वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सर्वच दैनिक,'सर्वांधिक खपाचे एकमेव दैनिक' असतात. मग ते सर्व दैनिक कोणते याचा मी शोध घेतो आहे. तसेच ,'गरम जिलेबी मिळण्याचे एकमेव ठिकाण' दूसऱ्या गरम जिलेबीवाल्याच्या शेजारी असते.
'आपल्या मतदारसंघाचे भले करणारा एकमेव
नेता ' असे सर्वच उमेदवारांचे प्रचारक म्हणतात. 'पर्यटकांच्या पसंतीची एकमेव यात्रा कंपनी' अशा हजारों कंपन्या असतांना
निर्धास्तपणे लिहिले जाते.
तसेच 'थंड रस मिळण्याचे एकमेव ठिकाण'
सगळ्याच ठिकाणी असतात. एखाद्या माणसाचा गौरव करतांना अतिशयोक्ती केली जाते.रिटायर कर्मचाऱ्याच्या बाबतीत,'आपल्या सेवेत एकही रजा न घेणारा एकमेव कर्मचारी .' लोक दबक्या टाळ्या वाजवतात कारण रजा न घेता गायब रहाणारा तो ख्यातीप्राप्त कर्मचारी असतो.
'एकमेव'चे फार कौतुक असते. गावामध्ये असे
खुप एकमेव असतात. फक्त अमुककडे बुलेट आहे. तो एकटाच पास झाला. तो एकमेव निवडून आला.त्याच्या एकट्याच्या विहिरीला पाणी आहे.तो एकमेव माणूस कुणालाच भित
नाही. अनेक गावात'एकमेव' बस असते. गावात जाण्याचा एकमेव रस्ता असतो.कुठे
एकमेव दुकान असते.
एकमेव असले की जास्त महत्त्व असते. पर्याय असला की महत्त्व कमी होते. अनेक
असले तरी एकमेव अशी जाहिरात करावी लागते.क्लासेसवाले शुद्धा ,'आपल्या पाल्याच्या यशाची खात्री देणारे एकमेव ' अशी जाहिरात करतात.' खात्रीचे सोने मिळण्याचे एकमेव ठिकाण' पण काही केल्या
ते एकमेव दुकान सापडत नाही. एका ठिकाणी,'ताजा खवा मिळण्याचे एकमेव ठिकाण'असे लिहिलेले होते. बघतो तर काय
चांगला महिनाभराचा शिळा खवा त्याने आमच्या माथी मारला.
'शेती औजारे मिळण्याचे एकमेव ठिकाण' त्या
ठिकाणी गेलो.कोणतीही वस्तू मागितली की
आताच संपली,उद्या नवा माल येणार आहे,सध्या तुडवडा आहे, नोकराने कुठे ठेवली त्यालाच माहीत. ती चांगली नाही, आता ती बंद झाली. अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तो आम्हाला कटवतो.जातांना
'एकमेव ठिकाण' फलक बघण्याचा मोह मला आवरत नाही.
'आमच्या गावातील शिकलेला एकमेव माणूस' लगेच छाती फुगते. अनेकांना एकमेव
असल्याचे भाग्य लाभलेले आहे. ज्यांना नाही
लाभले तेही एकमेव असल्याचा प्रचार करत
आहेत. प्रेमी देखील एकमेकांना ,'माझ्या जीवनात तु एकमेव आहे.' अशी खात्री दिली
जाते. तशी ती अनेकांना दिलेली असते. पण
हे उभयतांना माहीत असल्याने त्या खात्रीची
कुणी खात्री बाळगत नाही.
एकमेव असल्याचा तोरा वेगळाच असतो.मग
तो शिरा हलवायचा चाटू की असेना.
कौशल्याच्या बाबतीतही एकमेव असल्याचा
गाजावाजा असतो.खंब्यावर चढणारा एकमेव
माणूस,दाताने लाकूड उचलणारा वगैरे. किंवा
संचालन किंवा भाषण करणारा एकमेव व्यक्ती. उर्दू जाणणारा एकमेव व्यक्ती. खेड्यात असे एकमेव अनेक असतात. शहरात मात्र खुप पर्याय असतात.खेड्यात
एकमेव दवाखाना असतो.एकमेव शाळा असते. जिथे एकच आहे तिथे एकमेव लिहिले
जात नाही ,त्याची गरज नसते कारण ते खरेच
असते. परंतु अनेक असतांना 'एकमेव'असा प्रचार करणे हास्यास्पद आहे.
-ना.रा.खरा
मत्स्योदरी विद्यालय,अंबड
March 16, 2023
नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .
August 10, 2025
सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले.
September 11, 2021
चांगदेव आणि कुटूमातली सगळीजणा म्हशीक हाकीत हूती तरी म्हस जाग्यावरना हलत नाय हूती. चांगदेवान जावन बेडरूमातना भायर पडणारा दार उघडल्यान आणि म्हशीक हाकूक लागलो तरी म्हस जावक मागना. लय येळ प्रयत्न करून पण म्हस जागची हलना. अकेरेक चांगदेवान गाव गोळा केल्यान. संत्याकडे निरोप धाडल्यानी.संत्याची लाली म्हस मारकुटी हूती ती उभ्या गावाक म्हायती. म्हस बेडरूमात गेली कशी हेच्यावर चर्चा रंगली.
February 24, 2023
महाराष्ट्राविषयी थोरांचे विचार…
May 11, 2021
रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. 'प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते', 'ते लाचखाऊ असतात' असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.
प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना 'मामा' म्हटलं जाई.
या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:
१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.
२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.
३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.
४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.
ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.
५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.
६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.
७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.
८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.
९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.
१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.
११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.
१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.
लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.
बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत' अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.
मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.
डॉ. अविनाश वैद्य
July 23, 2022
प्राध्यापकांचे आजचे वेतन 60 ते 80 हजारांवर गेले आहे. निखळ उत्पादक मूल्याचा विचार केला तर शिक्षक किवा प्राध्यापकांच्या तुलनेत शेतकरी कैकपटीने सरस ठरतो. परंतु मिळकतीच्या संदर्भात मात्र हाच शेतकरी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भिकारडा ठरतो. हा अन्याय आहे, असे कुणालाच वाटत नाही. आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना आपलाच अन्नदाता उपाशी मरत आहे, याचा विचार कुणी करत नाही आणि आज कृषीमालाच्या किमतीत थोडी वाढ झाली तर काय थयथयाट मांडल्या जात आहे.
July 30, 2010
हजारो माणसांमधून बरोबर आपल्यासाठी योग्य असे यजमान डास कसे शोधतात, त्यासाठी त्यांना मार्गदर्शन कसे व कुठून मिळत असावे हे प्रश्नचिन्ह माणसापुढे आजही, अजूनही आहे. निसर्गतः मिळालेली ही देणगी डासांसाठी हजारो वर्षे तशीच चालू आहे.
December 29, 2018
जर कसाबवर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा दाखल झाला होता. तर मग या पुलाच्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या महानगरपालिका, राज्य शासन आणि रेल्वे प्रशासनातील संबंधीत अधिकारी व या विभागाचे नगरसेवक, आमदार व खासदार यांच्यावर देशातील निरपराध नागरीकांच्यी जिविताविरुद्ध संगनमताने कट रचल्याचा गुन्हा का दाखल होऊ नये? देशाच्या नागरीकांविरुद्धचा कटाचा गुन्हा, देशद्रोहाच्या गुन्ह्यासारखाच मानला जावा.
March 23, 2019
सामान्यतः महत्वाचे सणाच्या दिवसांमध्ये बहुतांश लोक एवढे बिझी असतात की, त्यांना या सणामध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि तासंतास पार्लरमध्ये बसण्यासाठी वेळच मिळत नाही. तुमच्या समोरही हीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला झटपट चेहरा उजळवणारे काही निवडक नैसर्गिक उपाय सांगत आहोत.
1. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर १५ मिनिट लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर रक्तचंदनाचा लेपही लावा. या उपायाने चेहरा उजळ होण्यास मदत होईल.
2. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. पिकलेली स्ट्रॉबेरी मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. हे चेहऱ्यासाठी टॉनिकप्रमाणे काम करते. या उपायाने रंग गोरा होतो.
3. चेहर्याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहर्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ दिसेल.
4. अनेक प्रातांमध्ये लोक मधाचा वापर करून फेसपॅक तयार करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार बेसन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून तयार केलेला फेसपॅक प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो.
5. फेसपॅक तयार करण्यासाठी ३ चमचे बेसन पीठ, मध, दुधाची साय आणि ऑलिव्ह तेल १-१ चमचाभर मात्रेत घेऊन एकत्र करून घ्या. हे मिश्रण २० मिनिट चेहर्यावर लावून ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धवून घ्या.
6. दक्षिण भारतातील महिला रक्त चंदन नारळाच्या मलईमध्ये मिसळून चेहर्यावर लावतात. दक्षिण भारतीय या मिश्रणाला त्वचेसाठी खूप लाभदायक मानतात.
7. हिमाचल प्रदेशातील महिला चाहेर्यासाठी सफरचंदचा वापर करतात. यांच्या मतानुसार सफरचंद ज्यूस चेहर्यावर लावल्यास चेहर्यावरील काळे डाग दूर होतात. याच्या नियमित वापरणे चेहरा उजळतो.
8. दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे चेहर्यावर लावा. २० मिनिटांनी चेहर्यावरील हे मिश्रण ओल्या कापसाने स्वच्छ करून घ्या. या उपायाने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होईल.
9. कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही ठिंब टाका. हे मिश्रण चेहरावर लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.
10. चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चेह-यावर चमक येईल. किमान तासभर हा लेप चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चमकदार होईल.
तेलकट त्वचेकरीता उपाय
1 चमचा दही, 1 चमचा बेसन, चिमुटभर हळद व 2-4 थेंब लिंबाचा रस टाकून घट्ट लेप तयार करून शरीरावर लावा. या उपायाने त्वचा निरोगी राहील आणि उजळेल.
100 ग्रॅम हळकुंड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. हे उटणे थंडीपासून रक्षण करण्यासाठी आणि कांतीसाठी उपयुक्त आहे.
थोडेसे दही घेऊन त्यामध्ये ८-१० तुळस किंवा लिंबाच्या पानांची पावडर मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. या उपायाने वारंवार चेहऱ्यावर येणारे पुरळ, फोडं यापासून मुक्तता मिळेल.
एक चमचा गव्हाचे पीठ, तांदुळाची पेस्ट, ५-६ पुदिन्याचे पानं आणि ५ गुलाबाच्या पाकळ्या एकत्रितपणे कुटून एकजीव करा. या उपायाने त्वचा कोमल होईल.
रुक्ष त्वचेकरीता उपाय
थोडेसे तीळ दुधामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी यामध्ये चिमुटभर हळद टाकून बारीक कुटून पेस्ट तयार करा. हा लेप त्वचेवर लावल्यास त्वचा तजेलदार होईल.
२ बदाम आणि एक चमचे बेदाणे रात्री दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी पेस्ट करून चेहऱ्यावर लावा.
एक चमचा तांदुळाचे पीठ, 1 छोटा चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या उपायाने त्वचा मुलायम होईल.
एक चमचा उडदाची डाळ न तापवलेल्या दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून यामध्ये थोडेसे गुलाबपाणी टाकून चेहऱ्यावर लावा.
एक चमचा दही आणि 1 चमचा बेसन पिठामध्ये गुलाबपाणी मिसळून त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाईल.
केळ बारीक करून त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मिसळुन हे मिश्रण त्वचेवर लावल्यास टॅनिंगची समस्या दूर होईल.
सौजन्य
डाँ..घोसाळकर
7798617222
`आरोग्यदूत ७' या WhatsApp ग्रुपवरुन साभार
November 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti