धक्का लागला तरी किती जोरात ठणका लागतो. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आमच्या लहान पणी वडील एप्रिल-मे महिन्यात आम्हाला आईसक्रीम खायला घेऊन जात त्या काळात आईसक्रीम हा पदार्थ फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत खायचा असतो असे आमच्या डोक्यात ठाम बसले होते. आजकाल कोणताही ऋतु असो, अगदी धो धो पाऊस कोसळत असला तरी आणि कडाक्याची थंडी असली तरी “आईसक्रीम चालते.” फ्रीजचे थंड पाणी बारा महिने पिणारे लोक आहेत. काही होत नाही असा गोड गैरसमज त्यांच्या मनात कोण भरुन देते हेच कळत नाही. ह्या थंड पदार्थांचा मारा शरीरातील ऊब कमी करतो. नैसर्गिक ऊर्जा कमी होत जाते आणि जोडीला टाचा दुखणे चालू होते. हा विचार सांगितल्यावर काही विद्वान म्हणतात, “आम्ही इतके वर्ष फ्रीजचे पाणी पितो, तेव्हा काही नाही झालं, मग आता का?” ह्याचं उत्तर काहीही कुपथ्य केलं तर शरीर दीर्घकाळ पर्यंत त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतं. आणि एक वेळ अशी येते की शरीर संपावर जातं अत्याचारांना साथ देणं सोडून देतं.
ह्याचा दुसरा भाग म्हणजे थंड पदार्थ अति प्रमाणात वारंवार घेण्यामुळे वजन वाढते. वाढलेल्या वजनाचा सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल सर्वात जास्त भार टाचेवरच पडतो. त्या खालोखाल गुडघे नंतर कंबर व शेवटी मणके. गरज नसताना उगाचच पाणी पिण्यामुळे हे पाणी हाडांच्या भागात जास्त ओलावा निर्माण करतात आणि हाडांमध्ये सूज येऊ लागते. हा प्रकार समजण्यासाठी पावसाळ्यात लाकडी दरवाजे कसे फुगतात ते आठवून पहा. ओलावा वाढला की लाकूड जसे फुगते तशीच हाडे पण फुगतात, म्हणजेच सुजतात अशा वेळी आपण कोणतेही पेन किलर औषध घेतले की वेदना कमी होते. पण औषधाचा परिणाम होताना भरपूर घाम येतो म्हणजेच शरीरात ठोसलेलं जास्तीचं पाणी औषधाने बाहेर फेकून देण्याची क्रिया होते. हे उदाहरण देण्याचे प्रयोजन फक्त विषय समजण्यापुरते नव्हे तर हा प्रयोग असंख्य रुग्णांच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे. पूर्वीच्या काळी “संध्या” करण्याची पद्धत होती. ह्या संध्येच्या पद्धतीमध्ये पळी पळीने घेऊन आचमन आणि काही मंत्रोच्चानकरण्याची पद्धत होती. संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी संध्या करावी अशी शिकवण होती. म्हणजेच सूर्यास्तानंतर जास्त पाणी पिणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे असा संकेत होता.
फ्रीज सारखा दुसरा टाचांचा शत्रू म्हणजे ए.सी. वेदना शामक गोळी घेतली की घाम येतो ह्याचाच उलट अर्थ असा की घाम येण्याचे थांबवणारी क्रिया वेदना वाढवण्यास कारण होते. मग हे सर्व टाळण्यासाठी काय करता येईल? वातानुकुलित ऑफिस, घर,गाडी असताना कसलाच वापर करायचा नाही का? ह्याचे उत्तर “वापर जरुर करावा पण मर्यादेत”. दिवसातून वीस तास आपण जर ए.सी. मध्ये असाल तर किमान ४० मिनिटे असा काही व्यायाम करा की ज्यामुळे आडवून ठेवलेला सर्व घाम औषधाशिवायचबाहेर पडेल. स्टीम, सोना हे प्रकार करण्यासही हरकत नाही पण बॅडमिंटन, टेनिस, सायकलिंग सारखा व्यायाम केला तर तसा घाम तर बाहेर पडेलच पण सांधे पण लवचिक राहतील.
टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.
१) टाच दुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात मीठ टाकून १० मिनिटे पाय बुडवून बसावे.
२) फ्रीज शी चक्क कट्टी करावी.
३) कोल्ड ड्रिंक किंवा आईसक्रीम फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्याचे पदार्थ आहेत असे समजावे.
४) “बर्फ” हा शब्द पण उच्चारु नये.
५) सूर्यास्तानंतर पाणी किंवा थंड पदार्थ घेण्याचे टाळावे.
६) ए.सी. चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही तेथेच करावा.
शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की ह्या गोष्टींचा वापर ह्या सवयी गेल्या २५ वर्षांत अति प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून वाढते आहे टाच दुखी.
-- आर.बी.पाटील
संयोजक
फिटनेस मूवमेंट ऑफ़ इंडिया
April 17, 2017
प्रकाशन दिनांक :- 19/09/2004
‘उम्रे दराज मांग कर लाए थे चार दिन,
दो आरजू में कट गए, दो इंतजार में’
एका शायराची ही कैफियत, केवळ त्या शायरापुरती मर्यादित नाही. ही कैफियत प्रातिनिधीक आहे. ऊण्या-पुऱ्या चार दिवसाचे आयुष्य वाट्याला येते आणि त्यातले अर्धेअधिक वाट पाहण्यातच संपून जाते.
September 19, 2004
Copyright © 2025 | Marathisrushti