वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते.
November 3, 2010
धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट.धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.. आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात.
January 24, 2024
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
August 19, 2026
लोकशाही शासनपद्धती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे निवडणुका हा अपरिहार्य आणि तेवढाच महत्त्वाचा घटक झाला आहे. अलीकडील काळात या निवडणुकींना आलेले स्वरूप बघून अनेक सुबुद्ध नागरिक निवडणूक पद्धतीवर पर्यायाने लोकशाहीवरच टीका करीत मतदानापासून दूर राहतात.
April 18, 2004
सध्या आपल्याकडे “युथफुल” चित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतोय, विशेष म्हणजे अशा कथांना प्रेक्षक ही भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे कारण म्हणजे फर्स्ट लुक मधून केलेलं मनोवेधक मार्केटींग आणि साचेबद्ध पद्धतीच्या बाहेरचे असलेले विषय असल्याचं पटवून देणं, या फंड्यामुळे सध्या बर्यापैकी आपल्या मराठी चित्रपटांना हिट्स मिळत आहेत
August 19, 2013
जेम्स विल्सन ह्या भारताच्या पहिल्या ब्रिटीश अर्थ अधिकाऱ्याने भारतीयांवर इन्कम टॅक्स आकारण्यास सुरवात केली म्हणून आजच्या दिवशी आयकर (इन्कम टॅक्स) दिवस साजरा करण्यात येतो.
July 24, 2021
ज्या कोलकात्यातून १६४ वर्षांपूर्वी पहिली तार पाठविण्यात आली होती त्याच कोलकात्यातून ३१ जुलै १९९५ रोजी पहिला मोबाईल कॉल लावण्यात आला.
July 31, 2021
ठरल्याप्रमाणे वर्षभर ही मालिका चालणार होती. त्यानुसार ५२ भाग प्रसारित करण्याचे ठरविले होते. १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत गीतरामायण प्रसारित करण्याचे ठरले. त्याप्रमाणे दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वा. आकाशवाणीवरून लोक गीतरामायण ऐकायचे. हाच भाग शनिवारी व रविवारी पुन्हा त्याचवेळी ऐकविला जायचा. योगायोग असा की, यंदाच्या वर्षाप्रमाणे ५५ सालीही अधिक मास होता. त्यामुळेच ५२ भागांवरून ५६ भाग झाले. अर्थात ५६ गाण्यांची निर्मिती झाली.
April 1, 2022
बाभळीच्या झाडावरील वसंत बापट यांची ‘बाभूळ झाड’ कविता खूप गाजली. महाराष्ट्राच्या अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाचा शेवट या कवितेने केला आहे. बाभळीच्या कणखरपणाचे वर्णन ही कविता इतक्या चपखलपणे करते की अनेकांना रांगड्या बापाचे दर्शन होते. कणखर मनाने, आपले दु:ख आपल्या मनात ठेवत, कुटुंबाची बारा महिने काळजी घेणारा बाप या कवितेत वर्णन केला आहे.
September 23, 2022
भाग २ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे.
December 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti