(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजीर्ण

    न जीर्यती सुखेनान्नं विकारान् कुरुते डपिच |
    तदजीर्णमिति प्राहुस्तन्म्ला विविध रुजः |

    सेवन केलेल्या आहाराचे सम्यक् परिणमन (पचम) न होता तो अपक्वावस्थेतच राहणे म्हणजे अजीर्ण होय. अगिमांद्यजनीत हे अजीर्ण विविध प्रकारच्या रोगांचे कारण होऊ शकते. ‘डॉक्टर, मला अजीर्णाचा त्रास आहे.’ अशी तक्रार प्रत्येक डॉक्टरांकडे घेऊन दिवसांतून एखादा तरी रुग्ण सर्रास पहायला मिळतो. साधारण २५ टक्के तरी लोक अजीर्णाने ग्रासलेले आहे.

    आता आपण जर ही पाश्चाेत्य जीवनशैली बदलून आपली भारतीय संस्कृतीचे अनुकरण केले नाही, तर ही टक्केवारी वाढत जाईल. अजीर्णाचे रुग्ण वाढतील व त्याचबरोबर अजीर्णाने मोठ-मोठ्या आजारांना आमंत्रण मिळेल.

    अजीर्णाची कारणे
    विषमाशन – आयुर्वेदामध्ये आहार हा कधी घ्यावा, कसा घ्यावा, कीती घ्यावा, कुठल्याक्रमाने घ्यावा, कुठल्या संयोगाने घ्यावा, कीती शिजलेला घ्यावा व कोणत्या विधिनुरूप घ्यावा याचे काही नियम सांगितलेले आहे. पण आपण मात्र या नियमांविरुद्ध जेवण घेतो यालाच विषमाशन म्हणतात. आज बहुतांशी आई-वडिल दोघेही काम करतात. त्यामुळे जेवण हे एकदाच बनवले जाते व तसेच ते फ्रीजमध्येही ठेवले जाते. संध्याकाळी आल्यावर मायक्रोव्हेवमध्ये गरम केले की झाले. पण या सवयीमुळे आपली फ्वन शक्ती कमी होते. ‘रेड टू यूज’ पॅनटचा जास्त वापर घरात व्हायला लागला. क्षारयुक्त व रसायने वापरून टिकवलेल्या पदार्थांमुळे पौष्टिकता कीती? बर्यासचवेळा सकाळी डब्यासाठी शिळेच अन्न नेले जाते. ताज्या फळाऐवजी ‘फेव्हरेट जूस’लाच सगळ्यांची जास्त पसंती आहे. भाज्यापण आठवड्याभराच्या फ्रीजमध्ये भरून ठेवल्या जातात. त्यामुळे ताजेपणाचा विचार हा केलाच जात नाही. वेळेअभावी जीवनशैली बदलली, पण आजारही वाढले.

    आज हॉटेलमध्येही सर्रास खाणे-जेवणे वाढले. भाजी, मांस, मटण याची स्वच्छता, निवडणे हा विचार तर केलाच जातच नाही. जीभेला बरे लागते ना मग झाले. खाली आसनमांडी घालून शांत जेवणे ही प्रथा तर आता नष्टच झालेली आहे. हॉटेलमध्ये म्हटलं की परत वर खुर्चीवर बसून गप्पा गोष्टी करत टीव्ही पाहत जेवले म्हणजे आपण काय खातो व कीती खातो याचा तर अंदाजच लागत नाही. फॅशन म्हणून चिकन-मटण खाऊन परत वर आणि आईस्क्रीम खातात किंवा स्वीट डीश खातात. परिणामतः शरीरात कफदोष वाढतो व खालेले पचत नाही व सर्दी, खोकला सारखे त्रासही होतात.

    त्याचप्रमाणे हल्ली आपण संध्याकाळी कामावरून घरी येताना समोसा, वडा, केक, भजी यासारखे पदार्थ आणतो, म्हणजे जेवणापूर्वी खाल्ले जाते. जेवण बनवायला उशीर असल्याने हा पर्याय निवडतात. पण याने होत काय तर साहजिकच रात्री उशिरा जेवले जाते. त्यानंतर सोफ्यावर आडवे पडून मालिका बघण्यात अभ्यास करण्यात चॅट करण्यात वेळ घालवतो. जेवणं होईपर्यंत मध्यरात्र होते व आपण लगेच झोपतो. त्यामुळे खाल्लेले जेवण पोटात तसेच पडून राहते. रात्रीचे अन्न पचन नाही. त्यामुळे सकाळी शौचाला होत नाही. पोट साफ नसल्यास निरुत्साह वाटतो. परत सकाळी बाहेर पडायच्या गडबडीत नाश्ता करतो किंवा तसेच बाहेर पडतो. मग दुपारी आणलेला डबा भूक लागू दे किंवा न लागू दे वेळ झाली की खातो. पौष्टिक अन्न जरी असले तरी शांतचित्ताने न जेवल्यास किंवा टेन्शन, राग, दुःख, भीती अशा भावना मनात असल्यास पचन नीट होत नाही व खाल्लेले अंगाला लागत नाही.

    वेगविधारण – खाल्लेले अन्न पचते की आपल्याला सपाटून भूक लागते, सकाली उठल्या उठल्या शौचास जाण्याची संवेदना होते, पण सकाळी शौचास न झाल्याने अवेळी होते व मग वेगाचा धारण केला जातो व दोष प्रफुल्लित होऊन पचनसंस्था बिघडते.

    दिवास्वाप – रात्रीजागरण – आपल्या जीवनाचं सगळंच वेळापत्रक बदलल्याने आपण रात्री उशिरा झोपतो व ती झोप पुरी करण्यासाठी दिवसा झोपतो. अति गुरु-शीत-स्निग्ध-विदाही अशा आहाराचे सेवन करणे या सर्व कारणांनी अग्निमेद होतो आणि अजीर्ण ही व्याधी उत्पन्न होते.

    काही वेळा द्रवरूप पित्त वाढते. प्रफुल्लित झालेले पित्त व कफाने अवरोध होऊन अन्न पोटात पडून राहते. पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांमुळे कोष्ठाच्या इतर भागात प्रक्षोभ होऊन भूक लागल्यासारखी वाटते. ही खरी भूक नव्हे. अशावेळी आहार घेतला जातो व साहजिकच अजीर्णाची उत्पत्ती होते. म्हणूनच खूप खाल्लेतरीही अंगाला लागत नाही.

    अजीर्णाची सामान्य लक्षणे
    भूक न लागणे, तोंडास चव नसणे, पोट जड वाटणे, पोटात आवाज येणे, गॅस होणे, कधी पातळ संडास कधी मलावरोध, अंग दुखणे, अंग जड होणे, डोके दुखणे, भरभूर जांभया येणे, अंग मोडल्याप्रमाणे होणे.

    आमाजीर्ण असल्यास कफ वाढतो व थोडसेही खाल्ले तरी पोटजड होते. रुग्णास अम्लरहित अशा किंवा ज्या प्रकारचे अन्न घेतले असेल त्याचा रस गंध असलेल्या ढेकरा अतिप्रमाणात येतात.

    विदग्धाजीर्ण – पित्तप्रकोपाने विदग्धाजीर्ण होते. घशाशी आबंट, तिखट, कडवट येणे, छातीत पोटात जळजळणे, जास्त घाम येणे व तहान फार लागणे. अशी लक्षणे दिसतात.

    विष्टब्धाजीर्ण – या प्रकारात वायू व पुरीष यांचा अवष्टंळ होतो. विविध प्रकारच्या वेदना, आध्यान, डोकेदुखी, अंग दुखणे अशी लक्षणे दिसतात.

    अजीर्णामध्ये घ्यायाची काळजी व उपचार
    अजीर्ण झाले असता, सर्वप्रथम खाल्लेले अन्न जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत उपाशी रहावे. नंतर जसजसा अग्धी वाढेल, भूक लागेल त्याप्रमाणात, विविध प्रकारचे यूश, लिंबू सरबत, ताक, पेया, फलरस आणि द्रवाहार द्यावा.

    जेवणाच्या वेळा चुकवू नये. दुपारचे जेवण १-२ च्या दरम्यान व रात्री शक्यतो ९ च्या अगोदर. भूक नसल्यास जेवणापूर्वी आल्याच्या तुकड्यावर सैंधव घालून चघळावा. रात्री नुकतेच सॅलाड वैगेर खाऊ नये. अन्न शिजवूनच खावे.

    जमत असल्यास आठवड्यातून एक वेळ उपवास करावा. साबुदाणा खिचडी खाऊन नव्हे, तर पोटाला पूर्ण विश्रांती द्यावी. जेवताना शांत चित्ताने, एकाग्रतेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ताटातल्या जेवणावर भरपूर प्रेम करावे.

    औषधी द्रव्यांमध्ये त्रिटकू, पंचकोल, शंखवटी, हिंग्वाष्टक चूर्ण, आमपाचक वटी, भास्कर लवण उपयुक्त ठरतात.

    आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आहारासंबंधी नियम पाळल्यास अजीर्णाचा त्रास होणार नाही. आहाराचे योग्य तर्हेंने पचन होऊ लागले म्हणजे अजीर्ण होत नाही. शुद्ध ढेकर, उत्साह वाटणे, मलमूत्रादिंचे वेग योग्य प्रकारे येणे, चांगली भूक लागणे, शरीर लाघव प्राप्त होणे ही अन्नाचे संपूर्ण पचन झाल्याची लक्षणे होय व पर्यायाने अजीर्ण न घेण्याची.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- डॉ.मनाली महेश पवार

      January 23, 2017


  • शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”

    सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत.

      December 13, 2025


  • धुलिवंदन

    या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे.

      October 1, 2023


  • क्रिकेटपटू जेफ थॉमसन

    १९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता.

      August 23, 2021


  • मॅगझिन चॅम्पियन

    मानवी स्वभावाचा भाग म्हणुन तुमच्या, आमच्या, सर्वांमध्ये एक सुप्त चतुर रामलिंगम लपलेला असतो का?

      January 26, 2024


  • काळाचा खेळ

    मनुष्य हा काळाच्या हातातील बाहूले असतो, काळ्-सुत्री बाहूले. तो बरेच काही ठरवतो पण घडतं तेच जे काळ ठरवतो.

    माझ्या लहानपणापासुन पहाण्यातील एक व्यक्ती आहे,खूप कष्टाळु व मेहेनती, आता अन्दाजे वय ५८-६० असेल, पण मेहेनतीने व्यवसाय करायचे. लग्न झाले तेव्हा परिस्थिति अगदिच बेताची होती, कसेबसे खर्चाची तोंड मिळवणी व्ह्यायची, दोन वेळचे साधे जेवण कसेबसे मिळायचे त्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे तर दुरच... पण मुले मोठी होत होती व संसाराचा गाडा चालू होता. हळुहळू काळ सरला, मुले मोठी झाली, कामधंद्याला हातभार देउ लागली व आर्थिक परीस्थीती सुधारू लागली. त्यातच अचानक वडीलोपार्जीत जमीनीला सोन्याचा भाव आला, पैसा अडका आला, नविन घर, गाडी ई सुखसोयी आल्या व आयुष्य सुखासिन झाले. धंद्यातपण बरकंत आली व सगळेच रुळावर आले. खाण्याची चंगळ सुरु झाली, जे जे पुर्वायुष्यात हुलकावण्या देत होतं ते ते मिळू लागलं.

    एक दिवस साध्या आजाराच्या कारणाने तो मनुष्य माझ्याकडे आला व मला शंका आली म्हणुन रक्त तपासले तर मधुमेह असल्याचे निदान झाले. तो मनुष्य खेळकर स्वभावाचा असल्याने त्याने लगेच मिश्किलपणे हसंतच हे आयुष्याचे नवे वळंण स्विकारले. औषधे, पथ्य पाणी, आहार विहार याबद्दलची माहीती घेतली, मधुमेह झालाय हे कळल्यावरही तो दु:खी न होता त्याने ते लगेच स्विकारले हे बघून मला समाधान वाटले. ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो जाण्यासाठी उठला व हसंतच मनातील एक गोष्ट बोलला ...... "तरूण वयात ईच्छा असुनही परीस्थीतेने खायला मिळंत नव्हतं व आता हवे ते खायला मिळणार तर खाऊ शकंत नाही" !

    मिही क्षणभर स्तब्ध झालो, तो हसंतच खोलीबाहेर गेला, पण मी मात्र विचार करंत राहीलो की काळाचा खेळ पण काय अजब असतो ......... !!!

    -- डॉ. मयुरेश जोशी

      July 15, 2016


  • डॉ. वामन रामचंद्र कोकटनूर (१८८७-१९५०)

    पूर्वीच्या मुंबई प्रांतातील अथणी (आता कर्नाटकात) येथे जन्मलेल्या कोकटनूर यांनी बीएस्सी केल्यावर पुण्याच्या रानडे औद्योगिक संस्थेत रसायनतज्ज्ञ म्हणून एक वर्ष काम केले. नंतर त्यांना शिष्यवृत्ती मिळाली व ते कॅलिफोर्निया राज्यातील ओकलंड शहरी पुढील शिक्षणासाठी गेले. बटाट्यावर संशोधन करण्यासाठी ते तेथे गेले होते.

