वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते.
बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. बीजाचे अंकुरण घडून आले की, त्याच जातीची वनस्पती निर्माण होते.
१) आवृतबीजी असलेले फळ : नारळ
२) अनावृतबीज असलेली फळे: सायकस
३) आवृतबीजी वनस्पती सु. २,५०,००० आहेत. या वनस्पतींना फुले येतात. फुलांतील अंडाशयापासून फळे बनतात. फळांच्या आत बीजे असतात. उदा., गवते, झुडपे, वृक्ष, महावृक्ष व वेली. सु. आठशे अनावृतबीजी वनस्पती आहेत. बहुधा अनावृतबीजी वनस्पती शंकू निर्माण करतात. उदा., सायकस, देवदार, पाईन इत्यादी.
पण त्यांतील आकार, रंग, वासाचं वैविध्य असते.. नुसत्या फुलांच्याच नव्हे तर बियांच्यामधलं वैविध्य पाहून तर मती गुंगच होईल. ह्या बियांमध्ये, त्यांच्या पोतांत, रंगांत, आकारांत असतात. जणू कांही माणिकमोतीच. आणि या बियांमधल्या पंखपऱ्यांची विविध रुपं असतात. ह्यांचे रंग पाहून कोणीही हरखून जाईल अशाच आहेत. आकार, आकारमान व संरचना अशा बाबतींत वनस्पतींच्या बियांमध्ये फरक दिसून येतो. जहरी नारळाचे बीज सर्वांत मोठे असून त्याचा व्यास सु. ३० सेंमी. व वजन सु. १८ किग्रॅ. असते. याउलट, ऑर्किडच्या सुमारे आठ लाख बीजांचे वजन जेमतेम २५-२८ ग्रॅ. भरते. प्रत्येक वनस्पतीमध्ये बीजाच्या आकारमानानुसार बीजांची संख्या ठरते. नारळाचा वृक्ष मोठ्या फळामागे एकच बीज निर्माण करतो, तर ऑर्किडसारख्या वनस्पती लहान आकारांची लाखो बीजे निर्माण करतात. मात्र वनस्पतींचा आकार आणि बीजाचा आकार यांच्यात काहीही संबंध नसतो. उदा., रेडवुड या महावृक्षाचे बीज केवळ १•६ मिमी. लांब असते.
भ्रूण: बिया पाण्यात ठेवल्यास त्या फुगतात. त्या सोलून पाहिल्यास बीजावरणाखाली असलेले वनस्पतीच्या भ्रूणाचे भाग दिसतात. भ्रूणाचे बीजपत्र, उपरिबीजपत्र, प्रांकुर (कोंब), अधोबीजपत्र आणि मूलांकुर (मोड) हे भाग असतात. गहू, बाजरी, मका इ.च्या बीजांमध्ये एक बारीक अक्ष म्हणजे भ्रूणाक्ष दिसून येतो. त्याला एकच बीजपत्र असते. एकच बीजपत्र असलेल्या वनस्पतींना ‘एकदलिकित वनस्पती’ म्हणतात. एरंड, वाटाणा, पावटा इत्यादींच्या बीजांमध्ये दोन बीजपत्रे असतात, त्या वनस्पतींना ‘द्विदलिकित वनस्पती’ म्हणतात.
अनावृतबीजी वनस्पती : बहुतेक अनावृतबीजी वनस्पतींच्या बाबतीत प्रजननाचे कार्य त्यांच्यावर वाढणारे शंकू करतात. या वनस्पतींना फुले येत नाहीत. काही वृक्षांवर नर व मादी अशा दोन्ही प्रकारचे शंकू, तर काही वृक्षांवर फक्त नर शंकू किंवा मादी शंकू असतात. प्रत्येक शंकूमध्ये खवल्यासारख्या संरचना असतात. मादी शंकूच्या प्रत्येक खवल्याच्या वरच्या पृष्ठभागावर दोन बीजांडे तयार होतात. नर शंकूच्या खवल्यापासूनही बीजाणू तयार होतात आणि या बीजाणूंपासून परागकण तयार होतात.
बीजप्रसार:
पर्यावरण अनुकूल असताना म्हणजे योग्य तापमान व पुरेशी आर्द्रता असताना देखील काही वेळा बीजे अंकुरत नाहीत, असे दिसून येते. बीजांची ही सुप्तावस्था असते. बीजांच्या सुप्तावस्थेची दोन कार्ये असतात; (१) तयार होणारे रोप जगण्यासाठी पर्यावरणाची इष्ट स्थिती असताना अंकुरण घडवून आणणे आणि (२) एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपली सर्व संतती एकाच क्षणी नाश होऊ नये यासाठी बियांचे अंकुरण टप्प्याटप्प्याने घडवून आणणे. थोडक्यात बीजांची सुप्तावस्था पर्यावरणावर अवलंबून नसून ती बीजांची अवस्था असते.
बीज प्रसार हेच खरी वनस्पतींचे वंश वृद्धी करण्यासाठी असणारी व्यवस्था आहे. त्यासाठी त्यांना आप आपल्या बीजात वैविद्धे आणून असणाऱ्या परिसराशी जुळवून घ्यावे लागते.
(१) पाण्यामार्फत: नारळ; कमळ इ.
(२) तडकल्याने : धोतरा; फुटाणी, अबोली, इ.
(३) प्राण्यांमार्फत : लांडगा; शेळी, माणूस, वटवाघूळ, खार, पक्षी इ.
(४) वाऱ्या मार्फ़त : गवत, धान्ये, ऑर्किड, व बहुसंख्य वृक्ष
आता आपण वरील प्रत्येकाची उदाहरणासहित बीज प्रसारण कसे होते ते पाहू.
(१) पाण्याद्वारे बीजप्रसारण: नारळ हे पाण्या द्वारे बीज प्रसाराचे उत्तम उदाहरण आहे. नारळाचे वृक्ष हे समुद्रकिनारी असल्यामुळे नारळ हे समुद्रात पडतात त्या ठिकाणापासून दूर वाहून नेले जातात व तेथे जाऊन रुजतात आणी बीज प्रसारण होते. तसेच कमळ, पाण लिली, हायड्रीला या सारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची बीजे पाण्याच्या लहरीं व वेगामुळे ते दूर वाहून जाऊन बीज प्रसारण होते.
(२) तडकल्याने: हवामानातील तापमानाच्या फरकामुळे बिया तडकतात. धोतरा, फुटाणी, अबोली इ. बहुतेक वृक्षांच्या लांबसडक शेंगा ह्या हवेतील उष्णतेने वाळतात
व फूटतात. त्यामुळे त्यांचे बीजप्रसारण होते. जसे कि मुरुडशिंग, गुलमोहर, बहावा, नीलमोहोर, पावटा, वाल, मटार इ.
(३) प्राण्यांमार्फत : वाघनखी, लांडगा, आघाडा, गोखरू इ. काही बीजांवर किंवा फळांवर अंकुश किंवा तीक्ष्ण काटे असतात. लांडगा अथवा शेळी, अस्वल यांच्या केसाळ त्वचेमुळे त्यात बिया अडकतात व असे प्राणी दुसऱ्या क्षेत्रात जातात व बीजप्रसार करतात. उदा. विंचू व खाजकुयलीचे बीज.
उंडी (Calophyllum) या वृक्षाचा बीजप्रसार वाटवाघुळांच्या मार्फत होतो. माणसे ज्या वेळी दाट शेतात किंवा दाट गवतात काम करतात त्यावेळी तेथे असलेल्या वनस्पतीच्या बिया त्यांच्या कपड्यावर चिकटतात व बीजप्रसार होतो. खारोटी पावसाळ्यासाठी बियांचा वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवते आणी नंतर त्या जागा विसरून जाते. यामुळे त्या बिया पावसाळ्यात रुजतात. मुंग्यादेखील बीजप्रसार करतात. ज्या बियांपासून तेल मिळते अशा बिया मऊ व मांसल असतात. मुंग्या त्यांच्या वारुळात अशा बिया वाहून नेतात, त्यातील पोषक घटक खातात व त्यांना अखाद्य असलेला बीजाचा उरलेला कठीण भाग तसाच ठेवतात. त्यांपासून वनस्पती वाढतात.
(४) पक्ष्यांमार्फत: चिमणी, खंड्या, पोपट इत्यादी पक्षी झाडांची फळे खातात व वहनही करतात. उदा. पेरू, डाळिंब असे करताना ते फळांच्या बिया खातात व काही न खाल्लेल्या बियाना चोची मारून टणक बिया मऊ करतात त्यामुळे बी उगवून यायला मदत होते.
(५) वाऱ्यामार्फत बीजप्रसार: रूई, अर्जुन वृक्षांच्याच्या बिया, काटेसावर, गवत, इ.
काही बीजे दूरवर वाऱ्यावर उडत जातात. अशा बीजांना पंख किंवा केसांचा झुपका असतो. पाईनच्या बीजांना पातळ व पापुद्र्यासारखे पंख असतात. शेवगा, कोयनेल व तामण यांच्या बीजांना पंख असतात. रुई व कापूस यांच्या बीजांच्या एका टोकाला केसांचा झुपका असतो. ऑर्किडच्या बिया धूलिकणांसारख्या हलक्या असल्याने वाऱ्यावर उडून जातात. काही बीजे फळांतच राहतात. अशा फळांना पंख असतात. उदा., साल, मधुमालती इ. ‘केंजळ’ वृक्षाचा ‘बिजोरा’ म्हणजे बियांचा गुच्छ आणि त्याचे लहानलहान पंख एकमेकांलगत असतो. एका मोठय़ा ‘बिजोरा’चा पसारा लालभडक असतो. कालांतरानं काळा पडतो. जमिनीवर पसरून मातीशी एकरुप होतो. ओर्चीड या मनमोहक फुलाच्या बियांचे प्रसारण सुद्धा वाऱ्यामार्फत होते. ‘बी’ हाताशी, नव्हे केसाशी धरून उडणाऱ्या ‘म्हाताऱ्या’ ही आपण कधीतरी पाह्य़ल्या असतीलच. निदान काटेसांवरीच्या नक्कीच. प्रत्येक म्हातारी म्हणजे पांढऱ्या केसांचा मऊ पुंजका असतो, त्याच्या टोकांशी कारळ्यासारखं काळं बी असतं. बाहेर पडताना या म्हाताऱ्याचे केस फुलून उलटे होतात आणि पांढऱ्या पॅराशूटसारख्या त्या धरतीवर विसावतात. निसर्गातील वैविध्य, रचनाचातुर्य, रंगाची योजना, हे झाडांत, फुलांत दिसते. तसे ते ‘बी’ मध्येही दिसते. पुनर्निर्मिती, वाढ, प्रसार, म्हणजे उत्पत्ति, स्थिति, विलय यांतून पुन्हा नवनिर्मिती अशा निसर्ग चक्रांतून निसर्ग वंशसातत्य टिकवत असते.
बीजप्रसारण आणी पर्यावरण
आपण पावसाळ्यात बरेच वेळा बघतो की एखाद्या वृक्षाखाली बऱ्याच बिया पडलेल्या असतात. त्यांचे अंकुरही उगवतात पण त्याचे वृक्षात रूपांतर होत नाही. कारण तेथे अन्न मिळवण्याची कठीण स्पर्धा असते. त्यामुळे त्या बिया आपोआप मारून जातात. वनस्पतींचे बीज प्रसारण हे पर्यावरण रक्षणाचे काम करते बीज दूरवर वाहून नेल्यामुळे ते नवीन परिसरात उगवते. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. व हाच बीजप्रसारणाचा उद्देश असतो.
संदर्भ :
Dutta, A. C. A Class-Book of Botany, Calcatta, 1959. ISBN: 9780195637489
मराठी विकिपीडिया परांडेकर, शं. आ.
"Seed Dispersal" from William James Beal Originally published: 1898. गूगल बुक्स
Seed Dispersal Theory and Its Application in a Changing World. R J Green. 2007
गूगल . वरील बरेच लेख.
सर्व फोटो गूगल वरून साभार





December 12, 2022
कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीच्या साथीच्या निमित्ताने ‘व्याधिक्षमत्व’ हा विषय ऐरणीवर आला. जो-तो रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काय काय करता येईल? यासाठी इंटरनेटवर माहिती शोधू लागला. जवळच्या डॉक्टरांनाही सल्ले विचारू लागला.
September 23, 2023
अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला जाब विचारायलाच पाहिजे.
April 20, 2018
हिरवी हिरवी रानं....निळं निळं आकाश...लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू ...उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी... झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी.... निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. वाटत रहायचं आपल्याला ह्या फुलाशिवाय या निसर्गाशिवाय पर्यायच नाही... अगदी बुडून जायचो निसर्गाच्या रुपात तेंव्हा.. हळूहळू काळ बदलला.. एक एक करून अनुभवाचे पक्षी -हदयाच्या झाडावर गोळा होऊ लागले.त्यातले काही विचित्र होते.. काही थोडे निराशावादी होते. तर काहीना वर्गीकरणाच्या कुठल्याच कप्प्यात बसवता येणार नाही एवढे भयानक होते....
ज्या निसर्गावर जीवापाड प्रेम करावं. जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे तोच निसर्ग आज खायला उठल्यासारखा वाटू लागला आहे.. आपल्याला शेत आहे याची जाणीव होऊ लागली.. मग नदीला मोठ्ठा पूर आला तर सारी पिकं वाहून जातील... नुकसान होईल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे पूर्वीसारखा मोठ्ठा पाऊस आल्यावर पूर आला तर टाळ्या वाजवून होणारा आनंद आज राहिला नाही... जाणिवांची मनात पक्की वस्तीस्थानं होत गेली.. अन पूर्वीच्या आनंदाच्या झोपडीचं पुनर्वसन होत गेलं... एक एक करून हळूहळू खळाळून हसणं विरुन गेलं...उरलं फक्त नाटकी हसणं तेवढंच...
आत्ता आत्ता मुर्दाड विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. हळूवार भावनांचे पक्षी दूर देशी उडून गेलेत आपण एक निगरगठ्ठं दगडी माणूस बनू लागलोय... तरीही आपण हात- पाय हलवून जिवंत असल्याचं नाटक करत असतो... आपण जिवंत नसतोच मुळी.. आपल्या भावना मृत... आपल्या संवेदनांना बोथट कातडीची साल.. कासवाच्या पाठीवरील टणटणीत... कवचासारखी किंवा आपण म्हणजे एखाद्या खाटीकखान्यात कसाई... कुणाबद्दलही कशाबद्दलही अनुकंपा न बाळगणारं आपलं स्वार्थी कठोर मन... या सार्या गोष्टी पुरेशा आहेत आपले मुर्दाड जीवन स्पष्ट करायला.... फक्त श्वास घ्यायलाच आपण जीवंत जीवन समजत असतो.
आता तर आपल्या डोळ्यांमध्ये स्प्लेन्डर किंवा कॅलीबर्सची स्वप्न तरळू लागली आहेत. कधी कधी आपण एखादी ड्रीम राईडही घेऊ लागतो त्यावरून. एखाद्या गाडीची ठेकेदार फायरींगही रुंजी घालू लागते... आपल्या कानात... सेकंड ... थर्ड करत करत आपण सुसाट वेगाने धावू लागतो.. काळ्या करकरीत.. डांबरी रस्त्यावरुन ... काही रुपायाचं पेट्रोल गाडीत टाकून चेहऱ्यावरुन फुटका आनंद आणि दळभद्री समाधान मिरवत असतो आपण नेहमीच... पण ज्यांना संध्याकाळच्या फोडणीच्या तेलाची भ्रांत आहे अशी माणसं दिवसभर हाडाची काडं करून राबल्यावर संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं निखळ समाधान किंवा खळाळून हसणं आपल्याला हेवा वाटावं असंच असतं... पण आपल्याला त्याचं काहीच नसतं आपण फक्त खोट्या समाधानाच्या पाठीमागे लागलेलो असतो. आपल्याला आता ओळखू येत नाही ओढ्याचा खळखळणारा आवाज किंवा पाखरांचे कुजबुजणे, झाडांचे पानांच्या आडून डोकावणे... फुलांचे हळुवार पसरणे.... मोरांचे केकारव... काही काहीच वाटत नाही कशाचं ....समजत नाही त्यांची भाषा. आपली सौंदर्य दृष्टीच वेगळी झाली आहे पूर्णपणे.. कृत्रिम फुलं काचेच्या भांड्यात टेबलावर ठेवणं किंवा चित्रात दिसणारं संकुचित सौंदर्य एवढंच आपल्याला माहीत असतं..
एखादं सुंदर गीत मुक्तपणे ऐकायला येईनासं झालं आहे हल्ली कुठलाच स्वर मधुर वाटत नाही गीत कितीही हळुवार असलं तरीही कानावर कर्कश्य आघात व्हावेत किंवा मुर्दाड भावनाच सारख्या मनात येऊ लागतात राहून-राहून सर्वांनाच सवय झाली आहे याची.. कुणालाही कशाचेही काहीही वाटत नाही.. सर्वांची मनं वरचेवर निर्ढावू लागली आहेत... प्रत्येक जण घाई... गर्दी .. गडबड यातच एवढा रमला आहे की त्याला किंचितही कळवळा वाटत नाही.. करुणेचा झरा कोरडा पडू लागलेला आहे... नावाभोवती वलंयं तयार होत आहेत.. मोठेपणाचे बेगडी मुखवट्यावर मुखवटे चढवले जात आहेत.. भावनांचेही व्यावसायीकरण होऊ लागलं आहे.. करकचून बांधून टाकलं आहे आपण आपल्या मनाच्या मुक्ततेला 'लाईफ स्टेटस'च्या नावाखाली आपल्याला फार मोठं टेन्शन येतं आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जाता आलं नाही याचं.. उटी.. कुलू मनालीला जायचं रिझर्वेशन तिकीट मिळालं नाही याचं.. कधीकधी नळाच्या पाण्याचं किंवा पेपर उशिरा आल्याचं टेन्शन येतं... आपल्याला पण आपल्याला चुकूनही आठवण होत नाही आपल्या शेजाऱ्याचा मुलगा का आतल्याआत धुमसतो आहे? किंवा परवा गल्लीत कोणी तरी का आत्महत्या केली? कारण आपण त्यांच्यावर खदाखदा हसण्याशिवाय काहीच करू शकत नसतो तसे आपण... आपण स्वतःला जिवंत समजत असतो तसं आपलं वागणंही फार काही चूक नसतं...
अनुभवाच्या पक्षाच्या टोचण्या खात -खात प्रवास चालू असतो मात्र आपलीच फसवणूक करीत असतो... आपण... नेहमीच!
-- संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०
May 21, 2021
गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं?
January 1, 2018
…. तसाच परमार्थाचा मार्ग आहे. जपाचे पाणी घालून, भावाचे खत घाला, भक्तीचा मळा फुलवा, परमेश्वर तुमच्या जवळ आहे, याची अनुभूती येईल प्रचिती येईल.
June 22, 2020
जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.
January 29, 2020
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..
मुळात हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म आहे जो science वर आधारित आहे
|| श्री स्वामी समर्थ ||
-- WhastApp वरुन
August 16, 2017
सचिनचे कौतुक आणि क्रिकेटची नशा लोकांसाठी वेदनाशामक औषधीचे काम करते. क्रिकेटची ही धुंदी, क्रिकेटचे हे गारूड जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून उतरत नाही आणि त्याला “भारतरत्न” देण्यात येऊ नये याकरिता आंदोलन करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, फेसबुक किंवा इंटरनेटद्वारे या विरोधात जनजागृती करीत नाहीत तोपर्यंत हा देश सुधरू शकणार नाही.
July 31, 2011
रोसबाश, यंग, हॉल या तीन शास्त्रज्ञांना यावेळचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचा संशोधनाचा विषय होता; जैविक घड्याळ म्हणजेच biological clock. आपल्या शरीरातील सर्व क्रिया/ चयापचय होण्यामागे एक नैसर्गिक घड्याळ कार्य करत असते; ही मूलतः आयुर्वेदीय ग्रंथांत आलेली संकल्पना आहे.
October 12, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti