(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निवडणूक आयोगाचा वर्धापन दिन

    भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो.

      January 25, 2022


  • बालभारतीचा इतिहास पुस्तक आणि फिल्मच्या रूपात

    राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत आणि प्रगतीत `बालभारती`ची भूमिका मोलाची आहे. बालभारतीच्या या वैभवशाली इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होतं. ‘बालभारती’च्या सुवर्णमहोत्सवाचे निमित्त साधून संस्थेच्या इतिहासाचा-वाटचालीचा दस्तऐवज (डाॅक्युमेंटेशन) करण्याचं ठरलं. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साकारलेलं हे पुस्तक बालभारतीच्या तसेच राज्याच्या शैक्षणिक-सामाजिक वाटचालीचा महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे.

      November 29, 2017


  • भारतीय अभिजात संगीत

    संगीत हे मानवाच जीवनावश्यक असे घटक आहे. कारण भारतीय अभिजात संगीत हे पुरातन काळापासून देव दैत्य दानव अशा प्रत्येक व्यक्तीला आवडणारे व त्यात प्राविण्य असणारे असे हे संगीत आमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहे आणि तोच वारसा घेऊन आम्ही हे संगीत पुढे नेत आहोत. ज्यात आमच्या म्हणजे मानवाच्या प्रत्येक एक्टिविटी मध्ये संगीते अत्यावश्यक आहे .

      April 21, 2021


  • रोग परवडला!

    प्रकाशन दिनांक :- 02/01/2005
    तिकडे सुनामी लाटांनी दक्षिण भारताच्या किनारपट्टीला धुऊन काढले आणि त्याच वेळी पश्चिम किनाऱ्यावरील मुंबईत देशी दारूच्या लाटांनी जीवघेणे थैमान घातले. विषारी दारू प्राशन केल्याने तब्बल 83 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. केवळ आठवडाभराच्या आतच दोन वेगवेगळ्या घटनांत एवढ्या मोठ्या संख्येत बळी गेलेल्या लोकांमुळे अवैध दारूचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

      January 2, 2005


  • श्रीदत्तजयंती

    मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात.

      October 1, 2023


  • पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस

    प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती.

      September 21, 2021


  • त्रयोदशगुणी विडा

    विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो.

    १. कात : अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.

    २. जायफळ : तोंडाची दुर्गंधी दूर करणे.

    ३. ओवा : पोटदुखी थांबणे.

    ४. सुपारी : दात बळकट होतात.

    ५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते.

    ६. लवंग : दुर्गंधी व कफ कमी होते.

    ७. बडीशेप : वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.

    ८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.

    १०. ज्येष्ठमध : आवाज सुधारतो.

    ११. कापूर : जंतुनाशक.
    चुना : कफाचा नाश व उलटी थांबते.

    १२. केशर : सर्दी कमी होते.

    १३. नागवेलीची पाने : सुवासिक व दुर्गंधीनाशक.

    अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
    आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत.

    पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.

    श्रीधर कुलकर्णी
    ज्ञानामृत मंच ग्रुप

      March 12, 2017


  • कर्करोगाची लक्षणे (भाग १)

    स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते.

      June 1, 2023


  • अमेरिकेतील नगररचना

    अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले.

      April 9, 2023


  • नक्कीचं उजाडेल..!

    आपण अनेक शंकासुराच्या काटेरी कुंपणातुन गेलो आहोतचं, पण थोडे आपले बोल असत्याच्या चौकातून सत्याच्या मार्गाकडे रममाण झाले तर थोडं लवकर नक्कीच उजाडेल…!

      April 26, 2020