      October 1, 2023


  • रेल्वेमधील खानपान व्यवस्था (पँट्री कार)

    १८९० ते १९१० च्या दरम्यान चोवीस तास वा त्यापेक्षा जास्त वेळ प्रवास करण्यासाठीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या. त्यावेळी प्रवासात जेवणाची, खाण्यापिण्याची सोय प्रवासी स्वत:च करत असत. चार ते पाच-कप्पी पितळी वा अॅल्युमिनियम डबे, फिरकीचे तांबे, खुजे अशा जय्यत तयारीनिशी प्रवासी मंडळी दूरच्या प्रवासास निघत. ब्रिटिश उच्च अधिकारी पहिल्या वर्गानं प्रवास करत. त्यांना ताजं जेवण लागत असल्यानं त्यांच्या गाडीला एक वेगळा खानपान बनविण्याचा डबा जोडण्यात येऊ लागला. तिथे बर्फ ठेवण्याचीही सोय असे. पुढे पहिल्या वर्गाचे प्रवासी आपल्या डब्यांतून पॅन्ट्रीकारमध्ये जाऊन नाश्ता व जेवण करत. तिथे बसण्यास हॉटेलसारखी टेबलं-खुा असत. त्या काळात दोन डब्यांतून प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी जोडणारी व्यवस्था (Vestibule) नव्हती, त्यामुळे या खानपानाच्या डब्यापर्यंत प्रवाशांना पोहोचता यावं म्हणून लांब पल्ल्याची गाडी मधल्या लहान स्टेशनवर तीन ते पाच मिनिटं थांबत असे व प्रवासी तेवढ्या वेळात आपल्या डब्यातून उतरून पॅन्ट्रीकारपर्यंत जात असत. फ्रंटीयर मेल, ग्रँड ट्रंक एक्सप्रेस या अशा गाड्या होत्या. मुंबई-दिल्ली मार्गावर गाडी विरारला थांबे.

    हळूहळू जेवणाची मागणी वाढत गेल्यानं, जेवणाची ताटं प्रवाशांच्या जागेवर आणून देण्याची सोय झाली. ज्या गाड्यांना पॅन्ट्रीकार लागत असे त्यांची नोंद टाईम टेबलमध्ये ‘पी.' पॅन्ट्री म्हणून होते, पण पॅन्ट्री डबे सर्व गाड्यांना नसतात; त्यामुळे प्रवाशांच्या जेवणाच्या सोयीसाठी वाटेतील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेची कँटीन्स सुरू झाली. तिथे गाडी २० ते ३० मिनिटं थांबत असे. तेवढ्या वेळात अनेक प्रवासी या कँटीनमध्ये भरभर जात व जेवण उरकत. यामध्ये गाडीचा वेळ फुकट जाऊ लागल्यानं, जेवणाची ताटं ऑर्डरप्रमाणे गाडीच्या प्रत्येक डब्यात पोचवण्याची सोय झाली. या सोयी जरी उपलब्ध होत्या, तरीही घरातून डबे नेण्याचं प्रमाणही बरंच होतं.

    अति-लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये अॅल्युमिनियम फॉईलमधून जेवणाची बंद पाकिटं येण्यास सुरुवात झाली. अनेक प्रकारचं व चविष्ट खाणं देण्यासही सुरुवात झाली. राजधानी, शताब्दी, दुरान्तो या गाड्यांमध्ये उत्तम जेवणाची सोय असते आणि त्याचा खर्च तिकिटातच घेतला जातो.

    खानपान विषयक रेल्वेची भावी योजना

    रेल्वेकडून भारतभर २५० भव्य स्वयंपाकघरं उभारली जाणार आहेत. तिथे दिवसाला जेवणाची व नाष्ट्याची सहा लाख पाकिटं अतिशय आधुनिक पद्धतीनं बनविली जातील. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर रेल्वेची कडक नजर असेल. स्वयंपाकघरासाठी स्टेशनजवळ एक रुपया चौरस फुटाच्या दरानं कंत्राटदाराला जागा दिली जाईल.

    निर्जंतुक आरोग्यदायी अन्नपदार्थ (हायजेनिक) बनविण्याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाईल. प्रवासी मोबाईलवरून एस.एम.एस.द्वारा आपल्या आवडीचं जेवण मागवू शकेल व ते त्याला त्याच्या जागेवर मिळेल. रेल नीर'नं (बिसलरी) तर क्रांतीच केली आहे. या योजनेमुळे वर्षाला अंदाजे २००० कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

    अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रारी आल्यास कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल. काही काळापूर्वी कोकण रेल्वेवरील मंगलोर येथील कंत्राटदाराला याबाबत एक लाख रुपये दंड ठोठावून तो वसूलही करण्यात आला आहे.

    पितळी कप्प्यांचे डबे, फिरकीचे तांबे बघता-बघता इतिहासजमा झाले आणि आता खानपान क्रांतीचं नवं युग आलं आहे. रेल्वे सर्वच बाबतींत अत्याधुनिक होत असल्याचा प्रत्यय खानपान-पुरवठ्याबाबतही येत आहे.

    आता-आतापर्यंत डेक्कन क्वीनला असणारा ‘डायनिंग कार' हा डबा नुकताच गाडीला लावणं बंद करण्यात आलं, कारण अशा त-हेचे डबे आता भारतातील कोणत्याच गाडीला जोडले जात नसल्यानं त्यांचं उत्पादन थांबविलं गेलं आहे. पण या गाडीचा तो एक मानाचा डबा होता याची दखल घेत तशा त-हेचा डबा मुंबई रेल्वे वर्कशॉपमध्ये बनविण्यात येणार असून, तो 'डेक्कन क्वीन'ला पुन्हा जोडला जाणार आहे. असे आहे 'दख्खनच्या राणी'चे महत्त्व! डायनिंग कार: डेक्कन क्वीन

    -डॉ. अविनाश वैद्य

      August 6, 2022


  • हम आपके है कौन

    हम आपके है कौन' हा चित्रपट ५ ऑगस्ट १९९४ रोजी रिलीझ झाला. काही काही चित्रपट काळ कितीही पुढे सरकला तरी ते 'कालचे ' होत नाहीत. ते कायमच 'आजचे ' राहतात.

    राजश्री प्रॉडक्शनच्या सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित 'हम आपके है कौन ' या कौटुंबिक चित्रपटाबाबत अगदी तसेच झाले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास आज यशस्वी २७ वर्षे पूर्ण होत आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या हा चित्रपट ट्रेण्ड सेटर ठरला. या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मोठ्या शहरातील एकमेव थिएटरमध्ये आकर्षक डेकोरेशनसह सिनेमा रिलीज करणे, त्यातच चित्रपटात वापरलेल्या वस्तूच्या प्रतिकृती विक्रीला ठेवणे, सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पाहण्याजोगे वातावरण निर्माण करणे अशा वैशिष्ट्यांसह हा चित्रपट प्रदर्शित झाला. लग्नाची व्हिडिओ कॅसेट असे म्हटले गेलेला हा चित्रपट देशविदेशात लोकप्रिय ठरला.

    मुंबईत लिबर्टी थिएटरमध्ये या चित्रपटाने १०२ आठवड्यांचे यश संपादले. या चित्रपटात चौदा गाणी असल्याने त्याला काहीनी 'छायागीत' असेही म्हटले. पण यातील अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. लो चली मै, हम आपके है कौन, माई नि माई, मौसम का जादू, चॉकलेट लाईम ज्यूस, जुते दे दो पैसे दे दो, पहला पहला प्यार है, धिकताना धिकताना, मुझसे जुदा होकर, वाह वाह रामजी ही गाणी लाऊडस्पीकरपासून आजच्या यु ट्यूब चॅनलपर हिट आहेत.

    लता मंगेशकर तसेच एस. पी. बालसुब्रम्हणम, उदीत नारायण, शैलेंद्र सिंग, कुमार शानू इत्यादीनी ही गाणी गायली आहेत. ही गीते देव कोहली आणि रवींद्र रावल यांची असून संगीत राम लक्ष्मण यांचे आहे. या चित्रपटात मोहनिश बहेल, बिंदू, सतिश शहा, दिलीप जोशी, लक्ष्मीकांत बेर्डे, आलोकनाथ, प्रिया अरुण, अनुपम खेर इत्यादींच्याही भूमिका आहेत. गीत संगीत व नृत्य यातून ही पटकथा घडते, एक प्रकारचा हा वेगळा फाॅर्म या चित्रपटात आहे आणि तोच लोकप्रिय झाला.

    अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचलेल्या यशस्वी चित्रपटात हम आपके है कौनचा समावेश होतो. हाच चित्रपट तेलगू भाषेत डब होऊन प्रदर्शित झाला.

    संकलन : संजीव वेलणकर पुणे.

    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      August 5, 2021


  • अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

    मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।।

    या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, हे साधकाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे जीवनाला स्वस्थता लाभू शकते. स्वामी स्वरुपानंदांच्या संजीवन गाथेत अभंग क्र. १२३ असा आहे.

    चढो पालखीत पडो वा आगीत
    देह नाशिवंत मातीमोल ।। १ ।।

    काया कदा काळी जाणार जाईल।
    सांभाळावे शील जीव भावे ।। २ ।।

    देहाची आसक्ति असों नये चित्ती ।
    वसो द्यावी प्रीति हरिपायी ।। ३ ।।

    स्वामी म्हणे ऐसी करावी प्रार्थना ।
    देवा नारायणा धाव पाव ।। ४ ।।

    अर्थ:- मानवी देह नाशिवंत आहे. तेव्हा मानवी जीवन कधी सुखात राहते तर कधी दु:खाच्या आगीत होरपळून निघते. हा देह कधी तरी जाणारच असतो, त्यासाठी मनुष्याने शील (म्हणजे सद्गुण) जीवाभावाने सांभाळावे. (सद्गुणाच्या अंगीकाराने जीवन समृद्ध करावे, कसे ही वागू नये.) यासाठी चित्तात देहासक्ती ठेवू नये. हरीचे ठिकाणी प्रेम धरावे.
    जीवनात षडविकार, षड्उपाधी, अहंता ममता आहे, याने जीवाची ससेहोलपट होत असते. तेव्हा या सर्वातून रक्षण करून भगवंतापायी भक्तिभाव-प्रेम दृढ व्हावे अशी प्रार्थना करावी.

    या अभंगात दोन महत्त्वाच्या गोष्टी (वास्तविक, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण यातील दोन गोष्टींवर लक्ष वेधू या.) १) “शील सांभाळावे जीव भावे।" २) “वसो द्यावी प्रीती हरिपायी।” या आहेत. तेव्हा शील हे जीवभावाने सांभाळावे. मानवी जीवनात शीलामुळे त्याचे मूल्य वाढते. जीवनात स्वस्थता येते. शील म्हणजे जीवनात सद्गुणांचा अंगिकार करावा. मग सद्गुण कशाने वाढू शकतात याबद्दल एक चिंतन श्रीमद्भागवत ग्रंथात ११ व्या स्कंधात १३ व्या अध्यायात भगवंतानी उपदेश देताना सांगितले आहे.

    आगमोऽप: प्रजा देश: काल: कर्म च जन्म च ध्यानं मंत्रोऽथ संस्कारो दशैते गुणहैतव:।।

    अर्थ:- आगम, पाणी, प्रजा, देश, काल, क्रिया (कर्म), जन्म, ध्यान, मंत्र, संस्कार या दहा गुणांनी सत्वगुणाची वृद्धी होते.

    या प्रत्येक गुणात अत्यंत व्यापक सूक्ष्म असा भाव समाविष्ट आहे. या प्रत्येक गुणांचा साधक जीवनात फार मोठा प्रभाव आहे. तो कसा हे पाहूया.

    आगम:- म्हणजे वेद-शास्त्र होय. याचा अर्थ वेद, शास्त्र उपनिषद, पुराणे, संत वाडमय, संतांचे अभंग, कीर्तन करावे वा ऐकावे. त्यांचे चिंतन करावे. त्यातील उपदेशाचा अंगिकार करावा. श्रवण ही साधनेतील पहिली पायरी आहे. दासबोध तसेच समार्थांच्या सर्व वाङमयात श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच भगवंत म्हणतात, “श्रवणाच्या माध्यमाने मी मनुष्याच्या हृदयात प्रवेश करतो. भक्तानी हृदयात राहायला जागा दिली तर मी राहतो. नाही तर मी निघून जातो.” म्हणून संत म्हणतात, “काम-क्राधे केले घर रिते।।” घर म्णजे हृदय, मन, बुद्धी, चित्त येथे असलेले विकार उपाधी, अहंता व ममता हे गेले की भगवंत हृदयात प्रगट होतो. याची जाणीव आनंदरूपाने साधकांनरा होते. याच्या मागे इतका व्यापक अर्थ आहे.

    पाणी (आप):- म्हणजे तीर्थ होय. साधक काय खातो, काय पितो याचा यात समावेश आहे. तसेच तीर्थात देवत्वाची शक्ती त्वरित प्रकट होते. ‘तीर्थानं कुवर्ती तीर्थाणि”। हे नारद भक्ती सूत्र आहे. तीर्थात पवित्र शक्तीचा वास असतो. याने मन, बुद्धी, चित्त, हृदय पवित्र होते. पावन जागी परमात्म्याची जाणीव सहजतेने वा चटकन होते. असे तीर्थाचे महत्व असते.

    प्रजा:- म्हणजे सत्संग होय. साधकांनी सदैव सत्संगात राहवे. सत्चा संग तो सत्संग होय. दुसरा अर्थ असा की, आपली इंद्रिये बहिर्मुखी आहेत तेव्हा त्यांचा बहिर्मुख संग म्हणजे विषयाचा संग होय. तेव्हा असा “संगस्य त्याग: इति संत्संग: ।” असे म्हणता येते. सत्संगाचा फार मोठा परिणाम हा जीवनावर होत असतो. ज्या संगात जीव राहतो तशीच कर्माची प्रेरणा मनुष्याला होते. म्हणून मनुष्याने सदैव चांगल्या संगतीत रहावे, तसेच, चांगले विचार, चांगले चिंतन मनात ठेवावे हा ही एक सत्संग असतो. यासाठी नारदांचे चरित्र मार्गदर्शक आहे.

    देश:- म्हणजे “स्थान" होय. साधम कोठे राहतो. याला ही महत्त्व आहे. भक्तिशास्त्रात याला फार महत्त्व आहे. देवाची लीलाभूमी, संतांची कर्मभूमी, संतांची तप:स्थळी, समाधी स्थाने ही सर्व पवित्र स्थाने आहेत. अशा जागेत भगवंताची, संतांची, तपस्वींची ऊर्जा शक्ती अविरत कार्यरत असते. नित्य तेथे जरी वास करता आला नाही तरी मधून मधून तेथे राहवे. काही साधना, उपासना करावी. याचा पारतार्थिक वाटचालीस उपयोग होतो. उदा. पावस, वृंदावन, गोकुळ, सज्जनगड इ.

    काल:- म्हणजे वेळ. आम्ही वेळेचा उपयोग काय करतो. मनुष्याकडे तीन गोष्टी निरनिराळ्या वेळी येतात व त्याचा याथार्थ उपयोग झाला नाही तर अनर्थ होतो. (एक) सत्ता (दोन) पैसा (धन), (तिन) वेळ (समय) लहानपणी वेळ असतो, सत्ता-धन नसते. तरूणपणी सत्ता-धन असते पण वेळ नसतो. वृद्धपणी वेळ असतो, सत्ता नसते, धनही असते किंवा नसते. त्यामुळे लहानपणी पूर्व संस्कार व विद्यामान संस्कार चांगले असतील तर लहानपणीच भगवद् भजनाची गोडी निर्माण होते. तरूणपणीच खऱ्या अर्थाने परमार्थ करावा, अभ्यास करावा. पण नेमके साधक म्हणजो वेळ नाही. जर तारूण्यात अभ्यास केला असेल तरच वृद्धपणी फलोन्मुख होण्याची शक्यता असते. तेव्हा वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. यातच जीवनाचे सार्थक ठरू शकते, तर स्मरणशक्ती प्रखर असते. तरुणपणी आकलन शक्ती नसते, तर स्मरणशक्ती प्रखर असते. तरूणपणी आकलन शक्ती असते पण स्मरण शक्ती नसते. तरूणपणी अभ्यास नसेल तर वृद्धपणी आकलनशक्ती व स्मरणशक्ती दोन्ही राहत नाही. तेव्हा साधकांनी वेळेचा उपयोग सत्कारणी लावावा हे महत्त्वाचे आहे. सद्गुण वर्धनासाठी याचा उपयोग होतो.

    कर्म:- म्हणजे क्रिया होय. मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. मनुष्याकडून सतत मानसिक, वाचिक व शारीरिक क्रिया घडत असतात. "गहन कर्मणो गतिः ।” असे ऋषी सांगतात. कर्म जीवाला बंधनात टाकते तर कर्म जीवाला बंधनातून सोडविते. तेव्हा कर्म प्रकार असे आहेत- (१) क्रियामण कर्म (२) प्रारब्ध कर्म (त्याचे उपप्रकार स्वेच्छा प्रारब्ध, निरिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध) (३) संचित कर्म. हा एक भाग. दुसरे कर्मप्रकार (१) विहित कर्म (नित्य वा नैमित्तिक कर्म) (२) अकर्म (३) विकर्म (४) निषिद्ध कर्म (५) निष्काम कर्म तेव्हा मनुष्याने नित्य किंवा निष्काम कर्मे करावीत. जेणे करून भगवंताशी अनुसंधान राहिल. थोडक्यत वेळेचा सदुपयोग करावा. कर्माचा हेतू व भाव सदैव शुद्ध असावा.

    जन्म:- म्हणजे अनुग्रह होय. “सस्कारात द्विज उच्चते।” संस्काराने जीवाला द्विजत्व येते. माता-पिता मलाला शरीरिक, जन्म देतात, पण सद्गुरु हे जीवाला मानसिकरित्या “मानसिक" देह देतात. त्याने तो पैलतीर पार करू शकतो. म्हणून याला “जन्म” म्हटल आहे. सद्गुरूमहिमा सर्वांनी गायला आहे. ते जीवाला, शिष्याला “आपणा सारिखे करीती तात्काळ।” प्रमाणे जीवाला सबळ करतात. याचा अर्थ साधकाने गुरू करावा. सद्गुण वर्धनात गुरुचा प्रवेश उपकारक ठरतो. समर्थ
    रामदासांच्या मताप्रमाणे चैतन्यमयी गुरू असावा.

    ध्यान:- म्हणजे ही एक साधना आहे. धर्मशास्त्र दृष्ट्या भगवत्प्राप्तीचे साधन म्हणजे श्रमण, मनन, निदिध्यास (ध्यान), समाधी हे आहेत. साधकांनी या मार्गानी जावे. ध्यानाच्या अभ्यासाने मन, बुद्धी, चित्त शांत राहते. उत्साह, स्फूर्ती व प्रेरणा निर्माण होतात. यातून जीवनाचे सार्थक होते. तेव्हा हा अभ्यास सद्गुण वर्धनासाठी उपयुक्त आहे.

    मंत्र:- ज्या उपास्य देवतेची जीव उपासना करतो. त्याच्या मंत्राची उपासना घडली तर उपासकाला ती देवता उपासनेत साहाय्य करते. मंत्रानी जीवाला बळ येते. भगवद् अनुसंधनास म्हणून करून, सद्गुणवर्धन करावेत. हा उद्देश
    भगवंताच्या सागण्याचा आहे. मंत्रात भगवद्शक्ती कार्यरत असते.

    संस्कार: - मानवी जीवनात संस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संस्कारांचा प्रभाव व्यक्तापेक्षा अव्यक्तावर फार असतो. पूर्व संस्काराचा प्रभावही साधनेवर पडत असतो. म्हणून कान्होपात्रासारखी "स्त्री" ही पिंगलेच्या उदरी जन्माला येऊनही संत पदवीला पोहचली. जीवाने कुठे जन्म घ्यावा हे त्याच्या हाती नसते. मात्र त्याने केलेली उपासना महत्त्वाची असते. ती कधी वाया जात नाही. कान्होपात्रेवर संस्कार विपरीत वातावरणाचे झाले. पण पूर्व संस्काराच्या अव्यक्त प्रभावाने वारकऱ्यांत सामील होऊन ती पांडुरंग चरणी विलीन झाली. हे संस्काराने घडले. प्रल्हादाचा जन्म आसुराच्या उदरी झाला. पण मातेच्या गर्भात असतानाच नारदांच्या संस्काराने तो भगवद्भक्त बनला. तेव्हा चांगले संस्कार करीत असावे. ते कधी वाया जात नाहीत. तेव्हा संस्करानी सद्गुणांचा अंगिकार होत असतो. अशा प्रकारे भगवंत उद्धवाला दहा गोष्टी सद्गुण वर्धनासाठी सांगतात. तसेच “शील जीव भावे सांभाळावे” असे स्वामी स्वरूपानंद सांगतात.

    यातील आणखी एक चरण म्हणजे "वसो द्यावी प्रीति हरिपायी। ” साधकांनी कोणत्याही स्थितीत हरिचरणी प्रेम करावे. सर्वदा। हा भाव असावा. हरिचरण प्रेम म्हणजे निर्गुणावरचे प्रेम आहे. सगुण प्रेमाचा मनुष्य (दृश्यावरचा) अनुभव घेत
    असतो. त्यातील गोडी नाशवंत आहे. तेव्हा अविनाशी प्रेम हे केवळ अव्यक्तावरच होऊ शकते. तेव्हा ते प्रेम निर्माण होऊन टिकण्यासाठी या सर्वांची आवश्यकता आहे, असे वाटते. स्वामींनी सर्वांना भगवद्प्रेमात ठेवावे अशी प्रार्थना करूया.

    बालपणी खेळ यौवनी विलास ।
    वार्धक्यी जीवास व्याधि-चिंता ।। १ ।।

    बालपणी शाळा तारूण्यी संसार ।
    वार्धक्यी जो जार तयाचा चि ।। २ ।।

    जन्मुनियां वाया कष्टविली काया ।
    स्व-हित साधाया वेळ नाही ।। ३ ।।

    स्वामी म्हणे विसरला देवा ।
    सयासी विसावा कैंचा अंती ।। ४ ।।

    - स्वामी स्वरूपानंद

    -- डॉ. अजित कुलकर्णी.

    साभार: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ९ वा

    पुणे.

      August 15, 2022