(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • त्रिमितीय जीवाश्म

    त्रिमितीय जीवाश्म

    पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं.

      February 16, 2024


  • वेगळा आणि सक्षम पर्याय अपरिहार्य !

    सतत अपयशी ठरलेल्या खेळाडूंना बाहेर काढून लोकांनी एक नवा संघ उभारावा. गेली साठ वर्षे तोच तो डाव टाकून एक हारणारा जुगार या देशातील लोक खेळत आले आहेत, आता किमान एकदा तरी नवा डाव खेळून पाहायला हरकत नाही. ती या देशाची आजची खरी गरज आहे.

      October 1, 2012


  • डिक्शनरी आणि डिरेक्टरी

    डिक्शनरी आणि डिरेक्टरी आता नामशेष होण्यातच जमा आहेत. आजची e -पिढी गुगल वरच त्यांचे अर्थ सर्च करेल. पण आमचे हे संपर्क आणि शब्दांचे ब्राउझर आठवणींच्या ट्रंकेतला एक कोपरा व्यापुन विराजमान राहतील.

      August 24, 2023


  • ऍसिडिटीवर औषध काय?

    होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती, तसेच कडूपित्तावर अत्यंत गुणकारी औषधे आहेत. ‘व्यक्ती तितक्याथ प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकामध्ये ऍसिडिटीची वेगळी लक्षणे आढळतात. काहींना ऍसिडिटीमुळे पोटात जळजळते तर काहींना छातीत जळजळते. काही व्यक्तींना मळमळते, उलटी होते तर काहींना उलट्या कधीच होत नाहीत, नुसतेच मळमळते. काही व्यक्तींची ऍसिडिटी काहीतरी खाल्ल्यावर कमी होत, तर काहींना उपाशीपोटी बरे वाटते. ऍसिडिटीमुळे काही व्यक्तींची मान दुखू लागते, पित्त डोक्या त चढत आहे असे वाटते. काहींना आंबट घशाशी येते तर काहींना कडू पित्त होते. पित्त झाल्यावर काही व्यक्तींच्या पोटात बारीक दुखते तर काहींना अगदी आग पडल्यासारखी वाटते. काही रुग्णांमध्ये ऍसिडिटीमुळे गरगरते, चक्कर आल्यासारखी वाटते. पित्त वाढल्यामुळे काही व्यक्तींचे डोके जड झाल्यासारखे वाटते, दुखते तर काहींना खूप ढेकरा येतात. अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताचा त्रास वरचेवर होतो. या प्रत्येक लक्षणासाठी विशिष्ट, वेगळे औषध होमिओपॅथीत उपलब्ध आहे. होमिओपॅथिक औषधे ही चवीला गोड व घ्यायला अत्यंत सोपी असतात. ही औषधे उपाशीपोटी घेतली तरी चालतात. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट स होत नाहीत.ऍसिडिटी हा असा विकार आहे, की त्याला नुसते वरवरचे उपाय करून ते बरा होत नाही, मुळापासून त्यावर उपाय करावे लागतात. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथिक औषधांचे वैशिष्ट्य असल्यामुळे होमिओपॅथीमुळे ऍसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. सततच्या ऍसिडिटी मुळे आतड्याला जखम होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. अल्सरकडेही दुर्लक्ष केले तर पोटदुखी होऊन तो आतल्या आत फुटून सेप्टीक होऊ शकते. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या ऍसिडिटीकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करून घेणे हे केव्हाही हिताचे असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    9422301733

      December 24, 2016


  • चन्द्रशेखर अष्टक स्तोत्रम् – मराठी अर्थासह

    मार्कण्डेय पुराणाचे रचयिता मार्कण्डेय ऋषींनी हे अष्टक रचून शंकराचा धावा केला अशी लोककथा आहे. मृगशृंग ऋषींचा पुत्र मृकण्डू याला संतान नसल्याने त्याने भगवान शंकराची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, परंतु दीर्घायुषी पुत्र मंद बुद्धीचा तर अल्पयुषी पुत्र (१६ वर्षे) अत्यंत बुद्धिमान असेल असा विकल्प दिला. मृकण्ड ऋषींनी दुसरा विकल्प निवडला. तोच हा पुत्र. मृकण्डाचा पुत्र म्हणून त्याचे नाव मार्कण्डेय. १५ वर्षे विद्याध्ययन केले. १६ व्या वर्षी जेव्हा कृतांत काळ आला तेव्हा मार्कण्डेयाने भगवान शंकराचा धावा केला. यमदूतांनी आपल्याला ओढून नेऊ नये म्हणून त्याने शिवलिंगाला घट्ट मिठीच मारली. शंकराने प्रसन्न होऊन त्याचे रक्षण केले व यमाला रिक्तहस्ते परत पाठवून दिले. त्यानंतर त्याने हे स्तोत्र म्हटले अशी समजूत आहे.

    सदर अष्टक मार्कण्डेय ऋषींनी रचले आहे. त्याच्या पठणाने अकाल मृत्यू टळतो, तसेच हे मानवाला सांसारिक कष्टांपासून वाचवणारे कवच आहे अशी भाविकांची धारणा आहे.


    चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर पाहि माम् ।
    चन्द्रशेखर चन्द्रशेखर चन्द्रशेखर रक्ष माम् ॥१॥

    मराठी- हे शंकरा, माझे पालन कर. हे शंकरा माझे रक्षण कर.

    हे सदाशिव शंकरा जगती करी मम रक्षणा ।
    हे सदाशिव शंकरा जगती करी मम पालना ॥ ०१


    रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं
    सिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युताननसायकम् ।
    क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदिवालयैरभिवन्दितं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥२॥

    मराठी- चांदीसारख्या शुभ्र पर्वता (हिमालया) चे शिखर हेच ज्याचे घर आहे, ज्याने रत्नखचित मेरू पर्वताचे धनुष्य बनवले, त्याला सर्पराज (वासुकी) ची प्रत्यंचा जोडली, ज्याच्या बाणावर श्रीविष्णू आरूढ झाला, आणि ज्याने तीन नगरे झपाट्यात जाळून टाकली, ज्याला देवता वंदन करतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील?

    मेरुचे धनु, वासुकी गुण, विष्णु सायक ज्या करी (गुण- धनुष्याची दोरी)
    नष्ट तीन पुरे झणी, सुर पाउले नमिती बरी ।
    जो वसे शिखरी हिमालय, तो मला नित आसरा
    काय काळ करी तिथे मज, त्यास पाड नसे जरा ॥ ०२

    टीप- या श्लोकाला संदर्भ शिव पुराण व मत्स्य पुराणातील, शंकराने सर्व देवांच्या साहाय्याने त्रिपुरांचा नाश केला त्या कथेचा आहे.


    पञ्चपादपपुष्पगन्धपदांबुजद्वयशोभितं
    भाललोचनजातपावकदग्धमन्मथविग्रहम् ।
    भस्मदिग्धकलेबरं भव नाशनं भवमव्ययं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥३॥

    मराठी- पाच वृक्षांच्या फुलांनी आणि त्यांच्या सुवासाने ज्याची पदकमळे सुशोभित (आणि सुगंधित) झाली आहेत, कपाळावरील नेत्रातून बाहेर पडलेल्या अग्नीने ज्याने मदनाला जाळून टाकले, ज्याने सर्वांगावर राख फासली आहे, जो या जीवनातील दुःखे नष्ट करतो आणि जो सर्वकाळ अस्तित्त्वात रहातो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    पावले सुम पंचकी खुलली सुवास उफाळला
    वन्हिने नयनातल्या उघडून मन्मथ जाळिला ।
    सर्वव्यापक, दुःख नाश करीत, राख तनूवरी
    त्यास पाड नसे जरा मज काळ काय तिथे करी ॥ ०३

    टीप- येथे पहिल्या चरणातील ‘पंचपादप’ चा संदर्भ मंदार,पारिजात,संतान,कल्पवृक्ष आणि हरिचंदन या ‘देवतरु’ या उपाधीने ओळखल्या जाणार्‍या झाडांशी आहे.


    मत्तवारणमुख्यचर्मकॄतोत्तरीयमनोहरं
    पङ्कजासनपद्मलोचनपूजितांघ्रिसरोरुहम् ।
    देवसिन्धुतरङ्गसीकर सिक्तशुभ्रजटाधरं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥४॥

    मराठी- ज्याने माजलेल्या हत्तीचे कातडे आपल्या पाठीवर पांघरले आहे, ज्यामुळे तो (आणखीच) मनोहर दिसत आहे, ज्याच्या पदकमळांची कमळात बसणारा (ब्रह्मा) आणि कमळासारखे नेत्र असणारा (विष्णू) पूजा करतात, स्वर्गंगेच्या लाटांमुळे ज्याच्या शुभ्र जटांवर पाण्याचे तुषार फवारल्यासारखे दिसतात, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    जो दिसे रमणीय ओढुन मत्त कुंजर चामडे
    पादपद्म विधी-अनंतहि पूजिती नत त्यापुढे । (विधी-ब्रह्मा, अनंत-विष्णू)
    जान्हवी जल लाट फेकत शुभ्र थेंब जटांवरी
    शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०४


    यक्षराजसखं भगाक्षहरं भुजङ्गविभूषणं
    शैलराजसुतापरिष्कृतचारुवामकलेबरम् ।
    क्ष्वेडनीलगलं परश्वधधारिणं मृगधारिणं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥५॥

    मराठी- कुबेराचा मित्र असणार्‍या, भगाच्या डोळ्याचे हरण करणार्‍या, नाग हेच ज्याचे अलंकार आहेत, ज्याच्या शरीराचा डावा भाग नगसुता पार्वतीच्या रूपाने सुशोभित झाला आहे, विषप्राशनामुळे ज्याचा गळा निळा झाला आहे, ज्याच्या हाती परशू आहे, ज्याच्याबरोबर (शिरावरील चंद्रामध्ये) एक हरीण आहे,अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    मित्र वैश्रवणा, भगा नयनारि, पन्नग दागिना
    पार्वती विलसे सदाशिव अंग वाम सुलक्षणा ।
    प्राशुनी विष नील कंठ मृगा सवे परशू करी
    शंकरा शरणा मला मग काळ काय तिथे करी ॥ ०५


    कुण्डलीकृतकुण्डलेश्वर कुण्डलं वृषवाहनं
    नारदादिमुनीश्वरस्तुतवैभवं भुवनेश्वरम् ।
    अन्धकान्तकमाश्रितामरपादपं शमनान्तकं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥६॥

    मराठी- ज्याच्या कानावर सर्पराजाचे वेटोळे कर्णभूषण म्हणून घातले आहे, नंदी ज्याचे वाहन आहे, जो त्रिभुवनाचा स्वामी असून नारद इत्यादी मुनीश्रेष्ठ ज्याच्या ऐश्वर्याचे गुणगान करतात, ज्याने अंधकासुराचा नाश केला, जो शरणागतांसाठी कल्पवृक्ष आहे, ज्याचे यमावर नियंत्रण आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    वर्तुळाकृति वासुकी श्रवणी, नि नंदिक वाहना (नंदिक- नंदी, शिवाचे वाहन)
    तीन लोकधनी, मुनीजन गात वैभव वंदना ।
    अंधका वधिले, शिवा, शरणास कल्पतरू खरा
    काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०६

    टीप- काही अभ्यासकांनी ‘अन्धकान्तकमाश्रितामरपादपं’ चा संदर्भ वृष्णिवंश व अंधक वंशाच्या शिव भक्तीशी लावलेला दिसतो.


    भेषजं भवरोगिणामखिलापदामपहारिणं
    दक्षयज्ञविनाशनं त्रिगुणात्मकं त्रिविलोचनम् ।
    भुक्तिमुक्तिफलप्रदं सकलाघसंघनिबर्हणं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥७॥

    मराठी- या भव रूपी जगातील रोग्यांना औषधस्वरूप असणार्‍या, सर्व संकटांना दूर सारणार्‍या, दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणार्‍या, ज्याच्या ठायी (सत्व,रज,तम हे) तिन्ही गुण एकवटले आहेत, अशा तीन लोचन असलेल्या, भौतिक सुखोपभोग आणि मोक्ष रूपी फळ देणार्‍या,पातकांच्या राशींचा नाश करणार्‍या अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    तोडगा भव रोगियां, विपदा समस्त दुरी झणी
    दक्षहोमविनाश, सुंदर नेत्र तीन, त्रयो गुणी ।
    सौख्य मोक्षद, पापनाशक आसरा मज शंकरा
    काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०७


    भक्तवत्सलमर्चितं निधिक्षयं हरिदंबरं
    सर्वभूतपतिं परात्परमप्रमेयमनुत्तमम् ।
    सोमवारिदभूहुताशनसोमपानिलखाकृतिं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥८॥

    मराठी- ज्याची (भक्तजन) पूजा करतात, जो भक्तांप्रती दयाळू आहे, जो अक्षयनिधी आहे, या दिशाच ज्याची वस्त्रे आहेत, जो सर्व प्राणिमात्रांचा स्वामी आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अमर्याद आहे, ज्याच्यापेक्षा अधिक उत्तम कोणीही नाही, जो सूर्य,चंद्र, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदि स्वरूपात विराजमान आहे, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    सेवकां कनवाळु, पूजत भक्त, अक्षय राशि जो
    जो दिगंबर, भूतनाथ, अनंत, उत्तम सर्व जो ।
    तेज वायु रवी रसा नभ इन्दु जो जल साजिरा
    काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०८


    विश्वसृष्टिविधायिनं पुनरेव पालनतत्परं
    संहरन्तमपि प्रपञ्चमशेषलोकनिवासिनम् ।
    कीडयन्तमहर्निशं गणनाथयूथसमन्वितं
    चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः ॥९॥

    मराठी- जो या विश्वाचा आणि सृष्टीचा निर्माता आहे, तसाच त्याचे पालन करण्यातही तत्पर आहे, आणि शेवटी योग्य वेळी असंख्य जनांसाठी वसतीयोग्य अशा या जगाचा सर्वनाश करतो, आपल्या भूतगणांच्या गटांसमवेत रात्रंदिवस खेळत असतो, अशा शंकराचा आसरा मी घेतो. (मग तो) यम मला काय करील ?

    निर्मितो जगता, नियामक सृष्टिची जपतो धुरा
    शेवटी जग नाश मानव वास जो करितो बरा ।
    संघनायकसंग खेळत आपल्या नित जो खरा
    काय काळ करी तिथे मज त्यास पाड नसे जरा ॥ ०९


    मृत्युभीतमृकण्डुसूनुकृतस्तवं शिवसन्निधौ
    यत्र कुत्र च यः पठेन्न हि तस्य मृत्युभयं भवेत् ।
    पूर्णमायुररोगतामखिलार्थसंपदमादरात्
    चन्द्रशेखर एव तस्य ददाति मुक्तिमयत्नतः ॥१०॥

    मराठी- मरणाची भीती असलेल्या मृकण्डूच्या पुत्रा (मार्कण्डेया) ने केलेले हे स्तवन जो कोणी शंकराच्या जवळ किंवा जेथे कोठेही पठण करेल, त्याला मृत्यूचे भय राहणार नाही. सदाशिवच त्याला संपूर्ण निरामय आयुष्य, सर्व पुरुषार्थपूर्ण धनदौलत आणि (जनमानसात) आदर व सहज मुक्ती प्रदान करतो.

    मृत्युचे भय ज्या मृकण्डुसुतास ही सुचली स्तुती
    गातसे कुणि ही कुठे हि तयास वा शिव संगती ।
    काळभीति तया नसे, परिपूर्ण सार्थक जीवनी
    शंभु दे धन स्वास्थ्य आदरयुक्त, सद्गति देउनी ॥ १०

    इति श्रीचन्द्रशेखराष्टकस्तोत्रं संपूर्णम् ॥

    -- धनंजय बोरकर
    ९८३३०७७०९१

      February 27, 2022


  • अंधांची डोळस शाळा

    कोथरूड येथील दृष्टिहीनांसाठी, सर्वसमावेशक निवासी’ शाळा एकदा तरी भेट द्यायला हवी अशीच आहे. गांधी भवन, कोथरूड येथे ही शाळा आहे. डोळे असले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, हे येथील विद्यार्थ्यांकडून व त्यांनी केलेल्या वस्तू पाहून नक्कीच म्हणता येईल. केवळ वस्तूची निर्मिती नव्हे तर विक्री करून अर्थार्जनसुद्धा इथे केले जाते.

      July 2, 2026


  • ऑक्टोबर २० – सीमाप्रेमी सरदार आणि नजफगढचा नवाब

    १९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्‍या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.

    १९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला.

      October 18, 2010


  • सर्पगंधा

    सर्पगंधाचा सरळ सदाहरित १-३ फूट उंच क्षुप असतो.ह्याची पाने ३-७ इंच लांब व २-२१/२ इंच रूंद अण्डाकार अथवा भालाकार व तीक्ष्णाग्र असतात.पानांचा वरचा भाग गडद हिरवा व पृष्ठभाग हल्का हिरवा असतो.प्रत्येक काण्डपर्वातून ३-४ पाने निघतात.फुले पांढरी अथवा गुलाबी गुच्छामध्ये येतात.फळ मटराच्या आकाराचे कच्चे हिरवे व पिकल्यावर काळे होते.मुळ दृढ असून ४० सेंमी लांब व २ सेंमी व्यासाचे असते.

    ह्याचे उपयुक्तांग मुळ असून हि चवीला कडू,उष्ण गुणाची,रूक्ष व निद्राजनन आहे.हि कफवातनाशक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:

    १)झोप येत नसल्यास रात्री झोपताना तुपा सोबत सर्पगंधा देतात.

    २)चवीला कडू असल्याने सर्पगंधा कृमीघ्न कार्य करते.

    ३)सर्पगंधा उच्च रक्तदाबाच ही वापरतात.

    ४)कडू चव असल्याने सर्पगंधा आमपाचक व ज्वरनाशक आहे.

    ५)उष्ण असल्याने सर्पगंधा आर्तवजनन आहे.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 30, 2017


  • डॉ. बाळ दत्तात्रय टिळक

    डॉ. बाळ दत्तात्रय टिळक (१९१८ -१९९९) हे मुळातले यवतमाळ जिल्ह्यातील कारंजा गावचे. मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञानातील बीएस्सी करून मग सायन्समधून ऑफ इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल त्यांनी प्रा. के. व्यंकटरामन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. नंतर ते इंग्लंडला ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले व नोबेल पुरस्कार विजेते प्रा. रॉबिन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सेंद्रिय रसायनशास्त्रात संशोधन केले. त्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांना डी.फिल. ही पदवी दिली.

      October 5, 2023


  • मदिरापुराण

    … एकेकाळी रुढी-परंपरांचा आणि सामाजिक जीवनाचा भाग असलेली, सध्या… निषिद्ध समजली जाणारी ही दारू म्हणजे नेमके काय..? हेच बहुतेकांना माहिती नसते..! ऐकीव किंवा काही १-२ वाईट उदाहरणांवरून वेगेवेगळे मतप्रवाह बनलेली दारू म्हणजे नेमके काय..? चला तर आज तेच बघूयात…!

      November 19, 2019