वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हे कुटुंब तब्बल 32 जणांचे.. स्वतः जगतात,आणि आपल्या शेतीलाही मस्त जगवतात. आजच्या शहरी विभक्त कुटुंबपद्धतीत आदर्श ..
October 19, 2021
सौंदर्य म्हटले की अनिवार्यपणे ज्यांचा विचार येतो ती म्हणजे आभूषणे. आई जगदंबेच्या अशा दिव्य दागिन्यांचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, नवीनार्क अर्थात् नुकताच उगवलेला म्हणजे सूर्य. त्याचे भ्राज म्हणजे तेज,चकाकी हा त्या दागिन्यांचा स्थायीभाव आहे.
February 9, 2020
कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो.
March 3, 2022
पेक्षेप्रमाणे अखेर टाटांनी सिंगूरमधील आपला प्रकल्प गुजरातला हलविला. हा सिंगूरमधील शेतकऱ्यांचा विजय आहे की प. बंगाल सरकारच्या धरसोड वृत्तीचा पराभव आहे, हे सांगता येत नसले तरी शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे एक बलाढ्य सरकार नमले, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.
October 12, 2008
जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे.
January 31, 2023
विशाखापटटम ते अराक्कू VALLEY असा १३० किमी निसर्गरम्य घाटाचा रस्ता असून त्यावर अराक्कूच्या आधी ३५ किमी अंतरावर अनन्थगिरी डोंगररांगात २३१० फुट उंचीवर भारतातील सर्वात मोठी जमिनीखाली गुहा आहे. BORA CAVES म्हणजे निसर्गाचा अदभूत चमत्कारचआहे ओडीसा भाषेत त्याला बोरा गुहालु म्हणतात. ( बोरा म्हणजे मोठे भोक, गुहालु म्हणजे गुहा. गुहा ही काही दशलक्ष वर्षा पासून अस्तित्वात आहे.
April 15, 2019
साधी कणिक मळून झाली की हाताला किती चिकटून रहाते ? काढायची ठरवली तरी येत नाही. एवढी चिकट आहे. पोटातही तशीच चिकटून रहाणार. असे थरावर थर बसत गेले की ट्रॅफिक जाम होणारच !
August 24, 2016
‘गृहिणी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. कालच महिला दिन झाला .पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. आजीबाईचा बटवा ही शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे. ‘ताप येणे’ ही अवस्था ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टर बरेचदा ओळ्खू शकतात.
त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या. गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.
याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.
विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा. तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे. या बटव्यात असली पाहिजेत. सर्वांनी हे समजूनं घेतले पाहिजे की आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.
आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र : वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
नित्योपयोगी निवडक औषधे : श्री. म. गो. मोडक.
गृहवैद्य : लेखक डॉ. र. कृ. गर्दे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
February 2, 2017
मुरुड तालुक्यातील आठ जण संशयास्पदरीत्या फिरताना ०८ /०८ /२०१५ ला आढळून आले आहेत. हे सर्व जणवेळास्ते, वावडुंगी आणि सायगाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आले आहे. याबाबत जिल्ह्य़ात सर्वत्र नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
August 14, 2015
रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
February 21, 2012
Copyright © 2025 | Marathisrushti