नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र!
गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, "सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने सुभाषचंद्र बोस भारतावर चालून आले, तर ना गांधी ना नेहरु ना काँग्रेस, कुणीही देशाला चुचकारु वा समजावू शकणार नाही"! काय अर्थ निघतो ह्या ओळींचा?
क्रमांक १, सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ नंतरही जिवंत होते. हे तर उघडच आहे. पण यातून निघणारा दुसरा अर्थ जास्त घातक आहे मित्रांनो. नेताजी जर उद्या भारतावर चालून आले तर सैन्य त्यांना मदत करेल व त्यावेळी देशाला गांधी, नेहरु व काँग्रेस यांच्यापैकी कुणीच समजावू शकणार नाही. काय समजवायचं होतं त्यांना? आणि कुणाच्या बाजूने?
इंग्रजांच्या व्हाईसरॉयला पत्र पाठवलंय, याचा अर्थ इंग्रजांना समजवायचं तर नव्हतंच. तसं पत्रात स्पष्ट लिहिलंय "देशाला समजावू शकणार नाही". यातून ध्वनित होणारा अर्थ उघड आहे की, "मायबाप इंग्रज सरकार काहीतरी करा. आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. पण उद्या जर का सुभाषबाबू चालून आले, तर मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही". आम्ही म्हणजे कोण? तर गांधी, नेहरु व सर्व काँग्रेस! तशी स्पष्ट नावं घेतली आहेत पत्रात. आणि काय समजावणार, तर नेताजी चूक आहेत व इंग्रज सरकारच बरोबर आहे. ते इतके दिवस हेच सांगत आलेले असले पाहिजेत, म्हणूनच तर "नेताजी चालून आल्यावर" समजावून सांगू शकत नाही म्हणताहेत ना!
किती हा नीचपणा! सरळसरळ देशद्रोह आहे हा. आणि ही मंडळी आजवर आमच्या देशाचे नेते म्हणून मिरवत आली. जिथंतिथं विराजमान होत आली. आम्हीच काय तो स्वातंत्र्यलढा लढल्याची फेकाफेक करत आली. प्रत्यक्षात ह्या फाईलवरुन दिसतंय की, ही सगळीच मंडळी इंग्रजांची एजंट होती! एजंट!! ब्रिटीशांना माहिती पुरवणारे आणि योग्य वेळी ब्रिटीश सरकारचं रक्षण करणारे एजंट!!
काँग्रेसला हल्ली ट्विट करताना जो शब्द आवडतो ना, तो होती ही मंडळी - ट्रेटर!! आणि केवळ एवढं एकच पत्र नाहीये बरं का. याच फाईलमध्ये नेताजींनी नभोवाणीवरुन केलेली भाषणेसुद्धा उघड झाली आहेत.
१ जानेवारी १९४६ यादिवशी केलेल्या ह्या भाषणात ते गांधींना टोमणा मारतात, "अहिंसेने कधीच स्वातंत्र्य मिळत नसते"!
२६ डिसेंबर १९४५ यादिवशी नेताजी म्हणतात, "मी परत आलो की, माझ्या लोकांवर खटले भरणाऱ्या सगळ्यांचाच निवाडा करेन". नेताजींचे हे वाक्य उपरोक्त पत्रासंदर्भात वाचले की आपोआप कळते, नेताजींना अज्ञातवासात राहायला इंग्रजांनी भाग नाही पाडलं, तर त्यांच्या जीवावर उठणारे तथाकथित 'आपले'च लोक होते!!
नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र!
गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, “सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने सुभाषचंद्र बोस भारतावर चालून आले, तर ना गांधी ना नेहरु ना काँग्रेस, कुणीही देशाला चुचकारु वा समजावू शकणार नाही”! काय अर्थ निघतो ह्या ओळींचा?
क्रमांक १, सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ नंतरही जिवंत होते. हे तर उघडच आहे. पण यातून निघणारा दुसरा अर्थ जास्त घातक आहे मित्रांनो. नेताजी जर उद्या भारतावर चालून आले तर सैन्य त्यांना मदत करेल व त्यावेळी देशाला गांधी, नेहरु व काँग्रेस यांच्यापैकी कुणीच समजावू शकणार नाही. काय समजवायचं होतं त्यांना? आणि कुणाच्या बाजूने?
इंग्रजांच्या व्हाईसरॉयला पत्र पाठवलंय, याचा अर्थ इंग्रजांना समजवायचं तर नव्हतंच. तसं पत्रात स्पष्ट लिहिलंय “देशाला समजावू शकणार नाही”. यातून ध्वनित होणारा अर्थ उघड आहे की, “मायबाप इंग्रज सरकार काहीतरी करा. आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. पण उद्या जर का सुभाषबाबू चालून आले, तर मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही”. आम्ही म्हणजे कोण? तर गांधी, नेहरु व सर्व काँग्रेस! तशी स्पष्ट नावं घेतली आहेत पत्रात. आणि काय समजावणार, तर नेताजी चूक आहेत व इंग्रज सरकारच बरोबर आहे. ते इतके दिवस हेच सांगत आलेले असले पाहिजेत, म्हणूनच तर “नेताजी चालून आल्यावर” समजावून सांगू शकत नाही म्हणताहेत ना!
किती हा नीचपणा! सरळसरळ देशद्रोह आहे हा. आणि ही मंडळी आजवर आमच्या देशाचे नेते म्हणून मिरवत आली. जिथंतिथं विराजमान होत आली. आम्हीच काय तो स्वातंत्र्यलढा लढल्याची फेकाफेक करत आली. प्रत्यक्षात ह्या फाईलवरुन दिसतंय की, ही सगळीच मंडळी इंग्रजांची एजंट होती! एजंट!! ब्रिटीशांना माहिती पुरवणारे आणि योग्य वेळी ब्रिटीश सरकारचं रक्षण करणारे एजंट!!
काँग्रेसला हल्ली ट्विट करताना जो शब्द आवडतो ना, तो होती ही मंडळी – ट्रेटर!! आणि केवळ एवढं एकच पत्र नाहीये बरं का. याच फाईलमध्ये नेताजींनी नभोवाणीवरुन केलेली भाषणेसुद्धा उघड झाली आहेत.
१ जानेवारी १९४६ यादिवशी केलेल्या ह्या भाषणात ते गांधींना टोमणा मारतात, “अहिंसेने कधीच स्वातंत्र्य मिळत नसते”!
२६ डिसेंबर १९४५ यादिवशी नेताजी म्हणतात, “मी परत आलो की, माझ्या लोकांवर खटले भरणाऱ्या सगळ्यांचाच निवाडा करेन”. नेताजींचे हे वाक्य उपरोक्त पत्रासंदर्भात वाचले की आपोआप कळते, नेताजींना अज्ञातवासात राहायला इंग्रजांनी भाग नाही पाडलं, तर त्यांच्या जीवावर उठणारे तथाकथित ‘आपले’च लोक होते!!