वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.
August 31, 2016
पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.
September 12, 2021
१. पेरुव्हियन सेंट्रल रेल्वे (दक्षिण अमेरिका)
तिबेटिन रेल्वे बांधण्याआधी जगातील सर्वांत उंचावरील रेल्वेमार्ग म्हणून याची गणना होत असे. अँडीज पर्वतराजीत ४७८२ मीटर उंचीवरील हा रेल्वे मार्ग समुद्रसपाटीपासून सुरू होतो. १२ तासांच्या प्रवासात सहा विभागांमध्ये हवामान बदलत राहतं. सर्वांत उंच भागात प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची सोय डब्यात करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गाला 'ढगांतून जाणारा रेल्वे मार्ग' म्हणून ओळखलं जातं. जवळजवळ १०० वर्षांपूर्वी याची बांधणी झालेली आहे. या कामाचे नकाशे १८५१ सालापासून आखण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष कामास १८७० साली सुरुवात झाली व ४० वर्षांनी काम पूर्ण झालं. यासाठी अंदाजे दहा हजार कामगारांची नेमणूक करण्यात आली होती. या मार्गावर ६९ बोगदे, ५८ पूल आणि २१ अतिशय कठीण वळणं आहेत. गलेरा हे सर्वांत उंचावरील स्थानक बोगद्याच्या आतच आहे. १०,२८० फूट उंचीवरील पूल दोन अजस्त्र शिलांमधील बोगद्यांच्या मध्यात असून, त्यांच्या खाली प्रचंड खोल घळ आहे.
२. सैतान वा भुताच्या नाकासारखी बांधलेली रेल्वे (इक्वेडोर - दक्षिण अमेरिका)
हा जगातील सर्वांत कठीण, खडतर रेल्वेमार्ग म्हणून प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गायाक्विल शहर आणि राजधानी क्वीट यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या आखणीस २५ वर्षे लागली आणि १८९९ मध्ये काम सुरू झालं. त्यानंतर २० ते २५ वर्षांनंतर हा मार्ग प्रत्यक्षात सुरू झाला. वाटेतील एका सरळसोट अजस्र शिळेमधून अनेक वळणांचा मार्ग खोदण्यात आला आहे. चढण १:१८ हिशोबाने छाती दडपून टाकणारी आहे. सर्वांत उंच जागेस EI Noriz del Diablo (The Devil's nose) म्हणतात. १२ कि.मीटरचा उतरणीचा रस्ता १९९७ च्या भूकंपात उद्ध्वस्त झाला होता.
३. क्विंगानी तिबेट हेवी रेललाईन
(या मार्गाची माहिती तिबेट रेल्वे प्रकरणात दिलेली आहे.)
४. यिवान रेल लाईन तिबेट (यिचाँग टू चाँगींग-वांझाऊ)
३७७ कि.मी. लांब असलेला हा सर्वांत कठीण व अतिशय महाग रेल्वे प्रकल्प आहे. एक कि. मी. बांधण्यासाठी ९ मिलियन डॉलर्स या हिशोबाने या रेल्वे प्रकल्पाचा खर्च एकूण ३.४१ बिलियन डॉलर्स झाला आहे. ५० हजार कामगार या कामासाठी ७ वर्षं झटत होते. या मार्गावर २५३ पूल व १५९ बोगदे आहेत.
५. आल्प्स ट्रान्झिट रेल (स्वित्झर्लंड)
(न्यू रेल लिंक थ्रू आल्प्स माउंटन्स)
या मार्गाचं काम सन २०१६ पर्यंत पूर्ण होईल अशा वळणावर येऊन पोहोचलं आहे. यासाठी १३ बिलियन डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. सर्व रुळांचं जाळं खोल जमिनीखाली, बोगद्याच्या शेकडो मीटर खाली आहे. हे बोगदे १९१० सालात बांधलेले होते. जगातील सर्वांत लांब बोगदा ५७ कि.मीटर असून, गोथार्ड या नावाने या रेल्वे मार्गावर असणार आहे.
November 11, 2022
आदी मानवाच्या गरजांची व त्यांच्या आपुर्तीचा इतिहास थोडक्यात बघु या, कारण तो फारच मनोरंजक आहे. पुर्वी मनुष्य ‘आज मिळाले ते आपले’ व ‘उद्याचे उद्या बघु’ अशा अवस्थेत होता. नंतर आपल्याजवळ जास्त असलेले दुसर्याला देऊ करुन त्याच्या बदल्यात त्याचे जवळचे आवश्यक ते आपण घ्यावे, नंतर वस्तुंची अनेकांशी अदलाबदली मग हळुहळु तराजु आला व अशा स्वरुपात पण मर्यादीत व्यवसाय सुरु झाला. विचारांचे आदान-प्रदान ,संवाद व दळणवळण सुकर झाल्यावर देवाण-घेवाणीसाठीचे माध्यम अशा स्वरूपात सर्वमान्य चलन (पैसे) आले व व्यापाराला सुरवात झाली.
March 12, 2021
…1996 च्या विश्वचषकात त्याचा एक चेंडू सीमापार धाडल्यानंतर पाकिस्तानच्या आमीर सोहेलने त्याला उद्देशून काही अ-प-शब्द उच्चारले होते. पुढच्याच चेंडूवर वेंकीने त्याच्या यष्ट्या तीनताड उडवून दिलेला ‘दांडेतोड’ जवाब अनेकांना आठवत असेल.
August 4, 2010
राज ठाकरे यांच्या गुजरात दौर्यावर आधारित फोटो-कार्टून
August 8, 2011
आपापल्या दैवतांची उपासना कशी करावी? हा त्या त्या व्यक्तीचा प्रश्न. समाधानासाठी माणसं काहीही करतात. घरी सत्यनारायण, धार्मिक विधी करुन अंधश्रध्दा निर्मूलन करणारेही आहेत. देव, धर्म, उत्सव यामुळे समाजामध्ये थोडे चैतन्यही आहे पण अवडंबर नको.
October 29, 2018
विव्ह रिचर्ड्स यांनी २७ एप्रिल १९७४ मध्ये पहिला बेन्सन अँड हेजेस मधील सामना खेळले. त्यावेळी त्यांना मॅन ऑफ द मँच देण्यात आले.
September 9, 2021
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.
November 15, 2010
“खामोशी” शब्दांच्या पलीकडला – वहिदा, राजेश, धर्मेंद्र, गुलज़ार, ललिता पवार, देवेन वर्मा आणि हेमंतदा या साऱ्यांचा परिसस्पर्श मिरवणारा ! आज ५० वर्षांचा झालाय पण आपल्या रुग्णाच्या प्रेमात (एकदा नव्हे दोनदा) पडून त्याला बरं करण्याच्या नादात व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील रेषा विसरणारी नर्स वहिदा आजही स्मृतीत लखलखीत आहे.
April 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti