वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बहुचर्चित रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाचा निकाल अखेर लागला आणि अख्ख्या देशातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. सुदैवाने या निर्णयाचे सर्व स्तरांमध्ये शांततेने स्वागत झाले. या निर्णयात न्यायालयाने भक्ती आणि भावनांचा अधिक विचार केल्यासारखे वाटते. तसेच वादग्रस्त जागेवर पूर्वी मंदिर होते असे सांगण्यापेक्षा रामाचा जन्म त्याच ठिकाणी झाला असे सांगणे संयुक्तिक वाटत नाही.
October 6, 2010
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 19, 2019
आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही.
April 23, 2017
एलियनचा जन्म 6 डिसेंबर 1917 रोजी मारसेलीस फ्रांस येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई स्पॅनिश होती. तिचे शिक्षण ब्रिटन व स्पेन मध्ये झाले. तिचे इंग्रजी फ्रेंच, स्पेनिश भाषेवर प्रभुत्व होते. ग्रॅजुएशन झाल्यावर ती लिनसेसटर येथे कपड्याच्या व्यापारासाठी गेली.
July 14, 2023
वेदकालीन शिल्पकार समाज शोधण्यासाठी वैदिक वाङमयाव्यतिरिक्त अन्य मार्ग नाही. सिंधू संस्कृतीचा कालखंडही साधारण वैदिक काळाच्या जवळपासचाच गृहित धरल्या जातो. त्यामुळे उत्खननातील पुरावेही शिल्पकारांची माहिती पुरवितात परंतु उत्खननातून उपलब्ध झालेली माहिती वैदिक समाजजिवनाचीच आहे, याबाबत निर्णायक मत अजूनपर्यंत तरी कोणी देऊ शकलेले नाही. काही समान तथ्यांचा केवळ आधार घेतला जातो. प्रस्तुत लेखकाने प्रचलीत धारणांचाच आधार घेऊन वेदकालीन विश्वकर्मा समाजाची स्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
February 4, 2026
इतर मागासवर्गीयांना उच्च शिक्षणसंस्थांमध्ये घटनेतील तरतुदीनुसार 27 टक्के आरक्षण देण्याची घोषणा मानव संसाधन विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी केली आणि संपूर्ण देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अर्जुनसिंगांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आरक्षण विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
May 21, 2006
आरशात बघितलं की लगेचच आपण प्रथम केस ठिक करतो. बाजारात कॉस्मेटिक्सच्या उत्पादनांपैकी निम्म्याच्या आसपास उत्पादने केसांसाठी असतात. मनुष्य काय काय करु शकतो, काय काय कमाऊ शकतो आणि काय काय गमाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देता येतील.
October 30, 2010
आजची औषधी : गुडूची (गुळवेल)
● गुळवेल ही सर्व वयोगटात अनेक रोगांवर गुणकारी आहेच. शिवाय निरोगी व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारशक्ती आणि आयुष्यमान वाढवणारी वनस्पती आहे. म्हणुनच , आयुर्वेदात हिला अमृता म्हटले आहे.
● गुळवेल हे तापावरचे सर्वोत्तम व खात्रीलायक औषध आहे.
● बरेच दिवस अंगात राहणारा बारीक ताप , कणकण , अंगदुखी असल्यास गुळवेलीच्या काड्यांचा काढा दररोज दोन वेळा प्यावा.
● मुदतीचा , साथीचा मोठा ताप व त्या नंतर येणारी सांधेदुखी (उदा. चिकूनगुनिया) यामध्येही याच गुळवेलीचा काढा उपयुक्त आहे.
● गुळवेल पचनशक्ती वाढवते. त्यामुळे अजीर्ण , आमवात , जुलाब आणि पचनाशी संबंधित सर्वच तक्रारींवर गुळवेल गुणकारी आहे.
● आमवात , संधिवात अशा कोणत्याही सांधेदुखीमध्ये गुळवेल आणि थोडीशी सुंठ यांचा काढा रोज अगदी नियमित घ्यावा.
● गुळवेलीचे स्वच्छ पांढरे , भस्मासारखे बारीक सत्व मिळते. हे गुळवेल सत्व क्षयरोगासारख्या जुनाट रोगातही उपयुक्त आहे. ते तूप व खडीसाखरेसोबत घ्यावे.
● पित्ताधिक्य असणार्या काविळीमध्ये गुळवेलीच्या पानांचा 20 ते 30 मिली रस खडीसाखरेसोबत रोज घ्यावा.
● ताप नसतानाही तळहात-तळपाय , डोळे यांची आग , जळजळ होणे किंवा जास्त घाम येत असल्यास गुळवेलीचा रस नियमित घ्यावा.
● सांध्यांजवळ लहान-मोठ्या गाठी होऊन उद्भवणार्या वातरक्त नावाच्या सांधेदुखीच्या प्रकारात गुळवेल , शिलाजीत , गुग्गुळ , इ. असणार्या औषधांचा उत्तम परिणाम मिळतो.
● मधुमेहामध्ये गुळवेलीचा स्वरस मधाबरोबर घ्यावा.
● गुळवेल वातरोगांमध्ये तुपातून घ्यावी. पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेत गुळासोबत घ्यावी. पित्त शमनासाठी खडीसाखरेसोबत , कफाच्या रोगांमध्ये मधातून , आमवातात सुंठीसोबत घ्यावी. अशा अनुपानांचा वापर केल्यास गुळवेल अधिक उपयुक्त ठरेल.
● त्वचेवरील सुरकुत्या , केस गळणे - पिकणे , अशा अकाळी येणार्या वार्धक्याच्या खुणांवर गुळवेल खरोखरच अमृताप्रमाणे काम करते.
● गुळवेल ज्या झाडावर वाढली असेल , त्या नुसार तिचे गुणधर्म थोडेफार बदलतात. कडुनिंबावरची गुळवेल औषधोपचारांमध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते.
[ टीप - सर्वच आजार केवळ प्रथमोपचारांनी बरे होत नाहीत. कोणत्याही आजारासाठी कोणताही उपचार घेताना तज्ज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. ]
डॉ. अमेय गोखले ,
रत्नागिरी.
9422662772.
(05-05-2017)
August 16, 2017
काळा पैसा आणि चलनी नोटांमधील अफरातफरी रोखण्यासाठी भारत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या १००० आणि ५०० रूपयांच्या चलनी नोटा ३० डिसेंबर २०१६ नंतर बंद होणार आहेत. त्यामुळे आता १००० आणि ५०० रूपयांच्या जून्या नोटा यापूढे चलनात राहणार नाहीत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६च्या रात्री हा निर्णय जाहीर केला. आता २००० आणि ५०० च्या नवीन नोटा बाजारात येणार आहेत.
November 17, 2016
1920मध्ये कसोटी क्रिकेट पुनरुज्जीवित झाले तेव्हा वॉरन वयाच्या पस्तिशीत होता. त्याचा धडाका नंतर टिकला नाही. एका कसोटीत दोन शतके काढणार्या या फलंदाजाला आपल्या कारकिर्दीतील पुढच्या शतकासाठी तब्बल 17 वर्षे वाट पाहावी लागली.
August 10, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti