वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जय देवा जय देवा जय मोहिनी देवा
शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।।
समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली
सर्व देवांना ती तु अर्पण केली ।
अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला
वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।।
रुप बदलून राहू देवासह आला
नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला
नजरेतुन तुझ्या तो नाही सुटला
सुदर्शन चक्रे त्याचा निप्पात केला ।।
शरण येऊनी तुजला भक्ती जे करती
सुखी ठेऊनी त्यांना मुक्ती तु देशी ।
भक्त रक्षिणीया तू धावुनीया आला
नेवासे नगरी तू ऊभा ठाकला ।।
सुरेश काळे
सातारा.
July 26, 2018
सुरेश भटांच्या या शब्दांना कौशल श्री इनामदारने संगीत दिलं आहे. हे गीत प्रचंड मोठ्या प्रमाणात, म्हणजे १२० प्रस्थापीत गायक, ३५० समूहगायक आणि १०० वादक यांच्या ताफ्यात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.
March 25, 2010
सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये पंचगिरी करणारे डेविड शेफर्ड आणि ‘विक्रमी’ पंच
December 21, 2010
युद्ध अटीतटीचें झालें. बाजीरावानें जातीनें घोड्यावरून युद्ध केलें, तर त्रिंबकरावानें हत्तीवरून लढाई केली. सूर्योदयापासून तिसऱ्या प्रहरापर्यंत मोठ्या शिकस्तीने त्रिंबकराव लढला. हत्तीवरचा माहूत पडल्यावर, पायानें हत्ती चालवून त्यानें तिरंदाजी केली. तिरंदाजी करतां करतां त्याच्या बोटाची सालें गेली. पेशव्याकडचे पुष्कळ सैनिक त्यानें मारले.
January 28, 2022
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे.
एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले.
सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले, "दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?"
लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला," अरे तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे.पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो.''
दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो....
December 25, 2015
नेपाळ एकमेव हिंदू राष्ट्र आहे आणि विशेषकरून आयएसआय आणि चीन या राष्ट्रावर नजर ठेवून आहेत. नेपाळमध्ये सध्याचे सरकार धर्मनिरपेक्ष पद्धतीने काम करीत आहे. ख्रिश्चन व मुस्लिम समाज आपला धर्म व संस्कृतीचा नेपाळमध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी व तिथे आयएसआय सक्रिय आहे.
May 2, 2014
कोण होतास तू, काय झालास तू?’ हे चित्रपटगीत एकेकाळी खूप गाजले होते. आजही त्या गीताचे बोल कानाला सुखावून जातात आणि मनाला विचार करायला भाग पाडतात.
September 9, 2007

२५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी जाहीर झाली. वृत्तपत्रांवर सेन्सॉरशीप आली. कोणतीही बातमी, लेख छापण्याच्या आधी तो मजकूर माहिती खात्याच्या अधिकाऱ्यांना दाखवून मंजूर करून घेणे बंधनकारक झाले. जे अधिकारी वृत्तपत्रात सरकारचे लेख छापून यावेत म्हणून संपादकांच्या मागे पुढे अजिजी करायचे त्यांच्याकडेच जाऊन संपादकांना आपण उद्या जे काही छापणार आहोत ते तपासून घेण्याची वेळ आली. त्यामुळे वृत्तपत्रसृष्टीत त्यावेळी मोठा असंतोष निर्माण झाला. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या गळचेपीला विरोध कसा करायचा यावर संपादक आणि वृत्तपत्र मालकांमध्ये सखोल विचारमंथन झाले. त्यातून वेगवेगळे पर्याय समोर आले. वृत्तपत्रातील सर्वात महत्त्वाचे पान मानले जाते ते म्हणजे संपादकीय पान. त्या पानावर संपादकीय व विविध विषयांवर मते मांडणारे लेख व स्तंभ प्रकाशित होतात. त्या पानातून संबंधित वृत्तपत्राची विचारसरणी आणि भूमिका स्पष्ट होत असते.
आणीबाणी लागू झाल्यावर या संपादकीय पानांतून वृत्तपत्रांचे खरे स्वरूप स्पष्ट होऊ लागले. काही वृत्तपत्रांनी माध्यमांची ही मुस्कटदाबी निमूटपणे मान्य केली.कारण त्यांना त्यांचे वृत्तपत्र चालवायचे होते, त्यांच्या कर्मचाऱ्यांचे जीवन त्यावर अवलंबून होते. मात्र इंडियन एक्सप्रेस, स्टेट्समन, मराठवाडा यासारख्या काही मोजक्या दैनिकांनी अग्रलेखाची जागा कोरी सोडून बाणेदारपणा दाखविला. आमच्या विचारांवर तुम्ही बंधने घातली म्हणून आम्ही आमचे विचार ज्या जागेवर मांडतो ती जागाच कोरी सोडत आहोत अशी ती अव्यक्त निषेधाची भूमिका होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. हा एकच प्रसंग वृत्तपत्रांच्या आयुष्यात ‘अग्रेलखा’ चे महत्त्व किती आहे सांगण्यास पुरेसा ठरावा. या अनोख्या निषेधाची नोंद जगाने घेतली. अग्रलेखाची ती कोरी जागा, आणीबाणीच्या विरोधातील जनतेच्या मनातील आक्रोशाची अभिव्यक्ती ठरली.
July 3, 2025
लीलालब्धस्थापितलुप्ताखिललोकां
लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् ।
बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां
गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ १॥
आई जगदंबेच्या शुद्ध सात्विक स्वरूपाला गौरी असे म्हणतात. तिचा गौरवर्ण तिच्या सात्विकतेचे ,शुद्धतेचे, पावित्र्याचे प्रतीक आहे.
या आई जगदंबेचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
लीलालब्धस्थापित
लुप्ताखिललोकां- भगवान ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी म्हणजे कल्पांती ही चवदा भुवनात्मक सृष्टी विलोप पावते. पुन्हा नवीन कल्पात अर्थात श्री ब्रह्मदेवांच्या नवीन दिवसाच्या आरंभी जिच्या सहज लीलेने हे सर्व लोक हे लुप्त झालेले लोक जणू पुन्हा सापडल्यासारखे आपापल्या जागी स्थिर होतात अशी.
लोकातीतैर्योगिभिरन्तश्चिरमृग्याम् - लोकातीत अर्थात सामान्यजनांच्या पेक्षा अधिक श्रेष्ठ असलेले योगी लोक अंतकरणात सतत जिचा शोध घेतात, अर्थात सतत जिचे चिंतन करीत असतात अशी.
बालादित्यश्रेणिसमानद्युतिपुञ्जां- बाल आदित्य अर्थात नुकताच उगवलेला सूर्य, त्याची श्रेणी अर्थात समूह. म्हणजे जणू काही अनंत सूर्यांचे एकत्रित स्वरूप. त्या एकत्रित तेजाप्रमाणे दैदिप्यमान अशी.
अर्थात जिचे तेज कोट्यावधी सूर्याप्रमाणे लखलखते आहे मात्र बालरवी म्हणताना त्यात अपेक्षित आहे, की जरी असे कोट्यावधी सूर्याचे तेज असले तरी ते दाहक नाही. भीषण नाही. उलट प्रभातीच्या सूर्याप्रमाणे ते आल्हाददायक आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याला प्रेरणादायी आहे. जसा सूर्य उगवला की माणूस कामाला लागतो तसे आई जगदंबेचे दर्शन त्याला कर्तव्यरत करते.
गौरीममम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - गौरी अर्थात गौरवर्णाची असलेली, अंबा म्हणजे जगदंबा, अंबुरुहाक्षी म्हणजे कमळाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबेचे स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 28, 2020
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो.
मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते.
"अस्सं वाग, अस्स कर. अस्स करू नकोस, तू ना, आमची अगदी इज्जतच काढणार आहेस." वगैरे वगैरे.
आणि मुलींनाच जास्त ओरडा खावा लागतो. तेव्हा आई हा प्राणी तिचा जगातला एक नंबरचा शत्रू असतो.
" तू सारखं सारखं तेच तेच तेच तेच सांगत राहू नकोस, झाली कटकट सुरू, तू मला सांगतेस, त्या दाद्याला का सांगत नाहीस, सगळ्या चुका काय माझ्याच असतात काय,"
आणि हे भांडण शेवटी...
" मी मुलगी आहे, म्हणून काहीही ऐकून घ्यायचं काय ? "
या वाक्यावर येऊन थांबत असतं.
प्रत्येक घरात अगदी हे असंच चाललेलं असतं.
हे खरं पण आहे. "मुलीवर लग्नानंतर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मी नसणार, मुलाचं काही चुकलं, तर जे काही होईल, ते माझ्या डोळ्यासमोर होईल. मुलगी म्हणजे परक्याचं धन वगैरे, मी माझ्या मुलाला कधीही बदलवू शकते" अशा सरासर खोट्या आणि भ्रामक विश्वातून आई कधीच बाहेर येत नाही.
आणि नंतर जे व्हायचं तेच होतं. जी आई कधीकाळी शत्रू नंबर वन होती, मुलीला ती लग्नानंतर मात्र सद्गुणांचा पुतळा वगैरे भासू लागते. ( मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण जे अवतीभवती दिसतं ते सांगतोय, एवढंच. )
सांगायचंय काय तर,
लग्नानंतर मुलीला, आईनं केलेले हितोपदेश आठवू लागतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईची सुरू असलेली बडबड आठवून डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागतात.
मनात म्हटलं जातं,
"तू त्यावेळी सांगितले होतेस,
तेव्हा मला तुझा राग येत होता,
जीवाचा अगदी त्रागा होत होता.
तू सांगायचीस,
उतू नये मातू नये,
घेतला वसा कधी टाकू नये.
एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
घटाघट पाणी पिऊ नये.
उगाच आरश्यात पाहू नये.
केसांना हात लावू नये.
पदार्थ उघडा ठेऊ नये.
दुधावर फुंकर घालू नये.
पिंपात तांब्या बुडवू नये.
पातेलं खरडून वाढू नये.
ताटाच्या बाहेर सांडू नये.
पंगतीत ढेकर देऊ नये.
मधेच पंगतीतून उठू नये.
शिरा ताणून बोलू नये.
उगाच वाद ओढवू नये.
शब्दाने शब्द वाढवू नये.
उंबऱ्याच्या मर्यादा विसरू नये.
माहेरचे कौतुक सांगू नये.
कुणाचे वर्म काढू नये.
वर्मावर बोट ठेऊ नये.
मोठ्यांचा मान मोडू नये
लहानाशी खेळणं सोडू नये
दुसऱ्याचे दोष पाहू नये
दिलेले दान कळू नये.
धर्मशाळेत जेवू नये.
अंथरूणातून सूर्य पाहू नये.
गादीवर जास्त लोळू नये.
आळस मोठ्ठा देऊ नये.
तोंडाचा आऽ करू नये.
पाय पसरून बसू नये.
पाचकळ बाचकळ बोलू नये.
फिदीफिदी उगा हसू नये
भोकाड मोठे पसरू नये.
हट्टीपणा बरा नव्हे.
फुकाचे बोल बोलू नये.
कर्मकांड टाकू नये.
प्रयत्न कधी सोडू नये.
मनात विकल्प आणू नये.
भूतकाळा आठवू नये.
भविष्याचा विचार करू नये.
वर्तमानाशिवाय राहू नये.
विसरू नये देवाला
विसरू नये कर्माला
विसरू नये संस्काराला
विसरू नये राष्ट्राला
पण आता हे पटायला लागलंय,
तू सांगत होतीस, ते बरोबर असं आता वाटायला लागलंय.
तू मला तेव्हापासून बडवत होतीस,
ताईला नाही तर एका आईला घडवत होतीस.
तुझा एकेक शब्द आता मला आठवू लागलाय.
माझ्या मुलीच्या कानात तो रोज जाऊ लागलाय.
माझ्या मुलीबरोबर तेच भांडण मी करायला लागलीय.
तुझ्या नातीला आता मी तेच सांगायला लागलीय.
अगदी तुझा ठेका मला जमायला लागलाय.
'ह्यांना' सुद्धा तो जाणवायला लागलाय.
तू सांगितलेला प्रत्येक शब्द काळजात रुतून बसलाय.
आता माझ्या जीभेतून बाहेर येऊ लागलाय.
हितोपदेश तुझा आता आठवू लागलाय
मला "आई" बनवू लागलाय.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०८.०८.२०१७
August 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti