वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां,
गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम् |
घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६||
आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक.
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली.
प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे.
रक्ताचा निळा रंग वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येतो.
पहिली गोष्ट म्हणजे ज्या पांढऱ्या पेशी असतात त्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्या तर निळसर रंगाच्या दिसतात.
दुसरी गोष्ट जेव्हा रक्तात प्राणवायूचे प्रमाण कमी होते त्यावेळी त्याचा रंग निळसर होतो.
याच कारणाने फुफ्फुसापासून हृदयापर्यंत प्राणवायू युक्त रक्त नेणाऱ्या नलिकेला धमणी असे म्हणतात तर हृदयापासून फुफ्फुसा पर्यंत प्राणवायूक्षीण रक्ताला नेणाऱ्या रक्तवाहिनीला नीला असेच म्हणतात.
शरीरातील सर्व अवयवांना प्राणवायू पुरवल्यामुळे या रक्तातील प्राणवायू कमी झालेला असतो.
अशा नीलवर्णीय रक्ताप्रमाणे रंग असणारे वस्त्र जिने धारण केलेली आहेत अशी.
पूज्य आचार्यश्रींचे दर्शन किती सूक्ष्म आहे ? याचा विचार करावा.
गृहीतमधुपात्रिकां- जिने आपल्या रसग्रहणासाठी हाती मधाचे पात्र धारण केले आहे अशी. मधुविघूर्णनेत्रांचलाम् - मधू प्राशन केल्याने जडावलेले नेत्र असणारी.
घनस्तनभरोन्नतां- उन्नत आणि भरगच्च स्तनमंडल असणारी. गलितचूलिकां- आपल्याच आनंदात मान हलवल्याने वेणी,गजरा गळून पडलेली
श्यामलां- सावळ्या,
त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये - भगवान शंकरांची सहधर्मचारिणी असणाऱ्या श्रीत्रिपुरसुंदरीचा मी आश्रय करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 7, 2020
मी कथा विषयी बोलणार आहे, पण हे मी माझ्या कथांचे संदर्भ घेऊन बोलणार आहे.कथा म्हणजे काय? काल्पनिकते मध्ये वास्तविकता किंवा वास्तविकते मध्ये काल्पनिकतेचे मिसळ करून व्यक्त होणे.सर्वस्वी वास्तविक किंवा सर्वस्वी काल्पनिक असे काहीच नसते. पण विचार आणि चिंतन ही लेखकाची शिदोरी आहे. यातून जी जन्म घेते ती कविता किंवा कथा.
August 22, 2023

भौतिकशास्त्रातलं ‘स्टँडर्ड मॉडेल’ हे प्रारूप विश्वातील मूलभूत कणांतील आंतरक्रियांचा वेध घेतं. या आंतरक्रियांत तीन प्रकारच्या बलांचा सहभाग असतो. ही तीन बलं म्हणजे तीव्र केंद्रकीय बल, क्षीण केंद्रकीय बल आणि विद्युतचुंबकीय बल. मूलभूत कणांपैकी, क्वार्क या मूलभूत कणापासून बनलेल्या विविध कणांना ‘हॅड्रॉन’ संबोधलं जातं. हे कण वजनदार आहेत. आपल्याला परिचित असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन हे कण या हॅड्रोन गटातच येतात.
February 27, 2022
सर्वज्ञतां सदसि वाक्पटुतां प्रसूतॆ
दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः ।
किं च स्फुरन्मकुटमुज्ज्वलमातपत्रं
द्वॆ चामरॆ च महतीं वसुधां ददाति ॥ ७ ॥
आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की कोणकोणते अतिदिव्य लाभ होतात, हे सांगतांना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
दॆवि त्वदङ्घ्रि सरसीरुहयॊः प्रणामः- हे आई जगदंबे तुझ्या अंघ्री म्हणजे चरण, सरसीरूहयो: म्हणजे कमलावर जो कोणी वंदन करतो, त्याला या जगात,
सर्वज्ञतां - सर्व प्रकारच्या विद्या आणि कलांमध्ये अक्षुण्ण गती,
सदसि वाक्पटुतां- सभेमध्ये वाक कौशल्य,
प्रसूतॆ- प्राप्त होते.
यातील सभेतील वाक् कौशल्य हा शब्द महत्त्वाचा आहे. बोलता तर सगळ्यांनाच येते. पण सभेत याचा अर्थ विद्वानांच्यासमोर, शास्त्रशुद्ध, मुद्देसूदरीत्या, अकाट्य तर्कपूर्ण रीतीने बोलता येणे. अशावेळी अनेकांची फक्त त -त ,प -प होते. आई च्या कृपेने माणसाला अशा ठिकाणी वक्तृत्व संपन्नता येते.
किं च- आईच्या कृपेचे आणखीन काय लाभ सांगू? शेवटी सर्व एकत्र करून सांगण्याची माऊलींची 'किंबहुना' शब्द रचनेतील भूमिका या 'किं च' मध्ये आली आहे.
स्फुरन्मकुट- देदीप्यमान मुकुट अर्थात साम्राज्य पद.
उज्ज्वलमातपत्रं- चमचमते छत्र. त्यात उज्ज्वल शब्दात पांढरा रंग अपेक्षित आहे. एकछत्री सम्राटाचे छत्र पांढऱ्या रंगाचे असते.तो भाव.
द्वॆ चामरॆ च - दोन्ही बाजूला चवऱ्या. राजाच्या दोन्हीकडे उभ्या राहून त्याला वारा घालणाऱ्या सेविका, हा सामान्य अर्थ. हा कोणत्याही लहानसहान राजाला लागू पडतो.
येथे जणू सूर्य आणि चंद्र याच दोन चवऱ्या आहेत महान अर्थ अपेक्षित आहे.
महतीं वसुधां - विशाल पृथ्वी. अर्थात समुद्र वलयांकित साम्राज्य.
ददाति- आईची कृपा हे सर्व काही प्रदान करते.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 18, 2020
पाकिस्तानच्या तालावर नाचणार्या हुर्रियत परिषदेच्या नेत्यांना अफजलच्या फाशीचे हत्यार, राज्यात पुन्हा असंतोषाचा वणवा पेटवायला उपयोगी पडेल, असे वाटते. अफजल काही राष्ट्रभक्त नव्हता. तो देशद्रोही होता. पाकिस्तानातल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य होता. संसदेवर हल्ला चढवून मोठ्या नेत्यांचे मुडदे पाडायचा कट त्याने रचलेला होता. पण हुर्रियतवाल्यांना मात्र तो नायक वाटत होता.
February 18, 2013
सध्या मराठा आंदोलन हिंडोळ्यासारखे हलत आहे, यात मुख्यमंत्री विरुद्ध मराठा राजकीय नेते (अजितराव सोडून), असे एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे आहेत. विषय वेगवेगळ्या तर्हेने रंगवून कलगी तुऱ्याचा फड रंग धरू लागला आहे.
ज्या राज्यातील 75 टक्के खासदार, आमदार, नगरसेवक, आणि सरपंच हे मराठा जातीचे आहेत असे चित्र आजचे नसून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचे आहे. अश्या प्रगत राज्यात हा समाज उपेक्षित, अशिक्षित, नोकरी व उद्योग धंद्यात पिछाडीवर राहिला असे मानले तर एक तर या शब्दांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, किंबहुना हे शब्द विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत असेच म्हणावे लागेल.
आज महाराष्ट्रात जितक्या शैक्षणिक संस्था आहेत, त्यातील जवळपास 65 टक्के संस्था या मराठा नेत्यांच्या आहेत, यात चांद्या पासून बांद्या पर्यंत विचार केला तर, प्रमुख नावे अशी आहेत, डी वाय पाटील, पतंगराव कदम, वसंतदादा पाटील, जयंतराव पाटील, विखे पाटील, दत्ता मेघे, विलासराव देशमुख, शरद पवार, विश्वनाथ कराड, या शिवाय छोटे नेते आहेतच. या सर्व संस्थांच्याकडे मेडिकल व इंजिनियरिंग कॉलेजेस ची भरमार आहे, आणि यातून हे शिक्षण महर्षी अब्जाधीश झाले.
या सर्व कॉलेजेसना भरमसाठ डोनेशन्स देऊन लाखो इंजिनीअर, व डॉक्टर तयार झाले. हि अफाट संपत्ती या लोकांच्याकडे आहे, त्यातील थोडी जरी उर्वरित वर सांगितलेल्या उपेक्षित समाजासाठी यांनी खर्च केली असती तर, आजची परिस्थिती उद्भवलीच नसती. याचा अर्थ यांनी समाजहित न पाहता, फक्त मतांचे राजकारण करून, स्वतःच्या तुंबड्या भरल्या. का नाही हे शिक्षण महर्षी, ज्यांची ऐपत नाही अश्या सर्व मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात घेऊन जात. इतकी वर्ष ओरबाडलेच ना? पुढची चार वर्षे नाही कमावले तर रस्त्यावर येऊन भीक मागायची वेळ नक्कीच नाही येणार या नेत्यांवर. मित्रानो मूक मोर्चा काय काढता, जाब विचारा.
आता वेळ आली आहे, याना अद्दल घडवायची, व खड्यासारखे दूर करून, यांच्या संपत्तीवर धावा बोलायाची. हा बेनामी पैसा हे लोक तुमची मते विकत घेण्यासाठी वापरतात. निवडणूका आल्या कि जवळपास एक महिना, तुम्हाला रेलचेल दारू पाजून, मटणाच्या पार्ट्या दिल्या जातात, यातच तुम्ही खुश होता. तुम्ही यांच्या मागे साहेब, दादा, भाऊ, म्हणत पळत रहाता, मग पुढची पाच वर्षे तुम्हाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात, व हे लोक मलई खात रहातात. बदला राव तुम्ही आता, आत्मसन्मान जागा करा, घाला यांच्या घरावर हातोडे, विचारा त्यांना जाब.
आरक्षण हे ढोपरला लावण्याचे मधाचे बोट आहे. आजपर्यंत आरक्षणाने किती जातींचा उद्धार झाला, आकडेवारी काढा. जरी तुम्हाला आरक्षण मिळाले तरी, संपूर्ण राज्यात पंचवीस हजार पेक्ष्या जास्त नोकऱ्या मिळणार नाहीत, अहो जिथे लाखो बेरोजगार आहेत, तिथे हा आकडा म्हणजे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे.
उद्योग धंदे सुरु करा, नवीन काही करण्याची मनीषा बाळगा, मेहनत करा, गुजराथी, मारवाडी, सिंधी, शीख लोकांच्या सारखे बना. आज आपल्या राज्यात सर्वात जास्त जमिनी, मोक्याच्या जागा या बाहेरून आलेल्या लोकांनी प्रचंड मेहनत करून मिळवल्या, त्यांचा आदर्श घ्या. या जमिनी एकेकाळी तुमच्या होत्या, त्या तुम्ही मातीमोल भावाने या नेत्यांच्या मागे लागून विकल्यात. तुमचा खूप वेळ भाऊबंदकीत जातो, उरलेला बामणांना शिव्या घालण्यात, तसेच स्थानिक राजकारण करून शेजाऱ्याच्या प्रगतीत खोडा कसा घालता येईल यात जातो, मग स्वतःची प्रगती करण्यास तुमच्याकडे वेळ कधी उरतो?
मोर्चे काढून कधीच कुणाचे भले झालेले ऐकण्यात व पहण्यात आलेले नाही, हे आळवावरच्या थेंबासारखे असते. काम धंदे सोडून या दलदलीत जाऊ नका. विनायक मेटे, सारख्या विचारवंतांच्या मागे जाल तर विनाश अटळ आहे. जाता जाता सांगतो, गांधी हत्येनंतर ब्राम्हणांची घरे जाळली, संपत्ती लुटली, कुळ कायदा लाऊन जमिनी गेल्या, म्हणून त्यांनी न आरक्षण मागितले, न मोर्चे काढले, लोकसंख्या दोन टक्के, त्यामुळे राजकारणापासून दूर राहिले, पण स्वतःची प्रगती नाही थांबवली.
मराठयांच्या सर्वात वरच्या दोन नेत्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे, त्याच्या अर्धी सुद्धा संपत्ती समस्त ब्राह्मण वर्गाकडे मिळून नाही, पण जी आहे ती समांतर विखुरलेली आहे, त्यामुळेच हे लोक माज येण्याइतके फार श्रीमंत नाहीत तसेच दारिद्र्यात पण बुडालेले नाहीत, आणि तशी वेळ आलीच तर देश सोडायची तयारी पण करतात.
।। मराठा तितुका मेळवावा ।। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
-- विजय लिमये
(9326040204)
October 13, 2016
आता तिसऱ्या प्रकारातल्या दोस्त्यांमध्ये मोडणाऱ्या दोस्तांना दोस्त म्हणणं तितकसं सयुक्तिक नसतं. कारण यामधल्या प्रत्येकाचं मनाने एकमेकांशी काहीही देणं घेणं नसतं. दारू, व्यसनं, या एकाच अजेंड्याखाली सगळे एकत्र आलेले असतात.
August 26, 2022
भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
September 3, 2020
पुस्तकांच्यामधील व पुस्तकांच्या बाहेरची सर्व माहिती गुगलमध्ये मिळते, म्हणजे गुगल एक प्रकारे गुरुचीच भूमिका पार पाडतो. गुगल २४ तास आपल्यासमोर ज्ञानाचे भांडार उघड करतो. पूर्वी कुटुंबात काही अडचणी आल्या की घरातील मोठ्या माणसांना विचारलं जायचं आता कसलीही शंका मनात आली की लहान मुलंसुद्धा सरळ गुगलचा आधार घेतात आणि आपलं शंका निरसन करून आपल्या ज्ञानात भर पाडतात.
