(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगणे सुंदर व्हावे 

    आता जे उदाहरण मी देणार आहे ते मी अनेक ठिकाणी दिलंय. तेच उदाहरण द्यायचं कारण असं की, ज्या शब्दाचा अर्थ मला कित्येक पुस्तकं वाचून कळला नसता तो एका अशिक्षित स्त्रीनं सांगितला. तेव्हापासूनच न शिकलेल्या स्त्रियांना अडाणी म्हणणं मी सोडून दिलं.

      December 2, 2023


  • जपानमधील कालप्रलय

    जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते.

      May 2, 2011


  • श्री गणेश भुजंगस्तोत्रम् – ७

    भगवान श्री गणेशाच्या निर्गुण-निराकार स्वरूपाला अत्यंत सुस्पष्ट रीतीने आपल्या समोर ठेवणारा हा श्लोक.

      January 19, 2020


  • हॅलोविन डे

    ह्या दिवशी लोक विविध प्रकारचा भुताचा, पिशाचांचा, चेटकिणीचा, वेश परिधान करून रस्त्यांवर उतरतात. तसेच बरेच जण चांगल्या भूतांचे देखील कपडे परिधान करतात. ठिकठिकाणी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले जाते.

      October 31, 2021


  • माझे ‘शब्दालय’

    माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल.

      October 24, 2019


  • नोबेल’चे अज्ञात मानकरी

    एखाद्याला पडलेल्या प्रश्नातून किंवा सुचलेल्या कल्पनेतूनच शोध लागतात. आजच्या काळात जसे आपल्या विविध गरजा किंवा समस्या शास्त्रज्ञांना नवनवी तंत्रे विकसित करायला भाग पडतात, तशाच गरजांमधून खरेतर लाखो वर्षांपूर्वी आदिमानवांनीही शोध लावण्यास सुरुवात केली.

      November 6, 2017


  • दमनानंतरचा विस्फोट !

    कामावरून घरी आल्यावर व्यावसायिक आव्हाने,अडचणी उंबऱ्याबाहेर ठेवून मगच घरात पती,पिता असे पेहराव घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. अन्यथा बाहेरचे ताणतणाव घरातील जेवणाच्या वेळचे वादविवाद ठरू शकतात. काम/नोकरी आणि त्याबाहेरचे जीवन यांत फिल्टर लावणे गरजेचे असते.

      December 18, 2022


  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन

    विल्यम मोर्टन नावाच्या दंतचिकित्सकाने अमेरिकेतील बोस्टन येथे ‘ईथर’चा वापर करून, सर्वप्रथम भूलचे प्रात्यक्षिक केले होते. त्या काळी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना प्रचंड वेदना होत असत, पण या प्रात्यक्षिकादरम्यान रुग्णाला वेदना झाल्या नाहीत. संपूर्ण शस्त्रक्रिया निर्वेध पार पडली. या प्रसंगाने वैद्यकीय विश्वात प्रचंड खळबळ उडवून दिली.

      October 16, 2021


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 3

    संकल्प केल्याशिवाय कोणत्याही कामाची सिद्धी नाही. आपण अमुक पूजा का करीत आहोत, याचा संकल्प प्रथम करावा लागतो. जसे, श्री सत्यनारायणाची पूजा करताना मी सत्याने वागेन, सत्याचाच स्विकार करेन, सत्याचीच साथ करेन, सत्य कधीही सोडणार नाही, नेहेमीच माझे धोरण, संभाषण सत्याचेच असेल. ( कारण सत्य बोललेले कधीही लक्षात ठेवावे लागत नाही.) पण संकल्प केल्याप्रमाणे आचरण आपण ठेवले नाही. सत्य बाजूलाच जाईल आणि पूजा हे फक्त कर्मकांड होईल. असे होऊ नये. यासाठी संकल्प महत्त्वाचा असतो.

    कोणत्याही पूजेतील संकल्प लक्षात घेतला की, त्यातील स्वार्थ परमार्थ लक्षात येईल.
    "अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्यः आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं, द्विपद चतुष्पद सहितानां शान्त्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं समस्त अभ्युदयार्थं च कल्पोक्त फलाप्त्यर्थं अमुक देवताप्रीत्यर्थं यथा मिलितोपचारद्रव्यैः षोडशोपचार पूजां अहं कर्म करिष्ये ।"

    या संकल्पामधे "आयु आणि आरोग्य" असे दोन शब्द दिसताहेत.
    आरोग्य कोणाचे ?
    समस्त कुटुंबाचे, सर्व परिवाराचे, एवढेच नव्हे तर घरातील द्विपद म्हणजे पोपटासारखे पाळीव प्राणी, चतुष्पद म्हणजे चार पायाचे प्राणी, जसे, गाय बैल, म्हैशी, वासरे यांचे क्षेम असावे, या सर्वांचे आयुष्य आणि आरोग्य वृद्धींगत व्हावे, यासाठी मी जे द्रव्य उपलब्ध आहे त्यातून ही सोळा उपचारांची पूजा करीत आहे.

    केवढा विशाल दृष्टीकोन आहे या संकल्पामागे ! आणि मागायचेच आहे तर त्यात कंजुषी कशाला? आणि देणारा समर्थ असेल तर फक्त स्वतःपुरते कशाला मागायचे ? सर्वांसाठी सगळेच मागायचे !

    माऊलींनी पण पसायदानातून मागणे मागताना, विश्वाच्या कल्याणासाठी, जो जे वांछील तो ते लाहो, असंच भरगच्च मागितलं आहे.
    देनेवाला छप्पर फाड के देने के लिए बैठा है तो दुबळी (फाटकी ) माझी झोळी घेऊन का जावे ?

    मागताना लाजू नये, आणि देताना माजू नये असे म्हणतात. एक दिवस देणाऱ्याचे (देते ) हात व्हावे. प्रत्येक वेळी मागतच रहायला हवे असे नाही. कधीतरी "देणारा" देखील व्हावं. त्यातला आनंद आणखीनच वेगळा !

    आनंद मिळण्यासाठी थोडे कष्ट, थोडी कर्मकांडे देखील करावेच लागतात ना !

    अहो, एटीएम मधून आपलीच रक्कम मिळायला सुद्धा थोडा वेळ लागतोच ना, थोडी वाट पहावी लागतेच. जर तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असेल तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच ! थोडा इंतजार तो करना पडेगा . काही वेळा पासवर्ड चुकतो, काहीवेळा मशीन बंद असते, काहीवेळा चुकीची रक्कम टाकली जाते, काही वेळा खात्यामधे पुरेशी रक्कम नसते, तर काही वेळा सर्व गणित जुळवून देखील उत्तर चुकीचे येते.

    त्याची कृपा होण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागते. तो कृपाघन कृपा करणारच, असा भाव ठेवला तर अपेक्षित फळ मिळणार हे नक्कीच.

    औषधे देखील पोटात जाऊन, हवा तिथे अपेक्षित गुण दिसायला थोडा वेळ लागतोच ना, तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    28.05.2017

      May 28, 2017


  • महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

    महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

    महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .

    या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.

    या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.

    भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्‍वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्‍वासू, बृहद्‌भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
    रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.

    पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्‍चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.

    या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.

    -- निखिल आघाडे

      October 7, 2016