वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.
June 8, 2008
पहिल्या अवस्थेच्या सुरुवातीला पाय जड होतात, कंबर दुखते, पोटात कळा येऊ १२ आठव लागतात. हळूहळू कळ जास्त वेळ राहते, दोन कळांमधले अंतर कमी होऊ लागते. दहा मिनिटांमध्ये २-३ कळा येत असतील तर प्रसूती समाधानकारक आहे, असे समजावे. कळ आलेली असताना मातेने दीर्घ श्वास घ्यायचा. सर्व अंग सैल सोडायचे. दोन कळांच्या मधल्या वेळात स्वस्थ पडून राहायचे.
June 30, 2023
सभागृहात अभ्यासपूर्ण भाषण करून आपल्या धारदार वक्तृत्वाच्या जोरावर सरकारला घाम फोडणारे आमदार हवेतच कुणाला? इथे गरज राडा करणार्यांची आहे. बी.टी. देशमुख, वि.स.पागे यांचा जमाना आता संपला आहे. मधू लिमये, मधू दंडवते आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत, त्यांच्या सारख्यांची उपयुक्तता देखील संपुष्टात आली आहे.
March 25, 2013
आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार.
मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात.
कलिंगड बियाइसोबत खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. कलिंगडाच्या बियांमध्ये सिट्रालाइन हे अमायनो अॅसिड मुबलक प्रमाणात असते. याचा उपयोग रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास होतो.
हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठीही कलिंगडाच्या बिया उपयुक्त आहेत. बियांमधील अॅन्टीऑक्सिडंट हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार कलिंगडाच्या बियांमधील फॅटस् घातक कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करतात.
किटाणूंच्या संसर्गाचा प्रतिकार करण्यासाठीही कलिंगडाच्या बियांचा उपयोग होऊ शकतो.
April 1, 2016
सा-या भूतलावर शरदाचे चांदणे बरसवीत येते आश्विन पौर्णिमा. या पौर्णिमेला आपण “कोजागिरी” पौणिमा असे म्हणतो. सर्वाना आनंद वाटणा-या या रात्रीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व जाणून घेऊया…. कोजागरी, कौमुदी जागर, दीपदान जागर अशा विविध नावांनी ही रात्र ओळखली जाते.
February 19, 2019
वांगी खावीत तर कृष्णाकाठचीच. आणि अस्सल नारळाच्या रसातील सोलकढी प्यावी तर कोकणातीलच. हीच वैशिष्ट्ये. हे वेगळेपण. हीच परंपरा. हाच प्रदेशविचार.
August 23, 2016
एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.
June 13, 2020
मसालेदार पदार्थ हे भारतीय किंबहुना आशियाई लोकांचे वैशिष्ट्य. शतकानुशतके प्रयोग करून आपली खाद्यसंस्कृती तयार झाली. मसाल्यांचे स्थान अढळ राहिले. मसाल्यांशिवाय पदार्थाला चव नाही असे समीकरण झाले आहे. नुसत्या चवीसाठी हा खटाटोप झाला असेल? 'उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' हे वाक्य आपले पूर्वज अन्नाविषयी सतत सांगत आलेत. त्याचा अर्थ? आपले शरीर हे एक यज्ञकुंड. त्यात अन्नाची आहुती दिल्याशिवाय ऊर्जा मिळणार नाही. ही ऊर्जा मिळायला व सातत्याने शरीर निरोगी राखायला नुसतीच प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ व कर्बयुक्त पदार्थ मिळून चालत नाही तर त्याचबरोबरच जीवनसत्त्वे, सूक्ष्म खनिजे व क्षारही लागतात. ही सूक्ष्म खनिजद्रव्ये कडधान्ये, भाज्यातून मिळत असली तरी मसाल्याच्या पदार्थातून विपुल प्रमाणात मिळतात. या मसाल्यात असं दडलंय तरी काय हे त्या पदार्थांचे विश्लेषणच सांगेल.
१) काळीमिरी- सर्वात जास्त पिकणारी व निर्यात होणारी.
मुख्यतः केरळमध्ये याची लागवड होते. कारण तेथे खूप पाऊस, जास्तच तापमान व सावली मिळते. याची हिरवी फळे उकळत पाण्यात १० मिनिटे ठेवतात. त्यामुळे रंग तपकिरी/काळा होतो. नंतर ४ दिवस उन्हात वाळवून भरडले की काळीमिरे मिळतात. यातील पिपरीन, पिपरिडीन, चाव्हिसीन व अन्य तैलद्रव्यामुळे वास व तिखट चव येते. पाचक, पोटातील वायू कमी होतो, भूक प्रज्वलित होते. यात कॅल्शियम ४६०, फॉस्फरस १९८, लोह १३, मॅग्नेशिअम १७१, तांबे २ व मँगनीज ४ मि. ग्रॅ. प्रतिशत आणि 'अ' जीवनसत्व १०८० मायक्रो, असते. भेसळीसाठी पपयाच्या बिया टाकतात व चकाकीसाठी तेल वापरतात !
२) लवंगा- सीझिअम ॲरोमॅटिकम/ युजेनिया
कॅरियोफायलिस या झाडाच्या मुक्या कळ्या म्हणजे लवंगा, तामीळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुख्य लागवड, काळीमिऱ्याप्रमाणेच लवंगाही कोकणात पिकवायला लागले. लवंग पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ थांबवणारी, याचे तेल वेदनाशामक म्हणून दंतवैद्य दातदुखीवर वापरतात. युजेनॉल हे वेदनाशामक द्रव्य असते. तेल त्वचेवर चोळल्यास त्वचा गरम व लाल होते. लवंग व मधाचे चाटण घशाची खवखव कमी करते. लवंगात कॅल्शियम ७४०, फॉस्फरस १००, मॅग्नेशियम १३०, मँगनीज ५, जस्त २ प्रतिशत व 'अ' जीवनसत्त्व २५० मायक्रो असते.
March 13, 2023
धन्य तो एकलव्य, जीवन ज्याचे दिव्य
इतिहास घडवी भव्य, कौरव पांडवा संगे ।।१।।
साधा होता भिल्ल, शरीर संपदा मल्ल
धनुर्विदेचे शल्य, त्याच्या अंगी होते ।।२।।
जन्मता धनुर्धारी, बनोनी शिकारी
हिंस्र जनावरे मारी, अचूक नेम मारूनी ।।३।।
पाहोनी भक्ष्य, होवूनी दक्ष
देवूनी लक्ष, शिकार करी ।।४।।
गुरूच्या होता शोधात, तीच त्याची खंत
पूर्णता नसे ज्ञानात, गुरूविना ।।५।।
शोधता आला आश्रमी, कौरव पांडवाचे मुक्कामी
प्रसन्न झाला चित्ती ।।६।।
गुरू द्रोणाचार्य, महान ते आचार्य
अद्वितीय त्यांचे कार्य, महाभारतामध्ये ।।७।।
कौरव पांडवाचे गुरू, धनुर्विद्येत तरबेज करू
कुणी न त्यांचे हात धरू, ही इच्छा द्रोणाची ।।८।।
कौरव पांडव मेळाव्यांत, बसता द्रोण मध्यभागांत
एकलव्य येई तेथ, अभिवादन करी गुरुला ।।९।।
इच्छा प्रदर्शिली विद्येची, धनुर्धारी बनण्याची
द्रोणास गुरू करण्याची, एकलव्याने ।।१०।।
बघूनी एकलव्याची स्फूर्ती, द्रोणास हर्ष होती
कौतुके आशिर्वाद देती, गुरू द्रोणाचार्य ।।११।।
विद्या माझी क्षत्रियासी, परी तू भिल्ल असशी
कसे शिकवू मी तुजसी, द्रोण विचारी ।।१२।।
गुरुचरणा खालची माती, एकलव्य घेई हाती
हाच माझा गुरू असती, आशिर्वाद मागी द्रोणासी ।।१३।।
मानूनी गुरू द्रोणा, घेवूनी त्यांची प्रेरणा
जाई निघोनी वना, एकलव्य ।।१४।।
घेवूनी चरणाखालील माती, बनवी तयाची द्रोण मूर्ती
गुरू त्या प्रतीमे समजती, शिष्य होई एकलव्य ।।१५।।
नमन करूनी द्रोण प्रतिमेला, धनुर्विद्येचा सराव केला
मेहनत तो घेवू लागला, रात्रंदिनी ।।१६।।
करूनी गुरूचे चिंतन, एकाग्र करूनी मन
धनुर्विद्येचे ज्ञान, घेवू लागला ।।१७।।
गुरू समजोनी मूर्तीचे ठायी, धनूर्विद्येचे ज्ञान घेई
शिष्याचे प्रतीक होई, ह्या जगामध्ये ।।१८।।
नसता गुरू समोरी, ज्ञान संपादन करी
हीच असामान्यता खरी, एकलव्याची ।।१९।।
एकाग्र चित्तेचे फळ, हेच यशाचे बळ
समजोनी घ्यावे सकळ, विद्यार्थी जन हो ।।२०।।
कौरवा पांडवा संगे, द्रोण जाता त्याच मार्गे
अघटीत घटना होई गे, एकलव्याच्या वनांत ।।२१।।
गुरू मूर्ती समोरील चिंतनात, एकलव्याच्या एकाग्रतेत
अडथळा उत्पन्न होत, श्वानाच्या भूंकण्याने ।।२२।।
कौरव पांडवांची शिकारी कुत्री, भूंकू लागली एकलव्या वरती
थांबविण्या त्यांच्या भुंकण्याती, बाण सोडला त्यांचे वर ।।२३।।
अचूक वेध साधला, इजा न करी श्वानाला
बंद करी भूंकण्याला, मुखी बाण रोवूनी ।।२४।।
विस्मयीत झाले द्रोण, बघूनी त्याचे अचूक बाण
गुरू असावा ह्यांचा कोण, प्रश्न मनी पडला ।।२५।।
वंदन केले द्रोण चरणी, तुम्हीच माझे गुरू असूनी
विद्या शिकवली तव मूर्तीनी, चिंतन करिता तुमचे ।।२६।।
एकलव्याची वेध शक्ती, अर्जुनाहून सरस ठरती
मात करील त्याचे वरती, एकाग्रता शक्तीमुळे ।।२७।।
एकाग्रता हीच शक्ती, एकलव्याने जाणली युक्ती
करूनी गुरू मूर्तीवर भक्ती, साध्य केली धनुर्विद्या ।।२८।।
जर वाढेल हे तपसाधन, एकलव्य बनेल महान
धनुर्विद्येतील अजिंक्यपद, प्राप्त होईल त्यासी ।।२९।।
जाणता हे मर्म, विचार करी अधर्म
‘विद्येस बाधा’ हे कर्म, शोधू लागले द्रोण ।।३०।।
प्रसन्न आहे तूज विद्येवरी, माझे आशिर्वाद तुझेवरी,
परी तू गुरूदक्षिणा घ्यावी, खरी इच्छा करीती द्रोण ।।३१।।
उजवा अंगठा छाटूनी, गुरू दक्षिणा समजोनी
करावी तो मज अर्पूनी, द्रोण बोले ।।३२।।
निकामी झाला हात जाणून, अर्पण करी धनुष्य बाण
वंदन करुन गुरुद्रोण, एकलव्य गेला निघूनी ।।३३।।
एकलव्याची एकाग्रता महान, नियतीसी नव्हते मान्य
कर्ण अर्जूनासी मात करून, महाभारत बदलले असते ।।३४।।
एकलव्याचे जीवन, चमकती विज नभातून
एकाग्र चित्तेचे उदाहरण, देई करूनी जगाते ।।३५।।
शुभ भवतू
डॉ. भगवान नागापूरकर
५५८ – १६११८३
January 20, 2018
गरीबाचा / मुंबईकरांचा चा नाश्ता म्हणजे वडापाव .
पण गरमागरम वडा,भजी बाधून दिला जातो वर्तमान पत्राच्या कागदात.
किवा वडे,भजी तळणारा कामगार ते तळून अतिरिक्त तेल शोषण साठी त्याच्या भांड्यात वर्तमान पत्रच ठेवलेले असते.
एव्हडेच कशाला आपल्या घरात सुद्धा तळण करताना सुद्धा आपणसुद्धा वर्तमान पत्रच वापरतो. दिवाळीचे प्रमुख आकर्षण असते तो म्हणजे दिवाळीचा फराळ. घरात-घरात लाडू, चिवडा, चकली, करंजी, शंकरपाळ्या, अनारसे असे अनेक पदार्थ केले जातात. अनेक पदार्थ तळणीचे असल्याने आणि मोठ्या प्रमाणात केले जात असल्याने तेलातून काढल्यानंतर थेट वर्तमानपत्रावर पसरले जातात. टिश्यू पेपर किंवा किचन रोल्सच्या तुलनेत वर्तमानपत्र स्वस्त असल्याने हा पर्याय वापरला जातो.
मात्र असे करणे आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
मासिकं किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. त्यामधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोकाही बळावतो. शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतू ग्राफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो. वर्तमानपत्राच्या कागदामधील, शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करण्यास तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरातात. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो. म्हणूनच तळलेले पदार्थ वर्तमानपत्रावर निथळत ठेवणे किंवा पदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून ( पुडी) करून नंतरआहारात वापरणे आरोग्यास खूप धोकादायक आहे.
वर्तमानपत्राच्या शाईमध्ये पेट्रोलियम बेस्ड मिनरल ऑईलचा वापर करून ती अधिक पातळ केली जाते. तर ती सुकवण्यासाठी कोबाल्ट बेस्ड घटकाचा वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याला त्रासदायक असतात. वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद तुम्हांला अधिक चांगला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात. म्हणूनच पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.
टिश्यू पेपर किंवा टॉवेल घाऊक घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हांला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कागद वापरा. पण वर्तमानपत्र वापरणे कटाक्षाने टाळा.
आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपवरील लेख
October 21, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti