(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • समर्थ “समर्थ “का आहेत?

    संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे.

      June 1, 2021


  • पर्यटन आणि संरक्षण

    कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो.

      January 14, 2022


  • याला जीवन ऐसे नाव भाग ३

    निसर्गातील प्रत्येक क्रियेचा कर्ता तो परमात्मा आहे. तसेच शरीराच्या प्रत्येक क्रियेचा नियंता, प्रणेता, भोक्ता तो आत्मा आहे. आत्मा हे परमात्म्याचेच एक छोटे रूप. एक रिमोट तर दुसरा सेन्सर. हे एकमेकांच्या सान्निध्यात, समोरसमोर असले तरच चॅनेल बदलणार. संवाद जुळणार.

    माझ्या शरीरात मला काय हवंय, काय नकोय याचा निर्णय तो घेतो. मन त्याची इच्छा ज्ञानेंद्रियाकडून विचारून घेतं आणि ती पूर्ण करण्यासाठी कर्मेंद्रियाकरवी सुखाने काम करवून घेतं. त्याला जेव्हा या पूर्तीचा आनंद होतो, तेव्हा आपणाला खरे समाधान मिळते.

    हो. पाणी पिण्याशीच याचा संबंध आहे. तहान हा एक वेग म्हणून आयुर्वेदात वर्णन केला आहे.

    त्याला ज्याची खरज वाटते, त्या गोष्टी तो आपल्याशी आतून बोलत असतो, त्याला मी वेग असे समजतो. हे वेग म्हणजे नॅचरल अर्जेस. त्याचा फक्त माझ्याशी आतून होत असलेला संवाद.

    हा संवाद इतर कोणालाही कळत नाही.
    कसा कळणार ?
    मलमूत्र संवेदना, ढेकर, शिंक, अश्रू, भूक तशीच तहान लागली की नाही हे फक्त माझं मलाच कळेल ना.
    आपुला संवाद आपणासी.....
    अशी ही अवस्था ओळखता यायला हवी. यासाठी कधीतरी अंतर्मुख व्हायला हवं. आतमधे काय हवंय, हे बाहेरून जरा चाचपून बघायला हवं, की समजतं.

    पाणी किती प्यायला हवं, कधी प्यायला हवं हे तो सांगतो, त्यासाठी तो *तृष्णा म्हणजे तहान, हे लक्षण निर्माण करतो. आपल्याला समजते, मला तहान लागली, आता पाणी प्यायला हवे, आतला आवाज ओळखून तेवढेच पाणी प्यायलो की, आणखी एक लक्षण तो निर्माण करतो, ते म्हणजे तृप्ती - समाधान.
    म्हणजेच तृष्णा आणि तृप्तीच्यामध्ये तो आहे.
    त्याला विसरून कसे चालेल ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    10.12.2016

      December 10, 2016


  • चला जाणून घेऊया समर्थ रामदास स्वामींबद्दल….

    मित्रांनो, आपण मनाचे श्लोक, दासबोध किंवा त्यांचे इतर काव्य रचना जेंव्हा वाचतो किंवा ऐकतो तेंव्हा आपल्याला असे वाटत असते की जणू प्रत्यक्ष समर्थच आपल्याला ते सांगत आहेत. संतांच्या वाणीचा हा प्रभाव असतो कारण ते त्यांच्या स्वानुभवाचे बोल असतात.

      September 19, 2017


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – १

    भगवान शंकर यांच्या नावाचा उल्लेख निघाल्या बरोबर प्रत्येक भक्ताच्या मनात येणारी प्रथम गोष्ट म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग. भारतीय संस्कृतीमधील महान उपास्य स्थाने असणाऱ्या या बारा स्थानांचे महत्त्व सांगणारे स्तोत्र आहे द्वादशलिंगस्तोत्र.

      September 4, 2020


  • राष्ट्रीय उंधियो दिवस

    भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.

      January 14, 2022


  • तुकाराम बीज

    फाल्गुन कृष्ण द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी जगाचा निरोप घेतला.

      October 1, 2023


  • राज्याची आणि शेतकर्‍यांची गरिबी हटविण्याचा अभिनव मार्ग!

    याराज्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच हलाखीची असली पाहिजे. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत सरकार करू शकत नाही, यावरून हा निष्कर्ष काढलेला नाही; तर केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतरही अद्याप राज्य सरकारने तो आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला नाही, यावरून हा निष्कर्ष काढता येतो. सरकारचा आणि शेतकऱ्यांचा तसा काहीही संबंध नाही.

      October 5, 2008


  • विदर्भाकरिता नेतृत्वही आयात करूया!

    विदर्भ-मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल नेहमीच बोलले, लिहिले जाते. हा प्रदेश अविकसित आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही; परंतु हा प्रदेश इतर प्रांताच्या तुलनेत मागासलेला राहण्यामागच्या कारणांबद्दल मात्र प्रचंड मतभिन्नता आहे. विदर्भातील राजकारण्यांचा एक मोठा गट विदर्भाच्या मागासलेपणासाठी सरकारच्या पक्षपाती भूमिकेला दोष देतो.

      May 22, 2005


  • स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे

    स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६०रोजी कृष्ण जन्माष्टमी मुंबईच्या वाळकेश्र्वर येथे झाला. त्यांना लहानपणा पासूनच गायनाचे अंग होते. १० १२ वर्षाचे असताना त्यांना बासरी बाजवीण्याचा छंद जडला. मराठी शाळेतील शिक्षण संपवून मुंबईच्या एल्फिंन्स्टन स्कूल मध्ये इंग्रजीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. कॉलेज जिवनात पंडितजींना सतार वाजविण्याचे वेड जडले.

      May 7, 2011