वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय पातळीवर १०८ शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ - श्री तुळजाभवानी तुळजापूर
तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन २२ किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण ४४ किमी अंतरावर आहे.
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
माहिती संकलन : निखिल आघाडे
October 4, 2016
जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर (इन्कम टॅक्स) दिवस साजरा करण्यात येतो.
July 24, 2021
ज्येष्ठ नागरिक जे साधारणपणे ६५ ते ७५ वयाचे असतात यांना मूत्रदोषाचा त्रास होतो. ही परिस्थिती कोणालाही सांगता येत नाही अथवा कोणाजवळ बोलताही येत नाही. काय आहे हा मूत्रदोष? वास्तविक हा दोष कोणालाही म्हणजे स्त्री अथवा पुरुष यांनाही होऊ शकतो.
November 17, 2023
माझ्या फुलांचे संशोधनात शेवंती असिडिटी, पित्ताचा त्रास ह्यावर उपयोगी आहे असे आले.
शेवंती कोणतीही चालते, पांढरी किंवा पिवळी. त्या फुलांना शेवंतीची वास आला पाहिजे हे महत्वाचे, कारण आजकाल शेवंतीच्या जवळपास दिसणारी पांढरी व पिवळी फुले मिळतात, परंतु त्यांना शेवंतीचा वास नसतो. शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्यांचे पाणी करावे, त्यामुळे आम्लपित्त,अँसिडिटी जाते. अगदी उत्तम गुण येतो. आज त्रास होतो म्हणून हे पाणी घेतले तर उद्या चमचमीत खाल्ले तरी त्रास होत नाही. असा माझा अनुभव आहे.
एकदा तिखट खाल्याने पोटात खूपच जळजळ होत होती. शेवंती असिडिटी वर आहे म्हणून शेवंतीच्या फुलांचे पाकळ्यांचे पाणी प्यायलो, तीन तासात पोटातील जळजळ, आग थांबली. म्हणून पुन्हा एक डोस घेतला. बरे वाटले. ठरवले आता तिखट (स्पायसी )खाणे नाही. त्रास होतो. आणि दुसरे दिवशी नेमकी बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्राबरोबर बेडेकर ची मिसळ खावी लागली. खाताना मनात विचार आला मिसळ त्रास देणार आहे. पण शेवंती चे पाणी घेऊ, आणि मिसळ खाल्ली. घरी आल्यावर कामात शेवंतीचे पाणी घेणे विसरून गेलो. दुसरे दिवशी संध्याकाळी लक्षात आले अरे आपण शेवंतीचे पाणी घेतले नाही, पण त्रास पण झाला नाही.
प्रयोगातून असे लक्षात आले कि पाण्याचा इफेक्ट ४-५ दिवस राहतो. एकदा पाणी पाकळ्यासकट घेतले तर त्याचा इफेक्ट जवळ जवळ दोन महिने राहिला. आता पाकळ्या सुकवून गोळ्या केल्या व पेशेंटना दिल्या, त्यांना चांगला फायदा झाला.
माझ्या आईला (वय ८०) पित्ताचा त्रास खूप व्हायचा, पित्त उलटून पडायचे (हा त्रास ४० वर्षे होता). तिला शेवंतीचे पाणी दिल्यामुळे तो कमी झाला.
माझा "निर्माल्य औषध" हा लेख छापून आल्यावर बरेच जणांना मी शेवंतीच्या फुलांच्या पासून केलेली साखर दिली व त्यांना फायदा झाला काहींना साखरेने थोडासा गुण आला. त्यांना शेवंतीच्या पाकळ्या सुकवून केलेल्या गोळ्या दिल्यावर खूपच छान गुण आला.
निसर्ग देवता किती दयाळू व माणसाची काळजी घेणारी आहे. अश्विन व कार्तिकात पित्त वाढते. त्या दिवसात भरपूर शेवंती येते. आमचे पूर्वजांना शेवंतीची हा उपयोग माहिती असावा म्हणून नवरात्र,लक्ष्मीपूजनाला शेवंती आवश्यक अशी प्रथा पाडली.
जे देवाला ते माणसाला.
शेवंतीचे माझ्या संशोधनात आलेले काही गुण खालील आजारावर लागू पडते .
यकृत सूज, कोलायटिस, संडासला खडा, मधुमेह, गॅसेस अडकणे, दमा कोरडा, डोक्यात मुंग्या येणे, रेटिना, अर्धांगवायू, लठ्ठपणा वाढणे, उष्माघात, धनुर्वात, मूत्रपिण्ड काम न करणे, लघवीला आग,किडणी स्टोन.
ह्या आजारांवर मी अजून वापरलेले नाही.
ज्याना ते त्रास असतील त्यानी वापरून मला त्याचे अनुभव कळवावेत ही विनंती.
-- अरविंद जोशी
९४२१९४८८९४
शेवंतीच्या ह्या गुणधर्माना आयुर्वेदिक ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहिती नाही. माझे काम अनुभव घेणै व सांगणे हे आहे.
(आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपमधून साभार)
April 25, 2017
अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले. महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत.
January 14, 2022

रेल्वेवाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि जलद अशी अखंडपणे सुरू राहण्यासाठी रेल्वेमधले कर्मचारी व तंत्रज्ञ हे जसे महत्त्वाचे दुवे असतात, अगदी त्याच तोलामोलाचं महत्त्व रेल्वेमधल्या आधुनिकीकरणालाही आहे. काळ बदलला, रेल्वेप्रवाशांची गर्दी वाढली, रेल्वेचा विस्तार वाढला, तसं दर टप्प्यावर रेल्वेनं बदलांना, नव्या तंत्रांना आपलंसं केलं. या प्रवाहात रेल्वेला खऱ्या अर्थानं वेग आणण्यात विद्युतीकरण हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरला.
विजेवर चालणारं पहिलं रेल्वेइंजिन ‘एडिंबरो ते ग्लासगो' या दरम्यान सन १८३९ साली धावलं. पुढे १८७९ मध्ये बर्लिन येथील प्रदर्शनात विजेवर चालणाऱ्या रेलगाडीचं प्रात्याक्षिकही दाखविण्यात आलं.
भारतात मात्र विद्युतीकरणासाठी १९२५ साल उजडावं लागलं. १९२५ मध्ये मुंबईच्या 'हार्बर लाईन'वर मुंबई ते कुर्ला ९.५ मैलांचं अंतर पहिल्या विद्युत गाडीनं कापलं आणि पुढे १९२८ मध्ये मुंबई सेंट्रल ते बोरिवली हे बी.बी.सी.आय.वर, तर १९२९ साली जी.आय.पी.वरील कल्याणपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झालं. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग रेल्वेनं काळाचा विचार करता फार लवकर सुरू केला. रेल्वे यार्ड, स्टेशन, सिग्नल्स, रेल्वेचे डबे, या सर्व ठिकाणी अखंडपणे विजेचा पुरवठा मिळाल्यानं रेल्वेची सेवा उत्तम दर्जाची झाली. विजेवर चालणाऱ्या लोकल गाड्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू केल्यामुळे मुख्यत: मुंबई व कलकत्ता ही शहरं कल्पनेच्या पलीकडे पसरत गेली.
धुराच्या इंजिनासाठी कोळसा महाग पडत असे, शिवाय गाडीला वेग मिळण्यास वेळ लागायचा. घाटात गाडी चढणं कठीण जात असे. त्यामुळे हळूहळू अनेक मार्गांचं विद्युतीकरण होत गेलं आणि धुराची इंजिनं इतिहासजमा होत गेली.
२१ व्या शतकात यांत आणखीही बदल होणार आहेत. काळापुढे चालणारी रेल्वे लवकरच छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे डी.सी. (Direct Current)-ए.सी. (Alternating Current) परिवर्तन पूर्ण करेल. त्यानंतर या बदलामुळे दर दिवशी १ कोटी रुपयांची विजेची बचत होणार आहे. नवीन 'बंबार्डियर' गाड्या धावण्यासाठी हे आवश्यक आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसपासून लांब पल्ल्याच्या गाड्या यानंतर ए.सी. पद्धतीनं चालणार आहेत.
या सर्व कामासाठी मधून मधून रेल्वेचे मेगा ब्लॉक घडविणं आवश्यक ठरणार आहे. पूर्वी डी.सी.चं ए.सी.मध्ये रूपांतर करण्यात रेल्वेलाईनच्या बाजूनं अनेक ट्रान्सफॉर्मर लागत. त्याकरता जास्त लोक कामावर ठेवावे लागत व हे रूपांतर करण्यात वीज वाया जात असे. आता ए.सी. आल्यानंतर कामावर कमी लोक लागतील. पश्चिम रेल्वेवरचं काम पूर्ण झाल्यावर मुंबईची संपूर्ण लोकल व इंजिन वाहतूक ए.सी. मार्गानं होईल. दिल्ली, कलकत्ता, मद्रास येथे मुंबई इतक्या लोकल कधीच नव्हत्या. तिथे ए.सी.मधील रूपांतर आधीच झालेलं आहे. भारतीय रेल्वेने ही एक मोठी यशाची पायरी गाठली आहे.
आता जवळजवळ डी.सी. ते ए.सी. काम संपूर्ण भारतभर पूर्ण होत आलं
आहे. प्रथम डी.सी. करंट येत असताना बरीच यंत्रे व मनुष्यबळ रेल्वेलाईनच्या बाजूस ठेवावे लागे, हा सर्व खर्च आता वाचणार आहे; शिवाय, विजेची बचत झाल्याने त्यातही पैसे वाचणार आहेत. हळूहळू भारतभर सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण चालू आहे. याचा खर्च डिझेल इंजिने चालविण्यापेक्षा कमीच आहे व वेगात काहीच फरक पडत नाही आणि हवेत प्रदूषण तर अजिबातच होत नाही. पण याकरता मुबलक वीजपुरवठा असणे आवश्यक आहे; त्याकरता लागणारी वीज जल, कोळसा आणि सौरऊर्जेमार्फत मिळवावी लागेल.
-डॉ. अविनाश वैद्य
August 9, 2022
विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळी अमृतसर येथे झालेल्या मोठ्या रेल्वेअपघातांमध्ये रेल्वेचे जबाबदारी होती का? इंजिन ड्रायव्हरचा दोष होता का? रेल्वेने आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला का? असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले. याच संदर्भात रेल्वेचे इंजिन ड्रायव्हर कसा परिस्थितीत काम करतात, त्यांच्या कामाचे स्वरुप काय असतं, याचं फार सुंदर विवेचन या लेखात केलेलं आहे. दोन ते तीन हजार प्रवाशांच्या सुखकर प्रवासाच्या नाड्या इंजिनातील दोन कर्तबगार माणसांच्या हातात असतात याची जाणीव प्रवासात एकदा जरी आली तर तो त्यांच्या सचोटीच्या कामाला मानाचा मुजरा ठरेल.
October 23, 2018
१८व्या शतकातील मराठे दिल्लीस जाऊन पोचले परंतु दिल्लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्टीचा विचार करतांना दिल्लीला धडक देणार्या व्यक्ती कोण होत्या, हे पुन्हा एकदा विचारात घेणे आवश्यक आहे. आधी हा उल्लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्वतः राजा नव्हता, ते कुणा दुसर्याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते.
March 15, 2019
तुमच्या आयुष्यातला आनंद विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्यांच्या सोंडेइतके लांब असावे आणि
आयुष्यातले प्रत्येकक्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत.
August 7, 2017
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्टला वर्ष पूर्ण होईल. त्यांच्या हत्येचा तपास अजून सुरूच आहे. पोलिसांना अजूनही खुनी सापडलेले …..
August 19, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti