वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?
आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात
घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे.
पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं
जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कूलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.
शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)
स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात.
रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.
उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे.
Hot & cold food list
सफरचंद - थंड
चिकू - थंड
संत्री - उष्ण
लिंबू - उष्ण
कांदा - थंड
बटाटा - उष्ण
पालक - थंड
टॉमेटो - उष्ण
कारले - उष्ण
कोबी - थंड
गाजर - थंड
मिरची - उष्ण
मका - उष्ण
मेथी - उष्ण
वांगे - उष्ण
भेंडी - उष्ण
बीट - थंड
बडीशेप - थंड
वेलची - थंड
पपई - उष्ण
अननस - उष्ण
डाळींब - थंड
ऊस - उष्ण
मीठ - थंड
मूग डाळ - थंड
चणा डाळ - उष्ण
गुळ - उष्ण
तिळ - उष्ण
शेंगदाणे / बदाम / काजू / अक्रोड / खजूर - उष्ण
हळद - उष्ण
कॉफी - थंड
दूध / दही / तूप / ताक / तांदूळ - थंड
उन्हाळ्यात थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास होणारा त्रास कमी होतो .
आयुर्वेदातून संकलन
March 2, 2017
सूर्यावर घडणार्या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात.
May 3, 2011
स्वयंपाकघरापासून शेजघरापर्यंत,
तिचं आयुष्य जडलं होतं.
जन्म देणं अन् रांधून वाढणं,
इतकंच तिचं कर्म होतं.
June 15, 2022
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाःमातस्त्रिकॊणनिलयॆ त्रिपुरॆ त्रिनॆत्रॆ ।
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः ॥ ५ ॥
कोणत्याही देवतेच्या उपासनेत तंत्र, मंत्र आणि यंत्र अशा तीन गोष्टी असतात. त्या उपासनेचे जे शास्त्रशुद्ध नियम, पद्धती, परंपरा त्यांना तंत्र असे म्हणतात.
या देवतेचे निर्गुण-निराकार स्वरूप ज्याच्या चिंतन-मननातून व्यवस्थित समजून घेता येते त्याला मंत्र असे म्हणतात.
तर त्या देवतेच्या अधिष्ठान स्वरूपात ज्या आकृती तयार केलेल्या असतात, त्यांना यंत्र असे म्हणतात.
आई जगदंबेच्या उपासनेत सर्व श्रेष्ठ यंत्र म्हणजे श्री यंत्र. त्यात सगळ्यात मध्यभागी असतो एक त्रिकोण. त्या त्रिकोणात असणारा जो बिंदू ते आदिशक्तीचे मूळ पीठ.
कोणत्याही देवतेच्या मंत्रात सर्वाधिक प्रभावशाली मंत्र म्हणजे बीजमंत्र. आई जगदंबेच्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपां करिता अनुक्रमे ऐं, ह्रीं आणि क्लीं हे बीजमंत्र शास्त्राने सांगितले आहेत.
येथे आचार्य श्री त्या यंत्र आणि बीजमंत्राचा विचार मांडत आहेत. ते म्हणतात,
ह्रींकारमॆव तव नाम गृणन्ति वॆदाः- हे आई जगदंबे वेद तुझे नाव म्हणून ह्रीं काराचेच कथन करतात. अर्थात तेच तुझे नाव आहे. तोच तुझा सर्वोच्च मंत्र आहे.
मातस्त्रिकॊणनिलयॆ- हे आई श्री यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हे तुझे निवासस्थान आहे.
त्रिपुरॆ- हे त्रि-कोण जणूकाही त्रि-पूर आहेत. अर्थात स्थूल, सूक्ष्म ,कारण आहेत. तू त्यांच्या आत राहून त्यांचे संचालन करणारी चैतन्य शक्ती आहेस.
त्रिनॆत्रॆ - महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन स्वरूपातील तीन गुणांनी काम करणे हे जणू तुझे तीन नेत्र आहेत.
त्वत्संस्मृतौ यमभटाभिभवं विहाय
दीव्यन्ति नन्दनवनॆ सह लॊकपालैः - अशा तुझ्या स्वरूपाचे स्मरण करतात, ते यमाचे भट अर्थात दूतांचे भय सोडून नंदनवनामध्ये लोकपाल अर्थात देवतांसह विहार करतात.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
April 16, 2020
पालेभाज्यांचा पार अगदीच चोथा करून टाकलात हो,
आम्ही डोक्यावर घेऊन नाचत होतो, आज एकदम पायाखाली ?
आपण अगदी टोकाचे अतिरंजित लिहित आहात,
खरं वाटत नाही.
पालेभाज्यामधे जीवनमूल्यच नाहीत ? असे कसे म्हणू शकता ?
आम्ही तर रोज पालेभाज्या खातोय.
नाॅनव्हेज बंद केलेत, एकवेळ समजू शकतो. पण आता पालेभाज्यापण बंद. मग खायचे तरी काय ?
कालच्या आरोग्यटीपेवरील काही व्यक्त काही अव्यक्त टीका ....
आपण आपल्या धारणाच बदलून टाकल्या आहेत. म्हणजे जे मूलतः भारतीय विचार होते, ते कालबाह्य म्हणून टाकून दिले आणि ज्या लोकांना संस्कृती म्हणजे काय ? जेवावे कसे, हे माहिती नव्हते, त्यांना हे सर्व आपण भारतीयांनी शिकवले. आज त्यांचा अनुनय आपण करतोय ? ते सांगतात, त्यावर पूर्णसत्य म्हणून विश्वास ठेवतोय. कालाय तस्मै नमः । दुसरं काय ?
या लेख मालेतून आपण भारतीय आरोग्य ( आजच्या काळात किती श्रेष्ठ आहे हे ) जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण आधीच ठरवलेले आहे. त्यादृष्टीने सर्व लेखन चाललेले आपल्या लक्षात येत असेल.
आज आमची धारणा अशी झाली आहे, की जे जे पाश्चात्य ते ते चांगले. पण हे आमच्या लक्षात येत नाही, की त्यांच्या धारणा, जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन, हा भारतीय जीवनपद्धतीपेक्षा कितीतरी भिन्न आहे.
आजच्या शिक्षणपद्धतीमधला हा दोष आहे की आमचे ते सर्व वाईट आणि पाश्चात्यांचे सर्व योग्य असे शिकवले जाते. हे पण पटणारे नाही काही जणांना.
टाय बांधला की माणूस सुसंस्कृत, सुशिक्षित वाटतो. हे खरंही असेल पण तो खरंच तसा होतो का ? मग शेंबुड सुद्धा पुसता येत नाही अशा शाळेत जाणाऱ्या पोरांना टाय बांधायची आवश्यकताच काय आहे ? ( टायचा उपयोग शेंबुड पुसण्यापेक्षा आणखी चांगला काय असू शकेल ? ) केवळ दिसण्यापेक्षा आतून तसे भारतीय असणे आवश्यक वाटते.
मी मोदींची भलावण करतोय असं नाही, पण टाय न लावतादेखील भारतीय पोशाखात आपले व्यक्तिमत्व खुलवता येऊ शकते. विचार भारतीय असला की सगळं शक्य असतं.
पण काय भुललासी वरलीया रंगा... ही आमची स्थिती झाली आहे. भारताबद्दलचे प्रेम सोडता येत नाही आणि पाश्चात्य संस्कृतीचा मोह टाळता येत नाही. न घर का ना घाट का अशी अवस्था आपली झाली आहे.
त्याची कित्ती उदाहरणे सांगू. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती पाश्चात्य विचारांनी वागतोय, सहज हिशोब करीत बसलो होतो, तेव्हा असे लक्षात आले की तब्बल 127 ठिकाणी आम्ही आमच्या मूळ परंपरा, रितीरिवाज, भाषा, पोशाख, चालीरिती बदललेल्या आहेत, ज्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत चालला आहे.
म्हणून मी सुरवातीलाच म्हटले, मूळ भारतीय आरोग्यापासून आपण खूप लांब चाललो आहोत.
पालेभाज्यांच्या पार्श्वभूमीवर डोक्यात येणारे उलटसुलट विचार आजच्या ग्लोबलायझेशनच्या फास्ट ट्रॅक युगात रूचणारे नाहीत, पटणारे मुळीच नाहीत पण काय योग्य होते, आणि आपण काय करीत होतो, ज्यामुळे आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य चांगले राहात होते.
कुठेही शास्त्रीय आधार न सोडता, व्यवहारात काय चालले आहे, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
मी संपूर्णपणे भारतीय बनण्याचे ठरवलेले आहे. आत्ता सुरवात झालेली आहे. वेळ गेलेली नाही. आजपासून अजून पन्नास वर्षे शिल्लक आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.10.2016
October 20, 2016
पदार्पणाच्या कसोटीतील पहिल्याच चेंडूवर बळी मिळविणार्या गोलंदाजांची यादी :
December 6, 2010
१९३३ सालातील ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत, या ५ दिवसांत साने गुरुजींनी नाशिकच्या कारागृहात असताना ‘श्यामची आई’ कादंबरी लिहून काढली.
December 22, 2023
बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का
मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!
सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा
कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल.
बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.
शारीरिक व मानसीक बदल.हा आहे एक भाग, म्हणून जोडवि बीरोदी घालुन सूहासिनी सारखी बाई तू वाग !!
शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना " कानातले " घालायचा मान.
December 13, 2016
मूल मित्र..
घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही.
पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे.
या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू.
काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात. मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोऱ्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,'आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.'
भांडणासाठी प्रथम कारणीभूत असते ती आपली भाषा आणि नंतर आपली कृती.
ही भाषा आणि कृती पूर्णत: अवलंबून असते ती आपल्या दृष्टीकोनावर; म्हणजे आपण त्या घटनेकडे कशाप्रकारे पाहातो त्यावर.
अगदी कालच घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. त्यावरुन तुम्हीच काय ते ठरवा.
शाळेचं स्नेहसंमेलन प्लस पालक सभा असा टू इन वन कार्या*म होता.
पालकसभेसाठी एक तज्ञ मार्गदर्शक आले होते. त्यांना इंटरेस्ट होता पालकांना ज्ञान देण्यात.
पालकांना इंटरेस्ट होता स्नेहसंमेलनात.
त्यामुळे गोंधळाचे छान वातावरण तयार झाले होते. यात भरीस भर म्हणून,पालक सभा सुरू असतानाच हॉलच्या बाहेरुन बटाटे वड्यांचा वास व कपबशांची किणकिण ऐकू येऊ लागली. साहजिकच पालकांची चुळबूळ वाढली.
मुलांना उपजतच शहाणपण असल्याने, त्यांना पालकांच्या चुळबुळीचे कारण समजले. मुलांनी पालकांना पुरक व प्रेरक ठरतील असे हट्ट सुरू केले.
थोडक्यात, तज्ञ मार्गदर्शक बोलत असतानाच अनेक पालक मार्गस्थ होऊ लागले. प्रचंड गोंधळ सुरू झाला.
याच सुमारास ती घटना घडली.
स्टेज जवळ एक मुलगा रडत आला आणि म्हणाला,'माझे बाबा मिळत नाहीत.ठ त्याचे रडणे सुरूच.
एका पालकाने त्याचे नाव विचारले व अनाउन्स केले की,'प्रदीप लेले नावाचा मुलगा हरवला आहे. त्याच्या बाबांनी कृपया स्टेज जवळ यावे.ठ
हे त्या मुलांने ऐकताच संभाव्य धोक्याची कल्पना त्याला आली. त्याने आपला रडण्याचा स्पीड व आवाज दोन्ही वाढवला.
पण त्याच क्षणी एका 'मूल मित्र' शिक्षकाने माइक हातात घेतला आणि ते म्हणाले,'प्रदीप लेले इथेच आहे. हरवले आहेत त्याचे बाबा!! तरी कृपया हरवलेल्या पालकांनी स्टेज जवळ यावे.ठ
आता प्रदीपच्या जीवात जीव आला.
इतक्यात तोंडात बटाटे वडा कोंबत बाबा स्टेज जवळ आले.
त्याक्षणी प्रदीप शिक्षकांच्या जवळ सरकला.
बाबा काही बोलण्याआधीच ते शिक्षक म्हणाले,'प्रदीपला अजिबात ओरडायचं नाही. कारण कार्या*म संपेपर्यंत कुणीही हॉल सोडून जायचं नाही अशी स्पष्ट सूचना सगळ्यांनाच दिलेली होती.... मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेलच?ठ
हे ऐकल्यावर प्रदीपच्या बाबांना तोंडातला वडा धड गिळता येईना आणि बाहेर ही टाकता येईना. बाबांनी मान हलवली आणि प्रदीपचा हात धरुन ते गर्दीत मिसळले.
तोंड मोकळं होताच म्हणाले, 'कमालच आहे तुझी! रडायला काय झालं तुला? आणि एव्हढं मोठ्याने? सगळ्यांपुढे तमाशा झाला ना! पाच मिनीटं चूप्प बसला असतास तर काय बिघडलं असतं? मी काय पळून जाणार होतो? आता गप्पं बसून पुढचा कार्या*म पाहा.ठ
या प्रसंगातून अनेक गोष्टी तुमच्या लक्षात येतील.
खरं म्हणजे बाबा हरवले म्हणून काही प्रदीप रडत नव्हता.
तर बाबा एकटेच वडा खायला गेले याचं त्याला दुख: झालं होतं.
अशा आनंदाच्या क्षणी अचानकपणे,आपण नाकारले गेलो, एकटे पडलो हे प्रदीपचं दुख: होतं.
त्याचं रडणं हे त्याचं दुख: हलकं करण्याचं एक माध्यम होतं.
मुलांच्या रडण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच असतं. पण ते आपल्याला समजलंय असं समजूनच त्यांचे पालक त्यांना झापायला सुरुवात करतात.
आणि मग शब्दाने शब्द वाढत जातो. आणि नकळत मुले कायमची दुखावली जातात.
गर्दीच्या ठिकणी थोड्याफार फरकाने असा प्रसंग घडतो.
मुलगा सुरक्षित ठिकाणी असला तरी ही, हातात माइक असणारा माणूस हा मोठाच असतो. अशावेळी तो बिनदिक्कतपणे जाहीर करतो की,'मुलगा हरवला आहे!' असं जाहीर करणं कितपत योग्य आहे?
अशा प्रसंगी आवश्यक असते योग्य भाषा आणि त्यामागचा दृष्टीकोन.
आधीच भयभीत झालेला,गोंधळलेला तो मुलगा दुखावला जाणार नाही याची काळजी आपण मोठ्या माणसांनीच घ्यायला पाहिजे ना? आणि मुलांवर अकारण रागावू नये यासाठी पालकांनाही समजावलं पाहिजे ना?
खरं म्हणजे अशा कठीण प्रसंगी मुलांना 'मूल मित्र' माणसांची गरज असते. रडणाऱ्या मुलावर न ओरडता, तो का रडत आहे? त्याला कशाची भीती वाटते आहे? हे तो मोकळेपणाने, निर्भयपणे सांगू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे हे आपले काम आहे.
मुलांचा विश्वास जिंकणारेच 'मूल मित्र' असतात.
तुम्हाला काय वाटतं?
--------------------------------------------------------------------------------------------
पालकांसाठी गृहपाठ : आपल्या रडणाऱ्या मुलावर हात न उगारता, त्याच्या पाठीवर विश्वासाने हात ठेवा. रडणाऱ्या मुलाचं म्हणणं अगदी शांतपणे ऐकून घ्या.
असाच प्रसंग समजा आपल्याबाबतीत घडला असता तर अशावेळी तुम्ही तुमच्या पालकांकडून काय अपेक्षा केली असती? हा प्रश्न मनातल्या मनात स्वत:ला विचारा.
मला खात्री आहे, त्यानंतर रडणाऱ्या मुलावर हात उगारण्याची पाळी तुमच्यावर कधीच येणार नाही कारण; घरातली रडगाणी बंदच होतील.
'परस्परांतल्या खळाळणाऱ्या विश्वासात भांडणे विरघळून जातात' ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
--------------------------------------------------------------------------------------------------
-- राजीव तांबे
February 12, 2016
” विठोबा, मेन्यूत अगदीच बदल करायचा असेल तर पुरणपोळीऐवजी आमच्या टिळकांचं श्रीखंड किंवा चितळ्यांचं आम्रखंड, मटकीच्या उसळीऐवजी बटाट्याच्या काचऱ्या, पीठ पेरलेल्या तोंडलीच्या काचऱ्या, पडवळाच्या बियांची चटणी, पापडाऐवजी मिरगुंड, तीळ दाण्याची चटणी किंवा तळलेली सांडगी मिरची हे बदल कर. ब्रह्मानंदी वगैरे जे काय असतं ते फार सहज लागू रे!” मी जातीयवादी नाही पण एखाद्या भरलेल्या पानात हिरमुसलेला तळणीचा मोदक किंवा लसणीच्या चटणीत लसणीच्या मोठ्या मोठ्या लठ्ठ कळ्या दिसल्या की मी ताटीयवादी नक्की होतो. त्यावेळी ह्या सर्वांपेक्षा आपल्या ताटात किती चांगलं वाढलं जातं ह्या विचाराने माझा ऊर भरून वगैरे येतो.
आपल्याकडे प्रत्येक सेक्शन ऑफ सोसायटीची खाद्यपदार्थांची एकेक स्टाईल असते. कोक्स लोकांची ती एक स्पेशल आहे. जन्मापासून मी ती बघत आणि उपभोगत आलोय.
April 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti