वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी.
May 4, 2018
पण अशाच परिस्थितीत जर एखादा व्यक्ती शांत राहिला तर शाब्दिक वाद होत नाही आणि समोरचा व्यक्ती चा राग पण लवकर शांत होतो. असे केल्याने बोलणाऱ्याचे मन दुखावल्या जात नाही.
April 24, 2024
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
December 12, 2016
लेखिका – उषा शशीकांत जोशी – बहिणाबाई किंवा बहिणाबाईंची गाणी ही मराठी भाषेतील अपूर्व निर्मिती आहे. लौकिक अर्थाने त्या अडाणी (अनपढ) निरक्षर होत्या. लेखन, वाचनाच्या संस्कारांची सुतराम ही शक्यताही नव्हती. त्यामुळेच त्यांच्या निसर्गदत्त प्रतिमेबद्दल आश्चर्य वाटावं इतकी त्यांची कविता, शब्द, वाक्य, ध्वनी, छंद, यमक, अनुप्रास अशा भाषेच्या नियमांमध्ये पूर्णपणे बसणारी आहे. खरोखर अलौकिक प्रतिमेचं देणं म्हणजे काय याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे बहिणाबाईंची कविता होय.
August 27, 2019
एकूणच इथला भारतीय समाज, हा गतानुगतिकतेत अडकलेला आहे. प्रचंड अंधानुकरण आणि “बाबा वाक्यं प्रमाणम!!: हे इथल्या जीवनाचे प्रमुख सूत्र मांडता येईल. ज्या प्रमाणे मुली नको तितक्या पुढारलेल्या आहेत, त्याच प्रमाणे मुले देखील, अमेरिकन संस्कृतीचे तसेच अनुकरण करीत आहेत, न्यूयॉर्क मधली fashion हा इथल्या जीवनाचा मूलमंत्र आहे. केसांचे वळण(जीवनाला कसलेच “वळण” नाही!!), कपडे त्याच प्रमाणे घालायचे इत्यादी.
August 25, 2018
ही लोकशाही आता सर्वसामान्य लोकांची राहिलेली नाही. मूठभर लोकांनी मूठभर लोकांच्या भल्यासाठी संपूर्ण जनतेला वेठीस धरून, लुबाडून चालविलेली व्यवस्था म्हणजे भारतातील वर्तमान लोकशाही असेच म्हणावे लागेल. भारत अराजकाच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे म्हणतात आणि ते खरेच आहे.
December 4, 2011
श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.
श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
सुरुवातीला काही वर्षे सी.टी. स्कॅन मशिन्स ही फक्त डोक्याचेच स्कॅन करीत असत; परंतु विज्ञानातील व मुख्यत: संगणक शास्त्रातील प्रगतीमुळे पूर्ण शरीराचे स्कॅनिंग होऊ लागले.
November 22, 2010
असे का ?
मांस खाण्याविषयी दोन माणसांमधे तरी एकमत कुठे होते. ? प्रत्येकाच्या धारणा वेगवेगळ्या. प्रत्येकाची मते वेगळी. परस्पर अगदी विरूद्ध.
भारतातील हिंदु गाईला माता मानतात, ते गोमांस खात नाहीत, तर इतर देशा धर्मातील नव्हे तर भारतातील मुसलमान गोमांस खातात. ते माता बिता काही मानत नाहीत. पण मुसलमानांना डुकराचे मांस पूर्णतः निषिध्द. नाव सुद्धा चालत नाही. बाकी दोघांनाही शेळ्या मेंढ्या बकऱ्या चालतात. असे का ?
भारतातील जाऊ देत, जपानमधे कच्च्या मांसाचे लोणचे चटणी आवडीने खाल्ली जाते, तर इंग्लंडमधे मात्र कच्चे मांस खाणे अशिष्टपणाचे समजले जाते. असे का ?
चीन तैवान मधे कुत्र्याचे मास खाल्ले जाते, पण युरोपीयन देशात कुत्र्याचे मांस हा शब्द उच्चारला तरी ए, कुत्र्या म्हणून शिवी ऐकायला येईल. असे का ?
अरब देशात घोड्याचे आणि उंटाचे मांस प्रिय आहे, ऑस्ट्रेलियातून घोड्याचे मांस अरबांना विकले जाते, म्हणून अमेरीका, ऑस्ट्रेलियावर बंदी घालायची मागणी करते. असे का ?
डुकराचे साॅस खाणारे जर्मन, म्हणून इंग्रज लोक त्यांची टिंगल करतात, तर मासेमारीसाठी विनाकारण वेळ फुकट घालवणारे म्हणून इंग्रजांची जर्मनीमधे चेष्टा होते. असे का ?
अर्जेंटिना, मेक्सिको येथे हाॅटेलमधे जिवंत प्राणी तुमच्यासमोर आणून त्यातील कोणता अवयव तुम्हाला आहे, असे विचारून तुमच्या समोरच त्याला कापून तो अवयव तुम्हाला देतात, हे पाहून युरोपीयन माणूस चक्कर येऊनच पडतो. असे का ?
मध्यपूर्वेमधले देश प्राण्यांची हत्या करताना त्यांचा गळा चिरतात आणि वाहाणारे रक्त गर्दी करून गटागटा पितात, हे वाचताना देखील अस्सल मांसाहारींच्या अंगावर काटे येतात. असे का ?
भारतातील अस्सल मांस खाणारा जेव्हा अमेरीकेत किंवा युरोपमधे जातो, तेव्हा तेथील स्टेक म्हणजे नुसत्या वाफवलेल्या मांसाच्या तुकड्याला घश्याखाली घालवताना यांचा जीवच जातो. असे का ?
भारतातील बंगाली माणूस माशाचे डोकेपण आवडीने खातो, पण बिहारी लोकांना, साधे मासे पण खाता येत नाहीत, म्हणून बंगाली बाबु चिडवतात. असे का ?
भारतातील शीख लोक एका झटक्यात मारलेला प्राणीच खाण्यासाठी वापरणार पण मुसलमान मात्र प्राण्यांचा गळा अर्धा चिरून सारे रक्त वाहून गेल्यावर, हाल हाल होऊन मेल्यानंतरचे हलाल मांस खातात. दोघांनाही दुसऱ्या प्रकारचे मांस अजिबात चालत नाही. असे का ?
हे सर्व बारकाईने पाहिले असता असे लक्षात येते, की मूळ संस्कार, तेथील नैसर्गिक उपलब्धता, धर्म भावना, जमिनीची कृषी उत्पादनांची सकसता आणि स्वाभाविक ओघ इथपर्यंत आपण पोचतो.
जिथे अन्नधान्यांचे उत्पादनच न के बराबर आहे तिथे जगण्यासाठी मांस खाण्यावाचून पर्यायच नव्हता. पण आता तसे नाही. काळ बदललाय, संसाधने बदलली आहेत. मेहनत केली तर, अन्नधान्याचा तुटवडा कधीही पडणार नाही एवढी उपजाऊ जमिन शिल्लक आहे, अशा देशात आता शेतीमधे बदलाचे वारे वाहू लागले आहेत....
गरज आहे आपल्या मानसिकतेमधे बदल करण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
7.10.2016
October 7, 2016
चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …
October 27, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti