अक्कलकोट मध्ये ४२ एकरांच्या जागेवर साकारला जातोय भव्य अनुभुती प्रकल्प
श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य होते.
तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोग्य सेवा, पर्यटन असा विविध अंगांनी विकास करणे हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे ४२एकरांच्याजागेवरभव्यअसाअनुभुतीप्रकल्प साकारण्यात येत आहे.
अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामीसमर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली १०८ फुटी भव्य मूर्ती (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार असून त्यासोबत दिव्य दर्शन, बहूउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे.
या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांची असून त्यासाठी त्यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे २५० कोटीहून जास्त मुल्याची ४२ एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे. आता सर्व स्वामीभक्तांचा स्वामीसेवा स्वरुपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा रहात आहे.
सुयोग्य प्रकाश योजना, दिशा दर्शक फलक, भाविकांना मनःशांती प्रदान करणारे भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि फुलझाडांदे नक्षत्रवन हे देखील या प्रकल्पाचे आकर्षण ठरणार आहे. तज्ज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागीरांच्या कलाविष्कारातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात आपला वेगळा ठसा उमटविणारा ठरणार आहे.
या प्रकल्पाव्दारे पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देण्यात येणार असून अक्कलकोटच्या राजघराण्याची झलक देखील यातून मिळणार आहे.
प्रकल्पाची विस्तृत माहिती:
ब्रह्मस्थान (स्ट्याचूऑफमिरॅकल) ह्या नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फुटी पंचधातूमधील मूर्ती उभारण्यात येणार आहे. येथे चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थाचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभुती देणारे असणार आहे. सदर १०८ फुटी मूर्तीच्या खाली २२ फुटी कमळ आहे. त्या कमळाच्या खाली भाविकांसाठी ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र असणार आहे.
दिव्यदर्शन :- दिव्य दर्शनमधील १८ दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थाच्या जीवन चरित्राचा आस्वाद घेता येणार आहे. येथील प्रत्येक शिल्पामधून भाविक आणि पर्यटकांना एक आगळावेगळा अनुभव मिळणार आहे.
बहूउद्देशीयरुग्णालय :- अनुभूती प्रकल्पामधील येणाऱ्या उत्पन्नातून बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याद्वारे अक्कलकोटच्या राजघराण्याची समाजप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त होत आहे. हे बहूउद्देशीय रुग्णालय अक्कोलकोटवासीयांच्या सेवेसाठी नि शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्रशस्त पार्किंग :- प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंगसाठी ५०० कार, बसेस आणिक इतर वाहने उभी करण्यासाठी वृक्षेच्या छायेखाली जागा उपलब्ध करून देणार आहे. हे पार्किंग वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण १०० मीटर अंतरावर आहे.
पार्किंग परिसरात अग्निशामक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे.
फूडकोर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीच्या परिसरात असलेल्या फूड कोर्टमध्ये महाराष्ट्रातील विविध विभाग आणि जिल्ह्यांमधील तसेच भारतातील विविध राज्यांमधील आणि जगातील प्रमुख देशांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळी उपहारगृहे उभारण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटकांना अक्ललकोट येथे आकर्षित करण्यात येणार आहे. अक्कलकोट आणि परिसरातील जनतेसाठीसुद्धा ही एक खाद्य अनुभूती असणार आहे.
लाईट आणि साऊंड शो :- प्रकाश, ध्वनी आणि जलाचा मनोहारी सांगीतिक आविष्कार असलेल्या या विभागातून पर्यटकांना अतिउच्च आनंदाचा अनुभव मिळणार आहे.
प्रसादम् :- या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रसादम् विभागात सात्विक प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
कुंजरबन :- शाही हत्तींच्या मुक्त संचारासाठी हे वनरुपी परिपूर्ण निवासस्थान असेल.
पंचकर्मारिसॉर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या १०८ फुटी मूर्ती समोर आणि स्वामींच्या सानिध्यात १८ वैशिष्टयपूर्ण बंगल्याचे रिसॉर्ट देखील उभारण्यात येणार आहे. भारतातील तसेच परदेशी पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म यासाठीच्या उच्च दर्जाच्या सुविधा देणारे हे रिसॉर्ट अक्लकोट परिसरातील पर्यटनाला चालना देणार आहे.
स्टुडिओअपार्टमेंट :- देशभरातून आणि जगभरातून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार वास्तव्याची सोय करण्यासाठी विविध सोयी सुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट बांधण्यात येणार असून या निवासस्थानात अतिथींना सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
या संपूर्ण प्रकल्पाची माहिती www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.