वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बंगाली संस्कृतीत नवरात्रात ‘दुर्गा पूजे’ची विशेष परंपरा आहे. नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना बंगाली संस्कृतीत केली जाते. बंगाली समाजात देवी दुग्रेला विशेष महत्त्व असून तिला ‘दुर्गा माँ’ असे संबोधले जाते. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा पूजा करण्याची बंगाली समाजाची विशेष परंपरा आहे. साधारण महाराष्ट्रात नवरात्रीच्या पहिल्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी घटाची स्थापना करून मग नऊ दिवसाच्या नऊ माळा पूर्ण करत देवीची आराधना केली जाते. पण बंगाली समाजात नवरात्रीच्या सातव्या दिवशी दुर्गा माँची भव्य प्रतिमा स्थापित करून विजयादशमीपर्यंत तिची पूजा-अर्चा करण्याची पद्धत आहे. या पूजेत दुर्गा माँच्या प्रतिमेला विशेष महत्त्व असते. अगदी पारंपरिक पद्धतीनेच तिची भव्य प्रतिमा मूíतकारांकडून घडवून घेतल्या जातात. यात देवीच्या मूर्तीबरोबरच गणपती, काíतकेय, सरस्वती आणि लक्ष्मी यांच्या मूर्तीचाही समावेश असतो. यात एका भल्या मोठय़ा आडव्या पाटावर या मूर्तीची मांडणी केली जाते आणि त्याच्यामागे एक भव्य कमान उभी केली जाते.
सहाव्या म्हणजे महासष्टीच्या दिवशी सायंकाळी शंखांचा नाद करत दुर्गादेवीची प्रतिमा मंडपात आणली जाते. याला आमंत्रण अथवा अधिवास असे म्हटले जाते. महासप्तमी म्हणजेच सातव्या दिवशी त्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. सर्वप्रथम कलश स्थापनेचा विधी केला जातो. यात एका कलशामध्ये श्रीफळ आणि आंब्यांची पाने लावून दुर्गा माँचे प्रतीक मानून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर महास्थानाचा विधी पार पाडला जातो. यात प्रतिमेसमोर एक आरसा ठेवून त्या आरशात पडणाऱ्या देवीच्या प्रतििबबावर हळद आणि मोहरीचे तेल लावून त्या प्रतििबबाला उसाच्या रसाने अथवा गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. त्यानंतर पुजारी दुर्गा माँचे नाव लिहिलेला आरसा, साडी, आभूषणे हे सगळे बेडी म्हणजे पूजा करण्याच्या ठिकाणी ठेवून त्याची पूजा करतात. या सर्व प्रक्रियेत सर्व जातीच्या आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रीच्या घरातील मातीला विशेष महत्त्व असते. या सर्व विधींनंतर प्राणप्रतिष्ठापना हा महत्त्वाचा विधी पूर्ण केला जातो. यात पुजारी मंत्रोच्चार करून कलश आणि दुर्गादेवीच्या प्रतिमेत प्राण निर्माण करतो, अशी आख्यायिका आहे. अष्टमीच्या दिवशी देवींनी महागौरीचे रूप घेतल्यामुळे तिची महागौरी पूजा केली जाते. यानंतर नवमीला चंडी पूजा केली जाते. या क्षणी देवीने चामुंडाचे रूप घेतलेले असते. त्यावेळी देवीला विशेष असा ‘नीट भोग’ चढवला जातो. यात भात, वरण, भाजी, चटणी आणि पायेश या गोड पदार्थाचा समावेश असतो. १०८ दिवे आणि १०८ कमळ फुलेही याक्षणी देवीला वाहिली जातात. विजयादशमीच्या दिवशी देवीला मध-दुधाचा भोग दाखविला जातो. याला ‘चरणमिर्ती’ असे म्हणतात. याच दिवशी स्त्रिया सिंदुर उत्सव साजरा करतात. देवी आपल्या पतीच्या घरी कैलासावर जात आहे, अशी धारणा धरून त्या तिच्या डोक्यावर सिंदूर लावतात. याला ‘कनक अंजली’ असे म्हटले जाते. त्यानंतर देवीच्या उत्तरपूजेची सुरुवात होते. यामध्ये कलशासमोर उत्तर दिशेस म्हणजेच कैलास पर्वताच्या दिशेने एक फूल ठेवले जाते आणि त्यानंतर देवीच्या प्रतिमेस विसर्जनासाठी बाहेर काढले जाते. विसर्जनानंतर पुजारी विसर्जनस्थळावरील पाणी ज्याला शांती जल म्हटले जाते ते भक्तांच्या अंगावर आंब्याच्या पानाच्या साहाय्याने शिंपडतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 5, 2019
इंदिरा गांधी या दिवशी पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्या होत्या, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
January 24, 2022
यत्कटाक्षसमुपासना विधि: सेवकस्य सकलार्थ सम्पद:।
संतनोति वचनाङ्गमानसै-
स्त्वां मुरारिहृदयेश्वरीं भजे।।१४।।
या जगात भक्तासाठी करण्यासारखे एकमेव कार्य काही असेल तर ते केवळ आणि केवळ महालक्ष्मीची उपासना हेच आहे. अशी अनन्यशरणता सांगत आचार्यश्री येथे आई जगदंबेचे वैभव स्पष्ट करीत आहेत.
ते म्हणतात,
यत्कटाक्षसमुपासना विधि:- त्या आई जगदंबेच्या कटाक्षाच्या उपासनेचा विधिच,
सेवकस्य सकलार्थ सम्पद:- तिचा सेवकांना सर्व अपेक्षित संपत्तीला
संतनोति- वृद्धिंगत करणारा आहे.
आई महालक्ष्मीच्या कृपेनेच साधकाला जी जे हवे ते सर्व प्राप्त होऊ शकते. त्याच्या सर्व प्रकारच्या संपत्तींचा विकास होतो.
येथे त्या कटाक्षां ची उपासना करावी असे म्हटले आहे. मूर्तीची उपासना ठीक आहे. पण कटाक्षांची उपासना कशी करायची? तर उपासनेचे अंतीम फल आहे, उपास्य देवतेचे आपल्याकडे लक्ष जाणे. ती लक्ष जाणे म्हणजे तिने पाहणे. म्हणजे कटाक्ष.
ती केव्हा पाहील?तर तिला आवडती गोष्ट असेल त्यावेळी. तिला आवडती गोष्ट कोणती? तर भगवान श्रीहरी.
सोप्या शब्दात आपल्या हृदयात श्रीहरींचे स्थान असेल तर आईची कृपादृष्टी आपल्यावर पडेल.
यासाठी, मुरारि-मुर नामक राक्षसाचे शत्रु श्रीहरी. कृतयुगामध्ये नाडीजंघ नावाच्या राक्षसापासून मुर नावाचा राक्षस जन्माला आल्याची पुराणात कथा आहे.
त्याचे आणि भगवान विष्णूंचे प्रचंड युद्ध झाले. ज्यात तो मरेना. त्यावेळी थकून हिमालयात विश्राम करणाऱ्या विष्णूंच्या शरीरातून निघालेल्या शक्तीने त्याचा विनाश केल्याची कथा आहे.
त्या शक्तीला पुढे उत्पन्ना एकादशी असे नाव पडले. अशा त्या श्रीहरींची,
हृदयेश्वरीं- हृदयाची स्वामिनी असणाऱ्या,
त्वां- तुला,
वचनाङ्गमानसै- वचन म्हणजे वाणीने, अंग म्हणजे शरीराने आणि मानसै: म्हणजे मनाने, अर्थात सर्व मार्गाने, परिपूर्णरीत्या
भजे- भजत असतो. उपासना करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 23, 2020


प्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.
टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.
July 3, 2025
क्षितिज पार झाल्यासारखं वाटतं, तसंच आयुष्याचं आहे. “Miles to go before I sleep” ही अवस्था प्रत्येकाची असते. सगळं पार पडल्यावरच यशाचा व समाधानाचा थांबा येतो. यशाच्यामागे धावायचं, का समाधानाच्या थांब्यावर थांबून क्षणभर विश्रांती घ्यायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. सुखाचा शोध घ्यायला प्रत्येक जणाला यशोशिखराकडे जावं वाटतं, पण सुख पायाशी लोळण घेत असतं, हे अनेकांना माहीत नसतं. श्वास घेईपर्यंत अनेक गोष्टी पार पाडायच्या असतात, अनेक कर्तव्यं पार पाडायची असतात. अजून खूप पार पाडायचे आहे.
June 19, 2026
जगदंबेचे स्वरूप आहे तेज. त्या तेजानेच ज्ञान होते. दिवसा सूर्य, रात्री चंद्र, अंधारात दीप इत्यादी तेजाचे सर्व प्रकार आई जगदंबेच्या कला आहेत. या सगळ्यांच्या द्वारे ती ज्ञान प्रदान करते. यापैकी कोणते ना कोणते साधन सदैव उपस्थित असल्याने तिला विनिद्रा असे म्हटले.
January 29, 2020
अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.
September 7, 2023
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।१।।
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते।।२।।
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।३।।
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते।।४।।
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते।।५।।
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिको परा।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते।।६।।
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते।।७।।
जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा।।८।।
तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम्।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्।।९।।
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।
May 1, 2020
नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत येऊन तीन आठवडे होत आहेत तोच ते स्वतः भूतान दौर्यावर गेले. एवढ्या तातडीने परदेश दौर्यावर जाण्याचे कारण काय? आणि त्यातही त्यांनी भूतानचीच निवड का केली? पंतप्रधानांच्या भूतान दौर्यामागे राष्ट्रहिताची आणि संरक्षणाची महत्त्वाची कारणे आहेत. गेल्या दहा वर्षात आपल्या देशाचे शेजाराच्या देशांशी असलेले संबंध रसातळाला पोहोचले होते.
June 20, 2014
प्रस्तुत श्लोकांच्या पहिल्या दोन चरणात भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज आई जगदंबेच्या वेगवेगळ्या वाहनांचा विचार मांडत आहेत.
February 2, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti