वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती.
February 20, 2011
दिल्लीत श्री दत्त विनायक मंदिरात दरवर्षी दास नवमीच्या निमित्ताने समर्थांचे विचार आणि शिकवण लोकांपर्यंत पोहचविण्या साठी कार्यक्रम होतात. या वर्षी मनोबोधावर कार्यक्रम होता. श्रीरामाचा सर्वोत्तम दास कसा असतो या विषयावर आपल्या अल्प बुद्धीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
August 16, 2014
November 30, 2016
प्रकाशन दिनांक :- 16/05/2004
चौदाव्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम परिणाम बाहेर आले आणि संसद पुन्हा एकदा त्रिशंकू राहील हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास त्याला आपण केवळ ‘विस्कळीत’ एवढेच म्हणू शकतो. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत तर दूरच राहिले निसटत्या बहुमताच्या जवळपासही फिरकू दिले नाही.
May 16, 2004
मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली.
November 6, 2017
बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे ५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ.
November 14, 2023
‘डिसेंबर’मध्ये जन्मलेल्या व्यक्ती ह्या “दृढनिश्चयी, समजूतदार, महत्त्वाकांक्षी व शिस्तप्रिय” मानल्या जातात. चालू ‘डिसेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
December 11, 2025
एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.
बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’
राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही.
आनंद ची भूमिका राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.
या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब
"मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."
“ना जिया लागे ना...”
"जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."
"कहीं दूर जब दिन ढल जाये..”
चारही गाणी अप्रतिम
या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.
आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.
https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 12, 2022
…सरकारी कार्यालयाचे वाॅचमन, कार्यालयातील शिपाई, लिफ्टमन आदींचं समाधान दोन-पाचशे रुपयांच्या वर्गणीवर होतं. कारण त्यांची मजल तेवढीच असते. तेवढ्यावर मिळणारं एखादं गटार त्यांना पुरेसं असतं. खरी गटारी तर त्यांच्या पुढच्या डेसिग्नेशन्सवर असलेल्यांची आणि त्यांची तिथे नेमणूक करणार्या राजकारण्यांची असते. हे गटारी निमित्त वर्गणी वैगेरे काढत नाहात. ते एका दिवसाच्या गटारीवर समाधानीही नसतात. त्यांची गटारी वर्षभर सुरुच असते आणि लोळण्यासाठी गटारं असतात, ती ‘लाचे’ची, कॅश आॅर काईंड आॅर बोथ..! ही गटारं साधी, झोपडपट्टीतल्यासारखी गरजेपोटी निर्माण झालेली नसतात, तर मुद्दामहून तयार केलेले परंतू वरून गुळगुळीत गिलावा केलेले मोठे, गलित्छ नाले असतात…
July 26, 2017
श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.
श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti