वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शास्त्रात संध्या करताना सूर्यास अर्घ्य देण्याचे महत्त्व विशद केले आहे. हाताच्या ओंजळीत पाणी (जल) घेऊन सूर्यासमोर तोंड करून सूर्यास जल समर्पित केले जाते. त्यालाच 'अर्घ्य' म्हटले जाते. वेदांमध्ये सूर्यास डोळ्याची उपमा दिली गेली आहे.
सूर्यात सप्तरंगी किरणे असतात. या सप्तरंगी किरणांचे प्रतिबिंब ज्या रंगात पडते तेथून ती किरणे परत येतात. केवळ काळा रंगच असा रंग आहे की ज्यातून सूर्य किरणे परत येत नाहीत.
आपल्या शरीरात विविध रंगांची विद्युत किरणे असतात. यामुळे ज्या रंगाची कमतरता आपल्या शरीरात असते त्या रंगाची किरणे सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपणास मिळतात. डोळ्यांचे बुबळे काळी असतात. तेथून सूर्यकिरण परत जात नाही. यामुळे आवश्यक असणार्या रंगांच्या किरणांची कमतरता दूर होते.
वैज्ञानिकांनी हे सिध्द केले आहे की सूर्य किरणांचा प्रभाव पाण्यावर लवकर पडतो. यामुळे सूर्यास पाण्याचे अर्घ्य दिले जाते. सूर्य म्हणजे आकाशात बसलेला डॉक्टर आहे. सूर्याच्या सप्तरंगी किरणांमध्ये अदभूत रोगनाशक शक्ती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सूर्य किरणांमध्ये औषधी गुणधर्म भरपूर आहेत. सूर्यकिरण अनेक रोग उत्पादक विषाणूंचा नाश करतो. टिबीचे विषाणू उकळणार्या पाण्यात मरत नाहीत. पण सूर्यकिरणांनी त्वरीत नष्ट होतात. यावरूनच सूर्य किरणांमुळे कोणतेही विषाणू नष्ट होण्याबाबत शंकाच असू नये.
मानवाला निरोगी राहण्यासाठी जितकी शुध्द हवा आवश्यक आहे, तितकाच सूर्यप्रकाशही आवश्यक आहे. या प्रकाशाने मानवाच्या शरीरातील कमजोर असलेले अंग पुन्हा सशक्त आणि सक्रीय होते.
सूर्य किरणात प्रसन्नता-अप्रसन्नतेचे अणूही असतात. त्रिकाल संध्येचा संबंध सूर्याशी आहे. मुख्य संध्या म्हणजे सावित्री जप आहे. सावित्री सविताच्या अर्थात सूर्याच्या ऋचांचे नाव आहे. यामुळे संध्योपासना करताना सविताचे ध्यान केले जाते त्यावेळी अर्घ्य सूर्यास दिले जाते.
सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च (यजुर्वेद 7/42)। या मंत्राला सूर्याच्या स्थावर-जंगम पदार्थांचा आत्मा समजले जाते. जीवेत शरदः शतम् (यजुर्वेद 36/24) पासून शंभर वर्ष जगण्याची, शंभर वर्ष बोलण्याची आणि ऐकण्याची प्रार्थना सुध्दा सूर्यालाच केली जाते.
एका अमेरिकी शास्त्रज्ञाने म्हटले आहे, की जर सूर्यापासून मिळणारा उब आमच्यात सुरक्षित रहात असेल तर आम्ही चारशे वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. ही उब आपणास सूर्याकडून प्राप्त होते. सूर्य नसताना सर्व जीवसृष्टी नष्ट होते. सूर्यप्रकाशाचा संबंध केवळ ऊष्णतेशी नाही. त्याचा मानवाच्या आहाराशीसुध्दा आहे. वनस्पतींची पाने सूर्यकिरणांच्या माध्यमातून क्लोरोफिल नावाचा घटक निर्माण करतात. या घटकाविना पानात नैसर्गिक हिरवेपणा राहू शकत नाही. आपण दैनंदिन आहारात नेहमी हिरव्या भाज्यांचा समावेश करतो. या भाज्यांमध्येच मानवाच्या शरीरास आवश्यक पोषक घटक असतात. यामुळेच सूर्यप्रकाश मानवी जीवनासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रुपाने आवश्यक आहे.
January 19, 2017
स्वर्ग जिंकलेला मायाकर पाताळात गेला. या भीषण संकटाच्या वेळी पूर्वी केलेल्या तपाच्या आधारे श्री शेषांनी प्रार्थना केल्यावर भगवान त्यांच्या मनातून श्रीशेषात्मज रूपात प्रकट झाले.
September 6, 2019
सध्या सोनी चॅनलवर हिंदी इंडियन आयडाॅल सुरु आहे.याचा उच्चार उच्चभ्रू (स्वत:ला समजणारे !) लोक आयडल ( म्हणजे निष्क्रिय! ) असा का करतात हे एक न सुटणारे कोडे ! असो…..
February 27, 2024
Concord म्हणजे सामंजस्य, मान्यता. ब्रिटन व फ्रांस यांच्यात करार होऊन Supersonic विमानांची निर्मिती करण्याचे ठरले. विमानाला नाव देताना ‘e’ जोडला गेला Concord च्या पुढे. म्हणून ‘Concorde’ असे त्याचे बारसे झाले.
September 25, 2019
दिव्यात वात, तोंडात हात अशी आमच्या मालवणी भाषेत एक म्हण आहे.
याचा अर्थ असा आहे की, जेव्हा दिवेलागणीची वेळ होते, तेव्हा हात तोंडाकडे, तोंडात जावा.
अगदी शब्दशः अर्थ लावू नका हो.
August 8, 2016
परंपरेने गणेशाचं हे लोकप्रिय सगुणस्वरूप फार श्रद्धेनं जपलेलं आहे. असं असलं तरी गणपतीपूजनाला खरा राजाश्रय लाभला, तो पेशवे अधिकारपदावर आल्यावर. पेशवे गाणपत्य असल्याने त्यांनी आणि त्यांच्या सरदारांनी गावोगाव असलेल्या गणपतीच्या देवळांचं वैभव वृद्धिंगत केलं. अष्टविनायकांच्या स्थानांना प्रतिष्ठा आली. असंच एक पुरातन स्थान आहे कर्जत तालुक्यातल्या ‘कडाव’ला. इथल्या बालदिगंबर गणेशाचे देऊळ फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे.
September 9, 2019
अजय – अतुलचे संगीत, गुरू ठाकूर यांचे संवाद व गीतलेखन, झी मराठीची सहनिर्मिती आणि रवी जाधव यांचं दिग्दर्शकीय पदार्पण व रवी जाधव, अतुल कुलकर्णी, किशोर कदम, सोनाली कुलकर्णी (ज्युनियर) यांचा अभिनय या सगळ्याचा सहभाग असल्याने हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला.
January 1, 2022
ह्रींकारमॆव तव नाम तदॆव रूपं
त्वन्नाम दुर्लभमिह त्रिपुरॆ गृणन्ति ।
त्वत्तॆजसा परिणतं वियदादिभूतं
सौख्यं तनॊति सरसीरुहसंभवादॆः ॥ १५ ॥
जगातील कोणत्याही गोष्टीला जाणून घेण्याचे दोन महत्त्वाचे मार्ग म्हणजे नाम आणि रूप. या दोन्ही गोष्टी परस्परांशी अभिन्नरीत्या संलग्न असतात. एखादी नवीन गोष्ट पाहिली तिचे नाव काय? हा पहिला प्रश्न समोर येतो. तर एखाद्या नवीन गोष्टीबद्दल ऐकले तर ती कशी दिसते? याची उत्सुकता असते.अशा स्वरूपात प्रत्येक गोष्ट नाम आणि रूपाच्या आधारे जाणून घेता येते.
सामान्य गोष्टींच्या बाबतीत यांचे नाम आणि रूप वेगवेगळे असते. मात्र आई जगदंबेचे वैभव सांगताना आचार्यश्री म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम तदॆव रूपं- ह्रीं कार हेच तुझे नाव आहे आणि तेच तुझे रूपही आहे. अर्थात या बीज मंत्राने तुला हाक मारता येते म्हणून ते तुझे नाव आहे तर श्री यंत्राच्या सगळ्यात वरच्या त्रिकोणावर हे बीज स्थिर असल्याने ती सर्वोच्चताच भगवतीचे रूप आहे. अर्थात तिचे हे सर्वोच्चत्वच तिचे स्वरूप आहे.
त्वन्नाम दुर्लभमिह त्रिपुरॆ गृणन्ति- याच अर्थाने, हे त्रिपुरसुंदरी ! तुझे नाव दुर्लभ असल्याचे म्हटले जाते. जगातील कोणती भौतिक दृष्ट्या सर्वोच्च गोष्ट देखील सहज प्राप्त नसते मग जगदंबे चे नाव कसे असेल? अनेकांना ते घ्यावेच वाटत नाही हेच त्याचे दुर्लभ स्वरूप आहे.
त्वत्तॆजसा परिणतं वियदादिभूतं- आई तुझ्याच तेजाने आकाश इ. महाभूते प्रकाशित होत असतात. त्यांना शक्ती प्राप्त होत असते.
सरसीरुहसंभवादॆः- सरसीरुह म्हणजे कमळामध्ये संभव म्हणजे जन्माला आलेले, श्री ब्रह्मदेव. इत्यादी म्हणजे बाकी सर्व देव.
सौख्यं तनॊति - सुख प्राप्त करतात.
अर्थात या सगळ्यांना तुझ्याच कृपेने सुख प्राप्त होते.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 26, 2020
भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात…
October 25, 2020
आज एक चविष्ट विषयाला हात घातलाय. आता याचं काही विशेष वाटत नाही म्हणा, पण माझ्या लहानपणी म्हणजे १९६५-६६ मध्ये उपहारगृहात जाणं तसं विशेषच होतं. एक तर जेवायला, म्हणजे आजच्या भाषेत lunch अथवा dinner घ्यायला सर्वसामान्य घरातलं कुणी जात नव्हतं. महिन्या दोन महिन्यातून एकदा जाणं व्हायचं, ते ही अल्पोपहारासाठी. मला मात्र आमचे तात्या अधून मधून घेऊन जायचे उपहारगृहात. दादरमध्ये माझ्या आवडीची दोन उपहारगृह होती. त्यातलं एक उडीपी होतं.
July 27, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti