(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्लास्टिकला घटकद्रव्यांमुळे मजबुती

    ॲक्रिलोनायट्रिल ब्युटाडाइन स्टायरिन या मिश्र प्लास्टिकचा शोध १९४८ साली यामध्ये असलेल्या लागला. अॅक्रिलोनायट्रीलमुळे त्याला उच्च ताण सहन करण्याची शक्ती, रसायनांना विरोध करण्याची शक्ती व उष्णतेला टिकून राहण्याची शक्ती हे गुणधर्म प्राप्त झाले. यामध्ये आलेल्या ब्युटाडाइन या रबरामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्ती व मजबुती वाढली व स्टायरिन या घटकद्रव्यामुळे प्लास्टिक अधिक चकचकीत दिसते आणि त्यापासून वस्तू बनवणे सोपे झाले.

      October 29, 2023


  • पक्षीपरिचय २२

      October 10, 2015


  • कसोटी रक्कम हाताळणीची

    बँकांमधील सर्व कार्यपद्धतीचा अनुभव घेण्याचे भाग्य मला लाभले ते 1984 साली जेव्हा मला  पंजाब नॅशनल बँकेत नोकरी मिळाली तेव्हा. त्याकाळी क्लार्क-कम-टायपिस्ट आणि क्लर्क-कम-कॅशियर अशी वेगवेगळी पदे भरली जायची. कॅशियरचे काम करतांना विशेष भत्ता दिला जातो. मी टायपिस्टचे काम करत असताना रोखपालाचे काम करण्याची वेळ फारशी आली नाही,

      May 8, 2023


  • इराकची निर्माती आणि अरेबियाची अनभिषिक्त सम्राज्ञी’ – गरटूड बेल

    इंग्लंडच्या गरटूड बेल या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची ओळख आपण स्वतःला कशी करून द्यावी, असा प्रश्न मला पडतो. जगप्रवासी, राजकारणपटू, मानववंशशास्त्रज्ञ, कवयित्री, भाषातज्ज्ञ, गिर्यारोहक, फोटोग्राफर आणि ‘लॉरेन्स ऑफ अरेबियन’ची म्हणजे टी.ई. लॉरेन्स याची हितचिंतक आणि त्याला वैचारिक बळ व दिशा देणारी त्याची मैत्रीणही ती होती!

      January 23, 2024


  • मौखिक आरोग्य दिवस

    जेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.

      March 20, 2022


  • ग्लूटेन फ्री डायटचा गवगवा!

    ग्लूटेन फ्री डायट हे नाव आता आपल्याला नवीन राहिलेले नाही. तरीही ज्यांना याविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी थोड्क्यात सांगतो. ग्लूटेन हे गहू, जव आणि नाचणी यांसारख्या धान्यांत सापडणारे एक प्रोटीन असते. काहीजणांना ते न पचल्याने अनेक त्रास होतात; पैकी सगळ्यात मोठा त्रास म्हणजे Celiac disease. या रोगात ग्लूटेनयुक्त पदार्थ न पचल्याने लहान आतड्यांना इजा पोहचणे, अंगावर रॅशेस येणे वगैरे लक्षणं दिसतात. परिस्थिती गंभीर झाल्यास लहान आतड्यांच्या कर्करोगाचीदेखील शक्यता असते असे सांगितले जाते.

    आधुनिक शास्त्रात यावर इलाज म्हणून जन्माला आलेली संकल्पना म्हणजे ग्लूटेन फ्री डायट. अर्थात ज्या पदार्थांत ग्लूटेन आहे ते टाळणे आणि त्याचे पर्याय शोधणे. थोड्क्यात; आहारातून गहू, जव इत्यादि गोष्टी हद्दपार करणे. आता या ग्लूटेन फ्री डायटबाबत आयुर्वेदाचा दृष्टिकोन जाणून घेऊ.

    १. एखादा पदार्थ पचत नसल्यास तो टाळणे हा मार्ग नसून तो कसा पचेल यावर विचार करणे हे अधिक योग्य ठरते. थोड्क्यात आयुर्वेदानुसार सांगण्यात आलेला 'अग्निविचार' हा याठिकाणी महत्वाचा आहे.

    २. ग्लूटेन फ्री डायटच्या दुष्परिणामांतील सर्वात प्रमुख म्हणजे पोषणमूल्यांची कमतरता आहे असे आधुनिक आहारशास्त्रच सांगते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.

    ३. ग्लूटेनची समस्या प्रामुख्याने ब्रेडसारख्या बेकरी उत्पादनांत मोठी असून त्यामागे किण्वीकरण प्रक्रियेचा मोठा हात आहे हे लक्षात घेणे महत्वाचे. भारतासारख्या देशातील पोळी/चपाती, दलिया यांसारख्या गव्हाच्या पदार्थांना तोच न्याय लावणे योग्य होणार नाही. याकरताच मी शीर्षकात 'गवगवा' हा शब्द वापरला. ग्लूटेन फ्री डायट ही संकल्पना सध्या आपल्या देशात जोमाने रुजू पाहत आहे. हे चित्र समाधानकारक नक्कीच नाही.

    ४. ज्यांना पोळी/चपाती पचायला जड जाते त्यांनी ग्लूटेन फ्री डायटच्या मागे न लागता भाकरी वा थेट निखारे अथवा गॅस बर्नरवर भाजलेले फुलके यांचा आहारात समावेश करावा. तसेच जेवताना पिण्यासाठी गरम पाणी वापरावे.

    ५. आयुर्वेदीय उपचार आणि आहारातील नाममात्र पथ्ये यांच्या सहाय्याने 'ग्लूटेन फ्री डायट' पासून 'फ्री' राहण्यास मदत होते. त्यामुळे चपाती पचत नाही म्हणून लगेच आपल्याला ग्लूटेन फ्री डायटच हवे असा गैरसमज करून घेऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आयुर्वेदाने गहू हे धान्य 'संधानकर' म्हणजे शरीराला जोडणारे/ बळकटी देणारे सांगितले आहे. पंजाबसारख्या प्रचुर मात्रेत गहू पिकवणाऱ्या राज्यातील नागरिकांची शरीरयष्टी याची साक्षच नाही का? त्यामुळे एखाद्या संकल्पनेमागे वाहवत जाऊन उत्तम पोषक अन्न खाण्याच्या आनंदाला मुकू नका!

    © वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
    आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
    ।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
    संपर्क: ०२५१-२८६३८३५

      December 1, 2016


  • विडा घ्या हो नारायणा – भाग ६

    पानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे.

      July 7, 2017


  • विसरलेला काळ

    आज सिमेंट च्या जगलात माणूस नुसता कोडातलाय त्याला रात्र न दिवस फक्त आणि फक्त पैसा एके पैसा च दिसतो बारा बारा तास काम करून येऊन साधी झोप पण नीट घेईना झालाय आजच माणूस.

      March 14, 2019


  • खदिर / खैर

    खदिर / खैर

    खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो.हा कडू, तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.

      January 2, 2018


  • श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – १४

    त्या चरणकमलांच्या अत्यंत व्यापक विशाल स्वरूपाचे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री सादर करतात. ते म्हणतात,

      December 17, 2020