(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वॉर’ फोटोग्राफर मार्गारेट बॉर्क-व्हाईट

    ‘फॉरच्युन’ आणि ‘लाईफ’ या जगप्रसिद्ध नियतकालिकांच्या पहिल्या छायाचित्रकारांपैकी एक छायाचित्रकार म्हणून मागरिट गणली जाते. विशेष म्हणजे, ‘लाईफ’ मासिकाच्या पहिल्याच अंकाच्या मुखपृष्ठावर मागरिटने काढलेले फोर्ट पेक डॅमचे छायाचित्र होते ! प्रत्यक्ष रणभूमीवर हवाई प्रवास करून जाऊन छायाचित्रण करणारी जगातील पहिली महिला छायाचित्रकार म्हणून मागरिटचे नाव जगप्रसिद्ध झाले.

      January 29, 2023


  • ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार

    वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्यतक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. .......

    एकदा का रजोनिवृत्तीचा काळ व्यवस्थितपणे पार पडला, की साठीची चाहूल लागते. जीवनाच्या निवृत्तीकडे वाटचाल सुरू होते.

    वृद्धत्व ही नैसर्गिक क्रिया आहे. शरीराची वाढ व वयात येणे होईपर्यंत शरीरातील जडणघडणीच्या क्रिया अधिक, तर पुढे विघटनाच्या क्रिया पेशींमध्ये अधिक होतात. म्हणून वृद्धत्व येते. साठीनंतर शरीरातील आवश्यसक पेशींचा ऱ्हास होत असतो. शरीरक्रमांमध्ये बदल घडून येत असतात. वयोपरत्वे ऐकणे, दृष्टी, चव, स्पर्श, वास वगैरे संवेदना कमी होऊ लागतात. शरीरात फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजिकल, मानसिक बदल होत असतात. याची कारणेही अनेक आहेत. शारीरिक हालचालींची कमतरता, भूक मंदावणे, आपली कोणाला गरज नाही याची सतत बोचणी असणे, एकटेपणाची भावना सतावणे, वगैरे! शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो- ज्याकरिता आहाराचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. तरीही तो संतुलित मात्र हवाच.

    आहारात सकाळचा नाश्तार घेणे अत्यंत आवश्याक असते. तो सकाळी ८ ते ९ पर्यंतच घ्यायला हवा. त्यात आपले जुने पारंपरिक पदार्थ हवेत. दुपारचे जेवण एक वाजता. त्यात चौरस आहार- ज्यात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ असावे. संध्याकाळी ५ ते ६ मध्ये हलका कोरडा नाश्ता्- ज्यात चिवडा, लाह्या, सत्तू, गोपाळकाला, रताळी असे पदार्थ चांगले. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान व दुपारसारखेच! रात्री दही व फळ खाऊ नये. झोपताना दूध, हळद, अंजीर घ्यावे.

    अन्न घटकांची गरज

    कॅलरीज - हे नेहमी श्रमांच्या तुलनेत असतात. साठीमध्ये चयापचयाची गती कमी होते. म्हणून पूर्वीपेक्षा निदान ३०० कॅलरीज तरी कमी घ्याव्यात. शीतपेये, ब्रेड, बिस्किटे, साखर, पेस्ट्री वगैरे टाळावे.

    प्रोटिन्स - मानसिक ताणतणाव, इन्फेक्श्न, जुने रोग वगैरे असल्यास जरा अधिक, पण सहज पचणारे प्रोटिन्स घ्यावेत. भरपूर दूध, दही, ताक घ्यावे. डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला सोपी. इतर कडधान्ये मोड आणून घेतल्यास चांगले.

    कार्बोहायड्रेट्‌स - शरीरात इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढते म्हणून व कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्‌स रक्तातील वाढलेले असल्यासही आहारात साखर नसावी. त्याऐवजी संपृक्त कर्बोदके म्हणजे धान्ये, फळे, डाळी, दूध यांचे सेवन असावे. यातूनच चोथाही मिळतो. दातांचा त्रास असल्यामुळे पॉलिश तांदळाचे, ब्रेड-बिस्किटांचे अधिक आणि भाकरीचे कमी सेवन होते. यामुळे "ब' जीवनसत्त्वे मिळत नाहीत; पण आहारात ज्वारी, बाजरी, गहू, सोजी, हातकुटाईचे तांदूळ, कंदमुळे, फळे हवीत. जिभेवर ठेवल्यावर विरघळणारे पदार्थ टाळावे.

    स्निग्ध पदार्थ - रिफाइंड तेल, वनस्पती तूप, लोणी, साय, चीज, मिठाई, तळलेले पदार्थ, पुऱ्या, पराठे कमी होणे अत्यंत आवश्य क असते. दिवसभरात ३ चमचे घाणीचे ताजे तेल आणि दीड चमचा तूप आहारातून मिळावे. वनस्पतींपासून निघणाऱ्या तेलात कोलेस्टेरॉल नसते. ते पशूंच्या स्निग्धात, वनस्पती तुपात असते. कोरोनरी हार्ट डिसीजने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मेनोपॉजनंतर अधिक आहे. म्हणून वनस्पती तूपही टाळावे. मांसाहार घेऊ नये.

    चोथा - साठीनंतर शरीराचे श्रम, हालचाली कमी होतात. म्हणून आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते. आतड्यांतील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण या क्रिया मंदावतात. अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता सरसकट अनेकांमध्ये आढळून येते. याकरता गव्हाचा दलिया, पालेभाज्या, शेंगभाज्या, ज्वारी, बाजरी, फळे, ओवा, मेथीदाणा, नाचणी, हळीव, कारळी, कुळीथ, जवस यासारख्या गोष्टी रोजच्या आहारात असाव्यात.

    कॅल्शिअम -. रोज १/२ ते ३/४ लिटर दूध हे दही-ताकाच्या रूपात घ्यायलाच हवे. कॅल्शियमवर प्रोटिन्स जीवनसत्त्व "क'चे शोषणही अवलंबून असते. अन्नाचे पचन सुलभ होते. याशिवाय नाचणी, खसखस, हळीव, सोयाबीन, खजूर, पालेभाज्या रोज खाव्यात. भात शिजवताना त्यात चिमूटभर मऊ असा खायचा चुना घालावा.

    लोह - रक्तकण, हिमोग्लोबिन तयार होण्याकरिता या खनिजाची आवश्याकता असते. लोह सर्व पालेभाज्या, खजूर, बाजरी, नाचणी , मनुका, अंजीर, हळीव यात भरपूर असते. भाज्या, सलादवर लिंबू पिळूनच खावे.

    जीवनसत्त्वे - अ, ई, क, बीटा कॅरोटिन यांना अँटीऑक्सिाडंट्‌स म्हणतात. ते पेशींचा ऱ्हास होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. दूध, दही, तेलबिया, गव्हांकुर, गव्हाच्या रोपांच्या रसातून, लाल भोपळा, गाजर, पपई, रताळं, तीळ, खसखस, खरबूज, टरबूज बियांतून मिळतात. जीवनसत्त्व "ड' हाडांच्या मजबुतीकरता, नितळ निरोगी त्वचेकरता आवश्यळक. ते दूध, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं. वृद्धांना हिंडणं-फिरणं कठीण होतं. तरी शक्यूतोवर सकाळच्या वेळी बाहेर येणं आवश्याक.

    झिंक - वृद्धांमध्ये या खनिजाची कमतरता होते, म्हणूनही रोगप्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून धान्ये, डाळी वगैरे सालासकट खावे.

    बहुतेक ज्येष्ठांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असतात. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्यकक असते. हृद्रोकगातही ते कमीच हवे. जोडीला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे क्षार वाढवायची गरज असते. त्याकरता हिरव्या भाज्या, पुदिना, कोथिंबीर, फळे, सुका मेवा या गोष्टी रोज खाव्यात.

    हिरड्यातून रक्त येणे, झालेल्या जखमा चिघळणे, हेही वृद्धांमध्ये आढळते. म्हणून नैसर्गिक स्वरूपात "क' जीवनसत्त्व घेणे फायदेशीर ठरते. मोतीबिंदू तयार होणे, पिकणे या गोष्टी "क' जीवनसत्त्वाने लांबविता येतात. म्हणून आवळा, लिंबू, फळे, सलाद भरपूर खावे. तसेच फोलिक ऍसिड, जीवनसत्त्व ब ६ याचीही कमतरता दिसते. रक्तातील होमोसिस्टीनचे वाढलेले प्रमाण, या जीवनसत्त्वांची कमतरता तर हृद्रोागाची नांदी दर्शविते. सहसा हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे वगैरे गोष्टी जीवनसत्त्व ब १२ ची कमी दाखवतात. याकरता रोज भरपूर भाज्या, फळे, ताक व अंकुरित कडधान्ये व यीस्टच्या गोळ्याही घ्याव्यात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- जयश्री पेंढरकर
    आहारतज्ज्ञ

      September 28, 2016


  • श्री प्रभाकर देवधर, यांचा ‘अणुउर्जा प्रकल्पांना विरोधाची महत्वाची कारणे”

    पत्रात आपण आपले परखड आणि प्रांजळ विचार मांडून सरकारचे कुठे चुकते, कसा भ्रष्टाचार होतो, कसे चुकीचे निर्णय घेतले जातात, अणुउर्जेपेक्षा सौर उर्जा कशी स्वत आहे, सौर उर्जेचा वापर केल्याने वीज कशी स्वत मिळू शकते, निसर्गाचा पर्यायाने वातावरणातील तापमानाचा आणि पर्यावरणाचे रक्षण कसे चांगल्या रीतीने करता येते, विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती याचे विश्लेषण खुपच चांगल्या रीतीने केले आहे.

      June 4, 2013


  • रूढी, परंपरा आणि तिचं सौभाग्य

    एक विधुर म्हणून पुरुष कोणती ओळख घेऊन फिरतो सांगा तुम्हीच? त्याची बायको अल्पकाळी जाते म्हणून आपण त्याला अशुभ ठरवतो का? पण स्त्रियांच्याच बाबतीत हे सगळं का? इतर वेळी आपण बोलतो जन्माला येतानाच मृत्यूही घेऊन आलेला असतो माणूस मग अश्याच वेळी ते सगळं कुठे जात, का स्त्रीला कारणीभूत ठरवलं जात कोणाच्या मृत्यूसाठीपण?

      December 11, 2019


  • आहारातील बदल भाग ४६-चवदार आहार -भाग ७

    आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
    आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.

    आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
    शिल्लक काय रहाते ?
    जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
    मागे साधे मीठच उरते !
    जे खरंतर औषधी आहे.
    आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
    मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?

    आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
    हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
    या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
    मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
    पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
    मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
    नंतर ???
    पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    08.11.2016

      November 7, 2016


  • नमस्काराचे महत्व

    जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वितंडवाद सहज टाळता येऊ शकतात. असे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही.

      November 28, 2017


  • आत्महत्या ते नक्षलवाद!

    एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.

      June 4, 2006


  • या मसाल्यात दडलंय काय? – भाग एक

    मसालेदार पदार्थ हे भारतीय किंबहुना आशियाई लोकांचे वैशिष्ट्य. शतकानुशतके प्रयोग करून आपली खाद्यसंस्कृती तयार झाली. मसाल्यांचे स्थान अढळ राहिले. मसाल्यांशिवाय पदार्थाला चव नाही असे समीकरण झाले आहे. नुसत्या चवीसाठी हा खटाटोप झाला असेल? 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे वाक्य आपले पूर्वज अन्नाविषयी सतत सांगत आलेत. त्याचा अर्थ? आपले शरीर हे एक यज्ञकुंड. त्यात अन्नाची आहुती दिल्याशिवाय ऊर्जा मिळणार नाही. ही ऊर्जा मिळायला व सातत्याने शरीर निरोगी राखायला नुसतीच प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ व कर्बयुक्त पदार्थ मिळून चालत नाही तर त्याचबरोबरच जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे व क्षारही लागतात. ही सूक्ष्म खनिजद्रव्ये कडधान्ये, भाज्यातून मिळत असली तरी मसाल्याच्या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. या मसाल्यात असं दडलंय तरी काय हे त्या पदार्थांचे विश्लेषणच सांगेल.

    १) काळीमिरी- सर्वात जास्त पिकणारी व निर्यात होणारी.
    मुख्यतः केरळमध्ये याची लागवड होते. कारण तेथे खूप पाऊस, जास्तच तापमान व सावली मिळते. याची हिरवी फळे उकळत पाण्यात १० मिनिटे ठेवतात. त्यामुळे रंग तपकिरी/काळा होतो. नंतर ४ दिवस उन्हात वाळवून भरडले की काळीमिरे मिळतात. यातील पिपरीन, पिपरिडीन, चाव्हिसीन व अन्य तैलद्रव्यामुळे वास व तिखट चव येते. पाचक, पोटातील वायू कमी होतो, भूक प्रज्वलित होते. यात कॅल्शियम ४६०, फॉस्फरस १९८, लोह १३, मॅग्नेशिअम १७१, तांबे २ व मँगनीज ४ मि. ग्रॅ. प्रतिशत आणि 'अ' जीवनसत्व १०८० मायक्रो, असते. भेसळीसाठी पपयाच्या बिया टाकतात व चकाकीसाठी तेल वापरतात !

    २) लवंगा- सीझिअम ॲरोमॅटिकम/ युजेनिया
    कॅरियोफायलिस या झाडाच्या मुक्या कळ्या म्हणजे लवंगा, तामीळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुख्य लागवड, काळीमिऱ्याप्रमाणेच लवंगाही कोकणात पिकवायला लागले. लवंग पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ थांबवणारी, याचे तेल वेदनाशामक म्हणून दंतवैद्य दातदुखीवर वापरतात. युजेनॉल हे वेदनाशामक द्रव्य असते. तेल त्वचेवर चोळल्यास त्वचा गरम व लाल होते. लवंग व मधाचे चाटण घशाची खवखव कमी करते. लवंगात कॅल्शियम ७४०, फॉस्फरस १००, मॅग्नेशियम १३०, मँगनीज ५, जस्त २ प्रतिशत व 'अ' जीवनसत्त्व २५० मायक्रो असते.

      March 13, 2023


  • काळाची चाहूल ?

    नियती अनेक गाेष्टी घडवून आणते. तिघेही केंद्रात असते तर त्यांच्या निधनाचे हे धक्के सरकारसाठी सुरळीत कामकाजाच्या दृष्टीने समस्या हाेऊ शकले असते. पर्याय शाेधताना आणि गाडे रुळावर आणताना त्रास झाला असता. कुठल्या अंतस्थ शक्तीने त्यांना राेखले, हे परमेश्वर जाणाे. पण आपल्यामुळे देशाचे नुकसान हाेता कामा नये, याचा आदर्शपाठ या तिघांनीही घालून दिला. ताे नव्या पिढ्यांसाठी अनुकरणीय ठरेल.

      August 26, 2019


  • शर्मिली चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव !

    समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला. गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.

      April 29, 2021