वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दिलीप, राज, देव ही चित्रपट सृष्टीतील तीन विद्यापीठं होती. दिलीप कुमारचे चित्रपट अभ्यासून संवेदनशील, दुःखी भूमिका कशा साकारायला हव्यात हे शिकता येत होतं. राज कपूरचे चित्रपट पाहून सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं असतं हे शिकायला मिळायचं. देव आनंदचे चित्रपट हे ‘एव्हरग्रीन’ कसं जगायचं हे शिकविणारे होते. हे तिघेही सिने रसिकांच्या गळ्यातील ताईत, जसे जन्माला आले तसेच निजधामाला गेले..आधी शोमन राज कपूर, नंतर एव्हरग्रीन देव आनंद आणि आज ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार!! आता तिघेही वरती एकमेकांना गळामिठी घालून कडकडून भेटतील.
July 7, 2021
स्पॅम फोन कॉल अर्थात अनावश्यकपणे येणार्या फोन कॉलची संख्या भारतात एवढी मोठी आहे की भारताचा जगात चक्क दुसरा नंबर लागतो. ही माहिती दिली आहे आपल्याला येणाऱ्या फोनचा नंबर तात्काळ मोबाइल स्क्रीन वर दाखवणाऱ्या ट्रुकॉलर (Truecaller) या ॲपच्या निर्मात्यांनी.
December 19, 2018
नमोऽस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।१।।
जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया।
एकाप्यनेकरूपाऽसि जगदम्ब नमोऽस्तु ते।।२।।
सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते।।३।।
सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोऽस्तु ते।।४।।
विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोऽस्तु ते।।५।।
प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिको परा।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोऽस्तु ते।।६।।
शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोऽस्तु ते।।७।।
जगदम्ब नमोऽस्तु ते हिते जय शम्भोर्दयिते महामते।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा।।८।।
तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम्।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्।।९।।
इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रं संपूर्णम् ।।
May 1, 2020
मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.
March 8, 2026
सगळयाच निवृत्तीधारकांसं निवृत्ती नंतर काही दिवस व महिने बरे वाटते कारण रोजच्या धकाधकीच्या घाईगर्दी व लोटालोटीचा ट्रेनचा प्रवास सरलेला असतो. मुख्य म्हणजे मस्टर नसते त्यात पुरूषांना सकाळी आरामात ऊठता येते त्यामुळे वेळ बरा जातो. काही जणांची नोकरी व्यवसायात मिळणारी चिरीमीरी बंद झाल्याने आर्थिक तंगी असते. कुटुंबाची आर्थिक ओढाताण व्यसनं व नसत्या गरजा पैशा विना कशा पुर्या करायच्या हे प्रश्न मनात सतावत असतात. तसेच मानाची खुर्ची व पद नसल्याने सगळी कामे स्वतःहून करणे क्रमप्राप्त असते आणि हेच कुठेतरी खटकतं म्हणून निवृत्ती नको असते. निवृत्तीपासूनच निवृत्त असा पृथ्वीतलावर एकच अपवाद असेल तो म्हणजे राजकारणी !
June 10, 2011
बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ?
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६.
ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे.
पिढ्या बदलल्या की विचार बदलूं शकतात, नव्या पिढीला जुन्या संबंधांची जाण असतेंच असें नाहीं, आणि असलीच तर, पर्वा असतेच असें नाहीं. इतिहासात याची अनेक उदाहरणें दिसून येतात.
एक उदाहरण पाहूं या . ओरंगझेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजपुत्रानें शाहूला कैदेतून सोडलें. तो महाराष्ट्रात आला व त्याचा, राजारामाची पत्नी ताराबाई हिच्याशी संघर्ष सुरूं झाला. धनाजी जाधव, त्याचा कारभारी बाळाजी विश्वनाथ वगैरे मंडळी शाहूच्या पक्षात गेली. शाहू छत्रपती झाला. तरीही सरखेल कान्होजी आंग्रे ताराबाईच्या पक्षात होता. बाळाजी विश्वनाथ यानें कान्होजीचें मन वळवलें व त्याला शाहूच्या पक्षात आणले. यानंतर बाळाजी विश्वनाथ व कान्होजी आंग्रे यांच्यात फार चांगले संबंध राहिले. पुढे बाजीराव (पहिला) यानेंही जंजिरा मोहिमेच्या वेळीं आंग्र्यांची मदत घेतली होती. बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नानासाहेब हा पेशवा झाला. त्याला सर्व मराठी सत्ता स्वत:च्या हातात हवी होती. (त्या गोष्टीच्या कारणांची व योग्यायोग्यतेची चर्चा येथें अभिप्रेत नाहीं ). नानासाहेबानें तुळाजी आंग्रे याला पकडून तहहयात कैदेत डांबले, व कैदेतच तुळाजीचा मृत्यू झाला. केवळ चाळीसएक वर्षांमध्ये आणि २ पिढ्यांतच, विचारांमध्ये एवढा अमूलाग्र बदल घडून आला. खरें तर, बालाजी विश्वनाथाला पेशवेपद मिळाले, त्याला अप्रत्यक्षपणें कान्होजी जबाबदार होता. कारण, जेव्हां शाहूनें बाळाजीला कान्होजीशी लढायला सागितलें, त्या वेळी बाळाजीनें पेशवेपद मागून घेतलें, आणि नंतर कान्होजी शाहूच्या पक्षाला मिळाल्यावर बाळाजीचा दबदबा वाढला. परंतु, दोन पिढ्यांनंतर नानासाहेबानें जुन्या गोष्टी बाजूला ठेवून त्याच्या तत्कालीन लक्ष्यांचा व धोरणांचा अवलंब केला आणि आंग्रे कैदेत पडला.
९६ वर्षांपूर्वी गिरगांवातील कोळ्यांनी आपली ज़मीन दिली, त्यानंतर आतां चौथी पिढी चालूं आहे. सरकारें बदलली, सरकारी अधिकारी बदलले. आतां ते सध्याच्या परिस्थितीचा विचार करून त्याप्रमाणें निर्णय घेणार. शंभर वर्षांपूर्वी या बिचार्या कोळ्यांच्या पूर्वजांनी काय केलें, याला आतां विचारतो कोण !
नानासाहेब पेशव्याच्या एकूण वृत्तीचा मराठेशाहीला किती फायदा-तोटा झाल, हें पुढे पानिपतानें दाखवून दिलेंच. मान्य, की पानिपताशी आग्र्यांचा संबंध नव्हता, पण नानासाहेबाच्या वृत्तीचा तर होता ना!
असें म्हणतात की, इतिहासाकडून माणसानें शिकावें. पण इथें इतिहास वाचायला वेळ कुणाला फुरसत आहे ? इतिहासातून शिकण्याची बात तर दूरच !
- सुभाष स. नाईक
June 28, 2016
सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो.
October 14, 2020
१९८३ ची विश्वचषक स्पर्धा सुरुवातीपासून नाटयमय ठरली. काही धक्कादायक निकाल या स्पर्धेत नोंदले गेले. भारत, झिंम्बावे या तुलनेने दुबळया संघांनी साखळी फेरीत वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या बलाढय संघांवर विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली.
June 25, 2022
हरीद्वारला आमचा मुक्काम विष्णू घाटावरील एका लहानश्या आणि बऱ्याश्याही हाॅटेलात आहे. हाॅटेलातील रुमच्या खिडकीतून समोर अव्याहत वाहणाऱ्या गंगेचं सततच दर्शन होतं असतं.
May 24, 2017
भारतीय रेल्वेवरील जीवनवाहिनी एक्सप्रेस म्हणजेच रुळांवर चालणारं एक फिरतं रुग्णालय. अशी गाडी सुरू करण्याचा पहिला मान भारताकडे आहे. १९९१ सालात खलारी या बिहारमधील गावापासून ही सेवा सुरू झाली व गेली २४ वर्षे तिच्या मार्गावरील, भारताच्या कानाकोपऱ्यांतील छोट्या गावांपर्यंत ही गाडी जात असते.
June 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti