वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
देशी गाई भरपूर होत्या, त्या वेळी गोमूत्र व शेणाचे महत्त्व कोणाला नव्हते; पण आता गाई कमी झाल्या आणि गोमूत्राचे महत्त्व कळले. त्यामुळे चक्क देशी गाईंच्या गोमुत्राची डेअरी सुरू करावी लागली आहे. किटलीतून डेअरीत दूध घालायला यावे, तशा पद्धतीने किटलीतूनच गोमूत्र दररोज जमा केले जात आहे.
रामणवाडी (ता. राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या गावात ८० देशी गाई आहेत. त्या गावाने डेअरी सुरू केली आहे. आठ रुपये प्रतिलिटर दराने गोमुत्राची खरेदी केली जात आहे. या गोमुत्राचा औषधी अर्क व आयुर्वेद साबणांसाठी वापर होत आहे.
गोमुत्रातील औषधी ताकद आता वैज्ञानिक पातळींवरही स्पष्ट झाल्याने गोमुत्राचा औषधी कारणासाठी वापर वाढला आहे. रोगांचे मुळातूनच उच्चाटन करण्याची ताकद गोमुत्रात असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. त्याचा प्रत्ययही आल्याने गोमुत्राला "डिमांड‘ आहे.
आयुर्वेदिक साबण व इतर औषधे तयार करण्यासाठी कोल्हापुरातून हरिद्वारला गोमूत्र पाठविले जाते.
येथील वेणुमाधुरी ट्रस्टने गाईंच्या संवर्धनासाठी प्रयोग सुरू केले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर गाईंच्या पालनाची सामुदायिक ताकद दिसावी, यासाठी रामणवाडी गावात सत्तर ते ऐशी गाई गावकऱ्यांच्या साहाय्याने पाळल्या.
गाईंचे दूध हे उत्पन्नाचे साधन झालेच; शिवाय या गाईंपासून झालेल्या पाड्याची वाढ करून त्याच्या ताकदीवर त्यांनी गावात तेलघाणा सुरू केला. बैलांनी ओढलेल्या घाण्यातील तेल वापरणारी काही कुटुंबे आहेत.
यंत्राच्या माध्यमातून तयार झालेल्या तेलातील घटकात व बैलाच्या घाण्यातील तेलाच्या घटकात फरक असल्याने या तेलालाही मागणी आहे.
गोमूत्र पूर्वीपासून औषधी सामर्थ्य असलेला घटक आहे; *पण त्याचे महत्त्व फार कोणी जाणून घेत नव्हते.
देश- विदेशातील शोधप्रबंध, इंटरनेटवरील माहिती चर्चेत येऊ लागली; तेव्हा गोमुत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवू लागले. तोपर्यंत गाईंची संख्या कमी होत गेली. *गाय म्हणजे दूध आणि दूध द्यायची बंद झाली, की तिची रवानगी कत्तलखान्याकडे, हे ठरून गेले होते. आता मात्र *रामणवाडी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने गाई पाळून त्यांचे विविध अंगांनी असलेले महत्त्व ठळकपणे सर्वांसमोर आणले आहे.
सकाळी पहिल्या धारेचे गोमूत्र गावकरी धरतात. एका घरात असलेल्या डेअरीत आठ रुपये लिटर दराने घालतात. रोज एक गाय साधारण गोमुत्राच्या माध्यमातून ११ ते १२ रुपये मिळवून देते. मात्र या गोमुत्रातून पुढे अमूल्य असे औषध तयार होते.
देशी गाईचे वाळलेले शेण रानगोवरी या नावाने सहा रुपये किलो दराने विकत घेतले जाते. अनेक धार्मिक विधी व जंतुनाशक धुरासाठी दोन रुपयाला एक छोटा तुकडा, या दराने ही रानगोवरी विकली जाते. गाईच्या वाळलेल्या शेणाच्या तुकड्यावर एक चमचा गाईचे तूप, तांदळाचे काही दाणे टाकून ते पेटवल्यास होणाऱ्या धुरातून अनेक हानिकारक जंतू नाहीसे होतात, असा दावा केला जातो. (हीच पद्धति 'अग्निहोत्रात वापरली जाते).
या पार्श्वभूमीवर गोमुत्राची डेअरी उपक्रम पहिल्या टप्प्यात चांगलाच यशस्वी झाला आहे.
वेणुमाधुरी ट्रस्टचे राहुल देशपांडे व रामणवाडी येथील युवराज पाटील, मारुती पाटील, दत्ता पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. एका नव्या प्रयोगाची ही सुरवात आहे. ज्यांच्याकडे गाय आहे, त्यांनी गोमूत्र विकायचे राहू दे; पण वैयक्तिक जीवनात गोमुत्राचा वेगवेगळ्या अंगांनी वापर केला, तरी ते खूप मोलाचे ठरणार आहे, असा वेणुमाधुरीचा दावा आहे.
गोमूत्र, गाईचे शेण याची वैज्ञानिक आधारावर संपूर्ण माहिती राहुल देशपांडे (9372208108) यांच्याकडे मोफत उपलब्ध आहे.
वाढती मागणी
सध्या 'गोधन' या गाईच्या विविध घटकांवर आधारित औषध दुकानातून ...
एक लिटर अर्क केलेले गोमूत्र १२५ रुपयांना,
२०० मिली गोमूत्र ३५ रुपयांना व
पूजा विधीसाठी छोट्या बाटलीतून १० मिली गोमूत्र १० रुपयांना विकले जाते.
पिकावरील कीड घालवण्यासाठी गोमुत्राला मागणी वाढली आहे.
देशी गाईच्या गोमुत्राचे औषधी उपयोग खूप मोठे आहेत.
गाय, दुधाला कमी झाल्यावर, मारून टाकण्या पेक्षा गोमुत्र आणि तिच्या शेणापासून मौल्यवान शेणखत, तसेच त्यातून मिथेन हा gas तयार करण्याचे यंत्र सुद्धा तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी चांगल्या गोष्टी शिकून गोमुत्राचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
आज मनुष्य अनैतिक कामात नको तिथे तोंड घालतो, काहीही घाण खातो. पण आज त्याला गोमूत्र पिण्याची लाज वाटते.
देशी गायीच्या गोमुत्राने कैंसर बरा होतो. गाईचा स्पर्श नकोसा वाटतो. ज्या लोकाना रक्तदाबाचा त्रास आहे.त्यानी देशी गायीच्या पाठीवर व शिंडापासुन शेपटापर्यंत पाच मिनिट हात फिरविल्यास रक्तदाबाचा त्रास दुर होतो. गाईचे शेणही औषधी आहे.देशी गायीचे शेण विषशोषक आहे. शेण रेडिएशन शोषते.
पण आज आपला दरिद्रीपणा असा कि आपल्या देशी गाई कत्तलखान्यात कापल्या जात आहेत. तिच्या मांसावर आपण पैशासारखी क्षुल्लक गोष्ट मिळवत आहोत.
जसे आपण आपल्या पोराबाळांचा सांभाळ करतो तसेच गाईंचा सांभाळ करावे.
पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा देशी गाईचे दुध पिउन अतिबुद्धिमान, बलवान, चपळ आणि प्रेमळ व्हावे.
July 30, 2016
आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
March 10, 2022
प्रकाशन दिनांक :- 25/04/2004
14 व्या लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील 48 पैकी 24 मतदारसंघात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांनी संबंधित असते.
April 25, 2004
Simulation theory अनुसार विश्व codes वरती आधार लेले आहे व string theory अनुसार energy. पण या दोन्ही वेगळ्या concept नसून एकच आहेत. कारण computerised गोष्टी पुढे modified झाल्यावर त्यांचे स्वरूप बदलते . कसे ते पाहू: जे codes असतात ते modified होऊन automatic virtual programs मध्ये convert होते. विश्लेषण पुढे दिलेले आहे
March 29, 2019
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन यांनी लिहिलेला हा लेख
माझा देश महान करण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या करता मला जनजागृती करायची आहे.
सैन्यामधील ट्रेनिंग, कारवाया आणि जबाबदाऱ्या
मी, इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, मध्ये जुलै १९७३ला रुजू झालो आणि १५ जून १९७५ रोजी “कमिशन्ड ऑफिसर" म्हणून पायदळातील ७-मराठा-लाईट-इन्फन्ट्रीत प्रवेश केला. जम्मू-आणि-काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवादी क्षेत्रांत, पंजाबात आणि ईशान्य भारतातील दहशतवादी-विरोधी-कारवायीत सविस्तर सेवा केली. तसेच १९७५ पासून लष्कराने हाती घेतलेल्या सर्व महत्त्वाच्या युद्ध/दहशतविरोधी कारवायीमध्ये माझा सहभाग होता.
१९९५ ते १९९८ मी पूँछ क्षेत्रात काम केले. पूँछ आणि राजौरीच्या सर्वात अवघड क्षेत्रातील सर्वाधिक दहशतवादाच्या काळात, मी "ऑपरेशन रक्षक" मध्ये, ७-मराठा- लाईट- इन्फन्ट्रीचे नेतृत्व केले. माझी बटालियन, पाकिस्तानमधून जम्मू-आणि-काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यास जबाबदार होती. माझ्या बटालियनला "युनीट सायटेश प्रशस्ती- पारितोषिक आणि १८ शौर्य पदके” प्राप्त झाली. पुन्हा एकदा जम्मू-आणि-काश्मीर मधील पूँछ, कृष्णाघाटी, सुरणकोट आणि राजौरी इलाख्यांतील "ऑपरेशन रक्षक” ह्या कार्यवाहीत मी ब्रिगेडच्या नेतृत्वाची धुरा वाहिली. त्यांच्या एका युनिटला युनीट-गौरव घोषित झाली आणि ब्रिगेडमधील एकाअधिकाऱ्यास २००६ सालचे सर्वोच्च पारितोषिक मरणोत्तर अशोक चक्र प्राप्त झाले.
फेब्रुवारी २००६ मध्ये मी, “हायर कमांड विंग” चे अध्यापक - डी.एस. म्हणून, आर्मी-वॉर-कॉलेजमध्ये रुजू झालो. हायर कमांड अभ्यासक्रम, भूदल, नौदल व हवाईदलाच्या सर्वोच्च ७० कर्नल व समकक्षांचा असतो. अध्यापक ह्या नात्याने, राष्ट्रीय सुरक्षेचे निरनिराळे पैलू समजून घेण्यासाठी, अधिकारी-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ३१ जानेवारी २००९ ला मी निवृत्त झालो.
निवृत्ती नंतर
निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेवरील माझे देशाच्या सुरक्षेवरचे लेख आघाडीच्या सर्व मराठी वृत्तपत्रांतून नियमितपणे प्रकाशित होतात. त्यांनी २५०० हून अधिक लेख निवृत्ती नंतरच्या ९ वर्षात प्रकाशित झाले आहेत. या शिवाय मी अनेक टीव्ही वाहिनी आणि संस्थांमध्ये देशाच्या सुरक्षेवर बोलून जन जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
आव्हान अंतर्गत सुरक्षेचे
अनेक वर्षे भारतीय सैन्यात असतांना आम्ही सीमांचे रक्षण केले. मात्र आता सुरक्षेची आव्हाने बदलत आहेत. आता अंतर्गत सुरक्षेमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. प्रत्येक वर्षी मारले जाणाऱ्या भारतीयांची संख्या ही दोन ते अडीच हजार एवढी होती याशिवाय गंभीर जखमी झालेल्या भारतीयांची संख्या ही चार पट जास्त होती. त्यामुळे देशाची प्रगती सुद्धा कमी होत होती. कारण दहशतवादी/ माओवादी हल्ल्यामुळे आपल्या देशाला खूप नुकसान सहन करावे लागते. हजारो कोटीची संपत्ती प्रत्येक वर्ष बरबाद होते. याशिवाय देशद्रोही तत्व मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कोटी रुपयांची खंडणी वसूल करतात. एवढेच नव्हे तर या भागांमध्ये कुठलेही प्रगतीची कामे होऊ देत नाही. त्यामुळे देशाची प्रगती ही अतिशय थंडावली होती.
प्रत्येक नागरिकाने 'सैनिक', गुप्तहेर सायबर योद्धा बनणे अनिवार्य ! आपले सैनिक देशाचे रक्षण करतच आहेत, पण आज अशी स्थिती आहे की नागरिकांनाही शत्रूसोबत लढण्यास सिद्ध राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहणे अनिवार्य झाले आहे. परिणामी शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. त्यामुळे देशात लपून बसलेले दहशतवादी, माओवादी, पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही तर हे देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे.
असे म्हटले जाते की, आपल्याला जर लवकर गुप्त माहिती मिळाली तर आपण शस्त्र सिद्ध होऊन येणाऱ्या धोक्यांना जास्त चांगल्या पद्धतीने सामना करु शकतो. देशामध्ये जात, धर्म आणि इतर अनेक कारणांमुळे एकदम उसळणाऱ्या हिंसाचारामध्ये देशाचे प्रचंड नुकसान होते. जसे कोरेगांव भीमा हिंसाचार किंवा औरंगाबादमध्ये झालेल्या जातीय दंगली.
आपण एक टोल फ्री टेलीफोन तयार करायला पाहिजे ज्यामध्ये कुठलाही सामान्य नागरिक जर त्याच्या आजूबाजूला हिंसाचार होऊ शकतो याची बातमी, या कुठलीही सुरक्षेसंबंधीत माहिती लगेच आपल्या सुरक्षा संस्थांना देईल. त्याचे नाव गुप्त ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर करून अनेक भडकावू पोस्ट किंवा फिल्मस किंवा लेख टाकले जातात. कुठलेही भडकावू किंवा देशद्रोही लिखाण किंवा व्हिडीयो जर सोशल मीडियावरती असतील तर त्यांना शोधायला नागरिकांनी मदत केली पाहिजे. ज्यांनी अशा पोस्ट टाकल्या आहेत त्यांना सोशल मीडियाच्या मोठ्या कंपनीत म्हणजे याहु, गुगल, यु ट्युब वगैरेंचा उपयोग करून पकडले पाहिजे. म्हणूनच आता भारताच्या देशप्रेमी नागरिकांनी सुरक्षा एजन्सीचे कान आणि डोळे बनून आपल्या भागात कुठले पण चुकीचे काम होत असेल तर त्याची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे. कारण देशासमोर असलेली आव्हाने एवढी जास्त आहेत की, केवळ पोलिस किंवा अर्धसैनिक दल यांनी मिळून जरी सोडवली तरी कठीण आहेत. म्हणून आपल्याला पूर्णपणे सोडवायची असतील तर प्रत्येक भारतीयाने यावर ती लक्ष ठेवले तर आपण या आव्हानांना जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. आशा करूया देशभक्त नागरिक आपल्या देशाकरता काहीवेळ नक्कीच खर्च करू शकतील. गेल्या चार वर्षात आपण खूप प्रगती केली आहे. मात्र अजून खूप करायचे बाकी आहे.
माओवादी ग्रस्त जिल्हे पन्नास टक्के घट
कारण माओवादी हिंसाचार हा ७०% कमी झालेला आहे. जो भाग माओवाद्यांच्या हाताखालीच होता त्याची व्याप्ती आता ५०% कमी झालेली आहे. माओवादी ग्रस्त जिल्हे आता पन्नास टक्क्यांहून कमी झालेले आहे मात्र माओवाद संपायला अजून खूप वेळ लागणार आहे.
ईशान्य भारताची बंडखोरी मग ती नागा बंडखोरी असो की मणिपुरी बंडखोरी असो की उल्फा बंडखोरी, जी आसाममध्ये कार्यरत होती ती फारच कमी झाली आहे. बंडखोरीमुळे झालेला हिंसाचार कमी झाल्यामुळे या भागात शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि पर्यटन आणि आर्थिक कारवायीचा वेग हा वाढलेला आहे.
आपण जर देशाच्या इतर भागातील दहशतवादाकडे बघत बघितलं तर असे दिसते की पठानकोट हल्ल्यानंतर देशामध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला हा झालेला नाही. हे खरोखरच सरकारचे यश समजायला पाहिजे. आपली सागरी सुरक्षा ही आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. यामुळे समुद्राकडून कुठलाही हल्ला हा झालेला नाही.
हिंसाचार फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये
आज आपण काश्मीरकडे बघितले की, असे दिसते की लडाख, आणि जम्मू- उधमपूरच्या भागांमध्ये पूर्णपणे शांतता आहे ही शांतता उद्ध्वस्त करण्याकरता पाकिस्तान एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये तोफांचा व बंदुकीची फायरिंग करतो. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याला दहशतवाद्यांना मारण्यामध्ये मोठे यश मिळालेले आहे. २०१७ मध्ये २५० हून जास्त दहशतवादी मारले आहेत. मात्र काही युवक अजून काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांच्या अपप्रचाराला आणि हुरियतच्या अपप्रचाराला बळी पडून अजून सुद्धा दहशतवादाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या भागांमध्ये गरज आहे अशा वाट चुकलेल्या युवकांना हिंसाचाराच्या रस्त्यावरून इतर भारतीयांप्रमाणे सामान्य आयुष्य जगून देशात होणाऱ्या प्रगतीत सामील व्हायचे. नवीन रोजगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे तिथला हिंसाचार कमी होण्याकरता नक्कीच मदत मिळेल.
भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, काश्मीरची फक्त दोन कोटी आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत काश्मीरची लोकसंख्या ही एक टक्क्याहून कमी आहे. हिंसाचार हा फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये होतो, जिथे लोकसंख्या फक्त तीस लाखांच्या आसपास आहे. यामध्ये ही काही तरुण हिंसाचारात भाग घेतात.
म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अतिशय नगण्य. मात्र मीडियामध्ये हिंसाचाराला विनाकारण महत्व दिले जाते. अनेक चांगल्या घटना काश्मीरमध्ये होत आहेत, जसे की झोजिला मधुन होणारा बोगदा जो श्रीनगर आणि कारगिलचे अंतर अतिशय कमी करेल, ज्यामुळे पर्यटन वाढेल. झेलम नदीवर बांधलेले धरणामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये विजेचा तुटवडा कायमचा कमी होईल किंवा वैष्णवीदेवी मध्ये बांधलेला रोपवे, यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटन वाढेल. असा बातम्यांना महत्व द्या, हिंसाचाराला नको.
बांगलादेशी शोधणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य
बांगलादेशी घुसखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आज कोट्यावधी बांगलादेशी भारतामध्ये बसलेले आहेत. अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. म्हणून गरज आहे की, सामान्य माणसांनी आपल्या पोलिसांचे कान आणि डोळे बनून बांगलादेशी कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जर कोणी अवैध बांगलादेशी आलेले असतील तर त्यांना ओळखून ही माहिती आपण आपल्या पोलिसांना दिली पाहिजे तसेच त्यांना पकडण्याकरता मदत करणे गरजेचे आहे. बांगलादेशी आज सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. आशा करूया की नागरिकांच्या मदतीने आपल्याला बांगलादेशींना पकडण्यामध्ये यश मिळेल.
स्मगलिंग/ तस्करी, बेकायदा व्यापार थांबवा
नवीन आव्हाने जी देशांसमोर आहेत ती आहेत एक तर देशाच्या जमिनी सीमा आणि समुद्राकडून होणारे स्मगलिंग किंवा तस्करी यामध्ये खोट्या नोटा, अफू, गांजा आणि अनेक वस्तू देशांमध्ये आणल्या जातात. यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होते. एवढेच नव्हे तर बेकायदा व्यापार सुद्धा केला जातो, जो थांबवणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या समुद्रामध्ये इतर देशांची जहाजे मासेमारी करतात त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान होते हे थांबवणे गरजेचे आहे.
देश महान कसा बनतो
जे देश मोठे होतात त्यांच्या नागरिकांमध्ये काही गुण असतात ते खालील प्रमाणे आहेत.
स्त्रियांचे रक्षण करण्याची प्रवृत्ती, मुलांवरती प्रेम असे गुण असतात. नागरिक कुठेही वक्तशीरपणे जातात आणि त्यांची उत्पादन क्षमता ही चांगली असते ते कुठल्याही हिंसाचारामध्ये भाग घेत नाही आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. यामुळे जर तिथे काही कायदा सुव्यवस्था, माओवादी, दहशतवादी यासारखी कुठलीही घटना होणार असेल तर त्यांचे नक्कीच लक्ष असते.
तिथे एकदा समुद्रीसुनामीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. जगभरातून त्यांना मदत पाठवली जात होती. काही मिडियाचे प्रतिनिधी जिथे मदत वाटप सुरू होते तिथे गेले. त्यांना दिसले की तिथे २ लाईन होत्या. एक लाईन ही छोटी होती आणि एक मोठी होती. प्रश्न पडला की मोठी लाईन कशाकरता आणि छोटी कशा करता? विचारल्यावर असे कळाले की, छोटी लाईन ही ज्या जनतेला मदत पाहिजे त्यांच्या करता आहे. मग पुढचा प्रश्न होता की मोठी लाईन कशा करता? तेव्हा असे कळाले की मोठी लाईन अशा लोकांकरता होती की त्यांना मदत ही मिळालेली आहे परंतु त्यांना मिळालेली मदत त्यांच्या गरजेपेक्षा पुष्कळ जास्त आहे म्हणून ते नागरीक लाईन मध्ये उभे राहून आपल्याला मिळालेली जास्तीची मदत परत करण्याकरता उभे होते. त्यामुळे ती मदत जास्त गरजू लोकांकडे पोहोचू शकली असती. असे आपल्या देशात होईल का?
सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी
लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे सुरक्षा यंत्रणांचे, प्रशासनाचे, न्याय व्यवस्थांचे आणि राज्यकर्त्यांचे काम आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सामान्य माणसाने माओवाद्यांविरुद्ध लढूच नये.
माओ हिसांचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. वर्तमानपत्रातील बातम्या, लेख आणि अग्रलेख बारकाईने वाचून त्यामधल्या माओपूरक वृत्तीला ठोस उत्तर द्यावे लागेल.
परिसंवाद, चर्चा, बौद्धिक कार्यक्रमात भाग घेऊन हिंसाचार फुटीरतावादी चर्चेला आक्षेप घ्यावा लागेल. इंटरनेट, फेसबुक, याहू, ग्रुप्स, ई-मेल, ब्लॉग या चळवळीत सक्रीय भाग घेऊन माओवादी हिंसाचाराविरुद्ध आपला आवाज उठवावा लागेल. हे करण्याकरता निश्चयी मानसिकता तयार करावी लागेल. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? सामान्य नागरिकांची जबाबदारी
१. प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ रोज खर्च करायला हवे.
२. प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरीचे आहे. आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षित होऊ शकतो. माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील.
३. आपल्या मुलांना माओग्रस्त भागाच्या बाहेर शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल. हे ज्यांना शक्य असेल त्यांनी केले पाहिजे.
४. वनमाफिया वर लक्ष ठेवावे. मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचवावी.
५. माओ समर्थकांना आपल्या भागात प्रवेश बंदी करावी.
६. विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ आदिवासी नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी.
७. जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड, स्पेशल पोलीस अधिकारी डिझर्जे म्हणून भरती व्हावे.
८. वनसंपत्तीचे रक्षण करावे. पर्यावरण साक्षरता महत्वाची.
९. अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकारयांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी.
१०. विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना द्यावी.
११. माओवाद्यांनी लावलेल्या भुईसुरूंगाची माहिती पोलीसांना गुप्तपणे द्यावी.
१२. आधुनिक शेतीचा वापर करावा. पिकाची विक्री मोठ्या बाजारपेठेत करावी.
१३. माओवाद्यांमध्ये सामील असलेल्या आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे. माओग्रस्त भागाच्या बाहेरचे नाही.
१४. माओग्रस्त भागाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी. माओ विचारवंत आणि समर्थकांशी वैचारिक लढाई आमने सामने, वृत्तपत्रांना पत्रे लिहून, टीव्हीवर चर्चेत भाग घेऊन करावी.
१५. आपल्या गावात, शहरात माओवाद्यांच्या संघटनांना स्थान देऊ नये.
१६. आदिवासी कल्याण संस्थांना आर्थिक मदत किंवा स्वयंसेवी मदत करण्यास जाणे.
१७. माओग्रस्त भागात अनेक रम्य पर्यटन स्थळे आहेत. ती स्थळे विकसित करावी म्हणजे तिथल्या स्थानिक जनतेला आर्थिक फायदा पुरेपूर होईल. मध्यमवर्गीयांनी पर्यटनाकरता उगाच परदेशात चक्कर मारण्यापेक्षा अशा भागात जाऊन पैसे खर्च करावे.
स्वत:च्या कुटुंबाच्या परिघापलीकडे विचार करण्याची गरज.
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात.
म्हणून आज गरज आहे की पुढचे शंभर वर्ष नागरिकांमध्ये असलेले वाद जे जातीमुळे, धर्मामुळे असो की इतर कुठल्याही कारणाकरता असो ते न करणे आणि सगळ्यांचे लक्ष केवळ देशाच्या प्रगतीवर केंद्रित करणे गरजेचे आहे.
-ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
August 23, 2022
हे मोरया आपणच या संपूर्ण ब्रम्हांडाचे मूल बीजतत्व आहात. हे ईशसूनु अर्थात शिवसुता आपणास वंदन असो.आपण मला प्रसीद अर्थात प्रसन्न व्हावे.
January 20, 2020
सौम्य प्रमाणात मुंग्या येणे अथवा शरीराचा एखादा भाग बधिर होणे हा प्रकार वरचेवर घडत असेल, तर त्यामागचे कारण वेळीच शोधायला हवे. कदाचित मज्जारज्जूच्या शिरांना अपाय झाल्याने असे होऊ शकते. मज्जातंतू मज्जारज्जूतून बाहेर पडतात. थोड्याच अंतरावर त्यातील काही तंतू एकमेकांजवळ येतात व त्या गठ्ठ्याच्या शिरा बनतात. या शरीराच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या भागात कार्य करतात, म्हणून त्यांना पेरिफरल (परिघाच्या बाजूच्या) मज्जारज्जूच्या शिरा (नव्ह्र्ज) म्हटले जाते. या शिरांना अनेक कारणांनी अपाय होणे संभवते. अशा विकारांना पेरिफरल न्यूरोपथी म्हणतात. पेरिफरल नव्ह्र्जमुळे आपला मेंदू आपल्या शरीरातील एकूण एक लहानसहान भागाला जोडला जातो. कोणत्या जागेच्या शिरा आणि किती प्रमाणात अपाय झाला आहे, यावर लक्षणे ठरतात. बहुतेक सर्व प्रकारांत सुरवात सौम्य प्रमाणात मुंग्या येणे व भाग बधिर होणे अशी होते. हळूहळू काही महिन्यांनी अथवा वर्षांनी शरीराचे भाग बधिर होतात. मधुमेह या आजारात पावलात आलेल्या बधिरपणामुळे तेथे जखमा झालेल्या रुग्णांच्या लवकर लक्षात येत नाहीत. तेथे जंतुजन्य दाह झालेलादेखील समजत नाही. पावलात असे घडते, ही गोष्ट अनेक मधुमेही रुग्णांत घडते. शरीराच्या इतर भागातही असे घडू शकते. नजर अस्पष्ट होणे, रक्तदाब उतरणे, मूत्रविरेचनात अडथळे जाणवणे, पोट फुगणे, आतड्यांची हालचाल कमी किंवा जास्त होऊन मलावरोध किंवा पोटात कळा येणे आणि पुरुषांत लैंगिक दुर्बलता येणे, अशा विविध प्रकारचे त्रास रुग्णांना होऊ शकतात. हे पेरिफरल न्यूरोपथीचे आजार होण्याची अनेक कारणे असू शकतात. दीर्घ काळ मद्यसेवन, मधुमेह, शरीरात कोठेही (सुप्तदेखील) कॅन्सरची गाठ निर्माण होणे, मूत्रपिंडे अकार्यक्षम होणे, जीवनसत्त्वे ब 1, ब 6 किंवा ब 12 याचा आहारात अभाव होणे, शिसे जास्त प्रमाणात शरीरात जाणे, मुंग्या येण्यासारखे त्रास ताब्यात आणणे त्यामानाने कठीण असते. हेटेरोसायस्लिक प्रकारची औषधे वेदना ताब्यात आणण्यासाठी उपयोगी असतात. या औषधांचा फायदा औषधे घेण्यास सुरू केल्यापासून काही आठवड्यांनंतरच दिसू लागतो. दीर्घ काळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्ये मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. सर्व प्रकारच्या मद्य-पेयांत इथाईल अल्कॉहॉल नावाचे रासायनिक द्रव्य असते. आपल्या शरीरात यकृतातील पेशीने या इथाईल अल्कॉहॉलच्या रेणूचे विघटन होते व प्रथम ऍसिटाल्डिहाईड नावाचा रेणू तयार होतो.
ऍसिटाल्डिहाईडचे रूपांतर ऍसिटिक ऍसिड या रेणूत होते. ऍसिटिक ऍसिडचे रूपांतर कार्बन-डाय-ऑक्सातईड आणि पाणी या रेणूत होऊन ते शरीराच्या बाहेर टाकले जातात. या सर्व प्रक्रियांना दहा तास लागतात. ऍसिटाल्डिहाईड आणि ऍसिटिक ऍसिड हे रेणू शरीराच्या एकूण एक पेशींना घातकारक असतात.
शरीरात दहा तासांच्या अवधीत हे रेणू संपूर्ण शरीरभर फिरतात. यकृत, मेंदू, हृदयाचे स्नायू, स्वादुपिंड, जठर, लहान व मोठे आतडे, मूत्राशय इत्यादी सर्व अवयवांवर दारूचा दुष्परिमाण होतो. याचबरोबर पेरिफरल नव्ह्र्जच्या पेशीदेखील मृत होतात. परिणामी हात, पाय बधिर होतात. तेथे मुंग्या येणे, वेदना होणे असे त्रास अहोरात्र होतात. हातपाय कमजोर होतात. चालना येईनासे होते. एकदा या मज्जातंतूंच्या शिरा अशा प्रकारे विकारग्रस्त झाल्या की त्या पूर्ववत बऱ्या होतील, असा उपाय अद्ययावत सापडलेला नाही. मूळतःच दारूला स्पर्शही न करणे व घेणाऱ्यांनी तत्काळ पूर्णपणे वर्ज्य करणे अत्यंत आवश्याक आहे. शरीरात कॅन्सरच्या गाठी वाढू लागल्या की त्या पेशींना जीवनावश्यणक तत्त्वे, जीवनसत्त्वे इत्यादी मोठ्या प्रमाणात लागतात. परिणामी, शरीरातील पेशींना त्या कमी पडू लागतात. शिवाय या विकृत पेशी काही द्रव्ये स्रवतात. या द्रव्यांमुळे अन्नपेशींना अपाय होतो. परिणामी, पेरिफरल न्यूरोपथी होते. कधी कधी खुद्द कॅन्सरचा आकार फार मोठा नसतो. त्यामुळे जेथे कॅन्सर होतो त्या जागेवर फारसा त्रास होतही नाही. असा छुपा कॅन्सर जठर, मोठे आतडे, थॉयरॉईड ग्रंथी व श्वारसनलिका येथे असण्याचा संभव बराच असतो. मूळ कॅन्सर काढून टाकला की या पेरिफरल न्यूरोपथीचे त्रास शमू लागतात. मूत्रपिंडांचे कार्य नीट होत नसल्यास शरीरात बरेच बदल होतात. महत्त्वाच्या क्षारांची पातळी योग्य राहत नाही.
मूत्रपिंडाचे कार्य पुन्हा व्यवस्थित झाल्याखेरीज ही तक्रार जाऊ शकत नाही. काही जड धातूंचे रेणू शरीरात गेल्यास त्यांच्या अपायामुळे पेरिफरल न्यूरोपथी होतो. सुवर्ण, चांदी, पारा, आर्सेनिक किंवा शिसे अशा धातूंचे रेणू अपायकारक असतात. आपण सेवतो त्या औषधांत रासायनिक पृथक्कणरणाच्या परीक्षणातून असली द्रव्ये नाहीत याची खात्री करून मगच कोणतेही औषध घ्यावे. काही जीवनसत्त्वे मज्जापेशींच्या कामाला अधिक महत्त्वाची असतात. जीवनसत्त्व ब संकुलातील ब 1, ब 6 व ब 12 ही विशेष महत्त्वाची असतात. त्यांचा आहारातील अभाव हे पेरिफरल न्यूरोपथीचे कारण असते. पॉलिश्डा भातच खाणे, मैदा खाणे, दूध न घेता इतर आहार पूर्ण शाकाहारी असणे, अशा कारणांतून हे अभाव निर्माण होतात. आपल्या रक्तवाहिन्यांवर स्वतःच्या शरीरात स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध निर्माण झालेल्या प्रतिपिंडाचा दुष्परिणाम होतो. या आजाराला पेडिआर्टरायटिस नोडिसा म्हणतात. या आजारात मज्जातंतूंना जाणाऱ्या रक्तवाहिन्यांत दोष निर्माण झाल्याने पेरिफरल न्यूरोपथी होतो. थॉयरॉईड ग्रंथीच्या आजारातदेखील पेरिफरल न्यूरोपथी होते. पेरिफरल न्यूरोपथी हे अनेक विकारांचे लक्षण असते. कारण शोधून मगच खरा इलाज होऊ शकतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई
January 6, 2017
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 24, 2018
संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत.
April 15, 2021
जगभरात नेहमी आढळणारी व सर्व वयोगटातील लोकांची तक्रार म्हणजे घसा दुखणे. या दुखण्यामागची कारणे पण अनेक आहेत. सर्दीसायनसपासून कॅन्सरपर्यंत अनेक प्रकारच्या आजारात घसा दुखू शकतो. या बाबतीत योग्य निदान, वेळ न दवडता होणे महत्त्वाचे असते व त्याबरोबरच डॉक्टुरांकडून रुग्णाची काळजीपूर्वक तपासणी होणेदेखील महत्त्वाचे असते. घशात खूप वेदना जाणवणे, घसा कोरडा पडणेखवखवणेखाज सुटणे ही वरवर दिसणारी लक्षण आहेत. या आजारात काही रुग्णांचा कानही दुखू शकतो. अनेक लोकांना तोंड उघडे ठेवण्याची सवय असते. त्यामुळे श्वा सामुळे घसा कोरडा पडू शकतो. जिवाणू किंवा जिवाणूजन्य दाह, ऍलर्जी, अति प्रदूषण, अति धूळ किंवा घरात कचरा सांडणे, सिगारेटचा धूर, उदबत्तीचा उग्र वास किंवा उदबत्तीचा धूर, अति मोठ्याने बोलणे, घट्ट कॉलरचा शर्ट किंवा घट्ट टाय वापरणे, घशाला इजा होणे, घशाचा कॅन्सर, शरीरातील बिघाड किंवा काही प्रकारचे आजार; तसेच काही शस्त्रक्रिया किंवा तपासण्यांनंतर घसा दुखू शकतो. अतिरेकी मद्यपान, धूम्रपान, नाकाघशातून धूर जाणे, ऍसबेस्टॉस किंवा रासायनिक कारखान्यांमध्ये किंवा भट्टीजवळ काम करणे यामुळेसुद्धा घशाचे आजार संभवतात.
घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे ऍलर्जीक ऱ्हायनायटिस.
अनेकांना ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.
जे धूम्रपान करीत नाहीत, (passive smoking) त्यांनाही त्रास होऊ शकतो.
डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.
काही औषधांमध्ये उदा सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टारांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.
योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.
काही रुग्णांना घशात गाठ असण्याची भावना होऊ शकते. आवाज बसतो, स्वरयंत्रणेचा दाह होतो, स्वरयंत्रणेच्या कूर्चा सूजतात.
अगदी घरगुती उपचारांमध्ये वाफारा घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे करता येते.
विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.
मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, प्लिहा सूजणे, अति लाळ गळणे असा त्रास होत असल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घेणे हितकारक असते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 25, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti