वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी एकदा ठाणे पश्चिम शाखेच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत असताना एक विनोदी प्रसंग घडलेला आज ही आठवतो. तेव्हा टोकन नंबर दर्शवणारा बोर्ड बँकेत नव्हता. बहुदा कॅशियर टोकनचा किंवा नावाचा पुकारा करीत. तेव्हा आमच्याकडे डेक्कन लॉजचे खाते होते. बहुतेक ते लोक एक दिवसाआड पैसे काढायला येत.
May 10, 2023
मराठी सत्ता भारतव्यापी झाली ती १८व्या शतकात. याच शतकात बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी शिंदे यांनी दिल्लीला धडक दिली. या तीन पुरुषांच्या दिल्लीविषयक कामगिरीचे विश्लेषण करण्यापूर्वी आपण १८व्या शतकातील मराठी सत्तेचा थोडासा मागोवा घेऊ या.
March 6, 2019
आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे.. खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे.
January 24, 2018
कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.
June 11, 2016
सध्या मोबाईलच्या युगात बरेच जण प्रत्यक्ष भेटणं कमी आणि सोशिअल मीडियावर चॅटिंग करण्यात जास्त वेळ घालवतात तसेच सध्याच्या जगात बरेच जण स्वतःचा खूप विचार करतात पण आपल्या नात्यांना फारस महत्व देत नाही. सध्या सोशिअल मीडियाच्या जमान्यात आणि धावत्या आयुष्यात महत्वाची असणारी नाती हरवत चालली आहेत.त्याच नात्यांना जपण्यासाठी काही खास टिप्स येथे देत आहे…
March 10, 2019
May 4, 2026
अफगाणी तालिबानचे, अलकायद्याचे हजारो दहशतवादी जे सध्या अफगाणिस्तानच्या सैन्याविरुद्ध लढत आहेत, त्यांना काही काम उरणार नाही. अशा दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या काश्मिरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल. यामुळे तिथे दहशतवाद, येणार्या काळामध्ये वाढू शकतो. भारतानं अंतर्गत सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं गरजेचं आहे. गुप्तहेर संघटनांनी सतर्क राहणे गरजेचं आहे.
July 6, 2015
आपल्याला पहिला मुलगाच हवा, मुलगा म्हणजे कुळाचा उध्दारकर्ता , मुलगी काय परक्याचं धन असले विचार तर आम्हा दोघांच्याही मनाला कधी शिवले नाहीत. मुलीच्या जन्मानंतर आठ वर्षांनी आमच्या घरात एका गोड लेकाचा जन्म झाला, ही गोष्ट वेगळी.
August 25, 2022
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग पाच
सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही.
रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी जेवलो तर अन्न पचायला फक्त आठ तास लागतात. आणि पुनः सायंकाळी चरचरीत भूक लागते. तर रात्रीचे जेवलेले पचायला तब्बल सोळा तास लागतात. रात्री आठ वाजता जेवलो तर पुनः चरचरीत भूक लागते दुपारी बारा वाजता ! म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागतो.
रात्री कामही बेताचेच असते. सर्व वेळ झोपेतच असतो, त्यामुळे शरीराच्या हालचाली पण कमीच. श्रम कमी आणि अन्न जास्ती वेळ एकाच ठिकाणी पडून राहते. त्याचा परिणाम म्हणून पोटात चिकटपणा तयार होतो. चरबी वाढते, पोट सुटते, रक्तातील साखर किंवा आम म्हणजे आजच्या भाषेतील चरबीचे अनेक प्रकार म्हणजे ट्रायग्लीसराईड, कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे, वाढतात.
दिवसा ही चरबी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही, कारण ही चरबी किंवा चिकटपणा कमी करणारा सूर्य फक्त दिवसाचाच असतो. त्यामुळे दिवसा घेतलेल्या अन्नावर अग्निची प्रक्रिया पटकन होते, शारीरिक हालचाली नीट होत असतात. पोट हलत असते, चिकटपणा कमी निर्माण होतो. शरीर प्रमाणबद्ध रहाते. स्वास्थ्य मिळते.
निसर्गाने दिलेले नियम पाळले तर औषधांची गरजच उरणार नाही. नाहीतर कृत्रिम औषधांचा अक्षरशः बाजार झालाय. एकदा डाॅक्टरांकडे जावे लागले तर एक औषध कायम स्वरूपात सुरू होते. त्यातही आपली मूळ तक्रार राहते बाजूलाच, नवीनच रोग, ज्याचा आपल्याला त्रास काहीच नाही, तो शोधून काढला जातोय. आणि आपण तो अगदी सहज मान्य पण करतोय. त्यासाठी पुनः कृत्रिम औषधे आहेतच. एक नसलेला त्रास कमी होण्यासाठी दुसरे त्रासदायक औषध घेणे हा पर्याय.
असो ! काय करणार ?
आरोग्याच्या मूळ व्याख्याच बदलून गेल्यात.
ते पूर्वीचे फॅमिली डाॅक्टर बदलले, ती आपुलकीही संपून गेली.
ऋतुही बदलले, हवामानही बदलले,
पाच दिवसाची कसोटी आता एका ओव्हरपर्यंत कमी होत आली.
रात्रही बदलली आणि आता दिवसही बदलले.
रोग बदलले, आरोग्यही बदलले !
कामाचे दिवस आणि विश्रांतीची रात्रही बदलली !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.05.2017
May 20, 2017
डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराण आणि आधुनिक विज्ञान यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ..
January 7, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti