(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मी आणि हदेप्र – हरिभाई देवकरण प्रशाला !

    भुसावळमध्ये असताना प्राथमिक शाळेला “बालवाडी वा शाळा” आणि माध्यमिक शाळेला “हायस्कूल ” म्हणणारा मी ऑगस्ट ७४ ला सोलापूर नामक महानगरात पाऊल टाकल्यावर “प्रशाला “या नव्या शब्दाला भेटलो.

      July 22, 2022


  • डाएट सूज

    डाएट इनफ्लमेटरी इंडेक्स (आहाराच्या सूजेचा तक्ता)
    डाएट इनफ्लमेटरी इंडेक्स (आहाराच्या सूजेचा तक्ता) हया विषयीची माहिती आपण हया लेखात समजावून घेऊ या.

    आहार आपल्या शरीरात सूज निर्माण करतो हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? शरीरावर कुठेही सूज आली तरच दिसते पण सूज दिसली नाही म्हणून सूज नाही असे समजू नये कारण प्रत्येक वेळी सूज दिसतेच असे नाही. शरीरातील अंतर्गत भागात आलेली सूज दिसत नाही. एखाद्या रोगाचा संसर्ग, एखादी इजा, एखाद्या गोष्टीमुळे होणारी चरचर (इरीटेशन) हया कारणांमुळे शरीरा अंतर्गत सूज येऊ शकते. हळूहळू ही अंतर्गत सूज शरीराच्या प्रत्येक पेशीत शिरकाव करू लागते. कालांतराने ह्या अंतर्गत सूजेचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ लागतो. हळुहळु ह्या सूजेचा परिणाम आरोग्यावर ही दिसू लागतो. एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी (वावडे), सांधेदुखी, कालानुरूप होणारे बदल, शरीरावर लवकर दिसू लागणे ही त्याची काही उदाहरणे आहेत.

    जर ह्या न दिसणाऱ्या सूजेमुळेही आपल्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर नक्कीच त्या बद्दल काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी ही सूज मोजावी कशी आणि त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी हया विषयी माहिती असणे उपयुक्त ठरेल.

    पदार्थात विविध प्रकारचे अन्नघटक असतात. ह्या अन्नघटकांचे आपल्या आहारातील प्रमाण आपण जे अन्न खातो त्यावर अवलंबून असते. प्रत्येक अन्नघटकाचे काम वेगवेगळे आहे. ह्यातील काही अन्नघटक शरीरात सूज निर्माण करण्याचे काम करतात ज्याला आपण इनफ्लमेटरी प्रतिसाद म्हणतो तर काही अन्नघटक शरीरातील सूज कमी करण्याचे काम करतात ज्याला आपण अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी प्रतिसाद म्हणतो.

    daiet-2अयोग्य आणि अपुऱ्या अन्नघटकांच्या सेवनामुळे शरीरात इनफ्लमेटरी प्रतिक्रियेचा प्रतिसाद वाढत जातो ज्यामुळे शरिरा अंतर्गत सूज येऊ शकते आणि त्या सूजेमध्ये वाढ ही होऊ लागते. ही वाढलेली सूज रोग निर्मीतीत भाग घेत असते ज्याचामुळे हळूहळू आपण काही रोगांना बळी पङू शकतो. जर आपणास असे काही रोग होऊ नयेत असे वाटत असेल तर आपणास आपल्या आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात पदार्थांची निवङ अशी करावी लागेल की जा पदार्थांच्या सेवनाने शरिरा अंतर्गत सूज वाढण्या ऐवजी ती कमी व्हायला हवी म्हणजेच थोडक्यात आपला आहार अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी असावा.

    आहार आणि इनफ्लमेशनचा जवळचा संबंध आहे असे नवनवीन प्रयोग सिद्ध करत आहेत. काही आहार पद्धती / प्रकार हे शरीरातील सूज कमी करण्यासाठी उपयोगी पडतात असे आढळले आहे. आशा प्रकारची आहार पद्धती प्रतिक्षम/ सुरक्षित आहारात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. उष्मांक, प्रथिने, चरबी, जीवनसत्व खनिज आणि अनुरेखीत (ट्रेस) खनिजे ही प्रतिक्षम आहारात (अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी) महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात. जसेजसे प्रयोग पुढे पढे जात आहेत तसेतसे रोगावर नियंत्रण मिळविण्यात आणि रोग बरा करण्यात प्रतिक्षम आहार उपयोगी ठरतात असे निदर्शनास आले आहे. प्रयोगात ज्या आहारातून जीवनसत्व क, जीवनसत्व ई आरजिनीन, ग्लुटामिन, न्यूक्लिओटाईङस, आणि ओमेगा 3 ह्या अन्नघटकांचे प्रणाम जास्त आढळते त्या आहारामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते असे आढळले आहे. ङाएटरी इनफ्लमेटरी इंडेक्स चा उपयोग एखाद्या व्यक्तीच्या आहाराचे मूल्यमापन करून त्या व्यक्तीला आहारात कोणकोणता व कसा बदल करणे आवश्यक आहे हे तपासण्यासाठी उपयोगी पडेल. ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्ही त्या व्यक्तीला मार्गदर्शन करता येईल की जेणेकरून त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

    ह्या सर्व गोष्टी वरून असे जाणवले की अशी एखादी प्राप्तांक (स्कोर) पद्धति असावी की ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीच्या आहाराचे मूल्यमापन इनफ्लमेटरी आणि अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी आहारामध्ये करता येईल. ङाएटरी इनफ्लमेटरी इंडेक्स मध्ये 45 पदार्थ, अन्नघटक, आणि फायटोकेमिकल्स ह्यांचा समावेश आहे.

    ह्या तक्त्या बद्दलचा शोध काही वर्षांपूर्वी लागला आहे. जगभरात आहार आणि त्याचा सूज येणाऱ्या एखाद्या किंवा 6 इनफ्लमेटरी मारकर्सवर काय परिणाम होतो अशा शोध प्रबंधांचा आधार घेऊन हा तक्ता तयार केला आहे. इन्टरल्यूकीन - l (IL- l), IL-4, IL-6, IL-10, ट्युमरनेकरोसिस फॅक्टर आणि सी रिआक्टिव प्रोटिन आशा 6 घटकांचा इनफ्लमेटरी मारकर्सवर काय परिणाम होतो हे बघितले आहे. तक्ता बनवताना त्याचे मूल्यांकन खालील प्रमाणे केले आहे

    प्रो-इनफ्लमेटरी: +1
    नो चेंज इन इनफ्लमेशन: 0
    अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी: -1
    अ‍ॅन्टी इनफ्लमेटरी पदार्थ - ज्या पदार्थातून फायटोकेमिकल्स आणि ट्रेस खनिज जास्त प्रमाणात मिळतात असे पदार्थ जसे की फळ, भाज्या, पालेभाज्या, अख्खं धान्य, कठीण कवच असलेली फळ व बिया, काही मसाले व मसाल्याचे पदार्थ उदाहरणर्थ आलं, हळद प्रो इनफ्लमेटरी पदार्थ - सॅच्युरेटेङ फॅट, ट्रान्स फॅट, कोलेस्टरॉल, साखरेचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न प्रोसेसङ फूङ.

      April 1, 2015


  • नोव्हेंबर २३ : मर्व ह्युजेस- मिशी हीच ओळख आणि खेळपट्टीचे राजकारण

    झुबकेदार मिशांसाठी व तीन षटकांमध्ये तिभागलेल्या त्रिक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मर्व ह्युजेसचा जन्म आणि ब्रिस्बेनच्या महापौराने केलेले खेळपट्टीचे राजकारण

      November 19, 2010


  • ऊर्मीला एक दुर्लक्षित व्यक्तीमत्व

    संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.

      September 1, 2018


  • समर्थ रामदास स्वामी – भाग १०

    सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो सत्व गुणी असे समर्थ म्हणतात .समर्थांनी या समासात सत्व गुणी माणसांचे वर्णन केले आहे.

    भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनास युद्धाला तयार हो म्हणून जरी युद्धभूमी वर सांगत असले तरी त्यांना कुणी तमो गुणी म्हणणार नाही याचे कारण जो सन्मार्ग दाखवतो,अज्ञानी लोकांना ज्ञान देतो तो सत्व गुणी असतो.ज्या ज्ञान दानात स्वार्थ नसतो तर समाजाचेच हित असते त्या ज्ञान दानाला सत्व गुणी म्हणावे लागेल.

    देशाच्या रक्षणासाठी रणात युद्ध करणारा योद्धा सुद्धा सत्व गुणीच म्हणावा लागेल. स्वतःचे दुखः पचवून जो निदकांवर सुद्धा उपकार करतो, जो इंद्रिय दमन करतो,ईश्वराच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास आहे,जो संत आणि विद्वान यांना शरण जातो,ज्यास लोकांना शहाणे करण्याची सवय असते.जो सतत ज्ञानोपासना करण्यासाठी प्रयत्न करतो,दुस-याला दुःख झालेले ज्यास सहन होत नाही आणि त्याचे दुखः निवारण करण्यासाठी जो सतत प्रयत्नशील असतो तो सत्व गुणी.

    दानधर्म करावा,रुग्णांची सेवा करावी ,विहिरी खोदून लोकांच्या पाण्याची सोय करावी.समाजाच्या कल्याणासाठी उत्सव साजरे करावे.मंदिरे बांधावी,संतांची सेवा करावी अशी सत्व गुणी माणसास आवड असते.

    लांड्या लबाड्या ज्यास आवडत नाहीत , समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी जो सगज असतो तो सत्व गुणी असतो.म्हणून प्रामाणिक व्यापारी,प्रामाणिक पोलिस,सैनिक,आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना सत्व गुणीच म्हणावे लागेल.मी पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे समर्थ परामानस शास्त्रात पारंगत होते.समाज कसा असावा याचे ज्ञान त्याच मूळे समर्थ देऊ शकले.

    दासबोधाची व्याप्ती प्रचंड आहे.त्यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही परंतु मला समर्थ मनापासून आवडतात.जगात वाचण्या सारखे पुष्कळ आहे.परंतु जे ज्ञान सहज उपलब्ध आहे तो दासबोध,ज्ञानेश्वरी , गाथा,आणि एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत अथवा आनंद लहरी सोडून आपण इतर सगळे वाचतो पण ज्यात खरे " विज्ञान " आहे ते ज्ञान मात्र आपण अभ्यासत नाही.संतांचे ग्रंथ एकदा तरी मनापासून वाचावे खूप फरक पडतो.

    ॥श्रीराम॥

    मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |
    आतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||
    जो भजनाचा आधार | जो योगियांची थार |
    जो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||
    जेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |
    जेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||
    जो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |
    मोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||
    जो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |
    रजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||
    जो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |
    देऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||
    जो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |
    जयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||
    ऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |
    तये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||
    ईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |
    सदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||
    संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |
    भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||
    परमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |
    परोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||
    स्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |
    शरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||
    येजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |
    स्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||
    निरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |
    क्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||
    अश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |
    नाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||
    धनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |
    करी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||
    कार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |
    निःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||
    सहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |
    निष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||
    तीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |
    बांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||
    देवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |
    वृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||
    लावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |
    निववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||
    संध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |
    भांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||
    नाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |
    वाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||
    जेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |
    नाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||
    नाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |
    हरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||
    छेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |
    वाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||
    वृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |
    ऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||
    सुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |
    देवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||
    देवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |
    अपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||
    ऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |
    स्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||
    तिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |
    कायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||
    हरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |
    घेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||
    नर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |
    घेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||
    महत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |
    भक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||
    थोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |
    तिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||
    देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |
    नित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||
    शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |
    योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||
    सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |
    श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||
    अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |
    पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||
    हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |
    आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||
    मुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |
    घेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||
    देहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |
    मिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||
    कांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |
    उकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||
    संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |
    ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||
    असतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |
    सदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||
    सकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |
    आघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||
    सर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |
    आठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||
    पदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |
    ऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||
    लोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |
    निश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||
    अंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |
    नष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||
    शरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |
    सत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||
    शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |
    सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||
    आले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |
    येथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||
    तडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |
    तयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||
    आश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |
    शक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||
    जेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |
    जयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||
    होणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |
    डळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||
    येका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |
    केलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||
    विषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |
    ज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||
    देह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |
    तरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||
    श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |
    शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||
    जयास अहंकार नसे | नैराशता विलसे |
    जयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||
    सकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |
    सर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||
    सकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |
    परोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||
    आपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |
    मरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||
    पराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |
    समुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||
    नीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |
    आला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||
    अन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |
    तितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||
    शरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |
    निंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||
    मन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |
    इंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||
    सत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |
    वाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||
    जया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |
    नाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||
    पर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |
    जयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||
    विदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |
    अथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||
    कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |
    जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||
    लिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |
    देवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||
    संत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |
    नमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||
    संतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |
    तो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||
    सन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |
    ज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||
    आवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |
    जया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||
    भक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |
    धातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||
    झळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |
    पवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||
    परपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |
    वैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||
    परभूषणें भूषण | परदूषणें दूषण |
    परदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||
    आतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |
    भजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||
    ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
    येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||
    सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
    सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||
    ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
    सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||
    इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
    *सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||
    ॥श्रीराम॥
    लेखनसीमा ...... संपूर्ण

    --चिंतामणी कारखानीस

      March 25, 2016


  • आहाररहस्य-आहारातील बदल भाग ७०

    बदललं, सारंच बदललं.
    ते गोरे इंग्रज काय येऊन गेले,
    तथाकथित स्वातंत्र्य आम्हाला देऊन गेले
    पण जाताना आमचे भारतीयत्व घेऊन गेले.

      December 1, 2016


  • न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ

    न्यूट्रॉनचा आयुष्यकाळ काढण्यासाठी मदत झाली ती ‘मेंसेंजर’ या नासानं बुधाकडे पाठवलेल्या अंतराळयानाची. मेसेंजर यानानं २०११ ते २०१५ या काळात बुधाभोवती प्रदक्षिणा घातल्या. बुधाकडे जाताना या यानानं शुक्राजवळूनही प्रवास केला. आपल्याकडील उपकरणाद्वारे, या दोन्ही ग्रहांच्या पृष्ठभागापासून विविध अंतरावरून जाताना या यानानं, या ग्रहांपासून येणाऱ्या न्यूट्रॉन कणांची संख्या मोजली व त्यावरून संशोधकांना न्यूट्रॉनच्या सरासरी आयुष्याचं गणित मांडणं शक्य झालं. या गणितानुसार न्यूट्रॉनचं सरासरी आयुष्य हे फक्त तेरा मिनिटांचं असल्याचं आढळून आलं आहे.

      June 30, 2022


  • श्रीहरि स्तुति – १०

    तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत.

      October 28, 2020


  • कोती : समाजातील तृतीय पंथीय मुलाची ह्रदयद्रावक कहाणी

    समाजातील तृतीय पंथातील बालकाची हृदयद्रावक कहाणी मांडणारा कोती हा चित्रपट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकाच्या मनाला स्पर्शून अंतर्मुख करून जातो.

      June 16, 2020


  • आयुर्वेदातील नॅनोटेक्नोलॉजी

    आयुर्वेद हे जगातील सर्वात पुरातन असे भारतीय वैद्यक शास्त्र आहे. ह्या लहानशा लेखातून त्यातील औषधीकरणाचा मौलिक विषय नव्या स्वरुपात वाचा.

      October 13, 2014