(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दहशतवादाच्या लढाईमध्ये देशप्रेमी नागरिकांचे कर्तव्य

    आपण भारतीय केवळ एक दिवस प्रतिकात्मक देशभक्तीचे प्रदर्शन करून उरलेले दिवस मात्र त्याच पाकिस्तान बरोबरचे क्रिकेट सामने आणि पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे पाहण्यात घालवतो. आपली एक दिवसाची राष्ट्रभक्ती जागृत व्हायला सैनिकांना हुतात्मा व्हावे लागते, हे चित्र दुर्दैवी आहे.

      February 19, 2019


  • आजचा आरोग्य विचार – भाग तेहेतीस

    ६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं.

      March 5, 2018


  • साधी जखम झाली गँगरीन!

    नक्षलवादी चळवळ काही वर्षांपूर्वी किंवा आता आतापर्यंत या देशातील उपेक्षितांची, वंचितांची चळवळ होती. त्यांनी अंगीकारलेला सशस्त्र क्रांतीचा मार्ग योग्य होता की नाही हा कायम वादाचा विषय राहत आला असला तरी हा संघर्ष देशांतर्गत होता. नक्षलवादी म्हणजे आपलीच माणसे होती आणि आपल्या हक्कांसाठी ती भांडत होती.

      February 8, 2009


  • मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

    मराठी भाषा ही केवळ वाचण्या बोलण्यापुरती नसून ती जगण्याची आसक्ती आहे ज्या दिवशी कळेल तो सुदिनच म्हणावा लागेल.. मायबोली मराठीचा त्रिवार जयजयकार असो !!

      February 27, 2020


  • भव्य देवालय आणि भक्त (रूपक कथा)

    भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.

      April 8, 2019


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – २९

    इदानीमिदानीं मृतिर्मे भवित्री-
    त्यहो संततं चिंतया पीडितोऽस्मि |
    कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा
    नमस्ते गतीनां गते नीलकंठ ‖ २९ ‖

    या विश्वाचे स्वरूप अनिश्चित आहे. येथे कोणत्याच गोष्टीचे निश्चित पूर्वानुमान करता येत नाही.
    मात्र या अनिश्चित जगात एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे हे जग कधीतरी सोडावे लागणार आहे. मृत्यू एवढे एकच अटळ सत्य आहे.
    त्यात आनंदाची गोष्ट एकच आहे की तो नेमका केव्हा येणार? हे आपल्याला निश्चित माहीत नाही. पण त्या आनंदाला एक वेगळी चिंतेची किनार आहे की तो कधी येणार हे माहिती नसल्याने, तो केव्हाही येऊ शकतो याची भीती जीवाला अखंड त्रास देते.
    याच वास्तवाला आधार करीत आचार्य श्री म्हणतात,

    इदानीमिदानीं - आत्ता अगदी आत्ताच,
    मृतिर्मे भवित्रीति - माझा मृत्यू होऊ शकतो.
    अहो संततं चिंतया पीडितोऽस्मि - या चिंतेने मी सतत पीडित आहे.
    अर्थात कोणत्याही क्षणी माझा मृत्यू येऊ शकतो हा विचार सतत मनात येत असल्याने माझ्याजवळ असलेल्या, मी आज व अत्यंत परिश्रमाने मिळवलेल्या, सर्व सुख साधनांचे देखील पूर्ण सुख मला अनुभवता येत नाही.
    कथं नाम मा भून्मृतौ भीतिरेषा - माझा मृत्यू कसा होणार नाही? याची भीती मला सतत असते. अर्थात तो होऊ नये असे मला वाटते. मात्र त्याच वेळी तो टाळणे मला शक्य नाही हे समजत असल्याने भीती वाटते.
    नमस्ते गतीनां गते नीलकंठ - हे भगवान नीलकंठा आपल्याला नमस्कार असो. अशा वेळी आपणच माझ्या गतीची गती अर्थात अंतिम अवस्था आहात.

    येथे भगवंताला नीलकंठ हे विशेषण वापरणे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या काळजीच्या पलीकडेची गोष्ट भगवान करतात ते म्हणजे विषप्राशन.
    मात्र विष पिऊन देखील मृत्यूची भीती त्यांच्या हृदयात जागृत होत नाही. कारण ते विष त्यांनी कंठातच अडवले आहे.
    विषप्राशन करून देखील अमर असणाऱ्या भगवंताला त्या मृत्यूचा भीतीपासून वाचवण्याची ही प्रार्थना आहे. तोच वाचवू शकतो कारण तो स्वतः वाचला आहे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 8, 2020


  • भारतीय रेल्वे यंत्रणा बांधणीचा प्रवास

    भारतीय रेल्वे ही खऱ्या अर्थाने भारतीयत्वाची खूण सांगणारी आणि हिमालयापासून कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत देशाला जोडणारी, एकात्मतेचे महत्त्वाचे प्रतीक ठरलेली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास हा केवळ लोहमार्ग-बांधणीचा वा तांत्रिक सुधारणांचा आहे; तितकाच एक संघटनयंत्रणा (ऑर्गनायझेशन) म्हणून रेल्वेच्या होत गेलेल्या विकासाचाही हा इतिहास आहे. १८५० नंतर रेल्वेच्या उभारणीला जसा वेग आला, तसाच त्यानंतर १०० वर्षांनी, म्हणजे १९५० नंतर स्वतंत्र भारताची रेल्वे सेवा प्रशासन आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या प्रकारे संघटित करावी, या प्रयत्नांनीही वेग घेतला… तिथवरच्या इतिहासातून उलगडणाऱ्या या प्रशासनखुणा…

      August 9, 2023


  • नवरत्नमालिका – १

    हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनी
    कारणेश्वरमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम् ।
    कालकालफणिपाशबाणधनुरङ्कुशामरुणमेखलां
    फालभूतिलकलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ १॥

    नवरत्न शब्दाचा संबंध आहे नवग्रहांशी. सूर्यापासून तेजाचे ग्रहण करतात म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. मग सूर्याला ग्रह का म्हणायचे? तर तो आई जगदंबे पासून तेज ग्रहण करतो.
    या ग्रहांच्या तेजाने चमकतात नवरत्न.

    सोप्या शब्दात जगातील समस्त चमकदार, आकर्षक अर्थात सुखदायक गोष्टींच्या मागे आहे आई जगदंबा. तिच्या दिव्य वैभवाचे हे स्तोत्र नवरत्नमालिका.

    हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनीं- हार म्हणजे मोत्यांच्या माळा,नूपुर म्हणजे पैंजण,किरीट म्हणजे बाजुबंद,कुण्डल इ. अलंकारांनी विभूषित केलेल्या अवयवांनी सुशोभित दिसणाऱ्या,
    कारणेश्वर- सर्व विश्वाचे कारण असणाऱ्या भगवान शंकरांच्या,
    मौलिकोटि- कोट्यावधी मस्तकांना

    परिकल्प्यमान
    पदपीठिकाम् - जणु काही आपली पद पीठिका अर्थात पाय ठेवण्याची जागा समजणाऱ्या, प्रत्येक ब्रह्मांडाचे एक ब्रह्मदेव तसे एक शंकर. अशा अनंत कोटी ब्रह्मांडांच्या अनंत कोटी शंकरांच्या मस्तकावर पाय ठेवणारी. अर्थात यांच्यावर सत्ता चालवणाऱ्या,
    कालकालफणि- कालाचाही काल असणाऱ्या फणि म्हणजे महासर्प नागराज शेषाला,
    पाश म्हणजे दोरी,बाण,धनुष्य,
    अंकुश इ. गोष्टी हातात धारण करणाऱ्या,
    अमरुणमेखलां- लालबुंद कंबर पट्टा धारण केलेल्या,
    फालभूतिलकलोचनां- मस्तकावर वेणीसाठी दोन भागात फाकवलेल्या केसांच्या मध्यभागी तिलक स्वरूपाचा तिसरा नेत्र असणाऱ्या,
    मनसि भावयामि परदेवताम् - परमतमा आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 15, 2020


  • समलिंगी संबंध आणि आपण…

    समलिंगी विवाहाला मान्यता देणं म्हणजे अनैसर्गिक शरीर संबंधांना मान्यता देण्यासारखच आहे. अशा अनैसर्गिक असणार्‍या बर्‍याच गोष्टी परदेशात होत असतात. पण परदेशात असणारी विभक्त कुटुंब पद्धती आणि लयाला गेलेले नातेसंबंध त्यास कारणीभूत आहेत.

      December 14, 2013


  • ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

    ऑक्टोबर १४ रशीद लतीफ आणि ‘गंभीर’ गौतम

    १४ ऑक्टोबर १९६८ रोजी रशिद लतिफ या पाकिस्तानी कर्णधाराचा आणि यष्टीरक्षकाचा जन्म झाला. क्रिकेटविश्वाला ढवळून काढणार्‍या निकालनिश्चिती प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर असे प्रकार मान्य करणार्‍या थोडक्या खेळाडूंमध्ये रशीद लतीफ होता.

      October 12, 2010