(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दहावी नापासांचा देश!

    आठव्या वर्गात त्याला बर्‍यापैकी वाचता येते, ही त्याची प्रगती मानली जाईल, एरवी ही प्रगती दुसर्‍या-तिसर्‍या वर्गात अपेक्षित असायची. मूल्यमापनच नसल्यामुळे मूल्यमापनाचे निकष असण्याचीही गरज उरणार नाही. प्राथमिक शिक्षकांसाठी ही तशी आनंदाची बाब असली तरी सरकारच्या या निर्णयाचा दुरगामी परिणाम होणार आहे. सहा ते चौदा हा वयोगट अतिशय संस्कारक्षम वयोगट आहे. याच वयात मुले घडतात किंवा बिघडतात. नेमक्या याच वयोगटात त्यांना घडविण्याची जबाबदारी असलेल्यांना सरकारने मोकळं रान दिले तर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊ शकतो.

      May 16, 2010


  • नाकाचे हाड वाढणे / सर्दी पडसे होणे

    सर्दी पडसे होणे, नाकातले हाड वाढणे या बद्दलची माहिती देणारा लेख.

      October 21, 2016


  • गाढवाचं लग्न’ ह्या वगनाट्याची ३९ वर्ष

    गाढवाचं लग्न’ ह्या वगनाट्याची ३९ वर्ष

    गाढवाच्या जीवावर पोट भरणारा आणि गाढवालाच लेकराप्रमाणे जपणारा.सावळ्या कुंभाराला जन्म दिला तो श्री.हरिभाऊ वडगावकर ह्यांनी.एक लेखक म्हणून लेखणीतून सावळ्याला उतरवला खरा पण त्याच सावळ्यामध्ये प्राण फुकून जिवंत करणार अभिनेता ठरला प्रकाश इनामदार.

      November 9, 2021


  • अनंत चतुर्दशी

    हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही.

      September 28, 2023


  • मार्कांचा महापूर…!

    दहावीच्या परीक्षेत 83000+ विद्यार्थ्यांना मिळालेल्या 90% पेक्षा अधिक मार्कांची कारणमीमांसा आणि त्याचे असंभाव्य परिणाम…!

      August 4, 2020


  • जागतिक पर्यावरण दिन

    सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय.

      June 5, 2022


  • मन कि बात – ओळख

    नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या.

      July 11, 2017


  • विमानांपेक्षा मोटारींचे अपघात जास्त का?

    आपल्या देशात फार मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. त्यातही काही सावकाश चालणारी तर काही वेगवान असतात. आकाशात तसे नसते. काहीवेळा विमाने उतरताना किंवा वर जाताना गर्दी असते पण सगळे काम क्रमवारीने होते. कोणी मध्ये घुसत नाही. विमानाच्या हालचालीत नियंत्रण असते आणि त्यात सुसूत्रता असते.

      July 24, 2023


  • शिकेकई

    शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू.

    शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो.

    शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके साबण शाम्पू विकत घेत असतो, पण शिकेकई हे एक नैसर्गिक बॉडी केअर आणि हेअर केअर प्रॉडक्टच आहे. त्याची सर कोणत्याही शाम्पू कंडिशनरला नाही.

    शिकेकईमुळे केस काळे रहातात. शाम्पू वापरल्याचे दुष्परिणाम म्हणजे मानव निर्मित रसायना मुळे केस लवकर पांढरे होणे, केस गळणे इत्यादि. शिकेकई मधे नैसर्गिक तेल, नैसर्गिक शाम्पू आणि नैसर्गिक कंडिशनर असते.

    शिकेकई मधे खूप प्रमाणात सॅपोनियन हे नैसर्गिक द्रव्य आहे. ह्या द्रव्यामुळे फेस निर्माण होतो. त्यामधे स्वच्छतेला हातभार लावतील असे अंश असतात. हे रसायन नंतर साबण उत्पादनासाठी वापरले जाते.

    शिकेकईचा वापर उन्हाळ्यात खूपच प्रभावी ठरतो. त्यामुळे डोक्याला एक थंडाई येते. शिकेकईच्या बरोबरीनी नागरमुथा, वाळलेली संत्राची साले, वाळवलेली मेंदीची पाने, ह्या गोष्टीही वाटल्या जातात. शिकेकई वापरायची असल्यास दळून आणलेली शिकेकई आदल्या दिवशी रात्रीच लोखंडाच्या भांड्यात भिजवून ठेवतात. सकाळी नहाण्यापूर्वी ती भांड्यातील शिकेकई उकळून घेतात. म्हणजे त्याचे सर्व सत्व एकजीव होते आणि त्याचा केसांवर खूप छान परिणाम होतो.

    -- प्रमोद तांबे

      May 19, 2017


  • झुरळांची दूर-दृष्टी

    चीन मधील एक कोटी झुरळं पळालित या वृत्ताला समस्त दुनियेनं झुरळ अंगावर पडल्यावर आपण जसं झटकून टाकतो,तसं झटकून टाकलं.त्यामुळे या अद्वितीय आणि अद्भूत घटनेची चर्चा फारशी झाली नाही. माध्यमांना ती घडवावी सुध्दा वाटली नाही.

      September 29, 2013