(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विविध कालगणना

    भारतात चलनात असलेल्या प्रमुख दिनदर्शिका म्हणजे ग्रेगरियन, तिथी दर्शक शालिवाहन शक, विक्रम संवंत आणि नवीनच सुरु झालेली राष्ट्रीय सौर कालगणना. त्याशिवाय हिजरी आणि पारशी कालगणना वेगळीच प्रत्येक धर्माची स्वतंत्र कालगणना पद्धती असते.

      January 13, 2023


  • शॉपिंग कार्ट अर्थात ट्रॉली

    goldman-shopping-trolleyमॉलमध्ये गेल्यानंतर ट्रॉली ढकलत शॉपिंग करणं, हे आपल्यापैकी अनेकांना आवडतं. परंतु कोणे एके काळी या ट्रॉलींचा वापर करणं ग्राहकांना अपमान वाटत होता. चातुर्याने केलेलं प्रमोशन आणि बदल यांच्यामुळे ट्रॉली अर्थात शापिंग कार्ट आज कमालीच्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेतील एका सुपरमार्केटच्या मालकाने आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी तयार केलेली ही कार्ट आता सर्वसामान्यांच्या हाती जाऊन विसावली आहे.

    अमेरिकेतील ओक्लोहोमा शहरात असलेल्या ' पिग्गली विग्गली ' या सुपरमार्केटचा मालक सिल्यान गोल्डमन आपल्या ग्राहकांच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करत असे. ग्राहकांना खरेदीचा पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात तो नेहमीच पुढाकार घ्यायचा. ग्राहकांनी जास्त सामान घेतल्यानंतर ते सांभाळता येत नसल्याने एका क्षमतेपलीकडे ते खरेदीच करत नसल्याचं गोल्डमनच्या लक्षात आले. त्यासाठी काय उपाय करता येईल, याचा तो विचार करू लागला. बास्केट उपलब्ध करुन दिलं तरीही तीच समस्या कायम राहत असल्याचं त्याला माहिती होते.

    एके रात्री तो ऑफिसमध्ये बसून याच विषयावर विचार करत होता. त्यावेळी त्याच्या सुपरमार्केटमधील मेकॅनिक क्रेड यंग त्याच्या केबिनमध्ये आला. त्याचक्षणी गोल्डमनला एक युक्ती सुचली. त्याने त्याच्या केबिनमधील लाकडी खुर्चीला बास्केट लावण्यास सांगितलं. त्यानंतर त्या खुर्चीच्या चारही पायांना चाकं लावण्यास सांगितलं. ही चालतीफिरती खुर्ची पाहून गोल्डमन खूश झाला. त्याने अशाप्रकारच्या काही खुर्च्या तयार करुन सुपरमार्केटमध्ये ठेवण्यास सांगितलं.

    उत्साहाने दुसर्‍या दिवशी गोल्डमन आल्यानंतर त्यानं पाहिलं, तर एकही ग्राहक या खुर्च्या वापरत नसल्याचे त्याला दिसून आलं. आम्ही खरेदी केलेलं सामान अशा खुर्च्यावर ठेवून आम्ही फिरायचं का, असा प्रश्न ते विचारु लागले. गोल्डमनने मग वेगळा मार्ग अनुसरला. त्याने या खुर्च्या ओढण्यासाठी काही माणसं ठेवली. हळूहळू लोकांना ही सुविधा आवडू लागली. तोपर्यंत त्यात बरेच बदल होत गेले. ४ जून १९३७ साली गोल्डमनने सुरू केलेली ही फिरती खुर्ची नंतर शॉपिंग कार्ट म्हणून लोकप्रिय पावली.

    आज संपूर्ण जगात या कार्टचा वापर केला जातो. आता तर लहान मुलांना त्यावर बसवण्याची सोयही करण्यात आली आहे.

    कधी एके काळी खूळ म्हणून ज्याकडे पाहिलं जात होते, आता त्याकडे खरेदी करतानाची महत्त्वाची गोष्ट म्हणून पाहिलं जात आहे.

      October 9, 2016


  • अब्राहम लिंकनचे पत्र पुन्हा वाचताना

    मोठी माणसे पत्ररुपाने आपल्यात मृत्यूनंतरही असतात. अब्राहम लिकन आज असते तर आपले पत्र शैक्षणिक संस्था विसरल्या की काय? अशी शंका त्यांना आली असती. पत्राला ‘शोपीस केलेलं त्यांनाही आवडलं नसतं. काही पत्र काळाशी इमान ठेवून लिहिलेली असतात. काळ बदलतो, काळ सोकावतो, परिस्थितीचे संदर्भ बदलल्यावरही पत्रातील विचारांची उंची कमी होत नाही. समाज थिटा पडतो. तेव्हा विचारांची उंचीच कामाला येते.

      October 9, 2018


  • अजूनही जीवंत आहे माणुसकी…!!!

    भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
    पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे.

      March 17, 2011


  • अभ्यासक्रमातील प्राधान्यक्रम..

    जीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली.

      June 4, 2024


  • दामू, साने गुरुजींचा धडपडणारा मुलगा’ – पुस्तक परिचय

    हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८  मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू  लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”,  म्हणजेच साने गुरुजींचा दामू !  ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’  हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच  होते.

      November 13, 2021


  • मंतरलेले सोनेरी दिवस

    दिवस जसेजसे जुने होऊ जातात तसतसा त्यांचेवर सोन्याचा मुलामा चढू लागतो. सारेच जुने सोने असते की नाही ठाऊक नाही, पण जुने दिवस निश्चितच सोनेरी असतात हा माझा आजपर्यंतचा शाश्वत अनुभव आहे.

      June 4, 2022


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ३

    योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
    सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥

    आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत.

    योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने या सर्व योगांचा आनंद तीच प्रदान करते. रिपुक्षयकरी- रिपू अर्थात शत्रूंचा नाश करणारी. शास्त्रात आळसालाच शरीरातील सगळ्यात मोठा शत्रू म्हटले आहे. अन्न भक्षणातून उत्साह येतो. आळस निघून जातो. पर्यायाने या महाशत्रूचा ती विनाश करते. धर्मैकनिष्ठाकरी- धर्मावर साधकाची अविचल एक निष्ठा निर्माण करणारी.

    चन्द्रार्कानलभासमानलहरी- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजे अग्नी, त्यांची भा म्हणजे तेज. त्याच्या समान जिच्या तेजो मंडळातील लहरी आहेत अशी.

    त्रैलोक्यरक्षाकरी- स्वर्ग मृत्यु आणि पाताळ या तीनही लोकांचे रक्षण करणारी.

    सर्वैश्वर्यकरी- साधकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणारी.

    तप:फलकरी - त्यांच्या तपाचे फळ प्रदान करणारी. काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्ण! मला ज्ञान भक्ती वैराग्य रूपी भिक्षा प्रदान कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      February 29, 2020


  • श्रीबुद्धी नवरात्रोत्सव

    अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
    भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात.

      September 29, 2019


  • श्री श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४

    भगवंताच्या प्रत्येक आयुधाला एक स्वतंत्र आणि सुंदर नाव आहे. पहिल्या श्लोकात पांचजन्य नावाच्या शंखाचे, दुसऱ्या श्लोकात सुदर्शन नावाच्या चक्राचे, तिसऱ्या श्लोकात शार्ङ् नावाच्या धनुष्याचे वर्णन केल्यानंतर इथे भगवंताच्या नंदक नावाच्या खड्ग म्हणजे तलवारीचे वर्णन करीत आहेत. त्याचे गुण वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात,

      December 7, 2020