July 8, 2026


दोन माणसांच्या बोटांचे ठसे कधीच सारखे नसतात. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करण्यात बोटांचे ठसे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र ठशांचा हा पुरावा फसवाही ठरू शकतो. कारण जर हे ठसे गुन्हा घडण्याच्या अगोदरच किंवा गुन्हा घडल्यानंतर उमटलेले असले, तर गुन्ह्याचा तपास चुकीच्या दिशेनं जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ठसे केव्हा उमटले असावेत याची माहिती मिळू शकली, तर गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या होऊ शकेल. यासाठी ठशांचं ‘वय’ शोधण्याचे प्रयत्न गेली काही वर्षं चालू आहेत; परंतु संशोधकांना यात अजून यश आलेलं नाही. मात्र नजीकच्या भविष्यकाळात हे शक्य करणारं संशोधन, अमेरिकेतल्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटी’ या विद्यापीठातील यंग जीन ली यांनी अलीकडेच केलं आहे. यंग जीन ली यांनी अँड्रयू पॉलसन यांच्या सहकार्यानं केलेलं हे संशोधन अमेरिकन केमिकल सोसायटीच्या ‘सेंट्रल सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे. हे संशोधन म्हणजे यंग जीन ली यांनी तीन वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या स्वतःच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे.
आताच्या या अभ्यासात या संशोधकांनी एकाच व्यक्तीच्या बोटांचे चौदा ठसे घेतले. त्यानंतर हे ठसे ज्या काचांवर घेतले, त्या काचा प्रयोगशाळेतच, परंतु उघड्यावर ठेवल्या. त्याचबरोबर त्यांनी प्रयोगाच्या काळातलं, प्रयोगशाळेतलं तापमान, आर्द्रता, हवेतील ओझोनचं प्रमाण, इत्यादी सर्व गोष्टींची काटेकोर नोंद ठेवली. त्यानंतर त्यांनी, या चौदा ठशांचं वेगवेगळ्या दिवशी रासायनिक विश्लेषण केलं. सुरुवातीला मोजक्या रासायनिक पदार्थांचं मिश्रण असणाऱ्या या पदार्थांना, हवेतल्या ओझोनशी झालेल्या रासायनिक क्रियांमुळे अधिकाधिक गुंतागुंतीचं स्वरूप येऊ लागल्याचं या संशोधकांना आढळलं. या ठशांतील ट्रायअसाइलग्लिसेरॉल या रसायनाचं प्रमाण सात दिवसांत, तर स्क्वॅलिन या रसायनाचं प्रमाण तीन दिवसांत लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. मात्र त्याचबरोबर या रासायनिक क्रियांत तयार होणाऱ्या डेकॅनॉइक आम्लासारख्या स्निग्धाम्लांचं, तसंच इतर अनेक रसायनांचं प्रमाण वाढत गेलं होतं. ओझोनशी क्रिया होऊन नष्ट होणाऱ्या रसायनांची, तसंच या क्रियेतून निर्माण होणाऱ्या रसायनांची, त्यांच्या प्रमाणानुसार तपशीलवार माहिती या विश्लेषणातून मिळाली. यांतील कोणत्या रसायनांच्या प्रमाणात काळानुरूप होणाऱ्या बदलाचा, ठशांचं वय काढण्यासाठी उपयोग होऊ शकतो, याचा अंदाज या संशोधकांना येऊ शकला.
यंग जी लीन आणि अँड्रयू पॉलसन यांचे हे प्रयोग प्राथमिक स्वरूपाचे आहेत. या प्रयोगांत अधिक सुधारणा करण्याच्या दृष्टीनं यापुढचे प्रयोग केले जाणार आहेत. याशिवाय पुढचे प्रयोग हे अनेक व्यक्तींवर केले जाऊन, त्यांतून सर्वंकष स्वरूपाची माहिती गोळा केली जाईल. या माहितीच्या विश्लेषणासाठी वेगळी संगणकीय पद्धतीही विकसित केली जाईल. त्यामुळे या तंत्रातील अचूकता वाढून, गुन्ह्याच्या तपासातील अचूकताही वाढण्याची खात्री या संशोधकांना वाटते आहे. किंबहुना फक्त हे संशोधकच नव्हे तर, गुन्ह्यांचा शोध घेणारे तज्ज्ञही या तंत्राबद्दल अपेक्षा बाळगून आहेत. अमेरिकेतल्या व्हर्जिनिआ राज्याच्या न्यायवैद्यक विभागातील रसायनशास्त्रतज्ज्ञ कार्ल डेसिल यांनीही, यंग जीन ली आणि अँड्रयू पॉल यांचं हे संशोधन, गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या तंत्राचं प्रमाणीकरण होण्यास काही वेळ लागणार आहे. विश्लेषणात्मक रसायनशास्त्रात होत असलेली प्रगती पाहता, हा काळ फार मोठा असणार नाही हे नक्की!
(छायाचित्र सौजन्य - byrev/Pixabay and Young Jin Lee, et al)
February 7, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti