वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भे’ट देणे’ म्हणजे आपण कुठल्या तरी स्थळाला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला भेटायला जाणे असा एक अर्थ आहे आणि ‘भेट देणे’ म्हणजे आपण कुणाला तरी वस्तूरूपाने, पैशाच्या रूपाने वा इतर दृष्टीने काहीतरी ‘नजराणा’ ‘म्हणजे ‘भेट’ देतो. ही ‘भेट’ देण्यासाठी काहीतरी प्रयोजन असते. कारण असते. एखादा सण उत्सव आणि उल्लेखनीय दिवस… काहीही असते.
August 30, 2024
आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी.
August 25, 2022
मृत्यूनंतर जसे अवयवदान केले जाते तसेच जिवंतपणी यकृतदान, किडनीदान, गर्भाशयाचे दान केले जाऊ शकते.
November 27, 2021
जड पाणी हे नेहमीच्या पाण्याप्रमाणेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या अणूंचं संयुग आहे. साध्या पाण्यातील हायड्रोजनच्या अणूंमध्ये न्यूट्रॉनचा अभाव असतो. पण जड पाणी घडविणाऱ्या हायड्रोजनच्या अणूंमध्ये प्रोटॉनच्या जोडीला एक न्यूट्रॉनही असतो.
August 9, 2023
गोष्ट १५ वर्षांपूर्वीची असेन कदाचित पण वार शुक्रवार होता हे नक्की. नांदेडला दर शुक्रवारी ज्योती टॉकीज जवळ बाजार भरतो. आठवडी बाजाराची ओढ प्रत्येक शेतकऱ्याला तेवढीच असते जेवढी नोकरमान्याला महिन्याच्या पगारीची !. मी आणि माझ्या मोठ्या भावाने ४ दिवसापासूनच शुक्रवारच्या बाजाराची प्लांनिंग सुरु केली होती. प्लॅन असा होता - " गुरुवारी संध्याकाळीच भोपळे तोडून दोन पोती भरून ठेवायची आणि शुक्रवारी भल्या पहाटे नांदेडला जाऊन विकायची ".
ठरल्याप्रमाणे शुक्रवार उजडला , भोपळे एवढे वजनाने जाड असतात की सांगू नका त्यामुळे दोन पोते ठेवल्यावर आमची जुनी ऍटलास सायकल थरथर कापायला लागली. तिच्यावर बसणं तर सोडा नुसतं ढकलणं अवघड जात होत. बाजार ठिकाणापासून माझं गावं ३० किलोमीटर अंतरांवर. एवढं अंतर चालत जाणं आणि ते पण भोपळ्याने लादलेली सायकल ढकलतं, हे महा कठीण काम तेंव्हा माझ्यासाठी फक्त " बाँये हात का काम था ". कारण चार दिवसापासून मी फक्त कामाचीच प्लॅनिंग करत नव्हतो तर त्यातून मिळणाऱ्या पैशाचं काय-काय करायचं हे पण ठरवत होतो.
आमचा प्रवास सुरु झाला एकदाचा. कॅनॉल मार्गे निघालो.वाटलं शॉर्टकट आहे. सिडको पर्यंत आल्यावर थकवा जाणवत होता. कधी मी हॅन्डल धरून सायकलला रास्ता दाखवायचो कधी माझा मोठा भाऊ. थोडासा चढ आला कि धक्का द्यायला मी तर चड्डी सावरून तयारच होतो. गप्पा करत करत आम्ही निघालो. कच्चा रस्ता संपून डांबर रोड लागला. सिडकोला माझ्या दूरच्या आत्याच्या मुली शिकायला होत्या. एवढ्या मोठ्या सिडकोत मला त्यांच्याच येण्याची भीती वाटत होती. सिडको कधी जाईन आणि कधी लातूर फाटा येईन असं वाटत होत. मी नुसती सायकल ढकलत नव्हतो तर त्याच बरोबर मनातल्या मनात भोपळे विकून किती पैसे येतील याचा हिशोब पण लावत होतो. जर किलोने गेले तर जास्त येतील आणि नगाणे गेली तर कमी येतील. दोन पोत्याचे अंदाजे माझ्या हिशोबाने कमीत कमी २०० ते २५० रुपये येणार म्हणजे येणारच.
शेवटी पोहोचलो एकदाच बाजाराच्या तोंडाला. पोती सायकलवरून उतरवली. मी आणि माझा भाऊ इकडं तिकडं डोळे वासून पाहायला लागलो. नवीन जनावरांना बघून आमचं गायीचं वासरू कस करत तस आमचं व्हायला लागलं. जिकडं पाहावं तिकडं भाज्यांचं भाज्या. मी मनातल्या मनात म्हणालो , " इच्या मायला एवढ्या भाज्या असताना आमचे धोंड्या सारखी जड भोपळी कोण खाईल?'. आता माझा हिशोब खाली खाली येऊ लागला.
आमचे चुलत भाऊजी पण भाजीपाला विकायचे त्यावेळी. ते आमच्या अगोदरच बाजारात जागा धरून बसले होते. त्यांच्या भाज्यांच्या बाजूला आमच्या भोपळ्यानां थोडी जागा मिळाली एकदाची. भाऊ आणि भाऊजी भाज्यांच्या भावा बद्दल चर्चा करू लागले. तेवढ्यात दोन जाडजूड बायका , रंगबिरंगी पिशव्या घेऊन माझ्या समोर आल्या आणि भाव विचारू लागल्या. त्यांनी भाउजीने आणलेल्या भेंडी आणि कोथिंबीर बद्दल विचारलं , मह्या भोपळ्याकडे बघितलं पण नाही. एक भोपळा २ रुपयाला मागताना गिऱ्हाईकाला अजिबात लाज वाटत न्हवती. बाजारच रूप बघून आणि गिऱ्हाईकांची स्टाईल बघून माझे पाय जमिनीवर आले आणि माझा टोटल हिशोब ५० रुपयांच्या खाली आला.
भावाने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि त्याला समजलं मला काय झालाय ते. त्याने न विचारता बाजूच्या हॉटेलातून एक ३ रुपयांची कचोरी आणून मला खायायला दिली . माझी कचोरी खाऊन झाल्यावर भाऊ म्हटला , " हे ५ रुपये घे आणि सिडको पर्यंत ऑटो नि जा नंतर मग कॅनॉल चा रस्ता धरून आलं तस पायी जा ".
मी जड अंतकरणाने घराकडे निघालो. माझा विश्वासच उडाला या सगळ्यावरून. जग मोठं असत हे कळलं पण त्याच बरोबर शेतकऱ्याचं स्वप्न किती लहान असत हे पण पहिल्यांदा जाणवलं. या बाजारात माझ्यासारखा लहान मुलगा टिकू शकणार नाही हे माझ्या भावाला माहित होत म्हणून त्यानं मला दिवसभर उन्हात उभं नाही केलं. दिवसभर काय झालं आणि किती पैसे आले याचा हिशोब मी माझ्या मोठ्या भावाला विचारला नाही , कारण त्या हिशोबाची पुरेपूर जाणीव मला होती.
June 3, 2017
15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो.
January 13, 2023
बऱ्याच वेळेला पेपरचं पान उघडलं की कोणाच्या तरी अचानक मृत्यूची बातमी आपलं लक्ष वेधून घेते. इतक्या लहान वयात असं कसं झालं? नुकतंच लग्न झालं होतं. लहान मुलं देखील आहेत, आता त्यांचं कसं होणार? यासारख्या विचारांनी त्याच्या कुटुंबियांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात एक सहानुभूतीची भावना निर्माण होते. त्याच्या जागी आपणही असू शकतो या जाणिवेने एक थंड शिरशिरी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला अक्षरशः थिजवून जाते. एखाद्या दिवशी ऑफिसला गेल्यानंतर घरी परत येऊ का? असा अपशकुनी विचारही मनात येऊन जातो. नेमका काय हा प्रकार आहे?
June 2, 2019
श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे.
December 13, 2025
अतिपोषण हा आपल्या देशात नवीन, पण वाढती समस्या झाली आहे. अतिपोषण हेसुद्धा एक प्रकारचे कुपोषण आहे.
September 1, 2021

ज्वालामुखीच्या उद्रेकात बाहेर पडणारा शिलारस अत्यंत तप्त असतो. वितळलेल्या खडकांपासून तयार झालेल्या या शिलारसाचं तापमान बाराशे अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. हा अतितप्त शिलारस जळाऊ पदार्थांना सहजपणे आगी लावू शकतो. पण आश्चर्य म्हणजे, आता याच शिलारसाचा अग्निरोधक लेप म्हणून उपयोग करता येणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. कारण इतर पदार्थांना आगी लावणारा शिलारस स्वतः मात्र जळत नाही. ऑस्ट्रेलिआतील ‘सेंटर फॉर फ्युचर मटेरिअल्स’ या संस्थेतील पिंगान साँग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं, या अभिनव अग्निरोधकावरचं हे संशोधन ‘मॅटर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.
June 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti