वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो.
September 29, 2025
पूर्वीच्या कचेऱ्या ब्रिटिशकालीन बांधणीच्या असल्यामुळे त्यांचं छत फार उंच असायचं. उंचावरून लोंबत पंखा तोलणारे लांबच लांब पोकळ लोखंडी पाइप आणि त्यांना लावलेले पंखे काचेऱ्यांत जागोजागी लटकलेले असायचे. बरं हे पंखे, जेवण जड झाल्यासारखे दिसायलाही तुंदीलतनू आणि त्यांची पातीही जाड आणि जड अंतःकरणाने फिरल्यासारखी फेरे घ्यायची. वेगाच्या अगदी वरच्या नंबरवर ठेवला तर कुठे खाली बसणाऱ्याना थोडीफार हवा लागायची झालं.
August 31, 2022
लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख.
December 26, 2016
प्रत्येक देवतेच्या निर्गुण-निराकार स्वरूपाचे वर्णन करणे हे जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांचे वैभव. भगवान विष्णूंच्या अशा स्वरूपाचे वर्णन करताना ते म्हणतात…..
October 3, 2020
आपल्या सातत्यपूर्ण कारकिर्दीने क्रिकेटच्या इतिहासालाच एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवणार्या सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा आरंभ या दिवशी झाला. सचिन तेंडुलकरच्या पदार्पणावर बरोब्बर तीन वर्षांनी (१९९२) रमाकांत आचरेकर सरांच्या आणखी एका चेल्याने कसोटी पदार्पण साजरे केले आणि अगदी दणक्यात शतक ठोकून. १५ नोव्हेंबर १९९२ रोजी डर्बनमधील किंग्जमीडवर प्रवीण आमरेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६४ धावा काढल्या. आदल्या दिवशीचा खेळ संपताना तो ३९ धावांवर नाबाद होता.
November 14, 2010
आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे.
September 14, 2016
दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.
November 8, 2018
भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते.
April 3, 2019
ग्रामीण, निमग्रामीण भागातल्या लोकांचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध असावा यात काही नवल नाही. या निसर्गाच्या सान्निध्यातूनच पाळीव तसंच वन्य पशु-पक्षी जगत हे या जीवनाचं एक महत्वाचा घटक बनून गेलेले असतं. कृषीउद्योग आणि पशु संवर्धन हे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे, ग्रामीण जगतामधे पशु संवर्धनाला मानाचं स्थान असावं हे उघडच आहे. परंतु एकंदरीतच अमेरिकन जीवन प्रणालीमधे निसर्गाला आणि त्या अनुशंगाने पशु पक्षांच्या संवर्धनाला खूपच महत्व आहे. या संवर्धित नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कॅंपिंग, हायकिंग, हंटिंग, फिशिंग अशा विविध छंदांसाठी करून घेऊन, लक्षावधी अमेरिकन्स आपलं जीवन निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करून समृद्ध करून घेत असतात.
या लोकांचं शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यप्राणी जीवनासंबंधित छंदांचं (फोटोग्राफी, वन्यप्राणी अवलोकन वगैरे) वेड किती जबरदस्त आहे याची कल्पना २००६ च्या एका अहवालावरून येते. त्या साली ८७.५ दशलक्ष अमेरिकन्सनी या छंदापायी १२,२०० कोटी (१२२ बिलीयन) डॉलर्स खर्च केले. यापैकी ३० दशलक्ष लोकांनी आपला मासेमारीचा शौक पुरा केला, १२.५ दशलक्ष लोकांनी आपली शिकारीची हौस भागवून घेतली तर ७१.१ दशलक्ष लोकांनी वन्यप्राणी जीवनाचं अवलोकन, फोटोग्राफी असले छंद पुरे करून घेतले.
शिकारीच्या आकारमानानुसार अमेरिकेतल्या शिकारीचे तीन प्रकार होतात.
मोठ्या प्राण्य़ांची शिकार – यात मुख्यत: हरीण, एल्क (आपल्याकडच्या बारशिंग्यासारखं हरीण), अस्वल आणि जंगली टर्कीचा समावेश होतो. यात हरणांची शिकार करणारे १०.१ दशलक्ष, आणि टर्कीची शिकार करणारे २.६ दशलक्ष हे संख्येने सर्वाधिक.
लहान प्राण्यांची शिकार – यात ससे, खारी, फेसंट्स (जंगली कोंबड्या) आणि क्वेल (छोट्या रानकोंबड्यांचा प्रकार) हे मुख्यत्वे येतात.
स्थलांतरित पक्षांची शिकार – यात प्रामुख्याने ऋतुमानानुसार स्थलांतर करणार्या बदकं, गीज, कबुतर अशा पक्षांचा समावेश होतो.
गावाकडल्या बर्याच लोकांसाठी शिकार हा निव्वळ एक छंद न रहाता दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भागच असतो. गावातल्या फार्मस्वर जावं तर बंदुका म्हणजे आयुष्याचा एक घटकच वाटायला लागतात. जनावरांच्या गोठ्याच्या दरवाज्याआड, गॅरेजमधे, पिक-अप ट्रकच्या मागच्या अंगाला, बंदुका कायमच पडलेल्या असतात. उभ्या पिकात घुसणारी हरणं, शेळ्या-मेंढ्या किंवा वासरांनाच ठार करणारे कायोटी किंवा क्वचित लांडगे, परसदारात येऊन घरातल्या कुत्र्या मांजरांवर हल्ले करणारी अस्वलं किंवा बागेतल्या भाजी पाल्याची नासधूस करणारे ससे किंवा रकून्स बघितले की या बंदुकांचा उपयोग ठायी ठायी कसा होत असेल, हे जाणवल्याशिवाय रहात नाही. उगाच नाही आज अमेरिकेत २५० दशलक्ष बंदुका आहेत.
या सार्या शिकार, मासेमारी आणि एकंदरीतच वन्यजीवनाच्या सान्निध्याच्या ओढीचं मूळ, सतराव्या- अठराव्या शतकातील, अमेरिकेचा गोर्या लोकांना अनभिज्ञ असा अफाट विस्तार धुंडाळून, हा खंडप्राय देश पायतळी घालणार्या धाडशी बहाद्दरांमधे सापडतं.
क्रमशः ....
-- डॉ. संजीव चौबळ
October 17, 2016
अॅलन बॉर्डर ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू पहिला मानून जो एन्जेल (पदार्पणवीर) बाद झाला तिथपर्यंतचे कर्टली अॅम्बोजने टाकलेले चेंडू मोजल्यास ते अवघे ३२ भरतात आणि या बत्तीस चेंडूंवर अॅम्ब्रोजने केवळ एक धाव दिलेली होती !!
January 30, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti