(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पळसाच्या पानाची पत्रावळ आता विस्मरणातच….

    राज्याच्या व देशाच्या कानाकोपर्‍यात लग्न समारंभासह इतर सार्वजनिक कार्यक्रमांत गेल्या दोन शतकांहूनही अधिक काळ पारंपारीक पत्रावळ अधिराज्य करत होती. पळसाच्या पानांपासून बनवलेली ही पत्रावळ म्हणजे गरिबांच्याच काय पण मध्यमवर्गीयांच्या लग्न-मुंज-पूजा समारंभातला एक अविभाज्य भाग होती.

    जीवनमानातील बदलांमुळे शहरात पत्रावळींची जागा स्टीलच्या ताट-वाट्यांनी घेतली. त्यानंतरच्या काळात पंगत संस्कृती लोप पावत चालली आणि त्याची जागा बुफे लंच-डिनरने घेतली. या बुफे पद्धतीत मोठ्या ताटांची जागा छोट्या बुफे प्लेटसनी घेतली. शहरांमधल्या जेवणावळींतून `आग्रह' हा प्रकार हद्दपार झाला. आता तर आमंत्रणातच `स्वेच्छाभोजनाची वेळ' लिहिलेली असते. म्हणजे तुमचे तुम्हीच ठरवा काय खायचे ते!

    परंतु हल्लीहल्लीपर्यंत छोट्या गावांतील लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांत जेवण्यासाठी पळसाच्या पानांपासून तयार होणारी पारंपारीक पत्रावळ वापरात होती. मात्र आता ती तिथूनही हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. त्याजागी आता खेडोपाडीही होणार्‍या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लास्टिकच्या द्रोणाने घेतली आहे.

    सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. या कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो. शिवाय एका बाजूला मेणाचा वापर करुन पत्रावळी चकचकीत केल्या जातात. मात्र अशा कोटिंग केलेल्या चकचकीत पत्रवळी आरोग्यासाठी घातकच असतात. कारण उन्हात या पत्रावळींवरचा मेणाचा थर वितळायला लागतो आणि तो थेट आपल्या पोटात जातो. थर्माकोलपासून बनवलेल्या पत्रावळींमुळेही दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

    जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही अगदी आयुर्वेदातही दिलेली दिसते. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदीक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना किडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्व असलेल्या या पत्रावळीच भोजनसमारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.

    काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे तर अगदी रोजच्या घरातल्या जेवणातसुद्धा पत्रावळीचा वापर होत असे. पत्रावळींच्या वापरामुळे अनेक फायदे होत त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे जेवल्यानंतर बायकांनासुध्दा ताट-वाट्या घासण्याचा त्रास कमी होत असे. पूर्वी घरातली पुरुष मंडळी संध्याकाळी घरी येताना येताना शेतावरची भाजी, फुले आणि कधीकधी पत्रावळीसाठी पळसाची पानेही घेउन घरी येत असत. काही घरांमध्ये पत्रावळी लावणे हा एक कार्यक्रम असे.

    पत्रावळीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या पानांच्या पत्रावळी असत. पळसाच्या पानाची पत्रावळ तर ऑल टाईम फेव्हरिट असायची पण त्याचबरोबर वडाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढर्‍या चाफ्याची पाने यांच्याही पत्रावळी बनवल्या जायच्या. मोहाच्या पानांचीही पत्रावळ काही ठिकाणी श्राध्दाला मुद्दाम लावली जात असे. कोकणात अनेक बायका चातुर्मासात आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात.

    प्राचीन भारतीय संस्कृतीत पत्रावळी किंवा केळीच्या पानावर जेवणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. आयुर्वेद शास्त्रातही विविध पानांचे व त्यातून दिल्या जाणार्‍या अन्नपदार्थांचे उल्लेख आहेत. आजही दक्षिण भारतातील अनेक भागात केळीच्या पानावर जेवणाची प्रथा आहे. थर्माकोल आणि मेणाचा मुलामा दिलेला कागद यांचा वापर पर्यावरणासह शरीरासही धोकादायक असताना केवळ `रेडीमेड'च्या नादापोटी व वेळ वाचविण्यासाठी हा धोका पत्करला जात आहे.

    पळसाची पत्रावळ बनवणे हा एक ग्रामोद्योग होता. या उद्योगावर आधारित असलेल्यांची उपजीविकाही आता बुडाली आहे.

    थर्माकोल, प्लास्टिक वगैरेचे विघटन पूर्णपणे होत नसल्याने त्यांच्यापासून पर्यावरणाला अपाय होतो. आधुनिक काळातील `वापरा आणि फेका' या संस्कृतीमुळे अन्नधान्याच्या नासाडीसह प्लॉस्टिक व कृत्रिम वस्तूंचा बेसुमार वापर होत आहे. लग्नसमारंबात पाण्यासाठी सर्रासपणे मिनरल वॉटरच्या बॉटल्स किंवा पाऊच वापरले जातात.

    अर्थात आता यावर उपाय कठीणच आहे कारण प्लास्टिक, थर्माकोल वगैरेचा वापर आपल्या एवढा अंगवळणी पडला आहे की ती सवय चटकन मोडणार नाही.

      August 5, 2015


  • नोटबंदीनंतरच्या गावगप्पा

    येथे फक्त ज्या वैध नोटा बॅंकेत परत आल्यात त्याचाच विचार केला आहे. ज्या नोटा वैध नव्हत्या व बॅंकेत आल्या नाहीत त्याचा विचार केलेला नाही. अशा नोटांची संख्या ही कोणत्याही वेळी १० टक्के पेक्षा जास्त होती हेही विसरून चालणार नाही.

      September 4, 2018


  • लिलाव !

    ‘तुला पाच पैश्याची किंमत नाही ‘ हे वाक्य आयुष्यात कितीदा ऐकले असेल याची नोंद नाही. घरी, बाहेर ,लहान.,थोर सर्वांची या बाबतीत एकवाक्यता मला आश्चर्यचकित करून जाते. जगणे कठीण झाले .म्हणून मग मी काय केले ?......
    जगण्यासाठी एकदा मी माझाच लिलाव माडला,
    सर्व अवयव विक्रीस ठेवले ,
    रास्त किंमत ,भव्य डिस्कांउट,
    एकावर एक फ्रीचे बॅनर लावले
    आमची कोठेही शाखा नाही आवर्जून लिहिले
    हात ,पाय ,कान,नाक,पाठ ,पोट
    आकर्षक पॅकिंगमध्ये मांडून ठेवले,
    “घ्या हो घ्या ,हवे ते घ्या ,
    ज्यास्ती ज्यास्त बोली लावा “
    लिलावाचा हॉल गच्च भरला,
    लहान- थोर , गरीब-श्रीमंत ,
    स्वकीय, ओळखीचे, अन अनोळखीही
    माझ्या साठी आले,मन माझे भरून आले,
    लिलाव सुरु झाला ,हाता-पायांचा ,
    लाख,,,, दोन लाख,... बोली चढत होती ,
    माझी किंमत मलाच काळात होती,
    कमाल बोली स्वकीयांनीच लावली,
    आश्चर्य वाटले. ............का?,
    ‘कष्टाला बरे आहेत म्हणाले!
    शिवाय पाठ आणि खांदे डिस्कांउट मध्ये!’
    नाक लांब, कान हलके, म्हणत सर्व अवयव खपले,
    पण ,..........................
    पोट अन हृदय तसेच राहिले ,
    फुकट पण कोणी घेईनात!
    वेळ संपत आली ,हॉल रिकामा होत आला,
    आता काय करू ? माझी तगमग सुरु झाली,
    शेवटी .......................
    पोटातली भूक, अन हृदययातल मन उपसून काढले,
    दोन्ही रिकामे अवयव भिरकावून दिले!,
    भूक आणि मन स्वतःच मारून टाकले!,
    मग मात्र जगायचं कस ते समजू लागले!.

      August 13, 2018


  • नाही म्हणण्याची ताकद आपण हरवून बसलो आहोत का ?

    नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे.

      December 5, 2021


  • नोटांची छपाई ते वितरण

    नोटा छापणे, नाणी तयार करणे याव्यतिरिक्त देशाचे चलन अधिक सुरक्षित करणे आणि त्याद्वारे बनावट चलनाला दूर ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी असते. आपली रिझर्व्ह बँक, नोटांची प्रेस आणि नाण्यांची टांकसाळ इथून आवश्यक चलन निर्माण करून त्याची वितरण व्यवस्था करते जी सक्षम आहे.

      November 21, 2022


  • मालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज

    भारताने तूर्त मालदीववर कठोर निर्बंध घालून तेथे लवकरात लवकर निवडणुका होतील याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून तेथील लोकशाही जिवंत राहू शकेल. चीन व पाकिस्तान यासारख्या शत्रूंची तेथील उपस्थिती आपल्याला घातक ठरेल. त्यामुळे परराष्ट्र नीती हे आव्हान ठरते आहे. मालदीवमधील परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवत भारत सावधगिरीने पावले टाकील यात शंका नाही.

      March 10, 2018


  • कथिल पाणी

    ‘सार्थ भावप्रकाश’ या आयुर्वेदावरील ग्रंथात एक श्लोक आहे. त्याचा अर्थ पुढे देत आहे. ‘कथिल हे हलके, रुक्ष, उष्ण असून मधुमेह, कफ, कृमी, पांडुरोग व दम यांचा नाश करते. ते पित्तवर्धक असून डोळ्याला हितकार आहे. ज्याप्रमाणे सिंह हत्तीच्या समुदायाचा नाश करतो त्याप्रमाणे कथिल मधुमेहाचा नाश करते. ते सेवन केले तर सर्व इंद्रिये शुद्ध होऊन देहाला सुख लाभते.’

      September 4, 2017


  • मानसिक आरोग्यासाठी व्यक्त होणे गरजेचे

    आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते.

      February 7, 2022


  • त्वचारोग आणि आयुर्वेद

    त्वचाविकारावर इतर उपचार चालू असताना सोबत खालील उपचार करावेत.

    आयुर्वेदाच्या दृष्टीने अनेक त्वचारोग हे आंतरिक दोषांचे बाह्य स्वरूप आहेत. यासाठी काही पथ्येही सांगितली आहेत. एक सर्वसाधारण नियम म्हणजे दूध,मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत असा आयुर्वेदाचा सल्ला आहे. दूध-खिचडी, दूध-मासे हे पदार्थही एकत्र घेणे वर्ज्य आहे. मीठ व खारट पदार्थांवरही नियंत्रण आवश्यक आहे. लोणचे,खारवलेल्या मिरच्या, सांडगे,शेवया, इत्यादी पदार्थ या दृष्टीने कमी खावेत. अशी काळजी घेतल्यास त्वचारोग लवकर नियंत्रणात येतात असा अनुभव आहे. ठेवल्यावर आपोआप पाणी सुटणा-या दही, गूळ, इत्यादी वस्तूही त्वचारोग वाढवतात असा आयुर्वेदाचा विश्वास आहे. पोटात जंत असणे, कोठा साफ नसणे हा त्रास असेल तर त्यावर लवकर व नियमित उपचार करणे आवश्यक आहे. या विकारामुळे त्वचारोग लवकर आटोक्यात येत नाहीत.

    पावसाळयाच्या शेवटी होणारे त्वचाविकार हे शरीरातील थोडे रक्त काढल्यास (रक्तमोक्षण) लवकर बरे होतात. यासाठी जळवांचा वापर करता येईल. त्वचारोगाच्या आजूबाजूला किंवा रोगग्रस्त त्वचेवर जळवा लावल्यास लवकर आराम पडतो असा अनुभव आहे.

    आयुर्वेदानुसार साबणाऐवजी बेसनपीठ व तेल वापरल्यास त्वचा निरोगी व स्निग्ध राहण्यास मदत होते. विशेषकरून कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींनी अशी काळजी घेणे आवश्यक आहे.

    (अ) आरोग्यवर्धिनी 500 मि.ग्रॅ. दोन वेळा
    (ब) मंजिष्ठा चूर्ण पोटातून रोज दिल्यास आराम पडतो.

    (मात्रा : 1.5 ते 3 ग्रॅ. याप्रमाणे दिवसातून दोन वेळा)

    लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
    संदर्भ : आरोग्यविद्या

    -- आरोग्यदूत वरुन साभार

      August 20, 2016


  • वाचवा रें वाचवा ….!!!!! या आण्णा पासुन…… भारत सरकारचा टाहो.

    राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.

      August 19, 2011