वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मांसाहार करण्याची संयुक्तिक कारणे आणि समर्थन कितीही केले तरी ते लंगडेच होईल. कितीही शोधून काढा, माणसासाठी दररोज मांसाहार करणे हा कदापि आरोग्यदायी होणार नाही.
आपली गाडी जर पेट्रोलवर चालणारी असेल, तर ती गाडी डिझेल किंवा राॅकेलवर चालेल का ?
चालेलही.
पण किती दिवस ? आणि चालवली तरीही आतमधे काहीतरी, कुठेतरी दोष उत्पन्न होणारच ना !
अगदी हाच नियम वापरून बघा, जर माणसाचे शरीर निसर्गाने शाकाहाराला पूरक केले असेल तर त्यातील केवळ इंधन बदलले तर गाडीचे अॅव्हरेज वाढेल का ?
कधीही नाही.
शाकाहारी प्राण्यांची रचना आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळीच आहेत. ती मान्य करणे यातच जास्त शहाणपणा आहे.
काही व्यक्ती रोज मांसाहार करतात. काही आठवड्यातून ठराविक दिवस. तर काही जण महिन्यातून ठराविक दिवस.
पण ही मंडळी फक्त मांसाहारच करतात का ? नाही.
मांसाहाराबरोबर शाकाहार तर घेतच असतात. नव्हे तो घ्यावाच लागतो.
मांसाहारी कुटुंबात जन्म झाल्यामुळे मांसाहारी सवय लागतेच. पण त्यामुळे काय खातोय, कसं खातोय, कशासाठी खातोय, परिणाम काय होणार आहेत, यावर चिंतन अजिबात होत नाही. करू शकत नाही. जशा परंपरा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पुढे सुरू रहातात. यालाच अंधानुकरण म्हणतात. संस्कार एवढे पक्के होतात, की मांसाहाराचे दुष्परीणाम समजूनही मांसाहार सोडता येत नाही. जणु काही त्याचे व्यसनच लागते. मग घरातले पुरत नाही, रवि बुध लवकर येत नाही तेव्हा बाहेरील हाॅटेलिंग सुरू होते. खाल्लेले मांस सहजपणे पचत नाही म्हणून त्यासाठी पुनः मद्य सेवनाचा दोष.
एका दोषातून बाहेर पडण्यासाठी पुनः दुसरा दोष निर्माण केल्यासारखंच नाही का ?
म्हणजे एका उष्ण औषधाचे ऊष्ण परिणाम (म्हणजे अॅसिडीटी) दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे थंड औषध ( म्हणजे अॅण्टासिड .) याचा तिसरा दुष्परिणाम मलविबंध (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन ) यावरील औषधांनी आतड्यांचा फ्लोरा डिस्टर्ब होतो, म्हणून आणखी एक औषध. त्याने काही व्हिटामिन्स कमी होतात, म्हणून आणखी एक औषध. म्हणजे एक गुन्हा लपवण्यासाठी आणखी एक गुन्हा !
मग काय,
जगण्यासाठी चौदा पंधरा प्रकारची औषधे सुरू होतात.
आजन्म !
मरे पर्यंत !!
Until death !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
8.10.2016
October 8, 2016
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘बॅड पॅच’ येतो. शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात, करीयर मध्ये काहीतरी बिघडतं, नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं, व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो, पैशांची बिकट वाट लागते… नड येते ….. आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!
March 10, 2019
माझं आजोळ लालबागचं. सुरुवातीची मुंबई कोकणातून उतरली ती भाऊच्या धक्क्यावर आणि मुंबैची नंतरची पिढी जन्मली ती परळच्या वाडीयात. माझा जन्मही वाडीयाचाच. पुढं जे काही लालबाग आणि लालबागेतल्या सणांचं वर्णन केलंय, ते माझ्या लहानपणी आई-मामाचं बोट धरून फिरताना मला त्यावेळी जे दिसलं आणि त्या वयात मला त्याचं जे आकलन झालं, तसंच लिहायचा प्रयत्न केलाय. आता हे सारं लिहीताना मी त्याच सात-आठ वर्षाच्या वयात आहे असं समजून लिहीलंय.
September 4, 2017
बॉडीलाईनचे औषध इंग्लंडलाच पाजणार्या मॅनी मार्टिन्डेलचा जन्म आणि अष्टपैलू इम्रान खान
November 21, 2010
हन्तॆतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ
भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु ।
त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि
त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव ॥ ९ ॥
आई जगदंबेच्या एकमेवाद्वितीय सर्वश्रेष्ठत्वाला अधोरेखित करताना आचार्य श्री म्हणतात,
हन्त- अरेरे! या अर्थाचा हा उद्गार. कितीही समजावून सांगितले तरी न ऐकणाऱ्या सामान्य दीन जनांकडे पाहून आलेला हा कनवाळू उद्गार आहे.
काय समजावून सांगत होते आचार्य? काय ऐकत नव्हते सामान्य जन? तर,
इतरॆष्वपि मनांसि निधाय चान्यॆ
भक्तिं वहन्ति किल पामरदैवतॆषु - हे आई जगदंबे, हे सर्व तुला सोडून इतर सामान्य दैवतांच्या ठाई मन एकवटून उपासना करतात.
यातील पामर देवता हा शब्द मोठा चिंतनीय आहे. अन्य अनेक देवता आपल्यापेक्षा जरी श्रेष्ठ असल्या तरी त्यांना त्यांच्या स्वतःच्या मर्यादा असतात. श्रीअग्नीदेवांना फक्त जाळण्याची शक्ती आहे ते पाणी देऊ शकत नाहीत तर भगवान वरूणांना पाणी देण्याची शक्ती आहे ते काडिपेटी देणार नाहीत.
या अर्थाने या देवतांना पामर असे म्हटले आहे. जर अशा स्वरूपात या देवताच मर्यादित असतील तर त्यांच्याद्वारे मिळणारी वरदाने, कृपा अमर्याद कशा असतील? याच अर्थाने आचार्यश्री वरील कथन करीत आहेत. ते या सर्व देवतांना पामर देवता म्हणताहेत. सामान्य जन अशा दैवतांच्या मागे लागतात.
आई मला मात्र वास्तविकता कळली आहे. माझी परिस्थिती विचारशील तर,
त्वामॆव दॆवि मनसा समनुस्मरामि- हे आई मी मनाने फक्त तुझेच स्मरण करतो.
त्वामॆव नौमि शरणं जननि त्वमॆव- मी केवळ तुलाच शरण आलो आहे तूच माझी आई आहेस.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 20, 2020
द्धिमत्ता, पवित्रता, शालीनता, सौंदर्यता, कलात्मकतेचे बळ घेऊन नवे स्वप्न साकारण्यासाठी उगवत्या सूर्याकडे पाहून तुतारी फुंकणारी महिला असे कंपनीचे बोधचिन्ह अजरामर झाले. याच तुतारीच्या निनादाचे बळ घेऊन येथे अयोध्येचा राजा, गोपालकृष्ण, खुनी खंजीर, राणीसाहेब व बजरबट्ट उदयकाल, चंद्रसेना, जुलूम अशा मूकपटाची निर्मिती येथे झाली.
March 29, 2022
गेल्या साठ वर्षांपासून आपला देश अजूनही विकसनशील अवस्थेतच आहे आणि आपल्या मागे असलेले अनेक देश या शर्यतीत आपल्या खूप पुढे गेले आहेत. यामागचे मुख्य कारण आपली मानसिकता हेच आहे. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे, कोणत्या गोष्टींचा संबंध राष्ट्राभिमानाशी जोडायचा याचे आपल्याकडे काही तारतम्यच नाही.
May 11, 2008
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां,
गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम् |
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६||
आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक.
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली.
प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे.
रक्ताचा निळा रंग वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या तर निळसर रंगाच्या दिसतात.
दुसरी गोष्ट जेव्हा रक्तात प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो.
याच कारणाने फुफ्फुसापासून हृदयापर्यंत प्राणवायू युक्त रक्त नेणाऱ्या नलिकेला धमणी असे म्हणतात तर हृदयापासून फुफ्फुसा पर्यंत प्राणवायूक्षीण रक्ताला नेणाऱ्या रक्तवाहिनीला नीला असेच म्हणतात.
शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू पुरवल्यामुळे या रक्तातील प्राणवायू कमी झालेला असतो.
अशा नीलवर्णीय रक्ताप्रमाणे रंग असणारे वस्त्र जिने धारण केलेली आहेत अशी.
पूज्य आचार्यश्रींचे दर्शन किती सूक्ष्म आहे ? याचा विचार करावा.
गृहीतमधुपात्रिकां- जिने आपल्या रसग्रहणासाठी हाती मधाचे पात्र धारण केले आहे अशी. मधुविघूर्णनेत्रांचलाम् - मधू प्राशन केल्याने जडावलेले नेत्र असणारी.
घनस्तनभरोन्नतां- उन्नत आणि भरगच्च स्तनमंडल असणारी. गलितचूलिकां- आपल्याच आनंदात मान हलवल्याने वेणी,गजरा गळून पडलेली
श्यामलां- सावळ्या,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये - भगवान शंकरांची सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 7, 2020
इंटरनेट प्रसार वाढू लागला तशी त्याच्या स्पीडची गरजही वाढली. अकामाई टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड असलेले हे “टॉप टेन” देश. विशेष म्हणजे, चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेला “टॉप टेन मध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
October 11, 2013
ऑस्ट्रियाचा युवराज आर्चड्यूक फ्रॅन्झ फर्डिनांड याचा सेरेयावो, सर्बिया येथे १९१४मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हत्येने युरोपमध्ये महायुद्धाची ठिणगी उडाली आणि इच्छा नसताना विविध सामरिक करारांमुळे युरोपचे सर्व देश त्यात खेचले गेले.
November 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti